आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं !
नेहमी प्रमाणेच नेहमीचाच दिवस म्हणुन सकाळी उठल्यावर व्हॉट्सॅप्प चेक केलें अन सगळीकडे धडाधड मेसेज कोसळले "सोमवारच्या शुभेच्छा" "हर हर महादेव " "शंभो" वगैरे वगैरे.