विहार...भाग २

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 5:58 pm

पहिल्या भागाची लिंक
http://www.misalpav.com/node/39239
चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !!

हे सगळं आठवल्यावर अहमदच्या अंगावर शहारे आले. भानावर येताच आपण होडीवर असल्याचे त्याच्या ध्यानात आले. अहमदने त्याच्या बायकोला जास्त तपशील न सांगता फक्त नडियाडला जावे लागेल एवढेच सांगितले. तिला त्याचे गांभीर्य पूर्णतः: कळले नसले तरी ती चिंतातुर झालीच. नाडियाडला तिचा लांबच्या नात्यातला एक भाऊ राहायचा. त्याच्याकडे उतरता येईल असे तिने अहमदला सांगितलं. अहमदला या गोष्टीची काळजी नव्हतीच. त्याला डॉक्टरचे बोलणे आठवत होते.

"डॉक्टरसाहब इरफान ठीक तो हो जायेगा ना ?"
"अहमद..नडियाड के अस्पताल में बहोत अच्छे डॉक्टर्स है. वो कुछ ना कुछ रास्ता जरूर निकालेंगे.लेकिन..."
"लेकिन क्या साहब?"
"खर्चा बहोत हो सकता है ऐसा मेरा अंदाजा है"
"कितना होगा साहब?"
"वो तो नहीं बता पाऊंगा. अगर ऑपरेशन करना पडा तो लाख रुपये तक जा सकता है."
"इतना??"
"कर पाओगे क्या?"
"बहोत मुश्किल है साहब."
"हा..पर एकबार जा कर तो आओ वाहा.फिर देखते है."

एवढे पैसे कुठून आणावे हे अहमदला कळत नव्हतं. पण नडियाडला जाण्याआधीच पैशाची व्यवस्था करणं भाग होतं. तिथे गेल्यावर पैश्याची धावपळ करणं अशक्य झालं असतं. बँकेतले वगैरे मिळून चाळीसेक हजाराची व्यवस्था होती. सावकाराकडून पंधरा-वीस हजार उचलावे असं अहमदने विचार केला. त्यासाठी सावकाराकडे त्याला होडी गहाण ठेवावी लागली. नाडियाडला निघताना अहमदने जवळजवळ सत्तर हजार रुपये जवळ ठेवले. बायकोची नजर चुकवून स्वतःचा सोन्याचा गोफही त्याने डब्यातून काढून घेतला. त्याच्या बायकोची सोबत येण्याची इच्छा होती पण अहमदने तिला येऊ दिले नाही. शिवाय गरज पडली तरच तुझ्या भावाकडे जाईल असे त्याने ठणकावून सांगितले. आपण दोन-तीन दिवसातच वापस येऊ अशी एक वेडी आशा कुठेतरी त्याच्या मनात होती. शेवटी सगळी तयारी करून अहमद इरफानला घेऊन नडियाडला पोहोचला. तिथल्या मुलजीभाई पटेल इस्पितळात जायला त्याला सांगितले होते.

इस्पितळात पोहोचल्यावर तिथली गर्दी बघून ते दोघेही अवाक झाले. एवढी गर्दी आजपर्यंत त्यांनी फक्त बस स्टॅन्डवरच बघितली होती. रिसेप्शनमध्ये न्यू केसेस आणि ओल्ड केसेस असे दोन विभाग होते. त्यातल्या न्यू केसेस विभागासमोर अहमद उभा राहिला. इरफानचे पोट दुखायला सुरवात झाली असल्यामुळे तो खुर्चीवर बसला होता. नाव,पत्ता विचारून झाल्यावर तिथल्या माणसाने अहमदला विचारले,
"क्या तक्लीफ है?"
"जी पेट में बहोत दर्द होता है इसलिये हमारे डॉक्टरसाहब ने......."
"किडनी में क्या तकलीफ है ?"
"जी वो.....",अहमदला काय सांगावे सुचेना.
"कोई रिपोर्ट्स लाये हो?"
"जी हा..ये लिजिए"

रिसेप्शनिस्टने त्यांना दोन तास बसावे लागेल हे सांगितले. अहमद इरफानजवळ आला. काहीतरी खाल्ल्यावर बरे वाटेल असं विचार करून दोघेही तिथल्या कँटीनमध्ये जाऊन आले. थोड्यावेळाने त्यांचा नंबर लागला. केबिनमध्ये गेल्यावर डॉक्टरने विचारले,
"पेट में दर्द है."
"हा",इरफान म्हणाला.
"तो ऐसे यहा क्यो लाये हो?",डॉक्टरने अहमदला विचारले.
"जी वो हमारे डॉक्टरनेही यहा ले आने की सलाह दी."
"क्यो? ये किडनी हॉस्पिटल है"
"किडनी में ही तकलीफ है."
"क्या?"
इरफानसमोर बोलायची अहमदची इच्छा नव्हती पण आता नाईलाज होता.

"डॉक्टरसाहब इरफान की दोनो किडनीया आपसी में जुडी हुवी नहीं है. उसकी एक किडनी पेट में घूम रही है. शायद इसीलिये पेटदर्द होता है."
इरफान आणि डॉक्टर दोघेही आश्चर्यचकित झाले.
"क्या???? ये किसने बताया आपको?"
"हमारे डॉक्टरने."
"और आपने मान लिया. कमाल है!!"
"साहब रिपोर्ट में भी येही लिखा है. आप देख लिजिए"
"रिपोर्ट तो कुछ भी बनेंगे. ये छोटे-मोटे गाव के डॉक्टर यही करते है."
"आप एक बार देख तो लिजिए"
"ये नामूमकिन है. माफ किजीये लेकिन आपको बेवकूफ बनाया गया है"
"नहीं साहब"
"दिखाईये वो रिपोर्ट"

रिपोर्ट बघून डॉक्टरचा चेहरा गंभीर झाला. तो दुसऱ्या डॉक्टरांशी बोलायला बाहेर निघून गेला.थोड्यावेळाने येऊन तो अहमदला म्हणाला,
"आप ये सारी टेस्ट करावा लिजिए. और फिर एकबार सोनोग्राफीभी करनी पडेगी"
"सोनोग्राफी तो हो गयी हैं ना"
"इस रिपोर्टपे हम भरोसा नहीं कर सकते. प्लीज आप सोनोग्राफी कर लिजिए."

अहमद हो म्हणून बाहेर आला.सगळ्या टेस्ट्स आणि सोनोग्राफी करेपर्यंत संध्याकाळ झाली होती. इरफान अजूनही बाहेर आलाच नव्हता.अहमद परत त्या डॉक्टरांना भेटला. ते म्हणाले,
"हमने इरफान को ऍडमिट कर लिया है. आप बाहेर जाके फॉर्म और पैसे भर दीजिये."
"जी वो रिपोर्ट?"
"वो मैं देख लुंगा"
"ठीक है. मैं पैसे भरता हू. सब मिलके कितने पैसे खर्च हो सकते है कुछ बतायेंगे?"
"आप फिकीर मत किजीये. कम से कम पैसे लगे इसकी हम कोशिश करेंगे."

डॉक्टरांनी काही गोष्टी अहमदला सांगितल्याचं नाही ज्या त्याला नंतर इरफानकडून कळल्या. इरफानच्या केसने आज त्या हॉस्पिटलमध्ये खळबळ माजविली होती. त्याची सोनोग्राफी करताना हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरसमवेत आठ डॉक्टर्स तिथे हजर होते. कोणीही अशी केस याआधी बघितली नव्हती. ही केस त्या सर्व डॉक्टरांसाठी एक आव्हान होतं. पण भारतातलं सर्वोत्कृष्ट किडनी हॉस्पिटल म्हणून आपण ही केस सोडवू शकतो असा प्रमुख डॉक्टरांना विश्वास होता.

इरफानला ऍडमिट केल्यावर आता अहमदला स्वतः:च्या राहण्याची सोय करायची होती. पण आता खूपच उशीर झाला होता. बाहेरच्या बाकड्यावर काही पेशंट्सचे नातेवाईक झोपले असल्याचे त्याने पाहिले. त्याने आजची रात्र तिथंच झोपायचं ठरवलं. इरफानची काळजी वाटत असली तरी फार खर्च येऊ देणार नहीं असे डॉक्टरने सांगितल्यामुळे अहमद जरा निश्चित होता. अहमदचा लगेच डोळा लागला. रात्री काहीश्या कुजबुजीने त्याला जाग आले. बाजूचे दोन माणसं बोलत होते.

"ट्रान्सप्लांट तो हो गया आज. एक टेन्शन निकाल गया सरसे."
"हा पर अभी डिस्चार्ज मिलने को टाइम लगेगा."
"कोई बात नहीं. देख लेंगे."
"और पैसे का इंतजाम कर लिया क्या?"
"हा आज और पाच लाख रुपये मंगवा लिये है घरसे. कल चाचाजी लेकर आयेंगे."

पाच लाख ऐकून अहमद खडबडून उठला.

"ट्रान्सप्लांट के बाद भी इतने पैसे लगेंगे?"
"एक इंजेक्शन की किंमत एक लाख अस्सी हजार है. ऐसे दो देने है."

अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !!

क्रमश:

कथाअनुभव

प्रतिक्रिया

शलभ's picture

23 Mar 2017 - 6:08 pm | शलभ

वाचतोय. पुभाप्र.

काय लिहावे कळत नाही! :-(

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2017 - 7:53 pm | मराठी कथालेखक

उत्कंठा निर्माण होत आहे

आनंदयात्री's picture

24 Mar 2017 - 2:23 am | आनंदयात्री

या भागात उत्कंठा वाढलीये. मागच्या भागात किडनी चोरांचे रॅकेट असावे असे वाटले होते पण इथे तर खरेच किडनी डिटॅचड आहे. पुभाप्र.

शित्रेउमेश's picture

24 Mar 2017 - 8:41 am | शित्रेउमेश

उत्कंठा वाढलीये. वाचतोय. पु.भा.प्र.

पैसा's picture

24 Mar 2017 - 2:55 pm | पैसा

वाचत आहे