फ्यूज -२
फ्यूज १
-------------
फ्यूज १
-------------
एक पक्षी अंधारात
बरसणाऱ्या जलधारात
घरट्यात एकटाच . . . .
झाडावरचं एक फूल
उमलून कोमेजलेलं
झाडाच्याच पायाशी ......
पाहतो शून्यात मी
आजकाल नेहमी
विश्व निर्मिती तिथूनच !
जुळवले शब्द काही
अर्थ उमगलाच नाही
तरीही अर्थपूर्ण !
मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे. "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तु' एक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर.
मी शेती करतो व त्यावर माझ्यापुरता चरीतार्थ चालवतो.सातारा शहराजवळच आमचे शेत असल्याने मला शेतात राहवे लागत नाही.आठवड्यातून दोन तीन चकरा होतात तेव्हढेच.शेतात पुर्वी गहू ,ज्वारी,मका हे पीक वडील घेत होते.गहू ज्वारी घरी खायला व्हायची.पण आजकाल असल्या भुस्कट पिकाच्या फंदात कोणच पडत नसल्याने आम्हीही उस हेच पीक घेतो.उसाला एकदा पक्की बांधणी (लागणीनंतर चार पाच महीन्याने) झाल्यानंतर फक्त पाणी द्यायला लागते.त्यासाठी एक माणूस ठेवला आहे.
विलास व माधवी देशपांडे हे एक मध्यमवर्गीय जोडपं. यांना २२-२३ वर्षांची ऋचा ही एकुलती एक मुलगी. ती जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडतेय. विलास एका खाजगी विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जास्त वेतनाच्या अपेक्षेमुळे सरकारी नोकरी सोडून तो खाजगी क्षेत्रात आला आहे. लठ्ठ वेतनाबरोबरच तिथे असलेले विक्रीचे चढते लक्ष्य, व्यवसायवृद्धीची जबाबदारी, त्यामुळे येणारे ताणतणाव या सर्वांचा त्याच्या प्रकृतीवर व वागणुकीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव बराचसा चिडचिडा व उतावळा झाला आहे. कामाबरोबरच येणार्या दारू पार्ट्या, धूम्रपान, जागरणे याने तो त्रस्त आहे.
लिंगायत समाजाने आपणाला वेगळा धर्म अशी ओळख मिळावी अशी मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात हि काही पहिली घटना नव्हे, ह्या आधी रामकृष्ण मिशन ने तीच मागणी केली होती. येत्या काही वर्षांत हि मागणी इतर अनेक पंथ करतील ह्यांत काहीही शंका नाही. वीरशैव लोकांनी सुद्धा हि मागणी करायला सुरुवात केली आहे.
सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार.