Skip to main content

'किनी'-'मिनी' चमचा 'धरा' (लघुत्तम कथा)

Published on शुक्रवार, 24/03/2017
एक आटपाट शहर होत, त्या आटपाट शहरात किनई एक 'किनी' रहात असे. त्याच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं नाव होत, 'धरा'. एक दिवस 'किनी' मोठा झाला, नौकरीसुद्धा करु लागला. तसं 'धरा'नी त्याला प्रोपोज केलं; पण त्यावेळी 'किनी'ला आवडली होती 'मिनी'. 'किनी'ने 'मिनी'ला प्रोपोज केले, 'मिनी' हो म्हणाली, पण त्या आधी 'मिनी'ने विचारलेच होते तुझ्या आधीच्या मैत्रिणी कोण ? 'किनी'ने 'मिनी'ची 'धरा'शी ओळख करुन दिली. 'मिनी' किनई 'धरा'ला भेटली तिला उगीउगी सॉरी म्हणाली, 'धरा'ने लग्नात गीफ्ट काय देऊ म्हणून 'मिनी'ला विचारले; 'मिनी' 'धरा'ला म्हणाली 'किनी'ने विचारण्यापुर्वी मलाही अजून वेगळे कुणी आवडत असे पण त्यालाही माझी दुसरी मैत्रिण आवडली, माझी मैत्रिण मला त्याचा 'चमचा' म्हणत असे आणि त्यालाही जेवणास छोटे चमचे आवडत म्हणून किनई मी त्यांना लग्नात 'मिनी' चमच्यांचा सेट भेट केला. आणि जेवताना घेतलेला 'मिनी'चमचा टाकू नको असे सांगितले. हि गोष्ट ऐकुन 'धरा'नेही 'किनी'-'मिनी' च्या लग्नात चमच्याचा सेट दिला, 'चमचात धरलेला घास सांडू नकोस' असे बजावले. तेव्हापासून 'किनी'चे जेवणात लक्ष नसलेकी 'मिनी' 'किनी'ला अहो 'धरा' चमचा नीट 'धरा' अशी थट्टा करते. आणि 'किनी'-'मिनी' एकमेकांसोबत संसारात सुखाने नांदतात. हि कथा ऐकलेले सगळे 'किनी' त्यांनी 'धर'लेले 'मिनी'चमचे सांडत नाहीत ! अशी ही 'किनी'ने 'मिनी' चमचास 'धर'ण्याची कथेची अनुभूती येऊन वाचकांघरी सफळ संपुर्ण होवो. *( अंशिक तात्कालीक प्रेरणा 'या कवितेमुळे' आणि मागील पिढीतील माहित असलेल्या एका सत्यकथेतून )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 1730
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

U

मला वाटल॑ किनी-मिनी कडून चमचा गोटीच्या शर्यती पूर्वी सराव करून घेताय

In reply to by अनन्त्_यात्री

आम्ही आपलं शिंपल शिंपल लिवल, चमचा गोटी शर्यतीवर तुर्तास तरी काही सुचत नाही, खास करुन ललित लेखन माझा पिंड नव्हे. कथा लेखनाचा माझा तसा पहिलाच प्रयोग, तेव्हा आलेल्या प्रत्येक प्रतिसादासाठी आवर्जून आभारी आहेच.