Skip to main content

मौजमजा

मास्तरांची जिरवली!

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 20/09/2019 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी सातवीत होतो. माझं हायस्कूल तालुक्यातील उत्तम नावाजलेले होते. अतिशय शिस्तप्रिय आणि मुलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्राचार्य आम्हाला लाभले होते. सहकार सम्राट, साखर सम्राटाची संस्था असली तरी भ्रष्टाचार, पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करणं वगैरे गोष्टी तेव्हा अजिबात नव्हत्या. केवळ गुणवत्ता हाच निकष होता. प्राचार्यांच्या कावळ्याच्या नजरेतून एकही चूकीची गोष्ट सुटत नव्हती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व शिक्षक वर्ग तळमळीने काम करत होते. अशातच एक नवीन शिक्षक आम्हाला चित्रकलेला आले. त्यांचं नाव भैलुमे असे होते. ठेंगणी मुर्ती. आडवं पसरलेलं शरीर.

FLAME

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 18/09/2019 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं. मी पण उजीवर (उज्वला) लाईन मारणं सोडून दिले. गुडघ्याला मात्र राजाचा लयी राग आला. एक दिवस गुडघ्यानं मला एक पोरगी दाखवली. म्हणला हिला मी पटवणारच. पोरगी धिप्पाड , भरलेली व जवान होती. मोठ्या खानदानी घरातली वाटत होती.

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/09/2019 14:29 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

  1 भोळा शशी... आमच्या आवडीचे गाणे आम्ही ऐकत होतो... कहीं दिल ना चुराले मौसम बहार का... माझे मन मागे मागे गेले...

दिवसभराची कमाई

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/09/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरूवार. दत्ताचा वार. दिवसभर बसून होतो. मधूनच पावसाची सर यायची. तात्पुरता आडोसा शोधायला लागायचा. समोरच्या दुकानाच्या पायर्‍यांवर गर्दी व्हायची. अंग ओले झाल्याने बसवत नव्हते. तरीपण पाच वाजेपर्यंत बसून राहीलो. घरी जाणार्‍यांची गर्दी संध्याकाळीच होते. घरी जाता जाता दत्ताला हात जोडून, पैसे टाकून ते पुण्य कमवत होते. कंटाळलो कंटाळलो अन मग तेथून उठलो. बँकेत अकाऊंटला नेटबँकींगने पैसे ट्रान्सफर केले. थोडे पैसे गावी आयएमपीएसने पाठवले. खर्चासाठी अर्जंट पाहीजे म्हणत होती. ओले अंग अन थंडीच्या उतार्‍यासाठी समोरच्या शॉपमधून बाटली घेतली. अन स्विगीवरून ऑर्डर मागवली.

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/09/2019 00:28 या दिवशी प्रकाशित केले.

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

1 'आजचा दिवस माझा' सिनेमा ज्यांनी पाहिला असेल त्यांना वरील अंध गायकांना महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री एका रात्रीत कलाकार कोट्यातून राहायला घर द्यायला सरकारी यंत्रणा कामाला लावून चंग बांधतात आणि प्रत्यक्षातआणतात. ते ज्या कारणाने घडते त्याच्या मुळाशी त्यांचा अहंकार दुखावतो... कारण त्या रात्रीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित बडे बडे धनी, प्रतिष्ठित उच्चभ्रू त्यांचा आगमनाप्रित्यर्थ मान राखत उभे राहून अभिवादन करत असतात.

दोरीवरचे कपडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/09/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अ

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/09/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!! भाग १ हवाईदलातील माझ्या आठवणी... १९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे. कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.

एका साइड व्हिलनची कैफियत

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 26/08/2019 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला रोज वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल. आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है".

(रगेल पावट्याचे मनोगत)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 16/08/2019 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

दुष्ट दुष्ट बायको!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 31/07/2019 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?