सध्या आरसीसी बांधकामाचा खर्च काय आहे ?,तो कसा कमी करता येईल.?

चंद्रनील मुल्हेरकर's picture
चंद्रनील मुल्हेरकर in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 2:09 pm

माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत
१. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ?
ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.

जीवनमानतंत्रराहणीप्रकटन

पाककृती - समाजवादी लाडू

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 12:58 pm

" समाजवादी लाडू"

बेसन, तूप, साखर, बेदाणे उत्साहाने आणले जातात. घरी पिंपात भरून ठेवले जातात.

सर्व बारक्या सदस्यांना एका खोलीत कोंडून लाडू बनवायला लावायाचे ठरते. सगळ्यांना मेहनताना म्हणून एकेक लाडू द्यायचे ठरते.

दरम्यान मोठे सदस्य लाडू बनवावे की न बनवावे, लाडूंचा आकार, रंग ,बेदाण्यांचे प्रमाण यावर बिड्या फुंकत चर्चा करत असतात. चर्चेदरम्यान मतभेद झाल्याने लगेच एक भाऊ घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि भाड्याच्या घरात स्वतंत्र संसार मांडतो.

पाकक्रिया

‎निर्गुणी भजने‬ (भाग १)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 12:51 pm

मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागाची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात. मनावर आलेली मरगळ घालवतात.

संगीतआस्वाद

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 12:30 am

===================================================================

विज्ञानबातमीमाहिती

खुरटी झुडपं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 11:21 pm

एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो.

कथाप्रकटनप्रतिभा

मरण!

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 6:45 pm

"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताप्रकटनविचारप्रतिभा

अँजेलिना जोलिची 'कुंडली'

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 5:45 pm

स्वामींच्या भेटीची वाट पहाणार्‍या लोकांच्या नजरा सँडल्सचा टॉक टॉक असा आवाज करत दरबारात प्रवेश करणार्‍या अँजेलिना जोलिकडे वळल्या. स्वामींची अपॉइंटमेंट घेतल्यामूळे तीला स्वामींच्या भेटीसाठी थेट प्रवेश मिळाला. चेहरा वाचन, हस्तरेषा व कुंडलीवरून अचूक भविष्य सांगण्याच्या कौशल्यामूळे त्यांना देश विदेशात यशस्वी जोतिष विशारद म्हणून ओळखले जाते. स्वामींची किर्ती ऐकून जोली आपले भविष्य जाणण्यासाठी वाराणसीत आली होती.

ज्योतिषमाहिती

गूढकथा - आग्या वेताळ

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 5:26 pm

तो काळ होता सन 1960. महाराष्ट्रातले एक खेडेगाव- धामनेर! आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते?
एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे?

आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय...मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय या आयुष्याचा पण, मी काही करू शकत नाही.

या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!

कथाविरंगुळा