पहाट धुके

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
30 Nov 2016 - 1:39 pm

नमस्कार , माझं मिपावरील हे पहिलच लिखान आहे. आज पर्यंत फक्त एक मुकवाचक होतो. तर प्रथम थोडं कवितेबद्दल सांगतो. खरतर माझी ही चौथी कविता आहे. पहिल्या तीन कविता लिहलेले कागद हरवल्या नंतर मी एका वहीत कविता लिहायला सुरवात केली. काही दिवसाने ही वहीदेखील हरवली. पण मागच्या दोन महीण्याखाली जुनी पुस्तके चाळताना त्या गठ्ठ्या मधे ही वही सापडली. आणि खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. आणि त्या कविता पोस्ट करू करू म्हणत आज मुहुर्त आला.

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीमुक्त कविताहिरवाईकविता

निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग २

पाटीलभाऊ's picture
पाटीलभाऊ in भटकंती
30 Nov 2016 - 1:01 pm

निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग १

आज चौथा दिवस. आज मुकुर्थी डॅमवरून पंडियार हिल्स ला जाणार होतो. आज आम्हाला १२ किमीचा पल्ला गाठायचा होता. सगळ्यांनी आपल्या भल्या मोठ्या सॅक आपापल्या पाठीवर लादल्या आणि निघालो. आमच्यासोबत आजचा आमचा ट्रेक लीडर होता 'पुट्टुराज'. तामिळनाडूतच राहणारा पुट्टुराज शांत स्वभावाचा होता पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र नेहमी एक स्मितहास्य असे. आजचा रस्ता मस्त जंगल आणि चहाचे मळे यांमधून होता. हिरव्यागार वातावरणात चालताना थकवा अजिबात जाणवत नव्हता. मध्ये एक छोटे गाव लागले.

खरवसाची वडी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
30 Nov 2016 - 12:46 pm

kharvas
साहित्यः
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
kharvas
कृती:

अरे पाचशे हजार

मधुका's picture
मधुका in जे न देखे रवी...
30 Nov 2016 - 9:12 am

(बहिणाबाईंची माफी मागून)

अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार
आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर

अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही,
भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही!

अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं,
येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं

अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार
देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!

अहिराणीहास्यधोरणविडंबनविनोद

वियोग-कविता

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
30 Nov 2016 - 12:48 am

वियोग या विषयावरील काही जुन्याच कविता आज पुन्हा वाचत होतो या शेअर कराव्याश्या वाटल्या सहज म्हणुन हा धागाप्रपंच केला. बघा एखादी तार जुळते का तुमचीही.

मांडणीआस्वाद

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
29 Nov 2016 - 8:15 pm

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

शनिवार आणि रविवार हे आम्हा कष्टकरी लोकांच्या दृष्टीने खास दिवस . सोमवार ते शुक्रवार भरपुर कष्ट केल्यानंतर (पुण्यातील ट्रॅफिकमधुन वाट काढत ऑफिसला पोचणे हे मुख्य कष्ट .... ऑफिसमध्ये कामाचे वेगळे .. ) हे सुट्टीचे दोन दिवस म्हणजे जणू संजीवनीच ....

तर अशाच एका शनिवार सकाळची ही कहाणी

----------------------------------------------------------------------------------------

कथाप्रकटन

गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
29 Nov 2016 - 6:17 pm

गोव्याला तसा मी अगदी लहानपणी गेलो होतो, साधारण १४/१५ वर्षांचा असेन तेव्हा. अगदी पुसटश्या आठवणी आहेत तेव्हाच्या. पणजीला मुक्काम करुन तेव्हा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा एकेक दिवसाच्या गोवा पर्यटन मंडळाच्या सहली केल्या होत्या. त्यात जुन्या गोव्यातील चर्चेस, मयें तलाव, मंगेशी आणि शांतादुर्गा मंदिरे, कोळवा, कळंगुट, वागातर असे काही किनारे पाहिल्याचं फक्त आठवतंय. त्यानंतर गोवा हा कित्येक वर्षे विशलिस्टवरच राहिला होता.