दाराआडचे घड्याळ
लेखनविषय:
एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...
आणि एक वाळूचे घड्याळ...
अजुनही मागे मागे....
जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र
भिंतीवर कोरलेले सावलीचे घड्याळ...
आणखी कितीतरी चित्रविचित्र घड्याळं...
.
आणि खूप खूप पूर्वी वाळूत खोवलेला लाकडाचा एक तुकडा....
पूर्वी कधीतरी सव्वा अकरा वाजता बंद पडलेलं ते घड्याळ
जर्जर इमारतीच्या तुटक्या दाराआडून बघतच रहाते...
बघतच रहाते...
वाचन
8385
प्रतिक्रिया
0