आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात.
पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते.