✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फ्यूज

ज
जव्हेरगंज यांनी
Mon, 07/24/2017 - 02:26  ·  लेख
लेख
मरणाची थंडी पडली हुती. म्या श्याल गुंडाळून चौकीवर गेलो. इनस्पेक्टरला म्हणलं मर्डर झालाय लवणावर. मग त्यनं गाडी काढली. फटफटी. दोघंच निघालो लवणावर. लय रात झालती. त्यो म्हणला, फुकणीच्या कुठं झालाय मर्डर? म्या म्हणलो, फुलाच्या खाली. मग त्याला घेऊन खाली गेलो. एक बाई पडली हुती तिथं नागडी. म्या ब्याटरी मारून त्यला दाखवलं. बघ म्हणलं. त्यो म्हणला, रेप झाला का हिच्यावर? म्हणलं, कुणाला म्हाईत. त्यो म्हणला, तुला कसं कळलं? म्या म्हणलं, लिंबं आणायला गेलतो. ही दिसली फुलाखाली जाताना. बघितलं तर ह्ये आसं. मग त्यानं ब्याटरी मारून नीट तिला बघितली. टकुरं फुटलं हुतं. नुसतं रगात. म्हटलं, दादा, तुला भ्याव वाटत न्हाय का? त्यो म्हणला, जिंदगी गीली ह्यात. आता कसलं आलंय भ्याव. म्या म्हनलं, बरूबर. त्यो म्हणला, लफड्याची केस दिसतीय. पण ही इथं आलीच कशी. हीची कापडंबी कुटं दिसत न्हायीत. म्या म्हनलं, लय झाडवान हाय हीत. पडली आसतील सांदीत. त्यो म्हणला, मला अजून कळ्ळं न्हाय. तुला ह्ये कळलंच कसं. जरा नीट सांग. म्हणलं, सांगितलं की. खाली येताना दिसली. यीऊन बघितलं तर ह्ये आसं. त्यो म्हणला, आजून कोण कोण हुतं इथं? म्हणलं, कुणाला म्हाईत. त्यो म्हणला, फुकणीच्या मला गंडवतो का? म्या म्हनलं, काय झालं? त्याच्या हातात एक मोठं लांबडं दांडकं हुतं. काय कळायच्या आत त्यनं माज्या पाठीवर हाणलं. लय पाऊस पडत हुता. येवढ्या दुपारचंपण समदं काळवंडल्यावन झालं हुतं. समदं आंग ना आंग भिजलं हुतं. ह्या भागात नुसतं डुंगूरच डुंगर. एक घर कुटं म्हणून दिसना. शेवटाला एक झोपडं दिसलं. म्हाता-म्हातारी दोघंबी शेकत बसली हुती. म्या घरात शिरलू. म्हणलू, लय पाऊस पडतूय गड्या. म्हातारं म्हणलं, कुटनं आलाव? म्या म्हनलं, गाडी बंद पडलीय. इंजनात पाणी गेलंय. म्हातारं मनलं, जारं किस्न्या, बघून यं. तसं भिताडाच्या कडंला झोपलेला उघडाबंबू काळा माणूस जागा झाला. म्या म्हणलं, येवढ्याश्या घरात लय माणसं ऱ्हात्यात गड्या. किस्नानं सायकल काढली. म्हणला कुटं पडली गाडी बंद. म्हणलं, ही काय हितंच लवणावर. तिथं गेल्यावर तो म्हणला, नवीन दिसतीय फटफटी. बघू च्यावी. म्या म्हणलं, फुलाच्या खाली पडली का काय, या. हुडकू. मग त्यो मुकाट्यानं खाली चालत आला. चिखुल नुसता. झाडी गवात मायंदाळं. फुलाखाली आल्यावर तिथं एक पोलिस दिसला मरून पडलेला. आन त्येचा जवळंच एक नागडी बाई. पार टकुरं फुटलेलं. किस्नाची दातखिळीच बसली. पार ततपप कराय लागला. म्या म्हणलं, मर्डर झालेला दिसतूय. आपुन लगीच पुलिसांना कळवू. त्यो म्हणला, पण ह्ये झालंच कसं? म्या म्हणलं, कुणाला म्हाईत. मरणाचा पाऊस पडत हुता. आन त्या झोपड्यात म्हाता-म्हातारी शेकत बसली हुती. सायकलवर टांग टाकून मी कुडकुडत तिकडं निघालो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
8719 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

?? !!

कंजूस
Mon, 07/24/2017 - 02:41 नवीन
?? !!
  • Log in or register to post comments

मरणाचं जबरदस्त लिहिलंय.

एस
Mon, 07/24/2017 - 07:11 नवीन
मरणाचं जबरदस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments

अच्छा !

जेनी...
Mon, 07/24/2017 - 07:26 नवीन
अच्छा ! म्हणजे तो फटफटिवालाच मर्डरर आहे तर ... पुलाखाली माणसांना आणुन मारत होता ... मला तरी हेच कळलं .... अजुन पूढे आहे कि इथेच खप्पा झाली श्टोरी ??
  • Log in or register to post comments

भाऊ, खतरनाक. अजुन १ सिरीयल

भीमराव
Mon, 07/24/2017 - 07:30 नवीन
भाऊ, खतरनाक. अजुन १ सिरीयल किलर
  • Log in or register to post comments

जबरदस्त

ज्योति अळवणी
Mon, 07/24/2017 - 08:29 नवीन
जबरदस्त धन्यवाद! खूप दिवसांनी तुमचं लिखाण वाचायला मिळालं
  • Log in or register to post comments

लैच भयान

सौन्दर्य
Mon, 07/24/2017 - 08:48 नवीन
थोडक्यात घाबरवूनच सोडलंत की.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

रघुनाथ.केरकर
Mon, 07/24/2017 - 11:35 नवीन
छान टेंपो होता भाउ.
  • Log in or register to post comments

जव्हेर भाउ लै दिवसान असल

राजाभाउ
Mon, 07/24/2017 - 12:10 नवीन
जव्हेर भाउ लै दिवसान असल कायतर घ्युन आलासा. मस्त अजुन युदे.
  • Log in or register to post comments

मस्तच हो जव्हेरभाव. आवडले

अभ्या..
Mon, 07/24/2017 - 12:43 नवीन
मस्तच हो जव्हेरभाव. आवडले
  • Log in or register to post comments

जब्रा..!!

पुंबा
Mon, 07/24/2017 - 13:05 नवीन
जब्रा..!!
  • Log in or register to post comments

खतरनाक!!!!

पद्मावति
Mon, 07/24/2017 - 14:43 नवीन
खतरनाक!!!!
  • Log in or register to post comments

थरारक कथा .

सिरुसेरि
Mon, 07/24/2017 - 14:57 नवीन
थरारक कथा . +१००
  • Log in or register to post comments

भारी,

नीलमोहर
Mon, 07/24/2017 - 16:00 नवीन
डेंजर एकदम !!
  • Log in or register to post comments

सायको

कपिलमुनी
Mon, 07/24/2017 - 18:11 नवीन
जबर्‍या ष्टुरी
  • Log in or register to post comments

डेंजर लिहलंय..

विशुमित
Mon, 07/24/2017 - 18:24 नवीन
डेंजर लिहलंय.. """म्या म्हणलं, कुणाला म्हाईत.""
  • Log in or register to post comments

दमदार कथा पण बरीचशी

प्रचेतस
Tue, 07/25/2017 - 06:53 नवीन
दमदार कथा पण बरीचशी प्रेडिक्टेबल वाटली. कथानक फुलवण्याची हातोटी मस्तच.
  • Log in or register to post comments

लय भारी!!!

एमी
Tue, 07/25/2017 - 08:21 नवीन
लय भारी!!!
  • Log in or register to post comments

इस्मे वेब सिरीज बनाने का

पुंबा
Tue, 07/25/2017 - 10:16 नवीन
इस्मे वेब सिरीज बनाने का पोटेंशियल हय.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा