पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग २
पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग १
पाठलाग - कथा - ( काल्पनीक ) - भाग २ -- पुढे चालु
आज अजित आतुरतेने आपल्या मित्राची, रवीची वाट पाहात होता . थोड्याच वेळात रवी त्या हॉटेलमध्ये आला . तोही नुकताच एक प्रोजेक्ट संपल्यामुळे एकदम निवांत मुडमध्ये होता . अजितने लगेच दोघांसाठी चहा आणी काहितरी खाण्यासाठी मागवले . चहा आणी खाणे होईपर्यंत दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . नंतर अजितने मुख्य विषयाला सुरुवात केली .