न्यू यॉर्क : १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
3 Oct 2016 - 12:14 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

अश्या दृष्टीआडच्या सृष्टीची झलक पाहिली तर मग हे उद्यान वर्षानुवर्षे जगातल्या सर्वोत्तम उद्यानामध्ये का गणले जाते याचे गमक समजणे सोपे जाते. याशिवाय, ही दृष्टीआडची सृष्टी माझ्या अनेक कुतूहलाचे निरसन करून जाते, माझ्या ज्ञानात भर टाकत जाते आणि माझा पर्यटनाचा आनंद द्विगुणित करून जाते.

ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनपासून सबवे पकडून ब्रूकलीनमधलेच क्लार्क स्टेशन गाठले. तेथून चालत १५-२० मिनिटांत ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेडला पोहोचलो. वाटेत नेटनेटक्या ब्रूकलीनचे दर्शन झाले. जिथे जागा मिळेल तिथे झाडे व फुलझाडे लावून आपला परिसर कसा आकर्षक करता येईल याकडे प्रशासन आणि नागरिकांची चढाओढ असल्यासारखेच दिसत होते...

ब्रूकलीन परिसर ०१

ब्रूकलीन परिसर ०२

ब्रूकलीन परिसर ०३

ब्रूकलीन परिसर ०४

ब्रूकलीन परिसर ०५

ब्रूकलीन परिसर ०६ व ०७

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड (याला ब्रूकलीन एस्प्लनेड असेही म्हणतात) हा इस्ट रिव्हरच्या मुखाजवळ दक्षिण मॅनहॅटनच्या समोर असलेल्या ब्रूकलीनच्या किनार्‍यावर बांधलेला ५५७ मीटर लांबीचा भलामोठा चार मजली पादचारी चौथरा आहे. हा चौथरा इंटरस्टेट २७८ महामार्ग व त्याच्या सर्विस रोडच्या वर बांधलेला आहे.

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०१ : प्रोमोनेडच्या खालून जाणारा इंटरस्टेट २७८ महामार्ग

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०२ : मॅनहॅटनवरून होणारे ब्रूकलीन प्रोमेनेडचे दर्शन (जालावरून साभार)

त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे येथून मॅनहॅटनची जगप्रसिद्ध आकाशरेखा, न्यू यॉर्क बंदर, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, ब्रूकलीन पूल, इत्यादींचे मनोहारी दर्शन घेता येते.

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०३ : प्रोमोनेडचे मोक्याचे स्थान दाखवणारा नकाशा (जालावरून साभार)

ही जागा न्यू यॉर्कच्या पार्क व्यवस्थापनाच्या नियंत्रणात आहे आणि एखाद्या उद्यानासारखी विकसित केलेली आहे. लोक इथे धावायला, दक्षिण मॅनहॅटनचा (विशेषतः संध्याकाळचा व रात्रीचा) नजारा पाहायला आणि मस्त मजेत बाकावर बसून हडसन नदीवरून येणारा वारा खायला येतात.

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०४ : प्रोमोनेडच्या बाजूने दिसणारा प्रवेशमार्ग

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०५ : प्रोमोनेडच्या बाजूने दिसणारा प्रवेशमार्ग

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०६ : निरीक्षण चौथरा ०१

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०७ : निरीक्षण चौथरा ०२

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०८ : ब्रूकलीन व मॅनहॅटनला जोडणारा ब्रूकलीन ब्रिज

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०९ : गव्हर्नर्स आयलंड व त्याच्या उजव्या टोकाच्या मागे दिसणारा (पलीकडच्या बेटावर असलेला) स्वातंत्र्यदेवीचा पुतळा

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड १० : ब्रूकलीन किनारा, हडसन नदी आणि पलीकडच्या किनार्‍यावरच्या मॅनहॅटनमधल्या गगनचुंबी इमारती

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ११ : संध्याछाया पसरू लागल्या की मॅनहॅटनची आकाशरेखा जरा जास्तच आकर्षक व गूढगंभीर दिसू लागते

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड १२ : रात्रीच्या काळोखात मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारती दिव्यांनी झळकू लागल्या की त्या अधिकच आकर्षक दिसू लागतात (जालावरून साभार)

परतीची वेळ झाली आणि इतका वेळ मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारतींनी वेधून घेतलेले लक्ष प्रोमोनेडच्या बागेकडे गेले. प्रोमोनेड व रहिवासी इमारतींमधली चिंचोळी पट्टीही सौंदर्यपूर्ण बागेने भरून काढली होती...

ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड १३ : बगिचा

परतीच्या रस्त्यावरही ब्रूकलीनकरांच्या कलासक्तीची अनेक उदाहरणे नजरेस पडत होती...

परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०१

परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०२

परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०३

परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०४

परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०५

(क्रमशः :)
===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Oct 2016 - 4:31 am | रेवती

सर्व फोटू आवडले.

अजया's picture

3 Oct 2016 - 12:43 pm | अजया

सुंदर.

पद्मावति's picture

3 Oct 2016 - 1:11 pm | पद्मावति

मस्तं!

वेल्लाभट's picture

3 Oct 2016 - 4:25 pm | वेल्लाभट

सुंदर शहर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2016 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद !

खटपट्या's picture

6 Oct 2016 - 9:00 pm | खटपट्या

छान फोटो.

इशा१२३'s picture

6 Oct 2016 - 11:20 pm | इशा१२३

फोटो आवडले.