ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती.
------------–---–---------------------------------------------------------------------
(*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण)
यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू?
मी:-वाढा!
वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच!