पहाट धुके

Primary tabs

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
30 Nov 2016 - 1:39 pm

नमस्कार , माझं मिपावरील हे पहिलच लिखान आहे. आज पर्यंत फक्त एक मुकवाचक होतो. तर प्रथम थोडं कवितेबद्दल सांगतो. खरतर माझी ही चौथी कविता आहे. पहिल्या तीन कविता लिहलेले कागद हरवल्या नंतर मी एका वहीत कविता लिहायला सुरवात केली. काही दिवसाने ही वहीदेखील हरवली. पण मागच्या दोन महीण्याखाली जुनी पुस्तके चाळताना त्या गठ्ठ्या मधे ही वही सापडली. आणि खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. आणि त्या कविता पोस्ट करू करू म्हणत आज मुहुर्त आला.
हि कविता मी दहावीच्या वर्षाला असताना लिहली होती म्हणजे सहा वर्षापुर्वी. त्यावेळी कविता हा आमच्यासाठी नवीनच प्रांत होता. यमक जुळली की कविता तयार होते असाच आमचा समज होता. मग काय नव्याचे नउ दिवस असतात तसं आम्ही धडाधड जिलब्या पाडत सुटलो. मग हळुहळु काही दिवसांनी ते खुळ संपल आणि वही तशीच पडुन राहीली. पुढे पदवीकेला गेल्यानंतर एक-दोन कविता लिहल्या. त्यानंतर मात्र काही लिहल नाही. आणि त्यादिवशी वही सापडल्यानंतर खुप आनंद झाला की आपणही कधीकाळी काही तरी लिहीत होतो.
 हि कविता मला सुचली कशी त्याबद्दल  थोड सांगतो. त्यावेळी आम्हा सर्व विद्याथ्यांना शाळेमधे रात्रअभ्यासिकेसाठी मुक्कामी रहाव लागे. फक्त रविवारी घरी जाण्यास परवानगी असे. त्यामुळे आम्ही रविवारी पहाटेच सायकलवरती घरी यायचो. त्यावेळी वातावरणात गारवा ही असायचा आणि सगळीकडे धुके असायचे. घरी येईपर्यंत उजाडायचे. अशाच एका रम्य सकाळी सुचलेली ही कविता. काहीही बदल न करता जशी त्यावेळी लिहली होती तशीच पोस्ट करत आहे. तरी आमचा कधीकाळचा एक छोटासा प्रयत्न गोड मानुन घ्या.
धन्यवाद.     

          पहाट धुके

हिवाळ्यातील रम्य पहाट
धुक्यात हरवली वाट.
धुकेच जणु हे मेघ उतरले
पाहण्या सौंदर्याचा थाट.

सजली धरा ही सौंदर्याने
भुलले त्यासी धुके जणु हे
सापडेना धुक्याचा काठ
धुक्यात हरवली वाट.

हिरवळीस हे भुलले धुके
वापस जाण्या विसरले ते
सापडेना त्याला घाट
धुक्यात हरवली वाट.

सुर्यकिरण हे येता तेथे
भानावरती आले धुके
चालले सोडुन सौंदर्याशी गाठ
धुक्यात हरवली वाट.

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीमुक्त कविताहिरवाईकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

30 Nov 2016 - 2:18 pm | चांदणे संदीप

कविता ठीकच फक्त ते "वापस" वापस घ्या बघू!

पुलेशु!

Sandy

पाटीलभाऊ's picture

30 Nov 2016 - 2:21 pm | पाटीलभाऊ

स्वागत आहे..

जव्हेरगंज's picture

30 Nov 2016 - 2:24 pm | जव्हेरगंज

मस्त!!!

धन्यवाद. संदीपजी, पाटीलभाऊ , जव्हेरगंज.

संदीपजी, पोस्ट करताना वापस च्या जागी दुसरा शब्द लिहायचा होता, पण शब्दच सुचला नाही. म्हणुन आहे अशीच पोस्ट केली.

ज्योति अळवणी's picture

2 Dec 2016 - 6:28 pm | ज्योति अळवणी

कल्पना छान आहे

मदनबाण's picture

2 Dec 2016 - 8:52 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikre

धन्यवाद सर्व प्रतिसादासांठी.