अंकुर
सप्तसरुच्या काट्यामधुनी झरझर लागे पाझरु
कृष्णवनीच्या खोडामागे चाले रे पाखरु
घनान वारा भनान होई सप्तसुरांचे तरु
सृष्टीचे हे सारमिलन रे अवचित अंबर झरु
चकोर चांदणी नभात दिसता आम्ही रे बावरु
टपटप चाले सावज ऐसे टपटप रे पाखरु
उनाड गाई खळ्यात येत्या लागती हंबरु
उत्थानाची सांजकृपाळी मोत्यांनी पांघरु
अवखळ येती गंगामाई उधळे रे वासरु
कृष्णकळ्यांच्या वेलीवरती जिंकू किंवा मरु