प्रमोशन

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 5:11 pm

माॅर्निंग ब्रेकची वेळ.

ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

”मैंने सालभर क्या एेसेही नही घिसी यहाँपर, जो अभी ये सत्त्या बीचमें ही घूस रहा है." एका कोपर्यातल्या टेबलवर हातातल्या गरम पाण्याच्या कपात ग्रीन टी चार पाच वेळा डिप करतच रोहन मिंजलच्या कानाशी कुजबूजला.

”सब पता है रे मुझे, वोह सत्या कितना और क्या काम करता है और तू कितना काम करता है. सब मालुम है मुझे."

”बट तू डोन्ट वरी, धिस टाईम यू विल गेट गूड हाईक अॅज वेल अॅज दॅट मॅनेजर्स पोस्ट." गोल चेहर्याची सुबक ठेंगणी मिंजल ओठांचा चंबू करत अगदी लडिवाळपणे रोहनला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होती.

"यार मिंजल कुछ तो कर. तू ही एक है, जो मेरा काम पर्फेक्टली खतम कर सकती है." मिंजलच्या पुढ्यात असलेल्या ब्रेडवरच्या बटरकडे पाहत रोहनचे प्रयत्न सुरू होते.

"डोन्ट वरी डियर! मै हूं ना !"

ब्रेकफास्ट संपला तसं दोघेही उठून आपापल्या डेस्कच्या दिशेने निघून गेले. सतिश हा रोहनचा सह-कर्मचारी, दोघेही एकाच टिममध्ये काम करायचे. वर्षभरापूर्वी रोहन जॉईन झाल्यानंतर चारेक महिन्यांनी सतिश जॉईन कंपनीत रूजू झाला. दोघांचाही रिपोर्टींग मॅनेजर राजीव तसा शांत माणूस पण अगदी निर्णयशून्य! स्वतःचं असं काही ठाम मत त्याला कधी होतं कि नाही याचा रोहन आणि सत्याला नेहमी प्रश्न पडायचा. अकाऊंट्समध्ये असलेली मिंजलही त्यालाच रिपोर्ट करायची. ती काय आणि कसे रिपोर्ट्स करायची हे दोघेही जाणून होते म्हणूनच अप्रेझलच्या आधी दोघेही 'अडल्या नारायणसारखे' आपापल्या परीने तिला पटवण्याच्या प्रयत्नात होते.

"तू टेन्शन मत ले रे सत्या. मैने सरसे ऑलरेडी तेरे लिये बात कर ली है. डेफिनेटली यू वील बी अ नेक्स्ट मॅनेजर ईन युअर टीम." वेन्डर इनवॉइसेस क्लियर करण्यासाठी गेलेल्या सत्याला घोळात घ्यायला मिंजलने सुरूवात केली.

"बस मेल मेल खेलना आता है वोह रोहनको, काम तो कुछ करता नही."

"मुझे रिमाईंडर मेल भेजता है क्या पेमेंट्सके लिये, वो भी बॉसको सीसी में रखके! उसको तो मै बिलकूल छोडनेवाली नही हूं."

"एनिवे वो सब छोड. शामको सीसीडीमें चलतें है क्या? बहोत दिन हुये तेरे साथ कॉफी लिये हुये डियर."

शेवटच्या वाक्याने सत्याला कळून चुकले, त्याच्या खिशाला चारशे पाचशे रूपयाची फोडणी पडणार होती. मिंजलच्या डेस्कवरून निघताना पाकिटात किती रक्कम शिल्लक राहिली आहे हे त्याने चेक करून घेतले.

यथावकाश दोघांनीही आपापले अप्रेझल फॉर्म बॉसकडे सबमीट केले. केआरएमध्ये सगळ्या टारगेट फिल्ड्पुढे सेल्फ रेटिंग देताना दोघांनीही सढळ हस्ते रेटिंग्ज्सची उधळण केली. त्यातले अचिव्ह किती झाले आणि अनकंप्लीट किती राहीले हे दोघांसोबत, राजीवलाही चांगलेच ठाऊक होते. आपण मॅनेजर झाल्याची दिवास्वप्ने दिवसाढवळ्या दोघांनाही पाहून घेतली. आता बॉसच्या रेटिंग्ज्सची प्रतिक्षा होती.

फायनॅन्शियल ईयर एंडमुळे परफोर्मेन्स अप्रेझल रिव्यूव्ह एप्रिल एन्डला पार पडले आणि मे च्या पहिल्या आठवड्यात नवीन पोस्टिंगचे कम्युनिकेशन मेल सगळ्यांच्या मेलबॉक्समध्ये जाऊन धडकले.

'मिस. मिंजल दिक्षित अपॉईंटेड अ‍ॅज अ अ‍ॅडमीन मॅनेजर विथ द इफेक्ट फ्रॉम फर्स्ट मे ट्वेन्टी सेवेन्टीन....'

अनुभवी सतिश आणि रोहनच्या कल्पनेचे बेफाम उधळलेले वारू मिंजलने रोखून आपल्या दावणीला जोडले होते.

अनुभवशून्य पण राजीवच्या खास मर्जीतली मिंजल आता त्यांची मॅनेजर झाली होती आणि राजीवच्याऐवजी ते तिला रिपोर्टिंग करणार होते. गव्हर्नमेंटप्रमाणे आपल्या कंपनीतही आरटीआय हवे होते असा एक बालिश विचार दोघांच्याही मनात उगाचच डोकावून गेला.

धोरणकथाविडंबनसमाजजीवनमानरेखाटनप्रकटनअनुभवमतमाहितीसंदर्भचौकशीवादप्रतिभा

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

23 Mar 2017 - 5:29 pm | रुस्तम

हम्म्म्म असं झालं तर

जव्हेरगंज's picture

23 Mar 2017 - 5:31 pm | जव्हेरगंज

खरं आहे!

बघावं तिकडं xxxxxx

सुधांशुनूलकर's picture

23 Mar 2017 - 6:43 pm | सुधांशुनूलकर

सगळीकडेच मातीच्या चुली!

अतिअवांतर - हायला, धाग्याचं नाव वाचून 'अरे व्वा, किसनरावांचं प्रमोशन झालं की काय', असं वाटलं...
किसनरावांना प्रमोशनसाठी शुभेच्छा.

पैसा's picture

24 Mar 2017 - 10:11 am | पैसा

:)

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 10:19 am | किसन शिंदे

मला ही कुत्सितपणे हसण्याची स्मायली का वाटतेय. =))

पैसा's picture

24 Mar 2017 - 10:58 am | पैसा

मजेशीर कथा आहे. खूप ठिकाणी असे होताना पाहिले आहे. त्यामुळे फापटपसारा न लिहिता फक्त सहमती दर्शवली. शिवाय दोन बोक्यांचे भांडण आणि लोण्याचा गोळा ही क्लासिक कथा आठवली! =))

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 11:05 am | किसन शिंदे

शिवाय दोन बोक्यांचे भांडण आणि लोण्याचा गोळा ही क्लासिक कथा आठवली! =))

एग्जाटली हीच गोष्ट डोक्यात होती हे लिहीताना.

मराठी_माणूस's picture

24 Mar 2017 - 10:28 am | मराठी_माणूस

अन्याय झालाय किंवा डावलले गेले आहे असे काही वाटले नाही.

सतिश गावडे's picture

24 Mar 2017 - 10:34 am | सतिश गावडे

अरेरे... वाईट झालं.

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 10:35 am | किसन शिंदे

=))

प्रसन्न३००१'s picture

24 Mar 2017 - 10:42 am | प्रसन्न३००१

भेंडी, असंच असतं सगळीकडे शेवटी :(

मस्त गोष्ट! अशीच होत असतात प्रमोशन्स.
सभोवताली लक्ष्य ठेवून आपले स्पर्धक हेरून मंडळी आधीच सेटिंग लावतात.
ज्यांना ते जमत नै ते मागाहून म्यानेजरला 'अन्याय!' म्हणून ओरडतात अन 'पुढच्या वेळी'चे आश्वासन मागून घेतात.

अवांतरः
बाकी मिंजल हे नांव आवडलं. अनेक स्टायलिश मुलींची नांवं अशीच वेगळी असतात...पण आडनाव नोर्दिंडियन हवे ब्वॉ!
(गूगलच्या मते मिंगलचा हिंदीत अर्थ 'पागल' असा आहे! :)

मराठी कथालेखक's picture

24 Mar 2017 - 11:08 am | मराठी कथालेखक

चांगलंच झालं... निदान सुंदर मुलीला रिपोर्टिंग करताना कामाचा ताण तरी निवळेल :)

चला कीसनाला दुनियादारी समजू लागली तर.
असेच असते रे भावा, औकात नसलेले लोक फ़क्त वशिला वापरून शायनिंग करुन बोडक्यावर बस्तात. वर बाई माणूस म्हणाले की बोलायचेच नै.

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2017 - 12:32 pm | प्रसाद गोडबोले

भारी कथा आहे बे ! मि़जल आता बॉस होणार तर !!

एकदम कर्नल नेथन जेसपचा डायलॉग आठवला A Few Good Men मधील - Promote ‘em all...

JESSEP: You know, it just hit me, she outranks you, Danny.

KAFFEE: Yes sir.

JESSEP: I wanna tell you something, and listen up ‘cause I really mean this. You’re the luckiest man in the world. There’s nothing on this earth sexier, believe me gentlemen, than a woman you have to salute in the morning. Promote ‘em all, I say, ‘cause this is true. If you haven’t gotten a b*** j** from a superior officer, well, you’re just letting the best in life pass you by...

हा हा हा

सूड's picture

24 Mar 2017 - 12:36 pm | सूड

मातीच्या चुली!!

माझीही शॅम्पेन's picture

24 Mar 2017 - 1:33 pm | माझीही शॅम्पेन

अरे हे सगळी कडेच आहे , जग रीत आहे

रचाकने पुढच वाक्य काहीतर भलतच आहे अस वाटल :)

जो अभी ये सत्त्या बीचमें ही घूस रहा है

किसन शिंदे's picture

24 Mar 2017 - 2:01 pm | किसन शिंदे

चोराच्या मनात चांदणं !! =))

स्पा's picture

24 Mar 2017 - 2:37 pm | स्पा

ओके

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2017 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. आवडले लेखन लिहित राहा.

-दिलीप बिरुटे