“यावेळेस कोण येनार आहे तुमच्या ऑफिसच्या पार्टीला?”
“न ऐकलेले नाव आहे. कुणी रघू दिक्षित ”
नाव बदलले तरीही हा संवाद दरवर्षीचाच, नांव ओळखीची असली तरी कार्यक्रमला जाण्याचा उत्साह आणि प्रतिक्रीया ही अशीच असते. कुणीतरी येनार, चार गाणी म्हणनार, अर्धी बॉलीवुडची काही तॉलीवुडची. आपण पोर सांभाळायची, गर्दीतून रेटारेटीतून खाण्याच्या प्लेट आणायच्या, पोरांना खाउ घालायचे मग आपण खायचे. हे सार करीत असताना वेळ मिळेल तसे स्टेजवर चाललेले गाणे ऐकायचे. पार्टी फक्त खाण्यासाठी असते असे वाटावे इतकी गर्दी खाण्याच्या काउंटरवर असते आणि गायकाच्या अगदी समोरच्या खुर्च्या देखील रिकाम्या असतात.