जागरण....

काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

(गफ)

पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

दाराआडचे घड्याळ

. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र

(दाराआडची आई)

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

३१ डिसेंबर

लेखनविषय:
लेखनप्रकार
३१ डिसेंबर ची पार्टी. तिघे जण मित्र असतात व ते ३‍१ डिसेंबर ची पार्टी करायचे ठरवतात व त्यानुसार ते सर्व जण रात्री १०:३० वाजता ठरल्याप्रमाणे बाहेर पडतात.बाहेर पडल्यानंतर रोड वर धमाल मस्ती करत चालेले असतात कारण बाहेर माहोलच नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोश चाललेला असतो.कारण थोड्याच वेळात नवीन वर्ष चालु होणार असते.पण ते ज्या रोड वरून जाणार असतात त्या रोडवर एक पिझ्झा खाण्याचे स्वस्त व मस्त हॉटेल आहे.असे त्या तिघांपैकी एक मित्र त्या दोघांना सांगतो कि आपण( ४०₹ ला एक आहे असे पण सांगतो.

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Re-Revisited)

लेखनविषय:
लेखनप्रकार
साडे तीन शहाणे आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited) हे दोन्ही धागे वाचलेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय असू शकतील याचं हे विवेचन आहे असं जाणवलं. पण एक विचार आला की प्रॅक्टिकल नेहमी उलट किंवा वाईटच का असावं? दु:खदायकच का? त्यातून तयार झालेला हा संवाद. सिनेमा संपतो. जगणं नाही. काही संवाद [मराठीतून] - . . . इमरानः काय रे मोरोक्को काय म्हणतंय? लैला: काय मोरोक्को घेऊन बसलाहेस अजून. आम्हीही कामं धामं करतो म्हटलं.. :-) इमरानः ओह.. लैला.. मस्त वाटलं आवाज ऐकून!

मोदी[च] का?

लेखनप्रकार
डिस्क्लेमरः या विषयावरील अनेक धाग्यांमधे हात धुऊन घेण्याची अजिबात ईच्छा नाही. सहज वाटलं म्हणून लिहिलंय. :-) ===================== बर्‍याच दिवसांपासून या चर्चा पाहतोय, धागे पाहतोय.. मोठं कौतुक वाटतंय.. मोदींचं!! लोक किती जागरूक झालेत नाही? माझ्यासारख्या, न्यूज पाहण्याचा / वाचण्याचा जाम कंटाळा असलेल्या माणसाला, मागच्या ४-५ वर्षात किती उत्सुकता असते आता.. पुढे काय याची! नाही, पुर्वी अगदीच नव्हती असं नाही.. पण हे सगळं असंच चालणार.. कुणी काssssही बदल करू शकणार नाही असं अगदी मनावर ठाम बिंबलं होतं! साधारण २००६-२००७ पासून मोदींचं नाव सतत कानावर पडू लागलं.

मोबाईलची शेजआरती

*मोबाईलची शेजआरती* उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ|| दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश बॅटरी उतरवली दोन वेळा ||१|| घरी लपविले आई बापापासून मला ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ असा टाईमपास किती करावा? ||२|| असतात महत्वाची कामे घरी हापीसात न वापरावे कधी कितीही व्हाटसअप जरी आता मिळे फ्री डेटा ||३|| वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी जरी मी असे चांगला ||४|| काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे?
Subscribe to मौजमजा