अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर

समेळ पंकज विजय's picture
समेळ पंकज विजय in भटकंती
24 Jan 2017 - 8:58 am

समाधी मंदिर व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे त्रिशुंड गणपती महाराष्ट्रातील एक अद्वितीय मंदिर आहे. पुण्यातील तुळशीबाग, पर्वती, ओंकारेश्वर, सारसबाग गणपती मंदिर प्रसिध्द आणि लोकांना परिचित आहेत. हे मंदिर दुर्लक्षित राहण्याचे दुसरे कारण म्हणजे १८व्या शतकात नागझिरा ओढ्याच्या काठावर असण्याऱ्या सोमवार आणि मंगळवार पेठेच्या काही भागात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शहापुरा पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले. या पेठेत गोसावीपुरा नावाचा भाग होता.

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
24 Jan 2017 - 8:50 am

अनुवादीत

लोक अकारण निमत्त विचारतील उदासीनतेचं
विचारतील कारण तुझ्या बेचैन होण्याचं
बोटं दाखवतील सोडलेल्या तुझ्या केसांकडे
दृष्टी लावून पहातील व्यतीत झालेल्या काळाकडे
पाहून कंकणाकडे काही करतील पोटात मळमळ
पाहून थरथरत्या हाताला करतील काही खळखळ

होऊन आततायी ताने देतील अनेक
बोलण्या बोलण्यात करतील माझा उल्लेख
नको होऊस प्रभावित त्यांच्या बोलण्यावर
समजून जातील पाहूनी छ्टा तुझ्या चेहर्‍यावर
नको विचारू प्रश्न त्यांना काही झाले तर
नको बोलूंस त्यांच्याकडे माझ्या विषयावर

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

अनुवादगझल

फायनल डिल - कथा - काल्पनीक

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
23 Jan 2017 - 11:12 pm

फायनल डिल - कथा - काल्पनीक

रात्रीचा अंधार अधिकच दाट होत चालला आहे . रातकिड्यांची किरकिरही वाढत चालली आहे . सगळीकडे काळोख वेढुन राहिला आहे . रस्त्यांवरची वर्दळ कधीच थांबली आहे . कुठेतरी दुरवर रात्रीची गस्त घालत फिरत असलेल्या गुरख्याचे काठी आपटणे आणी त्याची "जागते रहो" हि आरोळी , एवढाच काय तो आवाज या शांत वातावरणात ऐकु येत आहे .

kathaaलेख

एक निर्णय (भाग 3)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
23 Jan 2017 - 8:28 am

एक निर्णय भाग 1

एक निर्णय भाग 2

भाग ३

एक एक महीना सरकत होता आणि दोघेही अभ्यासाच्या मागे लागले होते. एक वेगळाच समजूतदार धागा त्यांच्यात तयार झाला होता. एकत्र अभ्यास चांगला होत होता. प्रिलिम झाली... मुख्य परीक्षा झाली आणि तीन महिन्यांची मोठी सुट्टी सुरु झाली. त्या काळात सुट्टीमधे भेटणे तसे जमत नसे. त्यामुळे दोघे एकदाच भेटले.

"तू पुढे काय ठरवल आहेस?" मिनाक्षीचा प्रश्न.

"काही नक्की नाही ग. तू?" प्रशांत.

कथा

आभासी जगातल्या आभासी भाषा : वलारमोर्गुलिस

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in लेखमाला
23 Jan 2017 - 8:25 am

*/

बिग बँगमधून विश्वाची निर्मिती झाली, एकपेशीय जीवापासून विविध सजीव निर्माण झाले, त्यांची उत्क्रांती झाली. प्राणी असोत वा आजचा प्रगत (??? कदाचित १४ कोटी वर्षांनी सगळे सुपरमॅनही असू शकतील.) मानव, उत्क्रांतीबरोबरच कंपूबाजीलाही सुरुवात झाली. कंपूला ‘समाज’ असं गोंडस नाव मिळालं. आता समाज म्हटलं की चालीरिती आल्या, परंपरा आल्या आणि त्याच्या जोडीला ह्या कंपूला बांधून ठेवणारी एक देणगी मिळाली, ती म्हणजे 'संभाषणकला'.

ती एक वेडी

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
22 Jan 2017 - 5:26 pm

ती एक वेडी
जुन्या आठवणींचा कोष
मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी
एक दिवस तिच्याही नकळत
हा कोष जाणिवेत आला
बघता बघता त्यातनं
एक सुंदर फुलपाखरू निघालं
तिच्या तळहातावर अलगद बसलं
अगदी विश्वासानं
ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली
त्याची ओळख पटवू पाहू लागली
हळूच त्याने पंख मिचकावले
तिला वाटलं
ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे
ओळख पटली
ती हसली
तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं
त्याच्या रूपानं हरखून गेली
जुन्या आठवणीत हरवून गेली
एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताशांतरसकलाकविताप्रेमकाव्यमुक्तक