संस्कृती
लेखिका- इरावती कर्वे
संस्कृती म्हणजे संचय... वर्तमानकाळात श्रीमंत भूतकाळची कर्तबगारी मागच्या पिढीकडून जे जे मिळाले ते . ५०-७० वर्षापूर्वीचे हे संस्कृती पुस्तकातील समाजमनाचे विश्लेषण करणारे लेख आजही काळातीत आहे.इरावतीबाईंची 'आमची संस्कृती' ,'मराठी लोकांची संस्कृती' ही पुस्तकेदेखील मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय या दृष्टिकोणातून लिहिला आहे. 'मराठी लोकांची संस्कृती' या पुस्तकाची पीडीएफ आंतरजालावर सहज मिळेल,नक्की वाचा.

'संस्कृती' पुस्तकातील पहिलया सात लेख रामायण महाभारतातील गोष्टी संशोधक वृत्तीने अभ्यासल्या आहेत.
महाभारत आणि रामायण-१,महाभारत आणि रामायण - २
या दोन्ही लेखांत रामायण व महाभारत या दोघांमधील विस्तृत साम्य व फरक मांडले आहेत. रामायण-काव्य तर महाभारत-इतिहास. महाभारतातील विविध 'पर्व' तर रामायणातील विविध 'कांड' यातील पुरुषांचा संघर्ष सांगताना , एक महाभारतातील संघर्षाची बीजे सुरुवातीलाच रोवली असल्याने कथा एकसंध वाटते. तर रामायणात संघर्षभावना विविध वेळी येते व नाहीशी होते असल्याने कथा विस्कळीत वाटते. दोघांमधील अहिंसेबद्दलचे उल्लेख निराळे आहेत. दोन्हींमध्ये पितृप्रधान, बहुपत्नीक कुटुंब पद्धतीत जे संघर्ष व द्वेष आहेत त्यानुसार कथा दिसतात.परंतु महाभारतात भावाभावांचा संघर्ष माणसांचा अंत करतो, तर रामायणात गळे कापण्याऐवजी भावाभावांना एकमेकांच्या गळ्यात पडता येते हे सिद्ध होते.
यानंतर 'अयोध्याकांड (राम वनाला जातो)' यामधील दशरथ राजाच्या कृतीचे अनेक पद्धतीने, विविध कथा-अभ्यास करून खोल विवेचन आहे. 'भरत आजोळी असतानाच, दशरथाने राज्याभिषेकाची घाई का करावी?, कौसल्या व कैकयीचे नाते खरेच कसे होते? असे अनेक कधीही विचार न केलेले मुद्दे पाहायला मिळतात.
'अयोध्याकांड - २ (भरत भाव)' यात भरताने आपले राज्य नाकारत भावाकडे वनी धाव घेतली तेव्हा त्याचा प्रवास ,पितृशोक समाचार रामाला सांगणे ,मातासमवेत पुन्हा अयोध्या गमन हे सांगताना ,रामाने १४ वर्ष प्रतिज्ञा पाळण्याचे का ठरवले? हा प्रश्न मनात हा लेख पेरूण जातो .
'अरण्यकांडात' रामाचा प्रवास नक्की रामायणातील ठिकाणे कोणती हे विविध संदर्भाने अभ्यासले आहे. रामाने आयुष्यात चारदा गंगा ओलांडली.
१. विश्वामित्रांसह यज्ञ रक्षणाला जाताना
२. जनक यज्ञाला उत्तरेकडे गेले तेव्हा
३. वनवासाला जाताना
४. लंकेतून सीतेला घेऊन येताना
हंपी, गोदावरी, सध्याची लंका ह्या मागाहून रामकथेच जोडल्या गेल्या असतील का? कालीदासाच्या वेळेपर्यंतचे बदल झाले.
पुढे 'सीता' व 'सासवा सुना' हे लेख सीतेला सीतेच्या आणि महाभारतातील 'सत्यवती, अंबिका, अंबालिका या स्त्रियांच्या आयुष्यातील घटनाक्रम व त्याचे काम महाभारताच्या कथांवरचे परिणाम मांडले आहेत.
सासवा सुनांमध्ये पराधीन दुर्दैवी या तीन बायकांमुळे/नारीमुळे महाभारत कथेला जन्म मिळाला.
त्यांना व्यंग असणारी मुले व्यासाला त्यांनी दर्शविलेल्या अबोल विरोधामुळे निपजली व महाभारत युद्ध सुरू झाले असेही म्हणता येईल.
पुढचे अध्याय 'धर्म' हा एक अत्यंत समतोल भाषेतला लेख आहे. यामध्ये अगदी आदिमानवापासून आतापर्यंतच्या समाज जीवनात 'धर्म' म्हणजेच आचारसाधनेचा उगम व प्रवास थक्क करणाऱ्या तथ्यांसह वाचायला मिळतो. यामध्ये स्त्रियांचे, पुरुषांचे तंत्र व वागणुकीचे स्वतंत्रपणे विवेचन मिळते. त्यानंतर सामाजिक मूल्यांचे सांप्रदायिक, कायदेविषयक (दोन्ही आचारमय) आणि नीतीतत्त्वांच्या दृष्टीने (मन: प्रवृत्ती) तत्त्वे कशी काम करतात हे विविध उदाहरणांनी मांडले आहे.समाज रचना काळ सतत बदलत असतो. ती बदलती सत्ये आकलन करून त्यानुसार वागण्याची ताकद, सत्यशोधन सतत चालू ठेवल्याने मिळू शकते.
शेवटी नरहर कुरुंदकर यांनी एका दीर्घ वैचारिक लेखातून इरावतीबाईच्या थोर चिंतनाचा आढावा 'श्रद्धांजली' यात घेतला आहे. एकाच ठिकाणी गृहिणी,गार्गी आणि मराठी कवयित्री यांचा संगम अनोख्या पद्धतीने 'इरावती कर्वे' या महान व्यक्तिमत्त्वात झाला आहे. -
- भक्ती
तुनळी वर पुस्तकाच अल्प परिचय
https://youtu.be/SYgQYL6ZlJE?si=xRQC0PBU45yel-zV
प्रतिक्रिया
27 Dec 2025 - 4:26 pm | कुमार१
अभ्यासपूर्ण पुस्तकाचा चांगला परिचय.
चांगली लेखमाला
27 Dec 2025 - 6:16 pm | युयुत्सु
दोन्ही पुस्तके माझ्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहात आहेत आणि वाचली आहेत.
28 Dec 2025 - 4:09 am | कंजूस
तूनळीवरचा विडिओ पाहिला. तिकडे प्रतिक्रिया देता येत नाहीत. [ Video settings : made for kids केले असल्याने].
लेख ठीक आहे.
28 Dec 2025 - 8:46 am | Bhakti
सर्वांना धन्यवाद :)
हे नव्हते माहिती.पुढच्यावेळी हा पर्याय निवडणार नाही.खुप खुप धन्यवाद कंकाका
28 Dec 2025 - 11:21 am | कंजूस
पुन्हा edit होते का पाहा. यासाठी ॲप चालणार नाही, youtube dot com siteवरून करता येईल.
29 Dec 2025 - 3:46 pm | Bhakti
या पुस्तकाचे प्रकाशक देशमुख ॲन्ड देशमुख यांनी चेपूवरील त्यांच्या पेजवर माझा ह्या पुस्तकाचा परिचय शेअर केलाय(लाईक खुप कमी आहेत पण दखल घेतल्याचे तेवढंच सुख :))