Skip to main content

मौजमजा

चिंब

लेखक कोमल यांनी सोमवार, 02/07/2018 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली. पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते. तिच्या जन्माच्या वेळी वेड्यासारखं बरसून त्यानंही आनंद साजरा केलेला. पहिल्यांदा दप्तर पाठीवर लावून, त्यावरून रेनकोट घालून ती जशी शाळेला जायला निघाली तसा तोही आलाच. पहिल्या दिवशी खिदळत शाळेत पोहोचणारी ती एकटीच. आणि मग तर तिला सवयच लागली, पाऊस आला की दप्तराला रेनकोट घालायचा आणि आपण चिंब भिजत घरी यायचं.

(बसफुगडी)

लेखक नाखु यांनी शनिवार, 02/06/2018 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती पेर्ना क्र. १ पेर्ना क्र.

आऊटलँडर

लेखक एमी यांनी रविवार, 13/05/2018 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
. . Sing me a song of a lass that is gone, Say, could that lass be I? Merry of soul she sailed on a day Over the sea to Skye. Billow and breeze, islands and seas, Mountains of rain and sun, All that was good, all that was fair, All that was me is gone. . . वर्ल्डवॉर २ मधे कॉम्बॅट नर्स म्हणून काम केलेली क्लेअर आपल्या इतिहासतज्ञ नवर्यासोबत (फ्रॅंक) स्कॉटलंड फिरायला आली आहे. नवर्याचा पुर्वज जॅक रँडलबद्दल अधिक माहिती जमा करणे आणि दुसरा हनिमून असे दुहेरी उघड उद्देश या ट्रिपमागे आहेत.

बोरांचे दिवस

लेखक जागु यांनी मंगळवार, 30/01/2018 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर - जानेवारी महिन्यात आमच्या उरण येथील नागांवातील वाडीमध्ये बोरांचा घमघमाट सुटलेला असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अधून मधून एक-दोन लालसर-कच्चट बोरे पडायची मग आम्ही समजायचो की आता थोडे दिवसांत पिकलेल्या बोरांचे सडे झाडाखाली पडणार. माझी आई ह्या बोरे मोहोत्सवासाठी सज्ज असायची. तिच्या टोपल्या वाटच पाहत असायच्या त्यांचं रितेपण भरून काढण्यासाठी. आई प्रार्थमिक शिक्षिका होती. पण शाळेतल्या जबाबदार्‍या पार पाडून ती घरच्या-वाडीतल्या कामांतही लक्ष घालायची. झाडा-फुलांत रमायची. चिंचा-बोरांच्या सीझनला तिची लगबग असायची. वाडीत पाच-सहा बोरांची झाडे होती. प्रत्येक बोराचे खास वैशिष्ट्य असायचं.

चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 28/01/2018 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
( सुरेश भट _/\_ ) चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली उघडले कधीचे गुत्त्यांचे द्वार बंद अन्‌ चोरपावलांनी आला देशीचा गंध गल्ल्यावरी गुत्त्याच्या आंटी येऊन बसली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली चल लवकरी आता पहिल्या धारेचा सहारा मोसंबी नारंगी ठर्रा करती तुझा पुकारा सज्ज साथ देण्या पापड अंडी चकली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली तव याद करिती सारी बेवड्यांची मांदियाळी घे एक घोट नवटाक चिंता सर्व जाळी तुज शोधण्यास वेडी बायको पुन्हा निघाली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 23/01/2018 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल द्रविड - The wolf who lived for the pack

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 11/01/2018 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राहुल, ४५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम मध्ये तुझ्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता... आज जरा पुढे जाऊन मन मोकळं करावं म्हणतो. एकतर तू क्रिकेट खेळत नाहियेस हेच पटत नाही बघ. बॅटिंग करताना तू ४५ वर पोहोचेपर्यंत समोरच्या गोलंदाजांनी हत्यारं म्यान केलेली असायची. सिनेमातल्या डॉक्टरनं "अब इनको दवा की नहीं दुवा की जरूरत है" सांगितल्यावर नातेवाईकांचे होतात तसे चेहरे करून "फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे" असा कर्मयोगी विचार करून बिचारे गोलंदाजी करत राहायचे.

क्रीडायुद्धस्य कथा वाहा(ब) जी वाहा(ब)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 07/01/2018 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ड्रामा आवडतो. क्रिकेट असो वा सिनेमा वा लाइफ.... आपल्याला ड्रामा आवडतो. आपला हीरो कसा... हातात बंदुक असली तरी त्याच्या दस्त्यानी हानत हानत १० लोकांना लो़ळवील... पण गोळी नाही घालणार. सरळ समोरच्याला गोळी घालुन मामला खतम केला तर पिक्चरमध्ये मजा काय राहिली? जरा काचा तुटल्या, डोकी फुटली, मानसं हिकडून तिकडं उडून पडली, हाडं मोडली की कसं जरा पैशे वसूल झाल्यासारखं वाटतं. एका टीमनी अमुक अमुक रन केल्या आणि दुसर्‍या टीमनी तमुक तमुक ओव्हर्समध्ये त्या चेस केल्या अशी साधी सरळ सोपी स्टोरी असलेलं क्रिकेट आम्हाला कसं आवडणार? मग तो पाठलाग कितीही शिस्तीचा का असेना.