अरे पाचशे हजार

Primary tabs

मधुका's picture
मधुका in जे न देखे रवी...
30 Nov 2016 - 9:12 am

(बहिणाबाईंची माफी मागून)

अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार
आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर

अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही,
भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही!

अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं,
येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं

अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार
देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!

अहिराणीहास्यधोरणविडंबनविनोद

प्रतिक्रिया

मोदींना, किंवा गेलाबाजार फडणवीसांना पाठवा कविता. एखाद्या कॅम्पेनला वापरली जाण्याचे पोटेन्शिअल आहे कवितेत. ;-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Dec 2016 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार

व्हॉटस अप वर तर जोरात फिरेल.
पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2016 - 1:15 pm | अत्रुप्त आत्मा

स्तुत्य प्रयत्न. छान.

ज्योति अळवणी's picture

2 Dec 2016 - 6:30 pm | ज्योति अळवणी

मस्त ...

मदनबाण's picture

2 Dec 2016 - 8:53 pm | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikre

पिशी अबोली's picture

2 Dec 2016 - 9:54 pm | पिशी अबोली

छान!