मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

kathaa

बोट - वादळवारा

स्वीट टॉकर ·
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते? लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब. यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी). तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्‍यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही?

तार

अभिजीत अवलिया ·
१४ जुलै २०१३. रात्रीची १० ची वेळ. अश्वनी मिश्रा ह्यांनी राहुल गांधीना शेवटची तार पाटवली आणी तब्बल १६३ वर्ष सेवा बजावणारी तार सेवा भारतातून कायमची बंद केली गेली. मोबाइल, whats up, sms, email, इंटरनेट असे ताज्या दमाचे खेळाडू असताना तार सेवा चालू ठेवणे तसे पण फ़ायद्याचा व्यवहार न्हवताच. कधी ना कधी तिला जावे लागणार हे स्पष्टच होते. २०११ पासून चर्चा केली गेली आणी अखेरीस १४ जुलै २०१३ ला तिचे देहावसान झाले. अशी ही तार सेवा सुरु झाली १७९२ साली. ह्या वर्षी दूरच्या अंतरावरची टेलिग्राम सेवा सेमाफोर लाइन्स मार्फत सुरु झाली. पण इलेक्ट्रिक टेलिग्राम सुरु करण्याचे श्रेय जाते samuel morse ला.

बोटीवरील जीवन

स्वीट टॉकर ·
जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिलेली

Mission भगीरथ

आदित्य अनिल रुईकर ·
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. माझ्या या कादंबरी चे नाव आहे.... " मिशन भगीरथ" आणि त्याचे कथानक थोडक्यात असे आहे की, 'एक कॉलेज युवक, त्याला पडत असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेत, पहिला नेपाळ आणि नंतर तिबेटमध्ये जाऊन पोहचतो.

Mission भगीरथ

आदित्य अनिल रुईकर ·
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. त्यादृष्टीने प्रकाशकांशी बोलणे, करार इत्यादी सुरूच आहे. पण प्रत्यक्ष कादंबरी छापून विक्रीस येण्यास थोडा अवधी लागणार आहे.

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

स्वीट टॉकर ·
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

बेधुंद (भाग २ )

अविनाश लोंढे. ·
हर्षला ने त्याचा हात झटकला , आपले डोळ्यावर आलेले केस बाजूला करत ती बोलली - 'नको ना नितेश , प्लीज …. जसा हर्षला ने त्याचा हात झटकला , तस नितेशच मनही त्याला झटके देऊ लागले , अन त्या झटक्याने त्याला २ महिन्यापूर्वीची त्याची आयुष्याला कलाटणी देणारी घटनेत अडकवले . अन तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला . साधारण दोन महिन्यापूर्वी : जवळपास एक वर्ष 'चोरून' सुरु असलेल 'त्याच अन हर्षला'च प्रेम प्रकरण आता 'जगजाहीर' झालं होत . काही गोष्टी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपत नाहीत !

एका अनपेक्षित वळणावर-गोष्ट तुझी न माझी

Savnil ·
नीलांबरी आज लवकर निघाली ऑफिस मधून नेहमीच जादा तास काम करणाऱ्या नीलांबरी ला HOD नेही जाण्याची परवानगी दिली.परवानगी मिळताच ती घाईघाइने निघाली.नावा प्रमानेच निळसर डोळे गोरा वर्ण सरळ नाक काळभोर केशसंभार आणि ओठांवर नेहमी हसु.एखाद्या कवीने पाहील की म्हणाव जिवंत कविता नजरेसमोर उतरली आहे.या सर्वातहि तीच सर्वांशि मिळून मिसळून वागण सर्वनाच् तीआवडे.पण तिलाही थोडासा गर्व हा होताच. नाही गर्व रूपाचा नाही तर तिच्या कर्तुत्वाचा होता. कारण तिला साजेस स्वताच करियर तिने घडवल होत.

शोध राजीव हत्येचा भाग-२

गुल्लू दादा ·
21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या. घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.