लेखांचा खीमा-पाव
साहीत्य :
१) मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, इत्यादि....('तात्यासाहेब', 'बळवंतराव' भीमराव, 'भाईकाका, इ.) अशा माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे.
२) ज्या दुकानदाराकडून हा लेख आणलेला आहे त्याचा मेंदू. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या दुकानदाराला मेंद/अक्कलू नाही या वर आपला ठाम विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे.