दोन वेडे - उपसंहार

मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला! त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला! डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता! शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत! भारत अमेरिका युद्ध! जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते! "सर आपल्यासाठी पत्र आले आहे" बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले! "लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते! त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!

आला आला जिलबीवाला

काव्यरस
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

दोन वेडे -३

तो वेडा ब्रेड कापत होता. "हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला. वेडा फक्त त्याकडे बघत होता. "१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस" वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला. मार्कने तो शिताफीने चुकवला. "१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं! बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखनविषय:
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

निरीक्षण शब्दांच्या अपभ्रंशाचे

लेखनविषय:
लेखनप्रकार
"सचीन शतकांसाठीच खेळायचा" कपील पा जी म्हणाला,"त्याच्यातल्या क्षमतेला अल्पसंतुष्टवृत्तीमुळे न्याय मिळाला नाही". मी वेगळाच विचार करत होतो. बंगाली साहित्यातून सुंदर नावं आली आहेत,मूळ शची +इंद्र =शचींद्र असावे ,मग उच्चाराला सोपे करण्यासाठी जसा देवेंद्रचा देवेन होतो तसा शचींद्रचा शचीन व पुढे सचीन झाला असावा.

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश

लेखनविषय:
79 साल मध्ये एक हिंदी फिल्म आली होती, सरगम. काहींना ते आठवत असेल, हिट पिक्चर होतं, गाणीही खुप गाजली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं. गीतकार होते आनंद बक्षी. 'परबत के इस पार' या गाण्यात ते लिहून गेले, ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस ह्या ओळी आनंद बक्षी साहेबांनी का लिहील्या असतील ? हा प्रश्न मला अनेक वर्षे पडला आहे. बरं,स्टोरीलाईनची गरज म्हणून लिहीलंअसेल म्हणावं तर बक्षी हे सिध्दहस्त कवी होते.

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!) न्मसर्कार म्हणडलि! तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखनविषय:
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखनविषय:
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखनविषय:
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद
Subscribe to व्युत्पत्ती