( विशेष सूचना- सदरील कथा व यातील व्यक्ति त्यांची नावे, प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे.
सोशल नेटवर्क म्हणजे सर्वप्रकारचे फोटो,व्हिडिओ, लिखाण,माहिती,मैत्री,वाद-विवाद यांचा अफाट महासागर असल्याने पुढील कथा कोणाला आपल्या जवळची वाटली तर तो योगायोग समजावा. )
अमितने नेहमी प्रमाणे सकाळचा नाष्टा झाल्यानंतर घरच्यांशी ठरल्याप्रमाणे रात्री बंद केलेला मोबाईल व त्यावरील डाटा फेसबुक,व्हाट्स अप वरील नोटिफिकेशन पाहण्यासाठी सुरु केला. अपेक्षे प्रमाणे सतत टिंग...टिंग येणाऱ्या आवाजाने तो सुखावला.