Skip to main content

इतिहास

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

वह कौन थी ?

लेखक Rahul Hande यांनी मंगळवार, 06/07/2021 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजवर या दोन्ही घटनांमधील संबंध व साम्य दाखवण्यात अनेकांनी लेखण्या झिजवल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शोध घेऊन त्यांना उलगडलेले रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी संपले नाही,ते या दोन घटनांमधील रहस्य.

२१५

लेखक सारिका होगाडे यांनी गुरुवार, 01/07/2021 06:14 या दिवशी प्रकाशित केले.

२१५

(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.) आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते. आज कॅनडामध्ये २१५ हा काळा आकडा आहे असे म्हणू शकतो.

हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 16/06/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच काळानंतर घागा लिहित आहे. त्याला कारण ही मजबूत आहे. विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

लेखक मनो यांनी सोमवार, 14/06/2021 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

आज काय घडले .... चैत्र व. ६ भारताचार्य चि वि वैद्यांचा स्वर्गवास !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/06/2021 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्य ची वि शके १८६० च्या चैत्र व. ६ रोजी सुप्रसिद्ध विद्वान् , मार्मिक संशोधक, मराठी व इंग्रजी भाषेचे विख्यात अभ्यासक भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचे निधन झाले. शिक्षणक्रम पुरा झाल्यावर चिंतामणरावांनी प्रथम कोल्हापूर व ग्वाल्हेर संस्थानांत न्यायाधिशाचे काम केले.

आज काय घडले... चैत्र व. ५ मत्स्येंद्रनाथांची समाधि !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/06/2021 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मत्सेंद्रनाथ शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली! महाराष्ट्र संस्कृतीचा बनाव होतांना जे अनेक धर्मपंथ वा सांप्रदाय उदयास आले त्यांपैकी नाथसांप्रदाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज काय घडले... चैत्र व. ४ यदुवंशविलासु' रामदेवराव दिल्लीस !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 12/06/2021 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
देवगिरी शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले. तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदेवराव यादव नांवाचा राजा देवगिरी येथे राज्य करीत होता.

मी बिचारा एक म्हातारा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी बिचारा एक म्हातारा ती गेली देवाघरी आज बैसलों हसत एकटा या हास्यकट्ट्यावरी माती सरत चालली होती तरी जीव थकला नव्हता आजही थरथरत्या हातांना ओला स्पर्श हवा होता रोज यायची नटून थटुनी दिसायलाही होती बरी म्हाताऱ्याला हात पुरे तो कशाला हवी आता परी मी देखील नित्यनेमाने दात काढुनी हसायचो तिला हसताना बघून मात्र गुलाबी स्वप्नं बघायचो कधी कुलू तर कधी मनाली बेत ठरायचे मनात हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या सर्व बेत गेले मसनात ========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

शेर अफगाण- कथेनंतर, संदर्भ आणि नोंदी

लेखक विश्वनिर्माता यांनी शनिवार, 22/05/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश.