मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिशब्द

कोल्हे-कुई

पुष्कर ·
लेखनप्रकार
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.

मराठी भाषा व शब्दनिर्मीती

मराठी शब्द ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
  • भाषा
कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासुन तयार झालेल्या शब्दांमुळे वाक्यांपर्यंत पोहोचते. भाषेत जितके जास्त शब्द तितकी तिची समृद्धी जास्त. त्यातही हे शब्द जर एक स्वतंत्र व नेमका अर्थ प्रतित करणारे असतील तर त्या भाषेचे सामर्थ्य अधिकच जाणवते. माझ्या माहितीप्रमाणे "आप" ह्या शब्दाचा अर्थ पावसाच्या थेंबाच्या ढगांपासून पृथ्वी पर्यंत पोहोचण्याच्या मधल्या स्थितीसाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर त्याचे "पाणी" होते. हे शब्द समृद्धीचे एक ऊदाहरण. "एसोटेरिक" हा इंग्लिश शब्द "एखाद्या विषयाचे खास ज्ञान व आवड असलेल्या काही व्यक्तींचा समुह" यासाठी वापरतात.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

भोचक ·
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

स्वेच्छानिवॄती

चेतन ·
आदरणिय गुरु केशवसुमारांची निवॄती हे प्रकटन वाचले.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २

पुष्कर ·
(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.) पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण (पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन) पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

पुष्कर ·
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

मजेशीर शब्द

आर्य ·
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

(किंमत)

चेतन ·
कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं) कारणे होतीचं तशी लिहायला प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या प्रश्न हा साधाच होता पण तरी लागला तो काहीतरीच कारणे द्यायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे) काळजी त्यांची नका करू एव्हढिही की काळजी लागेल ही खटकायला बंद कधीही नाही केले मी उमलायचे आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला भाव नाही तुला थोडासाही दिला काजवे लागले दिवसाचं चमकायला माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी जेव्हा भूक ही लागेल बोलायला

लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)

इनोबा म्हणे ·
लेखनप्रकार
आख्खा 'इंडिया' मधे 'वर्ल्डफेमस' असलेल्या 'मुम्बईय्या हिंदी' प्रमाणेच मराठीतसुद्धा अशा प्रकारचे गमतीशीर शब्द व वाक्यप्रकार आहेत जे ठराविक शहरात वा गावात वापरले जातात.आपण अशाच प्रकारचे शब्द इथं इतर गावकर्‍यांनाही सांगावेत,जेणेकरुन आपले शब्द-वाक्यप्रकार ही आख्ख्या मिपात 'वर्ल्डफेमस' होतील. आमच्या पुण्यात आम्ही वापरत असलेले काही शब्दः गोड आमटी: बोलीभाषेतही लेखी मराठी,जड शब्दांचा वापर करणारे 'महाशय'(शक्यतो 'सदाशिव पेठेतला') अनपरवडेबलः न परवडणारे अनझेपेबलः न झेपणारे मसशाणा: अतिशहाणा नव्वदने कल्टी खाणे: लगेच सटकणे निगाहे बघ: निघायचे बघ केशवः नाकासमोर चालणारी व्यक्ती होमीओपॅथीचा पेशंटः होमोसेक्शूअल

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.