मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

“दीपशिखा कालिदास”

नागनिका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वैशाखाच्या उष्मादाहानंतर वर्षाऋतूची मोहक चाहूल लागते. आकाशामध्ये ढग दाटीवाटी करतात. कविमन उद्युक्त नाही झाले तर नवलच! पावसांच्या सरींबरोबर कविता, चारोळ्यांच्या सरी देखील बरसू लागतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलभारामुळे नभ जणू काही डोंगरावरच उतरले आहेत असा भास होतो. परंतु या नियमित घडणाऱ्या भौगोलिक घटनेकडे पाहून शंभर सव्वाशे श्लोकांचे नितांत सुंदर विरहकाव्य रचणाऱ्या महाकवी कालीदासांची काव्यप्रतिभा हजारो वर्षांपासून रसिक मनांना भुरळ पाडत आली आहे. प्रिय पत्नीच्या “अस्ति कश्चित् वाग्विशेष:?

हॅमिल्टन-संगीत नाटक (म्युजिकल)

कॉमी ·
लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी लिन मॅन्युएल मिरांडा ह्या भन्नाट व्यक्तीने लिहीलेले, संगीत दिलेले, अभिनय केलेले आणि रॅप केलेले 'म्युजिकल', म्हणजेच संगीत नाटक पाहिले. खूप आवडले. त्याबद्दल काही. अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन म्हणजे अमेरिकेच्या फाऊंडिंग फादर्स पैकी एक.

'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय', वाचावेच असे पुस्तक

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अक्षरनामा मध्ये आलेला लेख (लिंक शेवटी) वाचून मला या पुस्तकाचा परिचय झाला. तेव्हाच हे पुस्तक वाचायचे असे माझ्या मनात नोंदवून ठेवले होते. आमच्या गावात विठ्ठलाचे देऊळ आहे आणि तिथे आषाढ महिन्यात उत्सवही असतो. गेले वर्ष आणि या वर्षी कोविड साथीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही आषाढ म्हटले की विठ्ठल हे समीकरण माझ्याच नव्हे तर समस्त मराठी मनात पक्के आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ महिना जवळ आला तसं या पुस्तकाची मला आठवण आली आणि लगेच खरेदी करून वाचूनही काढले. सर्व पुस्तक आतुरतेने वाचून काढले. त्यातील मला आकलन झालेले काही मुद्दे खालील प्रमाणे.

६० वर्षांपूर्वी...

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता. लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. आपल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या जागी भिंतच बांधण्याचे ठरवले.

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

एकुलता एक डॉन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे नमस्ते २००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते बरेच ,९९% बंद पडले त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ मनोगत मायबोली मिसळपाव इसाहित्य मराठीमाती ऐसी अक्षरे मागे वळून पाहताना बंद पडलेली मीमराठी भुंगा मराठीप्रेमी मराठीकिडे काय वाटेलते कृपया यात अधिक भर घालावी

आठवणीतील श्रावण - कहाणी

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं ! नेहमी प्रमाणेच नेहमीचाच दिवस म्हणुन सकाळी उठल्यावर व्हॉट्सॅप्प चेक केलें अन सगळीकडे धडाधड मेसेज कोसळले "सोमवारच्या शुभेच्छा" "हर हर महादेव " "शंभो" वगैरे वगैरे.

हिरोशिमाचा स्मृतिदिवस

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली.

बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती. ‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!