एक निर्णय (भाग 2)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
20 Jan 2017 - 7:38 pm

एक निर्णय भाग 1

भाग २

सर्व उत्तम मार्क्सनी पास झाले. मिनाक्षीने यावर्षी पहिला क्रमांक पटकावला होता. पण प्रशांतने ते मात्र सहज स्वीकारलं. पण मग मात्र तो मुद्दाम सर्व शिक्षकांना जाऊन भेटला. तो कुठे कमी पडतो आहे का, अस त्याने प्रत्येक शिक्षकाला विचारल. मग मराठीच्या काणे बाईनी त्याला समजावलं;"प्रशांत, तू हुशार आहेस आणि कुठेही कमी पडलेला नाहीस. पण एक लक्षात घे. तू फक्त अभ्यास एके अभ्यास अशा स्वभावाचा नाही आहेस. तू शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आणि कार्यक्रमात भाग घेतोस. त्याचा थोडा परिणाम कदाचित पुढे अभ्यासावर होईल. तुला पुढे काय करायच आहे त्याचा विचार कर बघू. आणि महत्वाच म्हणजे १०वी मध्ये फक्त अभ्यासावर लक्ष ठेव. त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकांना भेटून बोलून घे." प्रशांतला बाईंच म्हणण पटल. पण फक्त अभ्यास एके अभ्यास त्याला कितपत जमेल याविषयी त्यालाच खात्री नव्हती.

10वी चे वर्ष आहे म्हंटल्यावर; सुट्टीत कसा आणि कोणता अभ्यास करावा याविषयी शिक्षकानी मार्गदर्शन कराव अशी विध्यार्थ्यांनी प्रत्येकाला गळ घातली. गणित, इंग्रजी आणि सायन्स विषय थोडे जड जातील हे लक्षात येऊन प्रशांतने सुट्टीत ही अडलेले प्रश्न विचारण्यासाठी घरी येण्याची परवानगी शिक्षकांकडून घेऊन ठेवली.

सुट्टी सुरु झाली आणि बघता बघता संपली. शाळा सुरु झाली. पहिल्या महिन्याच प्रशांतने सुट्टीत केलेल्या अभ्यासाचा उत्तम परिणाम त्याच्या एकूण वर्गातल्या प्रश्नोत्तराच्या तासाला वर दिसू लागला. शिक्षकांनी कौतुक केल. मीनाक्षीदेखिल जोरदार अभ्यासाला लागलेली दिसत होती. कारण वर्गात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये दोघांनाही उत्तम गुण मिळत होते.

दहावीचे वर्ष असल्याने घरच्यानी आणि शिक्षकांनी एक्स्ट्रा क्लास्सेस आणि जास्तीचा अभ्यास सुरु करायला लावला. दोघे हुशार होते. त्यामुळे शाळेच्या दोघांकडून खूप अपेक्षा होत्या. दोघेही शाळेचे नाव बोर्डात झळकवतील याची शिक्षकांना खात्री होती. त्यामुळे शिक्षक मुद्धाम दोघानाही घरी बोलावायला लागले अभ्यासासाठी; आणि प्रशांत आणि मिनाक्षीचे एकमेकांबरोबर रहाणे वाढले. इतर एक दोन विद्यार्थी देखील होते; पण हुशार आणि शिक्षकांचे सर्वात लाडके हे दोघे होते. अभ्यासाची चर्चा, पेपर्स एकत्र सोडवण सुरु झाल. जसजस त्याचं बरोबर राहाण वाढल तस त्या दोघाना जास्त चिडवण वाढल. काही ना काही कांडया पिकवल्या जायच्या. या चिडवण्याचा परिणाम असा झाला की प्रशांत आणि मीनाक्षी एकमेकांसोबत असताना थोड़े अस्वास्थ राहायला लागले. प्रशांतला ते चिड़वण आवाडायच. पण मिनाक्षीच्या मनात काय आहे आणि ती नक्की का अस्वथ होते आहे ते मात्र त्याच्या लक्षात येत नव्हत. कधीतरी शेवटी हा विषय मुख्यधापकांपर्यंत गेला. मग मात्र त्यांनी या दोघानाही बोलावून घेतले आणि हे असे विचार या वयात कसे चुकीचे आहेत आणि अभ्यास करियर याचा विचार करणे कसे योग्य आहे; हे समजावले.

मात्र याचा परिणाम असा झाला की आजवर इतर मुले चिड़वायची आणि प्रशांत-मीनाक्षी एकमेकांना आणि स्वतःला देखील सांभाळून घ्यायचे. पण याविषयी ते एकमेकांशी काही बोलले नव्हते; त्याला वाचा फुटली. पण शाळेत याविषयावर बोलणे शक्य नव्हते. म्हणून मग प्रशांतनेच मिनाक्षीला विचारले;"आपण शाळेनंतर भेटायचे का?" आश्चर्य म्हणजे ती ही तयार झाली.

हे अस कोणालाही न सांगता बाहेर भेटण्याची कल्पना दोघांसाठी खूपच वेगळी होती. सायन्सचे सर मिनाक्षीच्या घराजवळच राहायचे. त्यांच्या तिथल्या एका लस्सीवाल्याजवळ पाच वाजता भेटायचे ठरले. प्रशांतने आईला मस्का मारून लस्सीसाठीचे पैसे मिळवले. आज मित्र भेटणार आहेत. कदाचित् जाऊ. अस सांगून पैसे मिळवले होते. पण त्याला त्या खोट बोलण्यातही थ्रिल वाटल होत.

संध्याकाळची वाट दोघेही बघत होते. त्यांना दोघानाही हे असे भेटणे म्हणजे खूप काही वेगळे वाटत होते. थोड्स ऑक्वर्ड वाटण.. थोड़ी भिती... आणि खूपशी excitment अस एकूण मनात घेऊन बरोबर पाच वाजता दोघेही लस्सीवाल्याजवळ भेटले.

"हाय" प्रशांत हसून म्हणाला.

"हाय" कोणी ओळखीच दिसत नाही ना याचा अंदाज घेत तिच उत्तर.

"लस्सी पिणार?" प्रशांत.

"छे छे... नको. आई रागावेल. मी पैसे पण नाही आणलेत." मीनाक्षी.

"अग... माझ्याकडे आहेत. हाफ हाफ घेऊ. तेवढे पैसे आहेत नक्की." प्रशांत म्हणाला आणि ती हसली. दोघांनी लस्सी घेतली.

विषयाला सुरुवात करण आवश्यक होत; पण बोलणार कोण? आणि काय? साधारण 1985/86 चा काळ. आज-कालच्या मुलांसारखा बोल्डनेस् त्यावेळी ना मुलांमधे होता ना मुलींमधे. पण काळ कोणताही असला तरी भावना सारख्याच असतात ना!

शेवटी मिनाक्षीनेच सुरुवात केली."प्रशांत... तुला काय वाटत.... आपल्याला प्रिंसिपल मॅडम जे म्हणाल्या त्याबद्दल?"

"काय वाटायच?" प्रशांत एकदम क्लीन बोल्ड झाला होता. 'काय वाटत' म्हणजे मीनाक्षीबद्दल? की प्रेम या विषयाबद्दल? की मित्र चिडवतात त्याबद्दल? हिला नक्की काय म्हणायच आहे?

"अरे हेच की या चिडवण्याचा आणि आपण एकत्र असण्याचा करियरवर परिणाम होतो का खरच?" मीनाक्षी स्वतःच्या तंद्रित होती.

प्रशांतची परत पंचाईत... आता हिच्या या प्रश्नाचा काय अर्थ काढायचा? तो वैतागला. 'नक्की काय आहे हिच्या मनात? कायम का ही मला गोंधळवून टाकून पुढे निघायच्या तयारीत असल्यासारखी असते.'

प्रशांतने तिची तंद्री तोडली. "मीनाक्षी तुला नक्की काय म्हणायच आहे ते सांगशील का मला?" त्याने तिला विचारले.

"प्रिंसिपल जे म्हणाल्या त्याचा विचार करते आहे रे सारखा. अस इतरानी चिडवण्याचा आणि आपण अभ्यासाच्या निमित्ताने का होईना पण एकत्र असण्याचा परिणाम आपल्या करियरवर होत असेल का?" मीनाक्षी परत तेच म्हणाली.

प्रशांतने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. 'म्हणजे काय चिडवल जात आहे यापेक्षा चिडवतात त्याचा परिणाम करियरवर होतो का... याची हिला चिंता आहे तर.... म्हणजे तिला विषयात इंटरेस्ट नाही त्याच्या परिणामात आहे! धत्...' प्रशांत वैतागला.

"अग अजुन आपल करियर ठरायला खूप वेळ आहे अस नाही का वाटत तुला? सध्या हे सगळे काय चिडवतात त्याचा विचार नाही करत का तू?" त्याने तिला विचारले.

"अस कस म्हणतोस? माझ मी नक्की ठरवल आहे की मला डॉक्टर व्हायच आहे. आणि अजुन आपण एकमेकाना नीट ओळखत पण नाही. मग या चिडवण्याचा विचार काय करायचा? अजुन शाळेतच आहोत आपण. बर, पुढे कोणत करियर तू निवाडशील... ते काहीच माहीत नाही.. एकच कॉमन धागा म्हणजे आपण दोघे अभ्यासात सारखे आहोत. उगाच चिडवतात नाही का?" मीनाक्षी म्हणाली.

'ओह्... म्हणजे तिला एकूण या विषयात इंटरेस्ट नाही आहे तर..' प्रशांतच्या मनात आल. हे लक्षात आल्यावर तो थोड़ा हिरमुसला. आपल्याला नक्की वाईट कशाच वाटत आहे ते मात्र त्याच्या लक्षात नव्हत आल. तो थोडावेळ काहीच बोलला नाही. ती पण शांत बसली होती. त्याने अचानक विचारल, "मीनाक्षी तुला मी आवडतो का? म्हणजे तुला माझ्याबद्दल नक्की काय वाटत?"

मीनाक्षी पुरती गड़बड़ली.. अचानक अनपेक्षित प्रश्न प्रशांतने तिला विचारला होता. तिने त्याच्याकडे क्षणभर बघितले. म्हणाली,"तू न मला थोड़ा गोंधळलेला वाटतोस. सारखा अस्वस्थ असतोस... पण तरीही आवडत मला तुझ्याबरोबर; कारण तू माझ ऐकतोस." तिने हसत तिचे प्राजळ मत दिले होते. तिच शेवटच वाक्य प्रशांतला सुखावून गेल. किंबहुना तेवढच त्याला एकु आल. तो ख़ुशीत आला. "खर म्हणजे मलासुद्धा तुझ्याबरोबर खूप आवडत ग. पण तस कोणाला दाखवता येत नाही. उगाच सगळे तुला त्रास देतील न म्हणून." तो म्हणाला.

"अरे तुला का वाटत त्याचा मला त्रास होईल?" मिनाक्षीने भुवया उंचावून विचारले.

प्रशांतकडे तिच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.खर तर त्याला खूप काही दुसरेच बोलायचे होते.पण सुरुवात कशी करावी कळत नव्हते.

शेवटी त्याने हिम्मत केली आणि म्हणाला,"मीनाक्षी तू ना मला खूप आवाड़तेस. म्हणजे.... ना.. सगळे जे चिडवतात ना तशी आवड़तेस."

आता मात्र मिनाक्षीच्या डोक्यात प्रकाश पडला. ती एकदम गडबडली... थोड़ी लाजली... अवघडली... तिच्या 'आवाड़तोस मला' चा तिच्या मते असा अर्थ होता की एकत्र असताना तिला अभ्यास करायला आवडत. पण प्रशांतने मनातल बोलून दाखवल आणि तिची गड़बड़ उडाली. प्रशांतला तिची उडालेली गड़बड़ बघुन थोड़ी गम्मत वाटली.

"अरे हे अस? एकदम?" ती थोड़ लाजुन.. थोड़ हसत... म्हणाली.

"एकदम नाही ग. मनात होत बरेच दिवस. पण कधी सांगू शकलो नाही. आणि आता सांगायच कारण म्हणजे माझ्या मनात काय आहे ते तुझ्यापर्यन्त पोहोचवाव आणि हे देखिल सांगाव की तू विचार कर... घाई नाही. आपण 10वि च्या पारिक्षेनंतर परत बोलू. ठिक आहे न?" प्रशांत म्हणाला. तिने हलकेच हसत मान खाली घातली आणि हळूच "हो" म्हणाली. दोघे उठले आणि एकमेकांना बाय म्हणून निघाले.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

20 Jan 2017 - 10:02 pm | पद्मावति

छान चाललीय कथा. पु.भा.प्र.

पैसा's picture

20 Jan 2017 - 10:03 pm | पैसा

छान वेग घेतला आहे.

रातराणी's picture

20 Jan 2017 - 11:48 pm | रातराणी

वाचतेय. पुभाप्र.

संजय पाटिल's picture

21 Jan 2017 - 1:26 pm | संजय पाटिल

वाचतोय..

ग्रेंजर's picture

21 Jan 2017 - 1:45 pm | ग्रेंजर

वाचतेय.