आज काय घडले...
फाल्गुन शु. १३
शिवरायांची वाढती सत्ता !
शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला.
शिवरायांनी स्वराज्याचा उपक्रम केला, त्याचा जाच बऱ्याच लोकांना झाला. औरंगजेब तर जळफळून गेला. पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीझ लोक व्यापार करीत, त्यांनाहि शिवाजी राजांच्या वाढत्या प्रतापापासून त्रासच होऊ लागला. पाश्चात्य.लोक ज्या शस्त्रविद्येत निपुण होते ती विद्या हस्तगत करण्याची योजना शिवाजी राजांची होती. पोर्तुगीझ, इंग्रज, वगैरे व्यापारी शिवाजी राजांच्या शत्रूला दारूगोळा, हत्यारे,.वगैरे साहित्य पुरवून मदत देत असत.