न्यू यॉर्क : ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
18 Sep 2016 - 7:29 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

काँझरवेटरीजवळ असलेली रेस्तराँ पाहताच दमलेल्या पायांनी आणि भुकेने खवळलेल्या पोटाने जोरदार निदर्शने सुरू केली. अर्थातच त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.

आरामात बसून उदरभरण केल्याने पोटोबा शांत झाले होते आणि पायही परत ताजेतवाने झाले होते. आतापर्यंत दुर्लक्षित झालेली रेस्तराँच्या खुर्च्यांच्या आजूबाजूची फुले आता अचानक खुणावू लागली होती...

काँझरवेटरी जवळच्या रेस्तराँच्या खुर्च्यांच्या आजूबाजूचे फुलोरे

स्टाईनहार्ट काँझरवेटरी

हे विशिष्ट हवामानातल्या वनस्पतींसाठी आणि खास देखाव्यांसाठी बनवलेले ग्रीनहाऊस संकुल आहे. या दोन मजली संकुलातले विभाग एकमेकांना जोडून आहेत. अनेकदा शिड्या वापरून वरखाली जावे लागते आणि काही ठिकाणी उंच वृक्षराजी नीट न्याहाळता यावी यासाठी उंच निरिक्षणमनोरे आहेत. त्यामुळे, आत शिरल्यावर एखाद्या भुलभुलैयात गेल्यासारखे वाटते. पण फक्त एकच एक बाजू घेऊन (उदा : डावी, डावी, डावी) वळत राहिले तर सगळे संकुल पाहून सहीसलामत बाहेर येता येते ! :)

स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०१

बोन्साय विभाग

इथला बोन्साय संग्रह अमेरिकेतला सर्वात जुना आहे असा त्यांचा दावा आहे.

स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०२ : बोन्साय विभाग

ऑर्किड विभाग

हा मी पाहिलेला सर्वात मोठा ऑर्किडसंग्रह होता. त्याच्या आकारामुळे जास्त प्रभावित झालो की तिथले चित्रविचित्र फुलोरे पाहून जास्त आश्चर्यचकीत झालो हे मी अजून नक्की करू शकलो नाही !

स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०३ : ऑर्किड विभाग

मरुस्थल विभाग

इतके विविध आणि मोठ्या प्रमाणात फुलोरे आलेले निवडुंग मी पहिल्यांदाच पाहिले ! त्यातील काही निवडक खालच्या चित्रांत दिसतील...

स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०४ : मरुस्थल विभाग

काँझरवेटरीमधले अजून काही विशेष फुलोरे...

काँझरवेटरीमधले अजून काही विशेष फुलोरे

थकलेले पाय विसरून मी त्या काँझरवेटरीमधून दोन फेर्‍या मारल्या !

चकीत मनाने तिथून पुढे निघालो तर बागेने अजूनही बरेच काही बघायचे आहे याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली...

मूळ जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांना प्रमाणापेक्षा जास्त कृत्रिम व आखीवरेखीव करण्याऐवजी, तिचे मूळ नैसर्गिक सौंदर्य जपून ते कसे जास्त सुंदर करता येईल इकडे जास्त लक्ष दिले गेले आहे हे जागोजागी दिसत होते...

फिरत फिरत आम्ही ओक सर्कल येथे पोहोचलो. आजूबाजूचे सौंदर्य निरखत खिनभर बसून श्वास घ्यावा अशी जागा ! बाग बनवणार्‍यांच्या मनातही तेच असावे. कारण त्यांनी त्या चौकात बसण्यासाठी बाकेही ठेवलेली होती...

ओक सर्कल : ०१

ओक सर्कल : ०२ : परिसर

बागेचे नाव बोटॅनिकल गार्डन (वनस्पतीशास्त्रिय बाग) आहे. पण "ही एक गंभीर शैक्षणिक व संशोधनपर जागा आहे" असा नाही तर "सर्व वयाच्या आणि सर्व पार्श्वभूमीच्या लोकांनी तेथे येऊन एक आनंदभरा पिकनिक साजरा करावा व ते करताना कळत-नकळत कमीजास्त ज्ञानवृद्धी करून जावे" हा उद्येश डोळ्यासमोर ठेवून तिचा चेहरामोहरा जाणीवपूर्वक बनवला आहे, हे वारंवार जाणवते. यासाठी तिच्या विकासकांच्या व त्यामागच्या प्रशासकांच्या कल्पकतेची प्रशंसा करावी तेवढी थोडीच ! अख्ख्या बागेत एकही संरक्षक दिसला नाही. पण तरीही अगदी लहान मुलेही कोणत्याही झाडाचा पाला किंवा फुले तोडताना दिसली नाहीत व इकडेतिकडे टाकलेला कचरा दिसला नाही. अर्थातच, या बागेला भेट देणार्‍या परदेशी प्रवाशाच्या मनातही "इथे परत यायला जमले तर किती बहार येईल" असा विचार येत असला तर त्यात आश्चर्य ते काय !...

बागेतला आनंदोत्सव

कितीही चालत राहिलो आणि कितीही फुले बघितली तरी अजून काही नवीन दिसतच होते. त्यामुळे चालताना भिरभिरत्या नजरेने सतत आजूबाजूचे निरीक्षण करणे आणि काही वैशिष्ट्यपूर्ण दिसले की फोटो काढणे चालूच होते...

आमचा पुढचा थांबा होता चेरी एस्प्लनेड. बागेच्या या भागाला भेट देण्यासाठी आमची वेळ सर्वोत्तम नव्हती. त्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये "चेरी ब्लॉसम" ची वेळ उलटून गेली होती. बहरलेली असताना चेरी वृक्षावली कशी दिसत असेल याचा जालावरून घेतलेला फोटो पाहिला तर मी काय म्हणत आहे याची कल्पना येईल...

आम्ही पाहिलेली चेरी वृक्षावली आणि ती बहरात असतानाचा जालावरून घेतलेला फोटो

बहरात नसलेल्या चेरी वृक्षावलींतून चालत जाऊन पुढचा महत्त्वाचा, क्रॅनफर्ड रोज गार्डनचा, थांबा घ्यायचा होता. आतापर्यंत आमच्या अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या होत्या आणि हे उद्यान त्या फोल जाऊ देणार नाही इतकी त्याच्याबद्दल खात्री झाली होतीच. तेव्हा पाय झरझर गुलाबी उद्यानाच्या दिशेने चालू लागले.

(क्रमशः :)

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

बाबौ ! काय अप्रतिम उद्यान आहे.केवढं मोठं आहे.पायाचे तुकडे पडत असतील बघत फिरताना.

यशोधरा's picture

18 Sep 2016 - 8:26 pm | यशोधरा

सुरेख आहेत फुलं!

ब्रूकलिन वनस्पती उद्यानाचे दोन्ही भाग आवडले.
अफाट वनसंपदा आहे.

चौकटराजा's picture

20 Sep 2016 - 7:08 am | चौकटराजा

आतापर्यंत कोडईकनाल, केरळ व काश्मीर येथील जैववैविध्य पाहिले होते पण हे काही औरच प्रकरण दिसतेय. आपण निवडही अशी केलीय की त्यात अधिकात अधिक नवेपण पहाणार्‍याला वाटले पाहिजे. हा डोळ्यांसाठी रम्य असा सोहळा आहे. निसर्गातच परमेश पहाणार्‍या आमच्या सारख्याला ईशदर्शनच झाले म्हणायचे ! धन्यवाद !

पद्मावति's picture

20 Sep 2016 - 2:57 pm | पद्मावति

सुरेख आहे.

वरुण मोहिते's picture

20 Sep 2016 - 3:25 pm | वरुण मोहिते

मस्त !!!!

इशा१२३'s picture

20 Sep 2016 - 7:29 pm | इशा१२३

सुंदर फोटो!बरच मोठ दिसतयं उद्यान.ओर्किड विभागाचे फोटो पाहुन सिंगापोरच्या अोर्चिड गार्डनचि आठवण झाली, भरपुर व्हरायटि आहे तिथेही ओर्किडची.

खटपट्या's picture

20 Sep 2016 - 9:38 pm | खटपट्या

मस्त !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2016 - 1:23 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

या गार्डन वाल्या भागाने
वो क्या कहते है ना साहब
साला दिल
बॉग बॉग हो गया.
आणि हे जे फुल आहे खास करुन 1

याच्यासाठी हा शेर मॅच होतो.
मुझे यूँ लगा कि ख़ामोश ख़ुश्बू के होँठ तितली ने छू लिये
इन्ही ज़र्द पत्तों की ओट में कोई फूल सोया हुआ न हो

रेवती's picture

29 Sep 2016 - 6:32 pm | रेवती

बहारदार बहर.