इतिहास
शेर अफगाण- भाग २
चार
उदयपूरच्या राणासोबत मुघल सत्ता पुढे अनेक वर्षे लढली. या युद्धात, बर्याच वर्षांनंतर मुघल साम्राज्य पराजयी ठरले. त्यावेळेस पादशहा अकबर मृत होऊन आणि जहाँगिर सत्तेवर येऊन अनेक वर्षे लोटली होती. पराजयाची नैतिक जबाबदारी घेत खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान सेनापती पदावरुन निवृत्त झाले. निवृत्त जीवनात त्यांनी पुष्कळ लिखाण केले. हिंदू महाकाव्य, विशेषतः रामायण हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी “रहिम” नावाखाली भरपूर साहित्यरचना केली. ब्रिजभाषेत सामन्यजनांना सहजगत्या समजतील असे दोहे त्यांनी रचले. संस्कृतमध्ये सुद्धा त्यांनी काही ग्रंथ रचले.शेर अफगाण- भाग १
एक: अली कुली (ईसवी सन १६०७) I
गवताच्या सळसळीतून आणि घोड्यांच्या टापांनी चुरडल्या जाणार्या पाचोळ्याच्या आवाजामधून सुद्धा अली कुलीला वाघाच्या गुरकावण्याचा आवाज आला. त्याने हाताची मूठ दाखवून सोबतच्या गावकर्यांना सावध होण्याचा ईशारा केला. काही पावलांनंतर हरणाच्या धडावर पाय रोवलेला प्राणी अली कुलीला दिसला. रक्ताळलेले दात दाखवत वाघाने आपल्या शिकारीपुढे बचावात्मक पवित्रा घेतला. नंतर, अली कुलीने विचार केला. एकूण सहा तलवार आणि भाला घेतलेली माणसे, एवढ्या ताकदीशी त्या वाघाने का झुंज द्यावी ? एका हरणासाठी ?मादाम मेरी क्यूरी...
मादाम मेरी क्यूरी...
( काही शास्त्रीय शब्दांची मोडतोड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही केवळ एक आदरांजली समजावी)
.....हे वर्ष तसे महत्त्वाचे आहे. या वर्षी मेरी क्यूरीला नोबेल पुरस्कार मिळून १०० वर्षे पूर्ण झाली. १९११ साली रेडियम आणि पोलोनियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला.
.....हे वर्ष तसे महत्त्वाचे आहे. या वर्षी मेरी क्यूरीला नोबेल पुरस्कार मिळून १०० वर्षे पूर्ण झाली. १९११ साली रेडियम आणि पोलोनियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला.बंगाल
...परवा कोणीतरी म्हणाले की बंगालमधे १९४६ जशा दंगली झाल्या तशाच आत्ता बंगालमधे सुरू आहेत. पण त्यावेळेस दंगली कशा झाल्या आणि का झाल्या हे आजच्या पिढीला कदाचित माहीत नसावे म्हणून या लेखमालिकेचा प्रपंच...
बंगाल १९४६
जूनच्या २९ तारखेला ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांची समिती ब्रिटनला परत गेली आणि ते एका महिन्यात ब्रिटिश कॅबिनेटला आपला अहवाल सादर करतील असे सांगण्यात आले. जिनांनी आता अशा एका हत्याराचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्याने ते सूड घेऊ शकतील आणि त्यांची वैयक्तिक महात्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतील.
विजयनगर - उदयास्त
नमस्कार !
गेली कित्येक वर्षं हंपीला वर्षातून एकदा तरी जातोय. अर्थात या वर्षी करोनामुळे जमले नाही. हंपीवर अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यासही केला. त्याच्यावर एक दीर्घ लेखही लिहिला. बहुतेकांना तो आवडलाही. पण हंपीचे अवशेष पाहतांना जो त्रास होतो तो मात्र सहन होत नाही. हंपीची अवस्था अशी का झाली याचाही अभ्यास केलाय आणि त्यावर लवकरच एक लेख लिहायचा आहे.कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची
चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.
त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.
फाल्गुन व.३० संभाजी राजांची हत्या!
आज काय घडले...
शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजी छत्रपति संभाजी राजे यांची हत्या वडू (बुद्रुक ) येथे औरंगजेब याने अत्यंत अमानुषपणे केली!
सुमारे सव्वा महिन्यापूर्वी म्हणजे माघ व. ७ रोजी मुकर्बखानाने औरंगजेब बादशहाच्या सांगण्यावरून संभाजी राजे व कलुशा या दोघांना संगमेश्वर येथे कैद केले होते.
शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजी छत्रपति संभाजी राजे यांची हत्या वडू (बुद्रुक ) येथे औरंगजेब याने अत्यंत अमानुषपणे केली!
सुमारे सव्वा महिन्यापूर्वी म्हणजे माघ व. ७ रोजी मुकर्बखानाने औरंगजेब बादशहाच्या सांगण्यावरून संभाजी राजे व कलुशा या दोघांना संगमेश्वर येथे कैद केले होते.फाल्गुन व. १३ विष्णुशास्त्री चिपळणकर यांचे निधन !
शके १८०३ च्या फाल्गुन व. १३ रोजी अर्वाचीन मराठी वाङ्मयांतील प्रसिद्ध निबंधलेखक व टीकाकार विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचे निधन झाले.
अव्वल इंग्रजीतील प्रसिद्ध पंडित कृष्णशास्त्री चिपळुणकर यांचे हे जेष्ठ चिरंजीव. कॉलेजमध्ये असतांनाच यांना विद्याव्यासंगाचा नाद लागला.फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !
आज काय घडले...
फाल्गुन व. १४
ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !
शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
यांचे निधन झाले.
हायस्कूलमध्ये असल्यापासूनच यांच्या बहुश्रुतपणामुळे शिक्षक यांना 'एन्सायक्लोपीडिया' असे म्हणत. येथील शिक्षणक्रम अपुरा असतांनाच ते १९०६ मध्ये अमोरिकेस गेले. आणि तेथील कार्नेल विद्यापीठांत समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि थोड्याच अवधींत बी. ए., एम् . ए., पीएच. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या.
मिसळपाव