दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 5:43 pm

खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

नाट्यभाषासाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रनोकरीप्रकटनविचारप्रतिसादशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीमदतवादप्रतिभा

विहार…भाग ३

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 3:50 pm

पहिल्या दोन भागांची लिंक,
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266

अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !!

कथाअनुभव

विहार…भाग ३

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 3:50 pm

पहिल्या दोन भागांची लिंक,
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266

अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !!

कथाअनुभव

'किनी'-'मिनी' चमचा 'धरा' (लघुत्तम कथा)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 12:45 pm

एक आटपाट शहर होत, त्या आटपाट शहरात किनई एक 'किनी' रहात असे. त्याच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं नाव होत, 'धरा'. एक दिवस 'किनी' मोठा झाला, नौकरीसुद्धा करु लागला. तसं 'धरा'नी त्याला प्रोपोज केलं; पण त्यावेळी 'किनी'ला आवडली होती 'मिनी'.

'किनी'ने 'मिनी'ला प्रोपोज केले, 'मिनी' हो म्हणाली, पण त्या आधी 'मिनी'ने विचारलेच होते तुझ्या आधीच्या मैत्रिणी कोण ?
'किनी'ने 'मिनी'ची 'धरा'शी ओळख करुन दिली.

कथाविरंगुळा

(नेक्स्ट) गॉन गर्ल

एमी's picture
एमी in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 1:10 am

चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन.

वाङ्मयप्रकटनआस्वादशिफारस

कथाकथी

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 7:30 pm

नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे.

कथाशिफारस

विहार...भाग २

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 5:58 pm

पहिल्या भागाची लिंक
http://www.misalpav.com/node/39239
चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !!

कथाअनुभव

प्रमोशन

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 5:11 pm

माॅर्निंग ब्रेकची वेळ.

ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

धोरणकथाविडंबनसमाजजीवनमानरेखाटनप्रकटनअनुभवमतमाहितीसंदर्भचौकशीवादप्रतिभा

मनाचा प्रवास

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 4:20 pm

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी मी कल्याणला ट्रेन पकडते. एकदा आपल्या आसनावर स्थिरस्थावर झालं की बरोबर वाचण्यासाठी घेतलेलं पुस्तक मी काढते. मन एकाग्र व्हायला थोडा वेळ लागतोच कारण तोपर्यंत लोकांची उठ बस , ये जा चालू असते. पण पुस्तकात लक्ष घालून मी वाचण्याचा प्रयत्न करू लागते.
अंबरनाथ सोडले की माथेरान डोंगर रांग सुरु होते. मग पुस्तक बाजूला ठेवून ते डोंगर निरखण्यात मन गुंग होऊन जातं. ज्या डोंगरांवर गेले आहे ते पाहून मन हर्षभरित होते तर जिथे नाही गेले तिथे कधी जायला मिळेल या विचारात हरवून जातं.
मधून मधून पुस्तक वाचन चालूच असतं.

वाङ्मयप्रकटन