✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !

ज
जॅक डनियल्स यांनी
Mon, 11/14/2016 - 01:14  ·  लेख
लेख
तसे अल्कोहोल आणि माझे तसे जुने नाते आहे. पिण्याच्या निमिताने किंवा अभ्यासाच्या निमित्ताने हे केमिकल माझ्या आयुष्यात येतच गेले. थर्ड इअरला असताना distillary डिझाईनचे फक्त प्रश्न सोडवून मी plant technology चा पेपर सोडवला होता. जेडीला तर मी पुण्यात ओळखतच नव्हतो, आपले मित्र सुरवातीचे मित्र म्हणजे white mischief आणि ओल्ड मोन्क (हा मित्र अजून टिकून आहे.)! २००९ मध्ये टेनेसीच्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला, लगेच लोकांचे सल्ले आले - "अरे ते टेनेसी भयानक आहे, रेड्नेक कंट्री , रेसीसट लोक राहतात, एक वर्ष ड्रोप घे आणि जिकडे बाकीचे भारतीय जातात (newyork, california) तिकडे जा" पण मला असे सल्ले आणि लोक फाट्यावर मारायची 'मी साप पकडत' असल्यापासूनची चांगली सवय आहे. त्यामुळे मी टेनेसी मध्ये आलो आणि मला जॅक डनियल्स (जेडी) नावाचा मित्र भेटला. माझे गाव इनमिन २५००० लोकवस्तीचे युनिव्हर्सिटी town आणि त्यातून ते बायबल बेल्ट मध्ये (कडवे Christian आणि जास्त करून सगळे ट्रंपवाले!). २-३ कंट्री बार होते, ते पण म्हणजे टोबी केथच्या I love this bar! गाण्यामधले - फक्त बर्बन (bourban), मूनशाईन मिळणार, ४-५ पूल टेबले आणि आजूबाजूला फुल कंट्री जनता. विकेंडला हिम्मत करून या बारच्या वाऱ्या चालू केल्या तशी हळू हळू जेडीशी ओळख व्हायला लागली. "वीकडेज ला मी आणि इतर लोकं, तर विकेंड ला मी आणि ज्याक आणि कोक!" असे लाइफ चे साधे समीकरण बसले. जॅक डॅनियल्स (जेडी) ही एक परिपूर्ण परिपूर्ण पाककृती आहे, आणि ती दीडशे वर्ष तशीच बनत आहे. जेडीला दारू म्हणणे म्हणजे दुर्वांकूरच्या (फक्त उदाहरण दिले आहे- चर्चा नको!) मसाले भाताला तांदूळ म्हणण्यासारखे आहे. . जॅक डॅनियल्स १८५७ च्या उठावाच्या ७ वर्ष आधी याचा टेनसीमध्ये एका खेडेगावात (लिंचबर्ग) झाला. फारच मोठे कुटुंब आणि गरिबी त्यामुळे जेडी वयाच्या ७ वर्षापासूनच टेनसी ची देशी दारू -मूनशाईन बनवायला लागला. दिवसा बनवली तर धार्मिक लोक मारतील म्हणून ही दारू चंद्र प्रकाशात बनवली जायची. . ही मूनशाईन बनवायची जुनी पद्धत - लाकूड टाकून भट्टी पेटवली जायची . जेडीचा गुरु म्हणजे त्याचा काका तो तर चर्च मध्ये पाद्री होता. याने जेडीला व्हिस्कीची दीक्षा दिली आणि हा गुरुमंत्र दिला . 'सिंहगडावरच्या भजीला ची चव येते ती तिकडच्या देव टाक्यातल्या पाण्यामुळे' तेच तत्व व्हिस्कीला पण लागू होते. कुठल्यापण व्हिस्की चा आत्मा म्हणजे "पाणी"! आपण लोकं पाण्याला फारच कमी लेखतो पण "ते पाणीच" एकाला जॅक डॅनियल्स बनवते तर दुसऱ्याला मल्ल्या ! जेडीने लिंचबर्ग मध्ये हा झरा शोधला. हे कमी iron असलेले (iron हे ethanol ला ऑक्सिडाइज करते म्हणजे थोडक्यात त्याची चव बिघडवते! ) पाणीच जॅक डॅनियल्सची चव १५० वर्ष राखून आहे. . या झऱ्याचे पाणी आजही वापरले जाते. . झऱ्याच्या समोर जॅक डॅनियल्स ! जशी ताकापासून पियुषची व्युत्पत्ती होते, तशीच मूनशाईनपासून टेनसी व्हिस्की बनते, म्हणजे बेस सम पण फायनल product वेगळे. जॅक डॅनियल्सने त्या साठी दारू distill झाल्यावर कोळश्यामधून फिल्टर केली (म्हणजे टेनसी दारू गाळली, आपली देशी दारू ही कशातून गाळली नाही जात, मोस्टली distil झाल्यावर, देशी पाईप मधून गळत असेल म्हणून आपल्या कडे दारू गाळली असेल म्हणत असावेत!). हा कोळसा पण शुगर-मेपल झाडापासून बनवाला जातो. . . हि कोळसा बनवायची भट्टी आहे, जर विकडे मध्ये गेला तर कोळसा बनताना बघू शकतो. एकाच प्रकारचे आणि त्याच प्रदेशातील झाड कोळसा बनवण्यासाठी वापरल्यामुळे कोळशाची porosity, त्याची adsorption capacity (दारू मधले नको असलेले घटक शोषून चिटकवून ठेवायची capacity ) सारखी राहते. . या जेडी बनायच्या स्टेजेस आहेत, पहिली म्हणजे मूनशाईन, नंतर जशी कोळश्यातून पास झाल्या आणि ब्यारेल मध्ये साठवल्यानंतरची फायनल स्टेज ! . Distillary बिल्डिंग जी आतून बघू देत नाहीत. . सुशोभित करून ठेवलेल्या जेडी च्या बाटल्या ! मेपल कोळश्यातून गाळलेली जेडी ही मेपल झाडाच्याच ब्यारेल मध्ये साठवली जाते. जॅक डॅनियल्सची ३-४ ब्यारेल हाऊस आहेत. आझादहिंदच्या सेकंड स्लीपर बर्थ सारखी तीन लेवेलला ही ब्यारेल साठवली जातात. सगळ्यात वरच्या बर्थ किंवा लेव्हलला कोरड्या आणि गरम हवेमुळे पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते (H2O molecule हा C2H5OH ethnaol छोटा आहे.)म्हणून या लेव्हलची व्हिस्की जास्त strong (अल्कोहोल % जास्त असते.)असते आणि लवकर mature होते. सगळ्यात खालच्या लेव्हलला थंड आणि दमट हवा असल्याने हवेतले पाणी ब्यारेल मध्ये जाऊन भेसळ होते. सगळ्यात चांगली व्हिस्की ही मधल्या बर्थ च्या ब्यारेल मधून निघते. जॅक डॅनियल्स distillary टूर मध्ये जुन्या ब्यारेल हाउस ला घेऊन जातात, आत्ता चालू असणाऱ्या घेऊन गेले तर लोकांच्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या CO2 मुळे व्हिस्की खराब व्हायची आणि ब्यारेल मधल्या झिरपणाऱ्या दारूमुळे लोक झिंगायची ! (ब्यारेल मधून जी थोडी दारू झिरपली जाते त्याला angel कट म्हणतात. ) . ब्यारेल साठवायची बिल्डिंग. जश्या आपल्या आज्ज्या लोणचे मुरले हे त्याच्या सुगंधावरून आणि चवीवरून ठरवतात, तीच पद्धत जॅक डॅनियल्सने वापरली. जेडी मुरली हे त्याच्या वासावरून आणि चवीवरून ठरवले जाते. (मी नोकरी साठी अर्ज टाकत असताना एक अर्ज केंटकीच्या बर्बन distillary मध्ये analyatical chemist केला होता, त्यांची अट होती की व्हिस्कीच्या gas chromatography टेस्टिंग नंतर चव घेऊन बघावे लागेल :) ) यापद्धतीमुळे १५० वर्ष कधीच जेडीच्या ब्यारेल वर तारीख घातली गेली नाही. जॅक डॅनियल्सला ७ गर्ल फ्रेंड्स होत्या म्हणून त्या व्हिस्की ला "ओल्ड नंबर सेव्हन" पण म्हणले जाते. . ओल्ड नंबर सेव्हन चे ब्यारेल ! लिंचबर्गचा तालुका म्हणजे "मूर तालुका ", त्या मूर मध्ये दारू (हार्ड लिकर) विकायला परवानगी नाही. म्हणून लिंचबर्गसाठी "जिकडे पिकते तिकडे विकता येत नाही" असे म्हणायला लागेल. (मी ज्या गावात होतो -कुक्व्हील मध्ये पण २०१२ पर्यंत दारू विकायला परवानगी नव्हती, आम्ही १५ miles वर taxi करून जाऊन विंटरसाठी साठा भरून ठेवायचो. नंतर २०१२ ला माझे लग्न झाले आणि त्याच वर्षापासून कुक्व्हील मध्ये दारू विकायला परवानगी मिळाली--- चांगले योग येतात ते असे !) लिंचबर्ग मध्ये प्रत्येक घरटी २-३ मानसं जॅक डॅनियल्स distillary मध्ये कामाला आहे. Jack Daniels Town Video . गावातले जुने एक दुकान आहे. . गावातले जुने कोर्ट. मला दिवसाची सुरवात लवकर करायला आवडते, तसाच हा जॅक डॅनियल्स होता. एका अश्याच सकाळी जॅक डॅनियल्स स्वतःची तिजोरी उघडायची खटपट करत होता पण काही केल्या त्याला कोड आठवत नव्हता अश्या वेळी मी जे केले असते तेच त्याने केले तिजोरीला लाथ घातली (लाथ घालणे हा कॉम्पुटर रीबूट करण्यासारखा univarsal पर्याय आहे.) नंतर "उपचार न केल्यामुळे" त्याचा पायाला infection होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याने infection थांबवायला स्वतःची जेडी जरी वापरली असती तरी वाचू शकला असता, पण असो ! एखादा ब्रान्ड कुठे चालू होतो याला महत्व नसते तर त्याची क्वालिटी कशी वर्षानुवर्षे कशी राहते तेच जास्त महत्वाचे जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स ! . (सगळे फोटो मी काढले आहेत - samsung galaxy S6 वरून )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
प्रवास
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
24430 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

मस्त ओळख आणि फटू!!

संदीप डांगे
Mon, 11/14/2016 - 01:23 नवीन
मस्त ओळख आणि फटू!!
  • Log in or register to post comments

वाह, मस्तं लेख. फोटोही खूप

पद्मावति
Mon, 11/14/2016 - 01:27 नवीन
वाह, मस्तं लेख. फोटोही खूप छान.
  • Log in or register to post comments

आपणांस इथे पाहून आनंद झाला. :

आदूबाळ
Mon, 11/14/2016 - 01:41 नवीन
आपणांस इथे पाहून आनंद झाला. :) बादवे डिस्टीलरीमध्ये गुप्त राखण्यासारखं काय आहे?
  • Log in or register to post comments

डिस्टीलरीमध्ये गुप्त

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 07:04 नवीन
डिस्टीलरीमध्ये गुप्त राखण्यासारखे काही नाही. पण बहुतेक safety च्या आणि contamination च्या भीतीनी टूरमध्ये दाखवत नसतील. माझा एक मित्र तिकडे काम करायचा intern म्हणून तो म्हणलेला खूप lastest कंट्रोल system आहे जेडी प्लांट ची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अछा , असं आहे होय?

पीके
Mon, 11/14/2016 - 06:18 नवीन
तुमच्या आयडी मागचे रहस्य...
  • Log in or register to post comments

जेडी के साथ कोक ?

देशपांडेमामा
Mon, 11/14/2016 - 07:10 नवीन
कुछ समझा नहीं..ये तो ऑन द रॉक्सवाली चीज है! लेख मस्त जमलाय!! देश
  • Log in or register to post comments

मस्त लेख.. चारकोल नाकात

गवि
Mon, 11/14/2016 - 08:22 नवीन
मस्त लेख.. चारकोल नाकात दरवळून गेला. पण कोक? छ्या... डॅनियलअंकलनी इतक्या वेगवेगळ्या नोट्स त्यात आणल्या आणि नाकाला त्याचा पूर्ण फील देण्याऐवजी कोकाकोला मिसळला?
  • Log in or register to post comments

ज्याक आणि कोक हे टेनसी मधले

जॅक डनियल्स
Mon, 11/14/2016 - 08:51 नवीन
ज्याक आणि कोक हे टेनसी मधले famous cocktail आहे. त्यामुळे सुरूवातीला काही दिवस ते चाखून नंतर फक्त बर्फावर आलो. तसेच आम्ही 8 वाजता आत जाऊन 3 am बाहेर पडायचो त्यामुळे कोक शुद्धीत ठेवायला मदत करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त ओळख करुन दिलीये!

अजया
Mon, 11/14/2016 - 08:59 नवीन
मस्त ओळख करुन दिलीये! मूनशाइनचा उगम पण कळला.जिथे जेडी तिथे मूनशाइन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 07:05 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

असेच म्हणते!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 06/01/2017 - 11:59 नवीन
असेच म्हणते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

फेव्हरिट ब्रॅण्डची मस्त ओळख

महासंग्राम
Mon, 11/14/2016 - 09:09 नवीन
फेव्हरिट ब्रॅण्डची मस्त ओळख करून दिलीत जेडी राव....
  • Log in or register to post comments

बाब्बो, जियो

टवाळ कार्टा
Mon, 11/14/2016 - 09:12 नवीन
बाब्बो, जियो जॅक डॅनियल आणि कोकाकोला म्हणजे हाय मै मर जावा :)
  • Log in or register to post comments

मस्त लेख जेडी!

बोका-ए-आझम
Mon, 11/14/2016 - 09:21 नवीन
आम्ही चखणावाले असल्यामुळे काही उपयोग नाही, पण माहिती म्हणून मस्तच!
  • Log in or register to post comments

खुद्द पुण्यात असताना जॅक

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 11/14/2016 - 11:34 नवीन
खुद्द पुण्यात असताना जॅक डॅनियल म्हणजे प्राइझ्ड प्रकरण होते. कोणाचा मित्र ऑन साईट जातोय त्याने ती तुंबा भरून जॅक आणणे मग एक पार्टी जॅक स्पेशल त्या पार्टी मध्ये जॅक नीट न पिल्यामुळे मित्रांनी एकमेकांना 'तू गावठी बेवडा आहेस' वगैरे चिडवणे असे सगळे धार्मिक कार्यक्रम होत असत. नंतर मात्र चॉईसेस्ट आयरिश अन स्कॉटिश स्पिरिट्स सोबत ओळख वाढली तशी जॅक वेड कमी झाले, स्पाय साईड किंवा आईल साईड स्पिरिट्स वर चर्चा झडू लागल्या, बेलीज आयरिश क्रीम किंवा ग्लेनफिडीच ग्लेनमोरेंज पैकी सोवळे काय ह्यावर जास्त(च) खल होऊ लागला देवा. अशात अगदी शिवास रिगल किंवा जॉनी वाकर सुद्धा तितक्याश्या अपील होत नसत त्यात गरीब बिचाऱ्या जॅकला कोण पुसणार, तरीही तरुणपणाचा मद्यपानाचे प्राथमिक एटिकेट्स अन रॉयल ड्रिंकिंगचे आद्य धडे देणारा साथी म्हणून जॅक कायम आठवणीत राहील
  • Log in or register to post comments

ज्या बार मध्ये प्यायचो तिकडे

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 07:13 नवीन
ज्या बार मध्ये प्यायचो तिकडे सगळ्या अमेरिकन व्हिस्की होत्या, आणि अमेरिकन व्हिस्की टेनसी मध्ये कंट्री लोकांबरोबर प्यायची मजा जास्त यायची. त्यामुळे जेडी, केंटकी बर्बन - जिम बीम, बेसल हैदन इ. मधेच मन रमले म्हणून आत्ता सिंगल माल्ट कडे कधी वळीन असे वाटत नाही. काटाकिर मिसळची तल्लफ लागली की बेडकर आवडत नाही तसे ..दोन्ही ही आपल्यापरीने सर्वश्रेष्ठ पण तल्लफ एकाचीच लागते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

चियर्स ब्रदर, एन्जॉय सेफली

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 07:17 नवीन
चियर्स ब्रदर, एन्जॉय सेफली स्टे सेफ रॉक ऑन!! अमेरिकन व्हिस्की सुद्धा उत्तमच असतात, रच्याकने कधी प्रॉपर चिल्ड ग्रॅनाईट स्टोन्स घालून व्हिस्की ची मजा घेतली आहेत काय? नसल्यास तडक घ्या, एक अनुभव असतो दस्तुरखुद्द रॉक्स वर घेणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

चियर्स ब्रदर ! बाहेर पडणारा

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 07:25 नवीन
चियर्स ब्रदर ! बाहेर पडणारा बर्फ टाकून घेतली आहे ! पण आत्ता तुम्ही म्हणता तसे बर्फाचा दगड टाकून या winter ला अनुभव घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नाही नाही बर्फाचा दगड नाही

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 07:33 नवीन
नाही नाही बर्फाचा दगड नाही प्रॉपर दगड असतो तो हायलँड स्कॉटिश भागातला, त्याचा गुणधर्म असा असतो की तो खूप लवकर गार पडतो, असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर मध्ये अर्धातास ठेवले की गार होतात मग ते ग्लास मध्ये (२ दगड) ठेऊन त्यावर स्कॉच/अमेरिकन ओतायची, पाणी नसल्यामुळे ड्रिंक डायल्युट होत नाही अन गारेगार दगडामुळे फ्युमिंग कंट्रोल होऊन टेस्ट अन अरोमा क्लासिक मेन्टेन राहतो https://www.vat19.com/item/whiskey-stones इथे बघा मजा. टीप - संपादक मंडळ, लिंक पेस्ट करता येत नाहीयेत मिपावर कालपासून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

फारच भारी , माहिती नव्हते मला

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 08:01 नवीन
फारच भारी , माहिती नव्हते मला, लगेच घेऊन टाकतो आत्ता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर

अप्पा जोगळेकर
Tue, 11/15/2016 - 13:59 नवीन
असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर मध्ये अर्धातास ठेवले की गार होतात मग ते ग्लास मध्ये (२ दगड) ठेऊन त्यावर स्कॉच/अमेरिकन ओतायची, पाणी नसल्यामुळे ड्रिंक डायल्युट होत नाही अन गारेगार दगडामुळे फ्युमिंग कंट्रोल होऊन टेस्ट अन अरोमा क्लासिक मेन्टेन राहतो हायला, मी तर कल्पनेनेच गारेगार झालो. निवांत गप्पा मार्त पिताना शिंच्या त्या डायल्यूशन ने वैताग येतो. भारतात कुठे मिळते हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अमेझॉन वर आहेत की अप्पा

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 14:04 नवीन
अमेझॉन वर आहेत की अप्पा उपलब्ध, स्टेनलेस स्टील क्युब्स पण असतात ते ही मिळतील, पण स्कॉटिश स्टोन्सची बात न्यारी, त्यांचा सुगंध स्कॉचच्या फ्लेवरला पूरक असतो. ₹ ३५० ते ₹५००० / संच (४ स्टोन, पुसायला मखमली कापड अन ठेवायला एक चंची) असा सेट असतोय बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

३५०-५००० प्राईज रेंज आहे,

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 14:05 नवीन
३५०-५००० प्राईज रेंज आहे, मनाला येईल अन परवडल ते घेता येतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

"व्हिस्की क्युब" किंवा "वाईन

मोदक
Tue, 11/15/2016 - 15:55 नवीन
"व्हिस्की क्युब" किंवा "वाईन पर्ल्स" असे शोधा. आणखी एक वाचलेला प्रकार म्हणजे डायरेक्ट जेडीला गोठवून त्याचे क्युब करायचे. (याबाबत अधिक माहिती नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

चाखलाय हा प्रकार लै म्हणजे

महासंग्राम
Tue, 11/15/2016 - 16:25 नवीन
चाखलाय हा प्रकार लै म्हणजे लैच भारी. बत्त्या गुल होतात डायरेक्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पण अल्कोहोलचा गोठणबिंदू

आदूबाळ
Tue, 11/15/2016 - 16:35 नवीन
पण अल्कोहोलचा गोठणबिंदू शून्याच्या बराच खाली असतो ना? (म्हणून ध्रुवीय प्रदेशात पार्‍याऐवजी अल्कोहोल भरलेले थर्मामीटर वापरत असत असं ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांत वाचलं होतं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

नीट नाही वापरत काहीतरी कॉकटेल

महासंग्राम
Tue, 11/15/2016 - 16:48 नवीन
नीट नाही वापरत काहीतरी कॉकटेल करून आईस ट्रे मध्ये क्यूब बनवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्ही एक झक्कास आयड्या दिली

मोदक
Tue, 11/15/2016 - 19:40 नवीन
तुम्ही एक झक्कास आयड्या दिली आहे त्याबद्दल लै लै धन्यवाद..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ते प्युअर अल्कोहोल असेल.

मोदक
Tue, 11/15/2016 - 19:42 नवीन
ते प्युअर अल्कोहोल असेल. जेडीमध्ये किती % असणार आहे..? कमाल ५२% असे काहीतरी लिमीट असते ना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आबा तुम्हीपण व्हर्नियन काय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/16/2016 - 06:34 नवीन
आबा तुम्हीपण व्हर्नियन काय माझ्यासारखे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हा मंग!

आदूबाळ
Wed, 11/16/2016 - 16:50 नवीन
हा मंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सेम हिअर!

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/17/2016 - 12:00 नवीन
व्हर्निअन आणि भागवतीयन पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

म्हणजे!?

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 11/17/2016 - 12:08 नवीन
म्हणजे!?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

Ethanol चा गोठण बिंदू −114.9

जॅक डनियल्स
Wed, 11/16/2016 - 09:38 नवीन
Ethanol चा गोठण बिंदू −114.9 °C असल्यामुळे तो कमी तापमानाला वापरला जातो. तसेच ethanol, पाऱ्यापेक्षा कमी विषारी असल्यामुळे पण तो वापरला जातो. कॉकटेल करताना ५० % पाणी आणि ५० % जेडी ( म्हणजे खरी २५ % volume %) असल्यामुळे ७५% पाणी गोठते आणि २५% जेडी तशीच राहते. मी जेली चे वोडका जेलो करयचो, ते याच तत्वाने !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

स्पाय साईड किंवा आईल साईड स्पिरिट्स

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/15/2016 - 14:57 नवीन
ह्यावर एक लेख होऊ द्या बापु ... बाकी तिकडले जॅक, मॉर्गन ,अन इक्डले साधुबाबा झ्याक. आम आदमी की चॉईस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बाबौ, म्हातारा बुडा (ओल्ड

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 15:18 नवीन
बाबौ, म्हातारा बुडा (ओल्ड मॉन्क) लैच खास आहे, मध्यंतरी मोहन मिकिन्स ओल्ड मॉन्क बंद करणार म्हणून खबर आली होती (अर्थात खोटी) तेव्हाच मनात विचार आला होता, जोवर तरुणाई आहे इंजिनीरिंग कॉलेज आहेत, हॉस्टेल्स आहेत, खिशात कडकी आहे, मिलिटरी आहे तोवर ओल्ड मॉन्कला मरण नाही महाराजा. आमचा एक मित्र ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीला होता, पुढे त्याने अमेरिकेत खूप भ्रमंती केली नोकरी निमित्त, पार सीएटल ते मियामी अन जर्सी ते सेक्रेमेंटो फिरला शेवटी शिकागोला स्थाईक झाला गडी, तो सांगत असे की त्याच्या सीएटल ऑफिस मधली स्थानिक एतद्देशीय गोरी, घारी, काळी सगळी मित्रमंडळी त्याला घरी सुट्टीला आला की येताना ओल्ड मॉन्क सोबत आणायची विनंती करत असत. आता ते खरे का आमचा ओल्ड मॉन्क प्रेमी अहं सुखावयला सांगितलेली गोष्ट ते माहिती नाही तरी, आपले अमेरिका स्थित मिपाकर ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

खराय

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/15/2016 - 15:24 नवीन
कोलोरॅडोसारख्या (म्हणजे, तितकेसे भारतीय नसलेल्या) राज्यात लिकर मॉलमध्ये ओल्ड माँक आढळला होता. दर्दीलोक्स घेत असतील तिथले. अत्तापोतुर जगातली सगळ्यात जास्त विकली जाणारी रम होती ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ज्जे बात !! खुद्द जावईबुआ

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 15:48 नवीन
ज्जे बात !! खुद्द जावईबुआ रिपोर्ट देणार म्हणजे दस्तुरखुद्द शिक्कामोर्तब!. ओल्ड मॉन्क ओल्ड मॉन्क है हुजूर. कडाक्याच्या थंडीत हाती ओल्ड मॉन्क ऑन रॉक्स अन सोबत तंदुरीत खरपूस भाजलेला देशी कोंबडा बस्स, हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

भारी बेत हो देवा

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/15/2016 - 21:45 नवीन
एकदा जमवाव म्हणतो सगळे बुलेटिअर्स न साधू न कोंबडा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वल्लाह वल्लाह !!!

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/15/2016 - 21:47 नवीन
वल्लाह वल्लाह !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

खूप छान लेख

जगप्रवासी
Mon, 11/14/2016 - 17:52 नवीन
डिस्कव्हरी चॅनेल वर "how they do it?" की अजून असल्या कुठल्यातरी प्रोग्राम मध्ये ही पूर्ण प्रोसेस दाखवली होती. तो झरा देखील. खूप छान झालाय लेख.
  • Log in or register to post comments

हा चितळेंचा अपमान आहे.

मारवा
Mon, 11/14/2016 - 19:35 नवीन
कुठे दर्जेदार दुध विकणारे सात्विक चितळे कुठे दारु गाळणारा कलाल डॅनियल ! कुठे एकही गर्लफेंड नसणारे गर्लफ्रेंडविहीन सत्वशिल चितळे कुठे सात गर्लफ्रेंडा असणारा चरीत्रहीन जॅक डॅनियल ! कुठे मास्टर ऑफ बाकरवडी चितळे कुठे तो भट्टी पेटवणारा डॅनियल कुठे पुण्यात्मा चितळे कुठे अपवित्रात्मा डॅनियल कुठे किंग चितळे कुठे जॅक डॅनियल कुठे पुण्यनगरीचा मानबिंदु कुठे.... छे छे आमच्या भावना दुखावल्यात तुम्ही हे खपवुन घेतले जाणार नाही संपादक मंडळ धागा तात्काळ उडवावा मारवा
  • Log in or register to post comments

भावना समजल्या गेल्यात !

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 07:33 नवीन
भावना समजल्या गेल्यात ! प.पु. चितळे किंवा प.पु.डॅनियल च्या वैकीक्तिक आयुष्याबद्दल तुलना करणे, हा लेखाचा उद्देश नाही तर डॅनियल ने मेहनत केल्यामुळे तयार झालेल्या "brand" बद्दल माहिती देणे हा लेखाचा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

लेख सुंदर आहे हे सहज गंमतीने लिहीलय हो ह.घ्या. ही विनंती

मारवा
Tue, 11/15/2016 - 20:21 नवीन
लेख खरच सुंदर आहे आवडलाही सहज तुलना गमतीदार वाटली तुमचे म्हणुन मी ही गंमत करत होतो. कृपया हलक्यात घ्यावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

ओह!! ही होय ती मुनशाईन!! टोटल

पिलीयन रायडर
Mon, 11/14/2016 - 20:30 नवीन
ओह!! ही होय ती मुनशाईन!! टोटल लागलेली आहे! मस्तच लेख!
  • Log in or register to post comments

मुनशाईन फक्त जेडी बेस

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 11/14/2016 - 20:39 नवीन
मुनशाईन फक्त जेडी बेस प्रॉडक्टला म्हणतात असे नाही, तर बेकायदेशीरपणे तयार केल्या गेलेल्या अन थोडक्यात हातभट्टीच्या दारूलासुद्धा हमरिकेत मूनशाईन म्हणतात असे ऐकले होते. खखो देव, जॅक अन मिपा वरले जॅक जाणोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खरे आहे ! !

टिवटिव
Tue, 11/15/2016 - 06:15 नवीन
स्मोकी माउंट्न मध्ये गटलिनबर्गला मूनशाईन ची अनेक दुकाने आहेत.शार्लेटजवळपण लोणच्याच्या बरणी सारख्या बरणीमघ्ये हि मूनशाईन मिळ्ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण

जॅक डनियल्स
Tue, 11/15/2016 - 07:44 नवीन
गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण दुकानात जी लोणच्याच्या बरणीत मिळते ती लीगल मूनशाईन आहे. त्याची बनवण्याची पद्धत सारखीच असते पण चांगल्या distillary मध्ये (without contamination) बनवली असते आणि अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% ) असते. ती पण उग्र वासामुळे प्यायली जात नाही - पण त्यामध्ये बुडवून ठेवलेल्या चेरया आणि स्टोबेरी चावायला मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिवटिव

अल्कोहोल चे प्रमाण पण कमी

महासंग्राम
Tue, 11/15/2016 - 10:04 नवीन
अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% )
जेडी वर लिहिलेलं १०० प्रुफ म्हणजे काय आणि अल्कोहोलचे प्रमाण कसे ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

अल्कोल्होल हा abv - अल्कोहोल

जॅक डनियल्स
Wed, 11/16/2016 - 09:45 नवीन
अल्कोल्होल हा abv - अल्कोहोल बाय व्होलूम मध्ये मोजतात - जेडी ४०% असते म्हणजे ४० ml ethanol आणि ६० ml पाणी. अमेरिकत तीच ८० प्रुफ असते (volume % च्या दुप्पट).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा