Skip to main content

मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 02/04/2021 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर:- (सदर लेखन आम्हास काल इमेल बॉक्स चे उत्खनन करताना सापडलेले आहे,म्हणून त्यास हे टायटल दिले आहे. आमचे टायटल पाच वर्षांपूर्वी क्लिअर-झालेले असल्याने "असे" नाव सुचले,हे वाचकांपैकी गरजूंनी नीट ध्यानाच्या आत घ्यावे! गरजू 'नसलेल्यांबद्दल' आमची काहीही आरजूच नाही! ;) त्यामुळे त्यांनी नुसतेच वाचावे) मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न! 1) मला (सकाळची) वेळेवर आपोआप जाग आलेली आहे. 2) मेसवर शेपूची भाजी खायला मिळते आहे. 3) मी दररोज कपडे धुतो आहे. 4) रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला आहे.

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!

आत्म्याच्या आठवणी..., - दिखाऊ यजमानीण*

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 17/10/2019 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती. ------------–---–--------------------------------------------------------------------- (*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण) यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू? मी:-वाढा! वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच!

दुष्ट दुष्ट बायको!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 31/07/2019 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

जागरण....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/06/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

दुत्त यजमाण, स्पष्ट गुर्जी-एक खरीखुरी टेस्ट म्याच!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 04/10/2018 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
यजमा'ण :-" काय गुर्जी, एव्हढ्यातच अलीकडे लग्न झालं म्हणे तुमचं!? " गुर्जी:-" हो!!!" यजमा'ण :-" आणि मुलगाही झाला लगेच! " गुर्जी:-" हो!!!!! " यजमा'ण :-" उशिरा होऊन बर जमलं(लवकर!) " गुर्जी:-"!!!" यजमा'ण :-" ह्या ह्या ह्या...15 ओव्हर झाल्यावर उतरलात खेळायला! " गुर्जी:-" (दु दु दु दु!!!) " यजमा'ण :-" तरी फास्टेस्ट फिफ्टी झाली की(तुमची!) " गुर्जी:-" (लउल्लूल्लूल्लूऊ) " यजमा'ण :-" भाग्यवान आहात. " गुर्जी:-" हो!!!!!!! " यजमा'ण :-" नायतर 15 ओव्हर नन्तर खेळणार्यांना पॉवर प्ले गेल्या(?)मुळे रिस्टरीक्षण ( क्षण???)येतात,त्यांनी पळून(!!!!)रन खूप काढावे लागतात नै!? हहा हहा हहा हहा हहा हहा हा!

च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

लेखक खिलजि यांनी बुधवार, 23/05/2018 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
च्या मायला बॅट घ्यायची होती हातात अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं पण व्हायचं होतं येगळंच तिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं एकदा का लग्न झाले नक्की समजा झाली तुमची चक्की दळत राहा जात्यावाणी पळत राहा चोरावाणी चंद्र सूर्य मग एक भासतील तारका क्षणात लुप्त होतील सारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील उरलेसुरलेले केसही उडतील जसं जसं कुटुंब वाढेल तुमची "सावित्री "तुम्हास कुटून काढेल थोरामोठ्यांचं बघता बघता आयुष्य सार्थकी लागेल माझे पण असेच काहीसे झाले जास्त जाच नको म्हणून गेलो पोपटवाल्या ज्योतिषाकडे त्याने सांगितल्या प्रमाणे वडाला उलट फेरे मारले गणपतीला अ

बाई पलंगावर बसून होती

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 26/04/2018 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}