एआय आणि उत्पादकता
आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
माझी कन्या शाळेत असताना बर्याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्यापैकी पुढे होती. बौद्धिक आणि शारीरिक चापल्याचा घनिष्ट संबंध असल्याचे विज्ञानाने आता मान्य केला असल्याने माझ्या या जुजबी निरिक्षणांमध्ये शास्त्रीय तथ्य असल्याचे नंतर लक्षात आले.
हा गंमतीदार ’अभ्यास’ सांगायचा उद्देश असा की नवे तंत्रज्ञान आल्यावर जे अगोदर धावत सुटतात, ते त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा उठवतात. चॅटजीपीटीचे लोकार्पण झाल्यापासून मी रोज या तंत्रज्ञानाविषयी येणार्या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. जवळजवळ ३ महिने गेल्यानंतर भारतीय ब्लॉगर्सनी ए०आय०ची दखल घ्यायला सुरुवात केली. सांगायचा मुद्दा, आपण याही खेपेला नव्या तंत्रज्ञानाला संगणकाच्या आगमनाच्या वेळी दिला तसा थंडा प्रतिसाद दिला (हे अर्थात माझे वैयक्तिक मत आहे).
ए०आय० किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता हे असे तंत्रज्ञान आहे की ज्याने आजवर निर्माण झालेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात जास्त गुंतागुंतीचा प्रभाव मानवी जीवनावर टाकला आहे. ’बृह्त्भाषा प्रतिकृती’ (लार्ज लॅंग्वेज मॉडेल) अवतीर्ण होण्यापूर्वीच अनेक जणांनी धोक्याच्या घंटा वाजवायला सुरुवात केली होती. पण "मग सावकाश बघू" या धारणेमुळे बहुसंख्य लोकांनी या इशार्यांकडे दूर्लक्ष केले.
आज भारतीय माध्यमातून ए०आय० बद्दल जे लिहीले किंवा दाखवले जाते, त्यात मला नकारात्मक सूर जास्त सापडतो. मराठीत पण ए०आय० बद्दल बोलणारे अनेक मातब्बर तज्ज्ञ ए०आय० कसा वापरावा याबद्दल अवाक्षर न काढता धोक्यांबद्दलच जास्त बोलताना दिसतात. विशेषत: अलिकडे अमेरीकेतील एम०आय०टी०ने मेंदू निष्क्रिय होण्याबद्दल इशारा देणारा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे, असे मला वाटते. कारण प्रत्यक्षात अनेक लोकोत्तर तंत्रज्ञानांच्या आगमनावेळी असे इशारे देण्यात आले होते. उदा० इमेल तंत्रज्ञन आले तेव्हा लोकांना हाताने पत्र लिहीणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व वाटू लागले होते. तसेच इमेलमध्ये भावनिक ओलावा नाही म्हणून नाक मुरडले जायचे. अनेकजण मी इमेल बघत नाही, इंटरनेट वापरत असे अभिमानाने सांगायचे. पण नंतर इमेलने आणि संदेशनातील नंतरच्या प्रगतीने मानवी आयुष्य किती व्यापले हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे ही नकारात्मता जर अशीच कुरवाळली गेली तर तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणून पण भारत मागे पडेल अशी मला भीति वाटते. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अस्तित्त्वाला धक्का देणार्या, सर्व उपकारक आणि अपकारक तंत्रज्ञानांशी शेवटी मनुष्यप्राण्याने असे ना तसे जुळवून घेतले. ज्यांनी जुळवून घेतले नाही त्यांचे अस्तित्व अर्थातच धोक्यात आले.
मी ए०आय० कडे कसे बघतो?
"उत्पादकता वाढवणारा एक जीवलग सखा" अशी माझी ए०आय० बद्दलची धारणा आहे. असा किंवा अशासारखा सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तरच ए०आय०चा जास्तीत लाभ मिळवून उत्कर्ष साधता येईल असे माझे स्पष्ट मत आहे.
समजा तुम्हाला अल्पमोली, आखुडशिंगी, बहुदुधी अशी गाय एखाद्याने आणून दिली तर ती तशी खरोखर आहे का हे अधूनमधून तपासणे ही किमान जबाबदारी मालक म्हणून तुम्ही पार पडणे आवश्यक आहे. तात्पर्य, नोकर कितीही विश्वासू असला तरी किमान देखरेख ही ठेवावीच लागते. ए०आय० बाबत पण नेमके तसेच आहे.
ए० आय० कडून १०० टक्के अचूक उत्तरांची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने अनेक जण ओशाळताना दिसतात. पण ए०आय०ची थापेबाजी आता खुपच कमी/नगण्य झाली आहे. पण तरीही शंका आल्यास किंवा पुरेशी काळजी घेण्यासाठी एकच प्रश्न एकाच वेळेला, वेगवेगळ्या वेळेला, भाषा बदलून एकापेक्षा अधिक ए०आय० ना विचारल्याने विश्वासार्ह उत्तरे मिळायची शक्यता वाढते. तसेच एका ए०आय०ने दिलेले उत्तर दुसर्या ए०आय०कडुन तपासून घेता येते.
बर्याच ए०आय० सेवा देणार्या कंपन्यांनी माफक सेवाशुल्कात भारतात सेवा देणे चालू केले आहे. ज्याना शक्य आहे त्यांनी अशा सशुल्क सेवांचा अवश्य फायदा उठवला पाहिजे. हे पैसे आपली "उत्पादकता" वाढल्याने नंतर लगेच वसूल होतात.
एक ताजे उदाहरण-
मी शेअर बाजारातला एक छोटा गुंतवणूकदार आहे. मला कुणाचे सल्ले न घेता गुंतवणूक करायला आवडते. पूर्णपणे स्वत:च्या भरवशावर शेअरबाजारात गुंतवणूक करताना दोन गोष्टींचे पथ्य पाळावे पाळावे लागते - एक म्हणजे समभागाचे तांत्रिक विश्लेषण (technical analysis) आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या उद्योगाचे पायाभूत विश्लेषण (fundamental analysis).
नैसर्गिक देणग्यांमुळे (पॅटर्न शोधणे) आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे तांत्रिक विश्लेषणामध्ये मी ए०आय०च्या मदतीने अभ्यास करून बर्यापैकी प्रावीण्य मिळवले, पण पायाभूत विश्लेषण करण्यात मी कमी पडत होतो. ही उणीव भरून काढायला मला ए०आय० ची होत असलेली मदत अनन्यसाधारण आहे.
वेगाने व्यवसायात प्रगती करणार्या कंपन्या ओळखणे हे माझ्यासारख्या अनेकांना आह्वानात्मक असते. सर्वच लोकाना कंपन्यांचे ताळेबंद आणि त्यावरुन योग्य ते निष्कर्ष काढणे किंवा कंपनीच्या भविष्याविषयी अंदाज बांधणे जमत नाही. साहजिकच या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मी ए० आय० लाच प्रश्न विचारला -
"Help me to find good low valued stocks which have promising future in Indian markets. Suggest some strategies."
मला त्याने समभागांचे संख्यात्मक (ऐतिहासिक कामगिरी) आणि गुणात्मक विश्लेषण कसे करायचे याबद्दल काही सूचना केल्या. यातील संख्यात्मक विश्लेषण करण्यासाठी आज असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. पण समभागाच्या गुणात्मक विश्लेषणात त्याने - व्यवस्थापनाची गुणवत्ता (Management Quality), कंपनीची व्यवसायात स्पर्धात्मक आघाडी (Competitive Advantage), व्यवसायाचे भवितव्य (Growth Prospects) हे निकष तपासण्यास सांगितले. आता मुख्य समस्या अशी की माझ्या वैयक्तीक मर्यादांमुळे मला एखाद्या कंपनीचे असे ’गुणात्मक विश्लेषण’ अजुनही जमत नाही. त्यामुळे मी अर्थातच पुढचा प्रश्न विचारला -
"How to find out about management quality of a company?"
यावर जेमिनी या ए०आय०ने मला एक लांबलचक निकषांची यादी दिली. ती बघितल्यावर यात थापा नाहीत याची खात्री करण्यासाठी एका दुसर्या (डीपसिक) ए०आय०ला ही यादी तपासायला सांगितले आणि आवश्यक असेल तर भर टाकायला सांगितले. मला तात्काळ कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा ठरवणार्या निकषांची सुधारित आणि अंतिम यादी तयार करून मिळाली.
मी ग्रोक या ए०आय० ची सशुल्क सेवा वापरतो. वरील यादीतील निकष वापरून कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, तसेच व्यवसायाचे भवितव्य यावर पुन:पुन: माहिती मिळावी यासाठी ग्रोकमध्ये कायम स्वरूपी सूचना देता येतात. हा सर्व उद्योग केल्यावर मग प्रत्यक्ष चाचणीसाठी माझ्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ गडगडलेले आणि चांगली कामगिरी करत असलेले समभाग तपासले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. ग्रोकने दिलेली उत्तरे ~१००% अचूक होती.
माझ्या ऐकीव माहीतीनुसार प्रसिद्ध तत्त्वज्ञ विट्जेन्स्टाइन असे म्हणत असे - माणसाचे जग किती मोठे तर त्याच्या भाषेच्या वापरा एव्हढे. तसेच कितीही नाही म्हटले तरी माणसाची सुबत्ता त्याच्या घरातील नोकरचाकरांच्या संख्येवर, दारातील गाड्यांच्या संख्येवर ठरते. लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.
लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.यांतनं एक प्रश्न उपस्थित होतो. समजा मी तुमच्या माहितीचा ग्राहक आहे. माहितीचा ओघ तुमच्याकडून माझ्याकडे वाहतोय. तुम्ही कृबु वापरून काही माहिती गोळा केली व मला दिली. ती माहिती आता मी वाचणार. यांत तुमचा मेंदू कमी काळ व्यग्र ( = एंगेज्ड ) होता. कारण की कृबुने तुमच्या कामाचा बराचसा भार उचलला. पण मला मात्र पूर्ण लक्ष देऊन माहिती वाचावी लागणार. माझा मेंदू पूर्णवेळ व्यग्र राहणार. हे थोडं अस्थायी वाटंत नाही का ? हा एक प्रकारचा अन्याय आहे. हाच प्रश्न मी माझ्या एका मित्रास विचारला. तो म्हणाला की 'बिनडोक' माहितीचा वापर 'डोक्याने' करावा लागेल असं स्वप्नांतही वाटलं नव्हतं. कुठे नेऊन ठेवलंय हे जग माझं. मी म्हंटलं की कृबुने 'बिनडोक' या शब्दाची व्याख्याच बदलून टाकलीये. हीच मोठी प्रगती नव्हे काय? मग आम्ही दोघेही जोरजोरात हसू लागलो. बाकी, विनोदाचा भाग वगळता यावर पुढे काही चर्चा करता येईल काय? आ.न., -गा.पै. अवांतर : विट्जेनस्टेईन ( = विज्जेनस्टेईन ) चं नाव जरा सांभाळून घ्या बरंका. मी तुमच्या ज्ञान वा समज यावर भाष्य करीत नाहीये. ही फक्त एक धोक्याची सूचना समजा. माझा हा संदेश आठवला : https://www.misalpav.com/comment/1178078#comment-1178078
In reply to श्री मारवा, प्रा० बिरूटे, कंजूस, कानडाऊ योगेशु, गा०पै० by युयुत्सु
In reply to माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल by कंजूस
In reply to जाता जाता एक अनुभव by युयुत्सु
कृपया हा गुंतवणूक सल्ला नाही याची नोंद घ्यावी. आंधळेपणे शेअरबाजरात व्यवहार करणे धोक्याचे आहे. आपला अभ्यास पुरेसा नसेल तर मान्यताप्राप्त गुंतवणूक तज्ञांचाच सल्ला घ्यावा.हम्म...
In reply to जाता जाता एक अनुभव by युयुत्सु
In reply to ए आय एवढं उत्तम असेल by सुबोध खरे
In reply to तुम्ही म्हणता ते आज शंभर by गवि
In reply to श्री० गवि by युयुत्सु
In reply to तुम्ही म्हणता ते आज शंभर by गवि
बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे.
ह्यातली कुर्हाड एआय असली तरी चालवणारे जे हात आहेत त्यांच्याकडे अजून एक जस्टिफिकेशन आहे. "अमुकतमुक गोष्टीला इतके पैसे सांगत होतात ना तुम्ही, इ त का वेळ लागेल म्हणून ताणत होतात तुम्ही, तुम्हाला जमणारच नाही ह्या थाटात होतात ना तुम्ही, बघा आता तेच काम एआय वापरुन फुकटात केले मी. एआय वापरुन दोन मिनिटात केले मी, एआय वापरुन घरबसल्या केले मी."
हे 'मी' केले म्हणणार्यां सुमारांची सद्दी एआय संपवेल तेंव्हा परत बॅक टू बेसिक्स काय?
का "एआय प्लीज खाजवशील काय?"In reply to एआय मला पावसात जाऊ दे by अभ्या..
In reply to अधिकाधिक खोल जाणाऱ्या by गवि
कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही.
नाही गविराज,
सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा.
सोने मुबलक झाले तरी ते सोने आहे, परीस हा त्यानंतर फक्त दगड आहे.In reply to अंहं by अभ्या..
In reply to अंहं by अभ्या..
सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा.दोन्हीची किंमत एकामागून एक घसरत शून्याकडे जाणे अटळ.
In reply to सगळेच सोन्याचे झाल्यानंतर by गवि
In reply to अर्थात यामागे असे (कदाचित by गवि
मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही.
अॅक्चुअली.
एक मस्त केस स्टडी आहे, आपल्याच पुण्या मुंबईच्या मध्ये घडलेली.
राजा रविवर्म्याने मळवलीला स्टुडिओ टाकला. स्टुडिओ म्हणा प्रिंटिंग प्रेस म्हणा, नाव त्याचे चित्रशाळा.
त्यासाठी पैसा वापरला तो मोठमोठ्या राजा रजवाड्यांची चित्रे रंगवून मिळालेला.
चित्रे हिंदू देवतांची प्रामुख्याने,
सुरुवातीला व्हिज्युलाईज करणार रविवर्मा,
मॉडेल्स घेणार भारतीयच.
रंगवणार तोच.
रिप्रॉडक्शन साठी त्याचे आर्टवर्क बनवणार तोच.
ते घेऊन त्याच्या प्रती छापणार जर्मन्स.
विकणार सगळ्या हिंदुस्थानात.
घेणार सगळी गरीब जनता ज्यांना रविवर्म्यासारख्याच थोर चित्रकरांची चित्रे विकत घेणे परवडत नव्हते.
रविवर्म्यावर केस पडली अश्लीलता आणि नग्नतेच्या दर्शनाची.
.
आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा....
In reply to अहाहा by अभ्या..
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ? by मारवा
यात तर मला सरळ अर्थशास्त्र दिसत आहे
धन्यवाद.
कळावेIn reply to कळावे by अभ्या..
In reply to ए आय एवढं उत्तम असेल by सुबोध खरे
शिवाय जेवढे ज्ञान जालावर उपलब्ध आहे. त्याचे सार फक्त सगळे ए आय देऊ शकतात. प्रत्यक्ष वापरात त्याचा भरपूर फायदा होईलच असे नाही.AI च्या फारच वरवरच्या माहितीवरून असं म्त झालेलं असू शकतं. AI चा आवाका फक्त सार देणं ह्याच्या फार पलिकडे गेला आहे आणि प्रचंड वेगाने तो घातांकीय (exponential) वेगाने वाढतो आहे. BlackRock ही बलाढ्य investment company AI प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरते, बाजाराचे कल, 'सेंटीमेंट अॅनालिसीस' वापरून, शोधून त्यानुसार Event Detection करू शकते. चॅटजीपीटीला खालिल प्रश्न विचारा, How does BlackRock use AI models for trading? - (AI समर्थक) सोकाजी
In reply to शिवाय जेवढे ज्ञान जालावर by सोत्रि
In reply to एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस by सुबोध खरे
मानवी आयुष्य हे गणित नाही त्याचे अनेक पैलू आहेत.ए आय नेमके यासाठी आहे. आत्ता तपशीलवार लिहिणं जमणार नाही. म्हणून इतकेच. तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं उत्तर इन फॅक्ट एआयच अधिक चांगले देईल. त्याच्याकडे असे खूप खूप "पैलू" नोंदवून त्यांना योग्य ते वेटेज देण्याचे सामर्थ्य आहे. अगदी लक्षावधी पैलू आणि असंख्य मिती.
In reply to मानवी आयुष्य हे गणित नाही by गवि
In reply to गवि साहेब by सुबोध खरे
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही उलट त्याचा अभ्यासक, ग्राहक आणि समर्थकसुद्धा आहे.तुम्ही विरोधक आहात असे माझेही मत नाहीच.. आणि मी देखील खास समर्थक आहे असेही नव्हे. :-)
In reply to मी ए आय चा विरोधक मुळीच नाही by गवि
In reply to श्री० खरे यांनी विचारलेला by युयुत्सु
In reply to हम्म्म by सोत्रि
In reply to श्री० खरे यांनी विचारलेला by युयुत्सु
In reply to गवि साहेब by सुबोध खरे
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही उलट त्याचा अभ्यासक, ग्राहक आणि समर्थकसुद्धा आहे. माझ्या स्वतःच्या क्षेत्रात याचा आम्ही फार मोठा उपयोग करून घेतो आहोत.क्या रे ये! घोडा चतुर ... घोडा चतुर ... एक पे रेहना, य तो घोडा बोलो, या चतुर बोलो! - (ए आय पडोसनचा पडोसी) सोकाजी
In reply to =)) by सोत्रि
In reply to अहो पण या तो तुम हमारे साथ हो या हमारे दुश्मन.... by मारवा
In reply to शाप की वरदान हे टायटल अत्यंत चुकीचे आहे. by मारवा
In reply to एक उदाहरण देतो आहे by सुबोध खरे
In reply to तिच्याकडून सांत्वनाचे दोन by युयुत्सु
In reply to एक उदाहरण देतो आहे by सुबोध खरे
In reply to मानवी आयुष्य हे गणित नाही by गवि
In reply to अभिनंदन!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to या पेक्षा तुम्ही स्वतः का by गणेशा
In reply to "विद्या विनयेन शोभते" by धर्मराजमुटके
In reply to हेहे by अभ्या..
"तुमच्या भावना पोचल्या पण मुद्दे समजले नाहीत"'कुठला मुद्दा समजला नाही ह्यावर कृपया प्रकाश टाकावा...'
"सध्या सोने हा माझ्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय नसल्याने मी हातातले काम टाकून वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही."सध्याच काय सोने हा तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा विषय नव्हता, पण टूल किटचा एक भाग म्हणुन तुम्ही त्यावर लिहिले होते आणि ते किती भंपक होते हे जगजाहीर आहे. आणि असल्या फालतुगिरीवर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकवेळी मी तरी अजिबात वेळ देऊ शकत नाही Sorry to say! पण ते असो... आता हा भंपक लेख लिहिताना तो फक्त AI विषयी असता तरी हरकत नव्हती पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे! असो... खरोखर AI बद्दल कळवळा असेल तर यंदाच्या दिवाळी अंकाची थीम AI आहे तेव्हा त्यात आपण काहीतरी उद्बोधक लिहावेत, ते वाचायला आणि खरोखर ज्ञानवर्धक असेल तर त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करायला नक्कीच आवडेल! [गेल्या वर्षी 'निवडणूक/राजकारण' ही (एक) थीम होती, पण इथे बाकी वर्षभर राजकारणावर आपले (असलेले - नसलेले) ज्ञान पाजळणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी सपशेल पळ काढला होता, सगळे अगदी 'रणछोड दास' म्हणतात तसे झाले होते ते सगळे महाभाग] असो, धाग्याच्या शीर्षकातून जे अभिप्रेत होतंय त्या विषयावर (तुमची ईच्छा असल्यास) तुमच्याशी चर्चा करायला मला खरंच आवडेल!
तुम्हाला माझा लेख भंपक वाटल्याबद्दल मला अजिबात राग नाही. चिंता नसावी.तो तर वाटलाच आहे आणि त्याबद्दल राग किंवा चिंता वाटली काय आणि नाही वाटली काय who cares 😀
In reply to "तुमच्या भावना पोचल्या पण by टर्मीनेटर
In reply to इतकंच ना? by युयुत्सु
इतकंच ना?'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकाचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध आहे? I mean ह्यात नक्की कुठली उत्पादकता तुम्हाला अभिप्रेत आहे?
कुणाचं काय तर कुणाचं काय?Lol
In reply to इतकंच ना? by टर्मीनेटर
In reply to ही चर्चा व्यवस्थित पुढे by युयुत्सु
In reply to ही चर्चा व्यवस्थित पुढे by युयुत्सु
तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची उत्पादकतेची व्याख्या सांगावी.उत्पादकतेची व्याख्या मी काय करणार? पण जी सर्वमान्य व्याख्या प्रचलित आहे ती खाली इंग्रजी आणि मराठीत देतो (जी मला मान्य आहे त्यात तुम्हाला काही भर घालायची असेल तर अवश्य घालावीत)
Productivity is a measure of efficiency that shows the amount of goods or services produced (output) relative to the resources used (input) over a specific period of time. In simpler terms, it's about accomplishing more with less effort, time, or resources. Productivity can be applied at an individual, organizational, or national level, with higher productivity often leading to better standards of living and economic growth. --- उत्पादकता म्हणजे संसाधने किती कार्यक्षमतेने वापरली जातात आणि त्यातून किती उत्पादन (वस्तू किंवा सेवा) निर्माण होते, याचे मोजमाप . सोप्या भाषेत, कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पादन करणे किंवा समान उत्पादन करण्यासाठी कमी संसाधने वापरणे म्हणजे उत्पादकता वाढवणे होय. उत्पादकता कशी मोजतात? उत्पादकता मोजण्यासाठी उत्पादन (आउटपुट) आणि वापरलेले इनपुट (उदा. श्रम, वेळ, पैसा) यांचे गुणोत्तर काढले जाते. सूत्र: उत्पादकता = उत्पादन (आउटपुट) / इनपुट उत्पादकतेचे प्रकार आर्थिक उत्पादकता: याचा अर्थ वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनाची कार्यक्षमता होय. वैयक्तिक उत्पादकता: एखादी व्यक्ती किती सातत्याने आणि कार्यक्षमतेने काम पूर्ण करते किंवा उद्दिष्टे साध्य करते, यावरून ती मोजली जाते. उत्पादकता का महत्त्वाची आहे? कार्यक्षमता: संसाधनांचा प्रभावी वापर होतो.आता ह्या व्याख्येतुन प्रतीत होणाऱ्या अर्थाने तुम्हाला 'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकात 'उत्पादकता' अभिप्रेत आहे की 'कार्यक्षमता' ह्या अर्थाने अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावेत म्हणजे पुढील चर्चेची दिशा ठरवता येईल!
In reply to तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची by टर्मीनेटर
In reply to श्री० टर्मिनेटर by युयुत्सु
In reply to इतकंच ना? by टर्मीनेटर
Research from NYU has found that frontier models from OpenAI, Google, and Anthropic can now pass all three levels of the CFA (chartered financial analyst) exam, including difficult Level III essay questions that eluded them two years ago.
Models completed the exam in minutes versus the 1,000 hours humans typically spend studying across multiple years for all three levels.
OpenAI's o4-mini scored highest at 79.1% on the challenging essay portion, with Gemini 2.5 Pro and Claude 4 Opus reaching 75.9% and 74.9%.
https://www.prnewswire.com/news-releases/goodfin-and-nyu-stern-professor-srikanth-jagabathula-release-landmark-study-showing-ai-models-perform-at-a-level-above-and-beyond-the-cfa-level-iii-exam-standards-302562278.html
AI संदर्भात दोन मुद्दे