Skip to main content

२६-११शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 26/11/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजचाच दुर्देवी दिवस होता तो.. मी आणि माझी लाडकी लेक इथेच या स्टेशनच्या बाकावर बसलो होतो , आणि अचानक आम्हाला गोळ्यांचा आवाज एकू येऊ लागला. काही कळण्याच्या आधिच एक गोळी छकूलिच्या आरपार निघून गेली. क्षणार्धात माझ्या छकूलिला मी गमावलं होतं दहा मिनिटात प्रतिहल्ला करणा-यासाठी पोलिसांची एक टिम आलेली होती. थोड्याच वेळात त्यातल्या इनस्पेक्टरलाही गोळी लागली. बदला घेण्यासाठी मी पळत जाऊन त्याची पिस्तुल उचलली आणि त्या नराधमाकडे रोखली. र्िटगर दाबताच गोळीचा जोरदार आवाज कानी घुमला. पण..पण ती गोळी माझ्याकडुन सुटलेलीच नव्हती. पाठीमागच्या अतिरेक्याने ती मला मारली होती. अजुनही मी या बाकड्यावर विचार करत राहतो की "खरच सत्याच्या नेहमी विजय होतो का?"
लेखनविषय:

वाचने 1518
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by विनिता००२

कसाबला देण्यात आलेल्या फाशीमुळे नक्कीच संविधानावरील विश्वासास बळकटी मिळाली. पण हल्ल्याच्या आधीच्या हलगर्जीपणामुळे ( तो कोणाकोणाचा आणि कुठले हे उघड गुपित आहे) ज्या लोकांना जिवानिशी जावे लागले त्याचे काय ? म्हणूनच कसाबसारख्या प्याद्याला फाशी दिल्याने सर्वांना न्याय मिळाला का याबद्दलची साशंकता पात्र्ाव्दारे दाखवली आहे.

अजूनही अशा बाकड्यांवर अडकलेल्या जीवांचा विचार मनात येतो आणि अस्वस्थ वाटत.