दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
24 Mar 2017 - 5:43 pm

खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात. घरचा अभ्यास करायचा राहून गेल्यानंतर वर्गात मिळणार्‍या मारापासून वाचण्यासाठी शाळकरी मुलं ज्या काय भयंकर युक्ती लढवतात ते पाहता अगदी बालवयातच या कलेचा उगम होत असल्याच दिसून येतं आणि कॉलेज संपवून एखाद्या कार्यालयात रुजू होईपर्यंत ही कला आणखी बहरलेली असते.

सामान्यतः प्रकृती अस्वास्थ्याची कारणे ही दांडी मारण्यासाठी नेहमी पुढे केली जातात हे आपल्याला नेहमी पाहायला मिळते. जसे की पोटात दुखणे, ताप येणे, सर्दी होणे, डोळे येणे, बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे पाय मोडणे, पण त्यातल्या त्यात जुलाब लागणे हे सर्वात हिट कारण.!! 'रात्रीपासून भयानक जुलाब झाल्यामुळे खूप वीकनेस' आल्याचा मॅसेज आणि त्यासोबत ओळखीच्या डॉक्टरकडून एखादे बनावट सर्टिफिकेट तोंडावर फेकले की तुमचे वरिष्ठ निरुत्तर झालेच म्हणून समजा! एखाद्या लांबच्या आधीच गचकलेल्या नातेवाईकाच्या दहाव्याचे पुन्हा एकदा जेवायला जाणे हा एक उपाय दांडी मारण्यासाठी नेहमी अमलात आणला जातो हे मी 'पुराव्याने शाबित करू शकतो. बेमालूमपणे खोटं बोलून दांडी मारण्यामागची 'खरी' कारणं मात्र बरीच असतात.

पावसाळ्यातल्या एखाद्या धो-धो बरसणार्‍या सकाळी उठायला उशीर झाला म्हणून...

ऑफिसला निघता निघता अचानक कामाचा आळस येऊन दिवसभर लोळण्याचा मूड झाला म्हणून...

'तुम्ही माझ्यासाठी वेळच देत नाही' असा डॉयलॉग बायकोने तोंडावर मारल्यानंतर नाईलाजाने म्हणून का होईना तिला वेळ देण्यासाठी म्हणून...

परदेशातून बर्‍याच दिवसांनी परतलेल्या मित्रासोबत 'बैठक' जमवण्यासाठी म्हणून...

आवडत्या हिरोचा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी म्हणून...

खोटं बोलून दांडी मारण्यार्‍या इरसाल नमुन्यांसाठी रुपेरी पडदाही अपवाद कसा ठरावा. अगदी पटकन डोळ्यासमोर आलेले धनंजय माने आणि त्याच्या मित्रांनी केलेली बनवाबनवी!! अशोक सराफ अर्थात मिस्टर धनंजय माने दांडी मारल्यानंतर त्याच्या मित्राला सुधीरला त्याच्या मॅडमकडे रजेचे कारण देण्यासाठी पाठवतात आणि सुधीर अर्थात सचिन ज्या पद्धतीने धनंजय मानेंच्या रजेचं आजारी असल्याचं कारण मॅडमच्या पुढे मांडतात ते ऐकून अश्विनी भावेसारखी एखादी कोमल हृदयी बॉसही आपल्या आजारी कर्मचार्‍याला भेटायला निघाली नाही तर नवलच!

आणखी एक पटकन लक्षात येणारा चित्रपट आणि त्यातला प्रसंग म्हणजे अनिल कपूरचा लाडला.! दांडी मारून खलनायकच्या प्रिमियर शो ला हजेरी लावता यावी यासाठी आपला मामा गचकल्याची लोणकढी थाप आपल्या खडूस बॉसला मारताना आणि चित्रपट संपल्यानंतर त्याच खडूस बॉसच्या हस्ते बक्षिस स्विकारताना रवि बासवानी आणी अनिल कपूर यांनी अगदी धम्माल अभिनय केला होता. गेल्या बारा वर्षात खाजगी क्षेत्रात काम करत असताना अगदी याच पद्धतीच्या थापा मी स्वतःही बर्‍याचदा अनुभवल्या आहेत. मारल्या मात्र नाहीत हं!!

सरकारी ठिकाणी कधीच काम केले नसल्यामुळे व्यक्तिशः मला तिथल्या वातावरणाचा बिलकूल अनुभव नाही, पण सरकारी कार्यालयात काम करत असलेल्या ओळखीतल्या काही दांडी बहाद्दरांना अगदी जवळून पाहीलेले असल्यामुळे, खाजगी असो वा सरकारी सगळीकडे थोड्या फार फरकाने अगदी सारखेच अनुभव येतात असं दिसून येते. सरकारी ठिकाणच्या बाबू लोकांनी दांडी मारल्यानंतरची अद्भुत कारणे माझ्या या स्वतःच्या कानांनी ऐकलीयेत. तेच अगदी गेल्या बारा वर्षांत वेगवेगळ्या खाजगी ठिकाणी अगदी ग्राऊंड लेव्हलपासून काम करत वरिष्ठ पदावर आल्यामुळे आताशा या प्रकाराचा माझ्याकडे प्रचंड असा खजिना जमा झालाय. कधीकाळी मी स्वत:ही विंगेच्या पलीकडेच होतो आणि दांडी मारायला अशी एकापेक्षा कारणे वापरलेली असल्यामुळे, दांडी मारण्यासाठी देण्याच्या कारणांचे माझे अनुभवविश्व समृद्ध झालेय असे म्हणायला हरकत नसावी. अगदी अलीकडच्या काळातले लख्ख लक्षात राहावे असे काही भन्नाट अनुभव इथे नमूद करावेसे वाटतात. कोण जाणो एखाद्या वाचकाला याचा 'फायदा'ही होऊन जाईल.

टीसीएसमध्ये असताना बीपीओ असल्या कारणाने तीन शिफ्ट्मध्ये काम करावे लागे. अशाच एका सेकन्ड शिफ्टच्या वेळी संध्याकाळी काम संपवून डेस्कवर निवांत बसलो होतो नाईट शिफ्टच्या रिलीव्हरची वाट पाहत.

"मेरे नानाजी जऽऽस्ट आधे घंटे पैले गुजर गये. अभी हम लोग सब उधरही जा रहे है. अभी दोन दिन कामपे आँ नही सकता" साधारण साडे सात, आठच्या सुमारास माझ्या मोबाईलवर असा मॅसेज येऊन धडकला.

तो अर्थातच नाईट शिफ्टला येणार्‍या पार्टनरचा होता. आता त्याचा पुर्वेतिहास चांगलाच ठाऊक असल्याने, लगेचच मी ही माहिती माझ्या मॅनजरला आणि त्याच्याही वरच्या बॉसला दिली. मॅनेजर ट्रेनच्या प्रवासात असल्याने नीट कॉन्टॅक्ट करू शकत नव्हता, पण वरच्या बॉसने ही बाब गंभीरपणे घेत, त्या पठ्ठ्यालाच उलट मॅसेज धाडला.

"इस दु:खके समयमें हम सब आपके परिवारके साथ है, भाई तू बस अभी जहाँ गया है वो तेरे नानाके घरके फोटो मुझे और तेरे पार्टनरको व्हॉट्सअपपर भेज दे." ही तिखटचूर्णाची बरोबर लागू पडली. बरोबर दहा मिनिटांनी त्या दांडी बहाद्दराचा मला आणि सिनियर बॉसच्या मोबाईलवर मॅसेज आला...

'आय एम रियली सॉरी सर फॉर द इनकन्व्हेंयस. वुईल बी रीच ऑफिस बीफोर टेन पीएम टू रिलिव्ह माय करन्ट पार्टनर.'

आता काही महिन्यांपूर्वीच एका कुठल्याश्या शनिवारी माझ्या हाताखाली काम करत असलेल्या ऑपरेटरने लहान भावाचा अपघात झाल्याचे आणि त्याला भेटण्यासाठी गावी जाणार असल्याचे अचानक मला फोन करून कळवले. म्हटलं, काळजी घे लहान भावाची आणि हॉस्पीटलला पोचलास की एक फोटो पाठव व्हॉट्सपवर भावाला झालेल्या दुखापतीचा म्हणजे मलाही काही मदत करता येईल.

गोळी बरोबर बसली!!

एका इलेक्ट्रीशियनला आणि हाऊसकिपिंग ब्वॉयलाही सोबत घेऊन लेकाचा बिकिनीतल्या विदेशी तरूणी पाहण्यासाठी गोवा हिंडायला गेला होता!!

आणखी एका महाभागाने तर चक्क सासूबाई जिन्यातून पडल्यामुळे तिच्या पायांना प्लास्टर लावण्यासाठी दवाखान्यात जातोय असं कारण पुढे केल्याचंही पाहण्यात आलं होतं.

असंच एका सकाळी ऑफिसात बॉससोबत मिटिंगमध्ये असताना माझ्या मित्राच्या फोनवर घरून फोन आला, अर्थातच त्याच्या बायकोचा. फोनवर बोलताना त्याच्या चेहर्‍यावरून तो कमालीचा घाबरल्याचं दिसत होतं. फोन ठेवला आणि म्हणाला "सर माझ्या बायकोच्या पोटात खूप दुखतेय, तिला दवाखान्यात न्यायला हवेय. घरी सध्या कूणीच नाहीये." अगदी पुढच्याच क्षणाला बॉसने तडक निघण्यासाठी सांगितलं. बिचारा उठला आणि गडबडीने घरी गेलाही.

खाजगीत मागाहून कळालं की, हा संपूर्ण प्लॅन त्या पठठ्याने आणि त्याच्या बायकोने दांडी मारून चौपाटीला भटकण्यासाठी बनवला होता.

आहेत की नाही एकदम जगावेगळी आणि गमतीशीर कारणं!

इतक्या वर्षांच्या विविध अनुभवानंतर आता जेव्हा एखादा माझ्याकडे दांडी मारण्यासाठी किंवा मारल्यानंतरच्या दुसर्या दिवशी अशी कारणं घेऊन येतो तेव्हा ती व्यक्ती कितपत खरे बोलतेय कि खोटे बोलतेय हे बहुतेकदा अगदी दुसर्या मिनिटालाच माझ्या लक्षात येते. अशावेळी समोरच्याला जास्तीचे पाल्हाळ न लावू न देता मी जेव्हा थेट मुद्द्यावर पोचत तो खोटं बोलतंय हे दाखवून देतो तेव्हा समोरच्याची अवस्था खिंडीत अडकलेल्या माणसासारखी असते.

अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून..

नाट्यभाषासाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रनोकरीप्रकटनविचारप्रतिसादशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीमदतवादप्रतिभा

प्रतिक्रिया

स्पा's picture

24 Mar 2017 - 6:47 pm | स्पा

चान चान निबंध

नाही लिहित नाही लिहित म्हणत होतात ना?
घ्या आता.......
.
.
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव.

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 7:08 pm | किसन शिंदे

=))

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2017 - 3:09 pm | प्रसाद गोडबोले

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

किसन शिंदे's picture

30 Mar 2017 - 3:26 pm | किसन शिंदे

एवढ्या मरणाच्या उन्हात काय जेवण ठेवलेय का सोलापूरात.?! =))

नाही यार किसना, माझी ऑफर मागे घेतो. तू टाक जिल्ब्या.

किसन शिंदे's picture

30 Mar 2017 - 4:50 pm | किसन शिंदे

असं कसं x २

जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय.
जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण.
.
किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

किसन शिंदे's picture

30 Mar 2017 - 5:28 pm | किसन शिंदे

असं काय बे अभ्या, दोस्त ना तू आपला. शंभर कर ना गडे =))

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2017 - 5:37 pm | प्रसाद गोडबोले

सुकांताला जाउयात का जेवायला , जिलबी नाही पण आमरस मिळेल :ड

सूड's picture

30 Mar 2017 - 6:03 pm | सूड

तुमचं हे गडगडे वाचून म्हाग्रुंचा पिच्चर आठवला,

हेच लिहीणार होतो. पण किती जणांच्या शेपटीवर पाय द्यायचा ना? म्हणून गप्प बसलो. =))

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 7:17 pm | किसन शिंदे

बिनधास्त लिही रे तू सूड. आपलाच बोर्ड आणि आपलेच धागे..आपलं जिलब्या. =))

मोदक's picture

24 Mar 2017 - 7:20 pm | मोदक

बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे.

हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे.

..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 7:26 pm | किसन शिंदे

तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

प्रचेतस's picture

24 Mar 2017 - 7:31 pm | प्रचेतस

छान लेख

पैसा's picture

24 Mar 2017 - 8:16 pm | पैसा

एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 8:20 pm | किसन शिंदे

एकाच ठिकाणी कायम राहिलात तर शक्य नाही, पण बदलत राहिल्यास जमू शकते. ;)

शेवटचा डाव's picture

25 Mar 2017 - 1:43 am | शेवटचा डाव

काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा
1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही
2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे
3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे"
असो
"रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला"
लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु"
तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात
खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री's picture

25 Mar 2017 - 2:10 am | आनंदयात्री

>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून..

हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही.
या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात.

एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये.

अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात.

एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास.

इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो.

अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित's picture

25 Mar 2017 - 2:59 pm | विशुमित

ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता.

आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

प्रसाद गोडबोले's picture

29 Mar 2017 - 4:49 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर जिलेबी !

अत्रे's picture

29 Mar 2017 - 5:16 pm | अत्रे

मस्त :)

माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =))

त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2017 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.

पण धागा मस्तय रे...!

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

30 Mar 2017 - 5:30 pm | किसन शिंदे

एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.

बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी.

#प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ's picture

30 Mar 2017 - 5:52 pm | मी-सौरभ

लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.