✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंदिराजी

ज
जॉनी यांनी
Sat, 11/19/2016 - 23:12  ·  लेख
लेख
'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.' माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं... कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली. जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच. हे काही पहिले पहिले प्रसंग होते. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मधला बराचसा अनागोंदी कारभार भारताला डोकेदुखी ठरत होता. इंदिराजींनी या प्रश्नाचा काय तो निकाल लावायचाच असं ठरवलं होतं. यात लक्ष घालायला सुरवात केल्यावर त्यांना लवकरच लक्षात आलं की हा प्रश्न काही चर्चातून सुटणारा नाही. त्यांनी याबाबतीत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीच होती. अनेक देशाना भेटी देऊन पाकिस्तान प्रश्न, भारताची बाजू आणि भूमिका याबद्दल माहिती देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू भक्कम करून ठेवण्यात आली. दुसऱ्या बाजूला लष्कराला तयारी करण्याची सूचना देऊन ठेवलीच होती. 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाक विमानांनी अमृतसर, अंबाला आणि इतर ठिकाणी बॉम्बिंग केलं आणि युद्धाला सुरवात केली. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. त्यातल्याच तरुण मुलांना ट्रेनिंग देऊन 'बांगलादेश मुक्ती वाहिनी' तयार केली. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराला आदेश दिले की पाकिस्तानात शिरा. तेरा दिवस! तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला. ही भारताच्या इतिहासातील सर्व बाजूंनी तयारी करून योग्य संधीची वाट पाहून खेळलेली एकमेव खेळी. जिंकल्याची वार्ता मंत्रिमंडळाला सांगताना इंदिराजी म्हणतात, "गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है". आपल्या मंत्रिमंडळातून इंदिराजींनी सिंडिकेट ग्रुप ला तर काढून फेकलंच होतं. परत त्यांना कुणी गुंगी गुडीया बोललं नसेल. गुजरात आणि बिहार मध्ये भ्रष्टाचारविरोधी विद्यार्थी आंदोलन सुरू असताना भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्यासारखी काही विधानं त्यांच्याकडून झाली आणि इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला सुरुवात झाली. राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि इंदिराजींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली. ही बंदी पण झुगारून राजीनामा न देता इंदिराजींनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली आणि सुरु झाला भारताच्या इतिहासातील काळं पर्व. एकछत्री अंमल, कडक सेन्सॉरशिप इत्यादी. याच कालावधीत देशातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. 1977 साली इंदिराजींनी पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि 30 वर्षात प्रथमच केंद्रात काँग्रेस ची सत्ता गेली. जनता पार्टी ला लोकांनी प्रचंड प्रमाणात मतदान केलं. याच जनता पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे इंदिराजी 1980 साली पुन्हा निवडून आल्या. 'गरिबी हटाव' च्या मुद्द्यावर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. काही दिवसातच पुन्हा एका काळ्या पर्वाला त्यांना सामोरं जावं लागलं. ते म्हणजे ऑपरेशन ब्लु स्टार. सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला हेव्ही आर्टिलरी चा वापर करावा लागला आणि पवित्र सुवर्णमंदिरात रणगाडे घुसवल्याने शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. याचिच परिणीती दंगलींमध्ये झाली. फेब्रुवारी 1984 मध्ये, ज्यांच्या नावावरून पुण्यात पूल आहे, ते लंडन मधील भारतीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं 'जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट' च्या अतिरेक्यांनी अपहरण केलं आणि मकबूल भट या त्यांच्या म्होरक्याला सोडण्याची मागणी केली. इंदिराजींची भूमिका तीच, दहशतवादासमोर झुकणार नाही. दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला! 31 ऑक्टोबर 1984 ला याच ऑपरेशन ब्लु स्टार चा रोष मनात ठेवून इंदिराजींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली आणि एक झंझावात अखेर थंड झाला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
देशांतर

प्रतिक्रिया द्या
20960 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

धावता आढावा छान जमलाय.

जव्हेरगंज
Sun, 11/20/2016 - 18:06 नवीन
धावता आढावा छान जमलाय. अजून विस्तृत लिहावे.
  • Log in or register to post comments

ठळक

जॉनी
Sun, 11/20/2016 - 20:17 नवीन
धन्यवाद _/\_ इंदिराजींच्या कारकिर्दीतील ठळक गोष्टीच लिहिल्या आहेत फक्त. बाकी त्यांची कामगिरी खूप मोठी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

पंतप्रधान या मालिकेच्या ७,८,९

स्वलिखित
Sun, 11/20/2016 - 18:36 नवीन
पंतप्रधान या मालिकेच्या ७,८,९,१०,११,१२ या भागामध्येसुद्धा इंदिरा गांधी यांचा कार्यकाल वर्णन आहे.पण आणीबाणी च्या काळातील व कलम बदलांविषयी फारच कमी माहिती.
  • Log in or register to post comments

इंदिराजींचे कार्य

सर टोबी
Sun, 11/20/2016 - 19:48 नवीन
इंदिराजींच्या कार्याची हि थोडक्यात जंत्री: १. बँकांचे राष्ट्रीयीकरण: या मूळे छोटे उद्योग आणि सर्व सामान्य जनता यांना पतपुरवठा होऊन रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली. २. हरितक्रांती: धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्न्न तोड नाही. अन्नधान्याचे रेशनिंग ज्यांनी अनुभवले आहे त्यांना याचे महत्व वाटल्या शिवाय राहणार नाही. ३. अणु ऊर्जा आणि अवकाश संशोधन: आज आश्चर्य वाटेल परंतु आपल्या सारख्या गरीब देशाला या गोष्टींची काय गरज आहे असे त्या काळीं विरोधी पक्ष आणि काही लोक देखील विचारात असत. आज आपण त्या गोष्टींचे फायदे अनुभवत आहोत. ४. अणु स्फोट: हे तंत्र देशात विकसित करून त्यांनी एक प्रकारचा दरारा आणि आदर निर्माण केला. ५. सुंस्थानिकांचे भत्ते रद्द करणे: देशाच्या तिजोरी वरील मोठा भर त्यांनी हलका केला. ६. स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन: या मूळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. ७. रशिया बरोबर मैत्री संबंध: आज जेंव्हा आपली सर्व शेजारी राष्ट्रांकडून कोंडी होत आहे तेंव्हा रशिया सारखा मित्र असण्याची गरज समजते. भारत पाक युद्धात जरब बसविणे, भारता बरोबर रुपया वापरून आयात निर्यात करणे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान भारता बरोबर शेअर करणे असे अनेक पदर होते या मैत्रीचे.
  • Log in or register to post comments

मस्त

जॉनी
Sun, 11/20/2016 - 20:02 नवीन
मस्त सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

संस्थानिकांचे भत्ते

गॅरी ट्रुमन
Mon, 11/21/2016 - 12:00 नवीन
इतर मुद्द्यांविषयी नंतर लिहितो. पण आताच---
सुंस्थानिकांचे भत्ते रद्द करणे: देशाच्या तिजोरी वरील मोठा भर त्यांनी हलका केला.
मला वाटते की संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हा थोडासा पॉप्युलिझमचा आणि राजकारणाचा भाग होता. पॉप्युलिझमचा का? कारण इंदिराजींनी स्वतःला गरीबांची मसिहा/तारणहार म्हणून लोकांपुढे आणले होते.बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हे दोन निर्णय त्याचा एक भाग होते. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाविषयी माझ्याच मिपावरील दुसर्‍या जन्मातून लिहितो.संस्थानिकांचे भत्ते रद्द करून आपण राजेरजवाड्यांच्या (पक्षी श्रीमंतांच्या) विरोधात आहोत हे दाखवायची उत्तम संधी इंदिरा गांधींकडे होती.हा झाला पॉप्युलिझमचा भाग. यात आणखी राजकारण कुठे आले? तर बरेच संस्थानिक विरोधी स्वतंत्र पक्षात सामील झाले होते. स्वतंत्र पक्ष १९६० च्या दशकात काँग्रेसला एक समर्थ पर्याय म्हणून पुढे येत होता. १९६७ मध्ये स्वतंत्र पक्षाने लोकसभेत ४४ म्हणजे जनसंघापेक्षाही जास्त जागा जिंकल्या होत्या. तेव्हा बरेच संस्थानिक त्या पक्षात सामील झाले याचा राग असावा काय? अगदीच अशक्य नाही. संस्थानिकांच्या भत्त्यांमुळे सरकारी तिजोरीवर फार मोठा भार पडत होता असे नाही. सरदार पटेलांनी संस्थाने विलीन केली त्यावेळी साम-दाम-दंड-भेद या चारही मार्गांचा वापर केला. त्यातील हा दाममार्गाचा भाग होता.१९४७ मध्ये यासाठी सरकारचे दरवर्षी ६ कोटी खर्च होत होते. ही रक्कम पुढील पिढ्यांना कमी केली गेली होती त्यामुळे १९७० पर्यंत हा आकडा ४ कोटींवर आला होता. याविषयी अधिक माहिती इथे. १९४७ मध्ये ६ कोटी ही मोठी रक्कम असली तरी १९७० मध्ये ४ कोटी ही फार मोठी रक्कम होती असे नाही. या लेखातील इतर मुद्देही विचार करण्याजोगे आहेत. संस्थानिकांना भत्ते द्यावेत यासाठी स्वतः सरदार पटेल आग्रही होते आणि त्याचा उल्लेख राज्यघटनेत उल्लेख व्हावा यासाठीही ते आग्रही होते. जर का भारत सरकारने अमुक इतके पैसे दरवर्षी देऊ असे संस्थानिकांना आश्वासन दिले असेल पण नंतर त्याला हरताळ फासला असेल तर त्याला breach of sovereign guarantee असे का म्हणू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे

जयंत कुलकर्णी
Mon, 11/21/2016 - 12:08 नवीन
संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हा निव्वळ पोरखेळ होता ज्याने सामान्य मानसाच्या डोळ्यात धुळ फेकली गेली. कारण संस्थानिकांची नावे सात बार्‍यावरुन निघाली नाहीत. पण ना सरदार पटेलांनी त्यावर विचार केला ना इंदिरा गांधींनी. मोदींनी प्रथम हे काम केले असते तर फार बरे झाले असते. हे काम मोदीच करु शकतात. हे जर झाले तर सरकारला त्यांच्या उपक्रमासाठी जमिनीची कमतरता भासणार नाही... भत्ते इ इ फार किरकोळ संपत्ती आहे. जर भत्ते रद्द करणे न्याय्य असेल तर हा विचार जास्त फायद्याचा होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

स्वतंत्र पक्ष एकमेव उघड

अनुप ढेरे
Mon, 11/21/2016 - 12:11 नवीन
स्वतंत्र पक्ष एकमेव उघड आर्थिक उजवा पक्ष असावा भारतातला. रच्याकने, संस्थानिकांचे राजकारणात उतरणे, निवडणुकांमध्ये यश मिळवणे आणि नंतर भत्ते क्यांसल होणे याचा उल्लेख गुलाल चित्रपटात आहे. केकेच्या एका भाषणात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

हो

गॅरी ट्रुमन
Mon, 11/21/2016 - 12:44 नवीन
स्वतंत्र पक्ष एकमेव उघड आर्थिक उजवा पक्ष असावा भारतातला.
हो आणि स्वतंत्र पक्षाने पिलू मोदी, मिनू मसानी, एन.जी.रंगा यांच्यासारखे ज्येष्ठ संसदपटूही दिले. १९६० च्या दशकात उघडउघडपणे लायसेन्स-परमीट राज बंद करा ही मागणी करणे त्या वेळच्या वातावरणात इतके सोपे नव्हते. ते स्वतंत्र पक्षाने केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

जयपूरच्या संस्थानिक असलेल्या

श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 15:29 नवीन
जयपूरच्या संस्थानिक असलेल्या राजमाता गायत्रीदेवी या स्वतंत्र पक्षातर्फे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत राजस्थान विधानसभेच्या एका निवडणुकीत स्वतःत्र पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता व त्यांना बहुमतासाठी जेमतेम ८-१० जागा कमी पडत होत्या. अशा वेळी राज्यपालांच्या सहाय्याने इंदिरा गांधींनी रडीचा डाव खेळून विधानसभा स्थापन होऊन ने देता स्थगित करायला लावली. नंतरच्या ६ महिन्यात आमदारांची पुरेशी फोडाफोडी करून काँग्रेसकडे बहुमत जमविले व नंतर स्थगिती उठवून राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

इंदिरा गांधींनी रडीचा डाव

असंका
Tue, 11/22/2016 - 15:16 नवीन
इंदिरा गांधींनी रडीचा डाव खेळून
फारच औचित्यपुर्ण शब्दयोजना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अणुऊर्जा आणि त्यासंदर्भात

वटवट
Mon, 11/21/2016 - 13:07 नवीन
अणुऊर्जा आणि त्यासंदर्भात खरंच कोणाला श्रेय द्यायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपले माजी स्व. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभा ह्यांनाच द्यावे लागेल... उगं कोणाची पण बिलं कोणाच्यापण नावे फाडू नयेत... वैमगैन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

बँकांचे राष्ट्रीयीकरण

मिल्टन
Mon, 11/21/2016 - 14:06 नवीन
बँकांचे राष्ट्रीयीकरण: या मूळे छोटे उद्योग आणि सर्व सामान्य जनता यांना पतपुरवठा होऊन रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली.
बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि त्यानंतर खेडोपाडी बँकांच्या शाखांचे जाळे विणले गेले, गरीबांना त्यांचे बँकखाते उघडणे सोपे झाले इत्यादी गोष्टी कोणीच नाकारू शकत नाही. पण बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या बाबतीत काही मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. १. बँकांनी गावांमध्ये शाखा उघडाव्यात असे वाटत असेल तर रिझर्व्ह बँकेने नियम बदलून ते चालणार्‍यातले नव्हते का? म्हणजे शहरांमध्ये एक नवी ब्रँच हवी असेल तर गावांमध्ये तीन नव्या ब्रँच उघडायला हव्यात अशा स्वरूपाची अट घालून पाहिजे तो परिणाम साध्य करता आला नसता का? आज विमान उद्योग क्षेत्रात डी.जी.सी.ए ही लहान विमानतळांवर सेवा पुरवली पाहिजे अशी सक्ती विमानकंपन्यांना करतेच. अन्यथा सगळ्या विमान कंपन्या मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, गोवा, जयपूर इत्यादीच मार्गांवर विमानसेवा पुरवतील आणि हुबळी, लखनौ इत्यादी ठिकाणी विमान कंपन्या सेवा पुरवणार नाहीत. तसे नियम रिझर्व्ह बँकेला इतर बँकांना सक्तीचे करता आले असतेच. आजही जनधन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवाले अकाऊंट उघडायचे हा नियम आल्यानंतर सगळ्या बँकांनी निमूटपणे त्याचे पालन केलेच की. म्हणजे गावांमध्ये बँकांच्या शाखा वाढाव्यात असा उद्देश असेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते का? २. सरकारला बँकिंग बिझनेसमध्ये शिरकाव करायचा असेल तर सरकारला नव्या बँका चालू करायला कोणी रोखले होते? त्यासाठी खाजगी बँका जबरदस्तीने ताब्यात घेणे कसे काय समर्थनीय आहे? ३. वरील मुद्द्याशीच संबंधित-- सरकारने १९६९ मध्ये बँका ताब्यात घेतल्या तेव्हा त्या देशातील १४ सर्वात मोठ्या बँका होत्या.त्यातच धोंडूमामा साठे आणि इतरांनी कष्टपूर्वक उभी केलेली महाराष्ट्र बँकही होती तसेच टी.ए.पै आणि इतरांनी उभी केलेली सिंडिकेट बँकही होती. हे पाऊल उचलून सरकारने नक्की कोणते संकेत दिले? तुम्ही कितीही कष्ट करा, प्रयत्नपूर्वक आपला उद्योग उभा करा आणि एक दिवस सरकार येईल आणि तुम्हाला कवडीमोल रक्कम देऊन तुमचा उद्योग ताब्यात घेईल!! भारतातील entrepreneurial spirit वर मोठाच धक्का लावणारा हा प्रकार होता. याला काय अर्थ आहे? उद्या कोणी दरोडेखोर आला आणि डोक्याला बंदूक लाऊन 'बर्‍या बोलाने तुझ्याकडचे पैसे माझ्या ताब्यात दे नाहीतर गोळी घालीन' असे म्हणत असेल आणि पैसे लुबाडून घेऊन जात असेल तर त्याच्यात आणि सरकारच्या या कृतीमध्ये फरक काय? वर म्हटल्याप्रमाणे बँकेच्या राष्ट्रीयीकरणानंतर बरेच फायदे झाले हे कोणीच नाकारू शकत नाही.पण त्यासाठी राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते का? हे एक पाऊल उचलून गरीबांचा तारणहार ही प्रतिमा लोकांपुढे उभे करून इंदिरांना पक्षांतर्गत विरोधकांना (मोरारजी देसाई आणि इतर सिंडिकेट) धाराशायी करायची मात्र संधी मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

मस्त

चंबा मुतनाळ
Sun, 11/20/2016 - 20:14 नवीन
जाॅनीसर, छान विवरण केलय
  • Log in or register to post comments

आझाद हिंद सेनेच्या निवृत्त

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 11/20/2016 - 20:38 नवीन
आझाद हिंद सेनेच्या निवृत्त अधिकारी/जवानांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन पेन्शन सुरु करणाऱ्या सुद्धा बहुतेक इंदिरा होत्या .
  • Log in or register to post comments

इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित

एस
Sun, 11/20/2016 - 20:41 नवीन
इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित करणारी होती. त्यांना सलाम! प्रोजेक्ट टायगर सुरू करून वाघांची संख्या वाचवण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे.
  • Log in or register to post comments

इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित

एस
Sun, 11/20/2016 - 20:41 नवीन
इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित करणारी होती. त्यांना सलाम! प्रोजेक्ट टायगर सुरू करून वाघांची संख्या वाचवण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे.
  • Log in or register to post comments

होय बऱ्याच घटनांमध्ये त्यांचं कार्य आहे

वरुण मोहिते
Sun, 11/20/2016 - 20:47 नवीन
आज लोकसत्ता आणि मटा मध्ये पण चांगले लेख आले आहेत त्यांच्याबद्दल . वाचण्यासारखे .
  • Log in or register to post comments

बांगलादेश युद्धावेळी

जॉनी
Sun, 11/20/2016 - 20:50 नवीन
बांगलादेश युद्धावेळी इंदिराजींनी जेव्हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना सैन्याच्या तयारीबद्दल विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर जबरदस्त होतं "आय एम ओलवेज रेडी, स्वीटी"
  • Log in or register to post comments

हाच फरक आहे, वडील आणि मुलगी..

वटवट
Mon, 11/21/2016 - 13:04 नवीन
हाच फरक आहे, वडील आणि मुलगी... भारत चीन युद्धवेळेसचे नेहरू आणि ह्या... जमीन अस्मान...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनी

हे विधान बरोबर आहे का ?

jp_pankaj
Mon, 11/21/2016 - 23:20 नवीन
हे विधान बरोबर आहे का ? मी काहितरी वेगळच वाचलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनी

हे विधान बरोबर आहे का ?

jp_pankaj
Mon, 11/21/2016 - 23:21 नवीन
हे विधान बरोबर आहे का ? मी काहितरी वेगळच वाचलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनी

इंदिरा गांधींना सलाम, त्यांचं

अमितदादा
Sun, 11/20/2016 - 21:13 नवीन
इंदिरा गांधींना सलाम, त्यांचं संपूर्ण जीवन हे व्हाइट किंवा ब्लॅक शेड मध्ये न पाहता ग्रे शेड मध्ये पाहिलं पाहिजे, त्यांचे काही निर्णय चुकीचे आणि राजकीय होते मात्र काही निर्णयाने देशाचं भविष्य बदलण्यास मदत झाली हे नक्की. मूळ लेखात तसेच प्रतिसादात आलेल्या चांगल्या गोष्टीत थोडी भर 1. सिक्कीम भारतात आणायचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झालं. 2. बहुतांश तेल कंपन्यांचा सरकारीकरण आणि स्थापना इंदिरा च्या काळी झाली त्यांच्या बाबत च एक वाक्य नेहमी आवडत " The only man in her cabinet" त्याचा बाबतीत अस म्हंटल तरी वावगं ठरणार नाही " She was the only man prime minister india got till now " (इथं man चा अर्थ शब्दशः न घेता खंबीर असा घ्यावा)
.जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच.
या बाबतीत एक थेअरी (माझ्या मते सत्य) प्रचलित आहे की इंदिरानी हे सर्व घडवून आणलं जेणे करून भारताला राजनैतिक लाभ मिळेल (जास्त माहिती जालावर सापडेल)
  • Log in or register to post comments

मस्तं. अजून काही योगदान

अनुप ढेरे
Sun, 11/20/2016 - 21:54 नवीन
मस्तं. अजून काही योगदान इंदिराजींच, १. राजकीय फायद्यासाठी भिंद्रनवालेला प्रोत्साहन. नंतर तेच अंगाशी २. आणिबाणी आणि त्यातले अत्याचार ३. पक्षांतर्गत विरोधकांना शत्रू समजून त्यांचा नि:पात ४. न्यायव्यवस्थेची मोडतोड. आपल्याला लॉयल जज सुप्रीम कोर्टावर नेमून. ५. स्वतंत्र भारताच्या एकमेव हुकुमशहा ६. राजकारणात हायकमांड कल्चर ७. शिवसेनेसारख्या गुंड पक्षांच्या वाढीला हातभार ८. ९७% पर्यंत आयकर. काळ्या पैशाला हातभार. ९. संविधानाची मोडतोड. खूप सॉलिड काँट्रिभ्युशन आहे राव...
  • Log in or register to post comments

10.राजकीय भ्रष्टाचाराची जननी

पुंबा
Mon, 11/21/2016 - 01:55 नवीन
10.राजकीय भ्रष्टाचाराची जननी 11.गरिबी हटावच्या नावाखाली दमनकारी समाजवादाचा अंगीकार 12.घराणेशाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

इंदिरा गांधींनी आपल्या

श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 15:32 नवीन
इंदिरा गांधींनी आपल्या हयातीतच घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले. पूर्वी नेहरूंच्या कारकीर्दीत इंदिरा गांधींचा प्रभाव फारसा नव्हता. परंतु नंतर स्वतःच्या कारकीर्दीत इंदिरा गांधींनी स्वतःच्या मुलांना (आधी संजय गांधी व नंतर राजीव) पक्षाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेत स्थान दिले व ती उच्च परंपरा नंतर पक्षातील सर्वांनीच सुरू केली व इतर बहुतेक पक्षांनी त्याचे अनुकरण केले. म्हणूनच सद्या सोनिया पक्षाध्यक्ष तर चिरंजीव राहुल उपाध्यक्ष, मुलायम पक्षाध्यक्ष तर चिरंजीव अखिलेश मुख्यमंत्री इ. फळे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

शिवसेनेसारख्या गुंड

जॉनी
Mon, 11/21/2016 - 09:03 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

शिवसेनेसारख्या गुंड

जॉनी
Mon, 11/21/2016 - 09:03 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हा हा हा

जॉनी
Mon, 11/21/2016 - 09:04 नवीन
शिवसेनेसारख्या गुंड पक्षांच्या वाढीला हातभार बाब्बौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आयकर

गॅरी ट्रुमन
Mon, 11/21/2016 - 11:33 नवीन
बरेचसे मुद्दे मान्य. नेहरूंच्या काळात राजकारणात काही प्रमाणात तरी नैतिकतेला महत्व होते. ते इंदिरांच्या काळात बर्‍याच अंशी लयाला गेले. पण
८. ९७% पर्यंत आयकर.
९७% मार्जिनल टॅक्स रेट हा १९७३-७४ या वर्षात लावण्यात आला होता. त्या वर्षी सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ताही देण्यात आला नव्हता.याचे कारण १९७१ मध्ये जवळपास एक कोटी बांगलादेशी निर्वासित आले होते त्यामुळे सरकारचा खर्च वाढला होता, तसेच पुढे १९७१ चे बांगलादेश युध्द, १९७३ मध्ये मध्यपूर्वेतील युध्द आणि गोल्ड स्टँडर्ड बंद होणे इत्यादींमुळे आलेली अनिश्चितता हे होते. पण १९७६-७७ मध्ये तो दर सी.सुब्रमण्यम अर्थमंत्री असताना ६६% पर्यंत खाली आणला गेला. याविषयी अधिक इथे . १९८० पर्यंत अगदी अमेरिकेतही ७०% इतका सर्वात जास्त आयकर होता.१९८० च्या दशकात अमेरिकेत रॉनाल्ड रेगन यांनी तो ५०% पर्यंत खाली आणला. त्याप्रमाणेच भारतातही १९८५-८६ मध्ये वि.प्र.सिंग अर्थमंत्री असताना तो ५०% पर्यंत खाली आणला होता. तेव्हा कदाचित इतका जास्त कराचा दर असणे त्या काळाची गरज होती किंवा फॅशन होती असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आह, अमेरिकेतदेखील इतका

अनुप ढेरे
Mon, 11/21/2016 - 12:09 नवीन
आह, अमेरिकेतदेखील इतका ट्याक्स असे हे माहिती नव्ह्तं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

97 % खूपच जास्त

जॉनी
Mon, 11/21/2016 - 23:27 नवीन
गॅरी सर, काही प्रश्न 1.97 % टॅक्स म्हणजे मी कमावलेल्या 100 रुपयांमागे 97 रुपये टॅक्स भरायचा? 2.असं असेल तर हीच काळा पैसा वाढायची सुरवात म्हणता येईल का? 3.प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन 70 च्या दशकातच होतं का आपल्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

हो

गॅरी ट्रुमन
Tue, 11/22/2016 - 10:54 नवीन
1.97 % टॅक्स म्हणजे मी कमावलेल्या 100 रुपयांमागे 97 रुपये टॅक्स भरायचा?
य नव्हते. आज समजा वर्षाला ५ कोटीवरील उत्पन्नावर ९७% कर लावला तर ५.५ कोटी उत्पन्न असलेल्याला पहिल्या ५ कोटीवर जितका कर येईल तितका अधिक वरच्या ५० लाखच्या ९७% म्हणजे ४८.५ लाख इतका कर भरावा लागेल. त्यावेळी टॅक्सेशनच्या स्लॅब काय होत्या ते बघायला हवे. आंतरजालावर कुठेतरी माहिती मिळेलच.
2.असं असेल तर हीच काळा पैसा वाढायची सुरवात म्हणता येईल का?
नक्कीच. वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे ५ कोटीवरच्या उत्पन्नावर ९७% कर असेल तर कोणालाही ५ कोटीपेक्षा जास्त कमावायचा इन्सेन्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे एकतर आपले उत्पन्न कमी दाखवून करचुकवेपणा करणे आणि ते जमत नसेल तर ५ कोटीच्या वर कमावायला जायच्या भानगडीत न पडणे हेच दोन मार्ग लोकांपुढे होते.
3.प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन 70 च्या दशकातच होतं का आपल्याकडे?
हो अगदी पहिल्यापासून प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनी

पहिले वाक्यः

गॅरी ट्रुमन
Tue, 11/22/2016 - 10:56 नवीन
काही कारणाने पहिले वाक्य उडले. पहिले वाक्यः ९७% टॅक्स म्हणजे सर्वांना सरसकट ९७% कर असे नव्हते. तर ९७% हा सर्वाधिक कराचा दर होता. सर्वात कमी स्लॅब १०% होती आणि सर्वाधिक स्लॅब ९३% होती आणि विविध सरचार्ज इत्यादी मिळून तो ९७% पर्यंत जात असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

इंदिरा गांधी एक फार धडाडीची

मृत्युन्जय
Mon, 11/21/2016 - 11:00 नवीन
इंदिरा गांधी एक फार धडाडीची बाई. भारतीय राजकारणातले त्यांचे योगदान दुर्लक्षुन चालणार नाही. त्यांच्या कारकीर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले गेले जे घेण्यासाठी निधडी छाती लागते. दुर्दैवाने त्यांची कारकीर्द जितक्य्या उल्लेखनीय गोष्टींनी झळाळली तितक्याच किंबहुना त्याहुन कैक पटींनी जास्त कलंकित निर्णयांनी झाकोळली गेली. खासकरुन ज्या लोकशाहीचा आपण गर्व बाळगतो त्याची सर्वात जास्त मोडतोड बाईंनीच केली. देशातली एकमेव हुकुमशाही त्यांच्या नावावर आहे. असे असताना त्यांची उज्ज्वल बाजु बघुन् त्यांचे गुणगान करावे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो.
  • Log in or register to post comments

उचित लेख. मृत्युंजय यांच्याशी

सस्नेह
Mon, 11/21/2016 - 12:22 नवीन
उचित लेख. मृत्युंजय यांच्याशी सहमत ! 'भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व' असे इंदिराजींचे वर्णन केले तर उचित ठरेल.
  • Log in or register to post comments

मकबूल बट

गॅरी ट्रुमन
Mon, 11/21/2016 - 14:35 नवीन
दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला!
मकबूल बटला इंदिरा गांधींनी असे तडकाफडकी फासावर लटकविले असे नेहमी म्हटले जाते. पण त्यात तितकेसे तथ्य नाही असे मला वाटते.लोकशाही पध्दतीत असे रविंद्र म्हात्रेंना मारले म्हणून मकबूल बटला असे तडकाफडकी फासावर लटकवायचा अधिकार पंतप्रधानांकडे नसतो. मकबूल बटला १९६६ (की १९६९) मध्ये अमीर चंद या जम्मू-काश्मीर पोलिसदलातील अधिकार्‍याची हत्या केल्याचा आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने आधीच फाशीची शिक्षा सुनावली होती.तो १९६८ मध्ये तुरूंगातून पळालाही होता आणि १९७१ मधल्या लाहोर विमान अपहरण प्रकरणात (लेखात उल्लेख केलेल्या) सहभागी होता. १९७४ मध्ये त्याला काश्मीरमध्ये परत पकडण्यात आले होते.त्याने राष्ट्रपतींकडे फाशीच्या शिक्षेसंदर्भात दयेचा अर्ज केलाही होता. तो अर्ज राष्ट्रपती झैलसिंग यांनी फेटाळला. इंदिरा गांधींनी सांगितले तर आपण झाडू मारायलाही तयार होऊ असे जाहिरपणे झैलसिंग यांनी म्हटले होते तेव्हा या बाबतीत झैलसिंग यांनी स्वतःच्या मताने निर्णय घेतला असायची शक्यता कमीच. कदाचित म्हात्रे हत्याप्रकरणामुळे इंदिरांनी झैलसिंगना दयेचा अर्ज फेटाळा असे सांगितले असेल तर त्याबद्दल इंदिरांना योग्य ते श्रेय द्यायलाच हवे. पण तरीही रविंद्र म्हात्रेंना काश्मीरी दहशतवाद्यांनी ठार मारले म्हणून ताबडतोब इंदिरांनी मकबूल बटला फासावर लटविले हे म्हणणे तथ्याला धरून नाही कारण त्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने आधीच ठोठावली होती. २००४ मध्ये धनंजय चॅटर्जीला फाशी दिले होते त्यावेळी वाचल्याचे आठवते की फाशी द्यायची तयारी काही दिवस आधीपासूनच चालू होते. म्हणजे दोराला पिकलेली केळी चोळून कैद्याच्या मानेवरून तो सहजपणे स्लाईड होईल, तसेच कैद्याच्या वजनाचा आणि उंचीचा पुतळा घेऊन मॉक फाशी दिली जाते इत्यादी इत्यादी. या सगळ्याला काही दिवस जातात.रविंद्र म्हात्रेंचे अपहरण केले १ फेब्रुवारी १९८४ रोजी आणि त्यांचा मृतदेह सापडला ४ फेब्रुवारी १९८४ रोजी इंग्लंडमधील वेळेनुसार संध्याकाळी (म्हणजे भारतात रात्री). तर मकबूल भटला फाशी दिले ११ फेब्रुवारी १९८४ रोजी. शक्यतो फाशी पहाटेच दिले जाते. त्यामुळे म्हात्रेंची हत्या केली म्हणून मकबूल बटला फासावर चढवायचे असेल तर त्यासाठी ५ ते १० फेब्रुवारी हे ६ दिवसच होते.त्या ६ दिवसात सगळी तयारी करायला पुरेसा वेळ होता की मकबूल बटला फासावर लटकवायचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यातच हे रविंद्र म्हात्रे प्रकरण घडले हे समजायला मार्ग नाही.
  • Log in or register to post comments

ज्या तडफदारीने बाईंनी ते

मृत्युन्जय
Mon, 11/21/2016 - 14:48 नवीन
ज्या तडफदारीने बाईंनी ते प्रकरण हाताळले त्याची प्रशंसा केलीच पाहिजे. " ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

हो

गॅरी ट्रुमन
Mon, 11/21/2016 - 14:58 नवीन
ज्या तडफदारीने बाईंनी ते प्रकरण हाताळले त्याची प्रशंसा केलीच पाहिजे.
हो बरोबर. जेवढे श्रेय द्येय आहे तेवढे द्यायलाच हवे. पण अनेकांंना असे वाटते की म्हात्रे प्रकरण घडले म्हणून मकबूल बटला फाशी दिली. प्रत्यक्षात मकबूल बटला फाशी अमीर चंद हत्या प्रकरणी दिली गेली. म्हात्रे प्रकरणानंतर सूत्रे जोरात हलली असतील तर त्याचे श्रेय इंदिरांना द्यायलाच हवे पण त्याचवेळी रविंद्र म्हात्रेंना मारले म्हणून मकबूल बटला इंदिरांनी फासावर लटकवले असे म्हटले जाते ते योग्य नाही इतकेच.
" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.
असणारच. असल्या उदारमतवाद्यांची किड भारताला फार पूर्वीपासून लागलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

" ज्युडिशियल किलिंग " ची

मोदक
Mon, 11/21/2016 - 15:16 नवीन
" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे. असहिष्णुतेचा साक्षात्कार, पुरस्कार वापसी, अल्पसंख्यांकांच्या मतांची गळचेपी वगैरे प्रकार झाले नाहीत का नंतर..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

आणिबाणीचे समर्थन करताना आजही

मार्मिक गोडसे
Mon, 11/21/2016 - 17:58 नवीन
आणिबाणीचे समर्थन करताना आजही त्यांच्या पक्षाच्या लोकांची फेफे होते. १९७१ च्या पाकीस्तान युद्धावेळी भारतातील परदेशी तेल कंपन्यांनी मिलिटरीसाठी राखीव तेलसाठा उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्यामुळे त्या तेल कंपन्यांचे इंदीरा गांधींनी राष्ट्रीयीकरण केले हे खरं आहे काय? ह्या तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केल्याने भारताचा फायदा झाला की तोटा? इंदीरा गांधींना खरंच आपल्या जीवाची पर्वा नव्हती असे त्यांच्या शेवटच्या भाषणातील हे वाक्य ऐकल्यावर वाटते.
  • Log in or register to post comments

इंदीरा गांधींना खरंच आपल्या

मार्मिक गोडसे
Mon, 11/21/2016 - 19:26 नवीन
इंदीरा गांधींना खरंच आपल्या जीवाची पर्वा नव्हती असे त्यांच्या शेवटच्या भाषणातील हे वाक्य ऐकल्यावर वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

इंदिरा गांधींची वेगळी बाजू

गामा पैलवान
Mon, 11/21/2016 - 18:51 नवीन
लोकहो, इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं. मोहनदास करमचंद गांधींनी त्याला स्वत:चं आडनाव घेयायची सूचना केली होती! सत्याचे मेरुमणीच जणू!! सांगायचा मुद्दा काये की नेहरू-गांधी घराणं मुळातून मुस्लिम असून नावालाच हिंदू आहे. १९७१ साली बांगलादेशच्या युद्धात भारताने पाकिस्तानची ९३००० डुकरं कैद केली होती. त्यांना पोटंभर बिर्याण्या चारून परत पाठवण्यामागे काय कारण असेल ते लक्षात आलं असेलंच. विनोबा भाव्यांनी आणीबाणीला पाठींबा दिला तो गोहत्याबंदीच्या आश्वासनावर विसंबून. अर्थात मैमुनाबाईंनी नंतर विनोबांच्या तोंडाला पानं पुसलीच. कारण लक्षात आलं असेलंच. १९८० सालानंतर बाईसाहेबांनी अकाली दलाला शह देण्यासाठी भिंद्रनवाल्याला वर चढवण्याचं धोरण पत्करलं. मात्र त्यातून त्याने सुवर्णमंदिराचा कब्जा घेतला. आता परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून सुवर्णमंदिरात सैन्य घुसवलं. सैन्य धाडण्याबद्दल आक्षेप नाही, पण जो दिवस निवडला त्या दिवशी सणासुदीची गर्दी होती. त्यामुळे निरपराध भाविकांची नृशंस कत्तल झाली. तिथे लालफुल्लीसही प्रवेश नव्हता. तुलनेने कमी गर्दीचा दिवस का निवडला नाही यामागील कारण लक्षात आलं असेलंच. येथपर्यंत आपण इंदिरा गांधींच्या मुस्लिम पार्श्वभूमीमुले हिंदूंची झालेली हानी बघितली. आता एक वेगळा परिणाम बघूया. लोकहो, इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं. मोहनदास करमचंद गांधींनी त्याला आपलं स्वत:चं आडनाव देऊ केलं! सत्याचे मेरुमणीच जणू!! सांगायचा मुद्दा काये की नेहरू-गांधी घराणं मुळातून मुस्लिम असून नावालाच हिंदू आहे. १९७१ साली बांगलादेशच्या युद्धात भारताने पाकिस्तानची ९३००० डुकरं कैद केली होती. त्यांना पोटंभर बिर्याण्या चारून परत पाठवण्यामागे काय कारण असेल ते लक्षात आलं असेलंच. तसंच युद्धानंतर पूर्व बंगाल भारतात समाविष्ट व्हायला हवा होता. त्याऐवजी बांगलादेश हा वेगळा देश म्हणून का उदयाला आला याचं कारणही कळलं असेलंच. विनोबा भाव्यांनी आणीबाणीला पाठींबा दिला तो गोहत्याबंदीच्या आश्वासनावर विसंबून. अर्थात मैमुनाबाईंनी नंतर विनोबांच्या तोंडाला पानं पुसलीच. कारण लक्षात आलं असेलंच. १९८० सालानंतर बाईसाहेबांनी अकाली दलाला शह देण्यासाठी भिंद्रनवाल्याला वर चढवण्याचं धोरण पत्करलं. मात्र त्यातून त्याने सुवर्णमंदिराचा कब्जा घेतला. आता परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून बाईंनी सुवर्णमंदिरात सैन्य घुसवलं. सैन्य धाडण्याबद्दल आक्षेप नाही, पण जो दिवस निवडला त्या दिवशी सणासुदीची गर्दी होती. त्यामुळे निरपराध भाविकांची नृशंस कत्तल झाली. तिथे लालफुल्लीसही प्रवेश नव्हता. तुलनेने कमी गर्दीचा दिवस का निवडला नाही यामागील कारण लक्षात आलं असेलंच. येथपर्यंत आपण इंदिरा गांधींच्या मुस्लिम पार्श्वभूमीमुळे हिंदूंची झालेली हानी बघितली. आता एक वेगळा परिणाम बघूया. 'आम्हाला ५००० वर्षांचा विजयाचा इतिहास आहे' हे बाईंचं युद्धापूर्वीचं वक्तव्य मोठं महत्त्वपूर्ण आहे. हिंदूंचा पाठींबा मिळावा म्हणूनच उच्चारलेलं आहे याबद्दल शंका नाही. मात्र याचा पाकिस्तानवर विपरीत परिणाम झाला. एका मुसलमान बाईला हिंदूंचा इतिहास आपलासा वाटतो, आणि हीच बाई पुढे पाकिस्तानाचा तुकडा पाडून हिंदूंना विजय मिळवून देते. हा वेगळ्या पाकिस्तानच्या संकल्पनेवर झालेला मर्माघात आहे. आपली मुळं नक्की कशात आहेत याचं उघड व/वा छुपं विचारमंथन पाकिस्तानात सुरू झालं असावं. भुत्तो सत्तेवर होता तोवर त्याने दुर्लक्ष केलं, पण झिया सत्तेवर आल्यावर त्याला निर्णय घेणं भाग पडलं असावं. त्यातून पाकिस्तान्यांनी आपली मुळं अरबांमध्ये शोधायचा प्रयास केला असावा असं दिसतंय. अल-बाकीस्तान मागे अप्रत्यक्षरीत्या मैमुना बेगम कारणीभूत ठरल्या असाव्यात. असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

प्रतिसादात गडबड. कृपया सांभाळून घेणे.

गामा पैलवान
Mon, 11/21/2016 - 19:03 नवीन
वाचकहो, वरील प्रतिसादातला काही भाग कापला जाऊन सुरुवातीस परत चिकटला आहे. हे कशामुळे झालं ते माहित नाही. बहुतेक प्रतिसाद पूर्ण करतांना बराच खंड पडला. तस्मात सांभाळून घ्यावे ही विनंती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बाकी काही असो, तुमच्या

संदीप डांगे
Mon, 11/21/2016 - 19:48 नवीन
बाकी काही असो, तुमच्या प्रतिसादाचं कारण लक्शात आलंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अरे वा!

गामा पैलवान
Mon, 11/21/2016 - 20:32 नवीन
आरं वा, संदीप डांगे! लै हुश्शार झालात की वं तुमी राव. हबीणंडण. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

गा. पै...

वटवट
Mon, 11/21/2016 - 20:39 नवीन
गा. पै... फार मोठा घाव घातला आहे आपण, मुळावरच... आता येतीलच मुघल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तुमच्यासारखे लोक अवतीभवती

संदीप डांगे
Mon, 11/21/2016 - 21:46 नवीन
तुमच्यासारखे लोक अवतीभवती असतांना हुशार न होऊन कसं व्हईल... ??? =)) उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल. म्हणजे कसे, मलाही 'विश्वासार्ह' माहीती मिळेल ना! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हें बरीक खरें

गामा पैलवान
Mon, 11/21/2016 - 23:09 नवीन
संदीप डांगे, अगदी बरोबर बोललात पहा. आता हेच बघा ना, मैमुना बेगम नावाच्या मुसलमान स्त्रीस हिंदूंचा गौरवशाली इतिहास आपलासा वाटतो. त्यामुळे ती पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करते. यावरून हिंदू धर्माच्या सहवासाची महती कळते. माझ्या सहवासात राहून तुमची हुशारी वाढली आहे, ती याच धर्तीवर बरंका. ही वार्ता संतोषजनक आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती चालू राहू द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ना, मैमुना बेगम नावाच्या

विजुभाऊ
Wed, 12/28/2016 - 20:39 नवीन
ना, मैमुना बेगम नावाच्या मुसलमान स्त्रीस हिंदूंचा गौरवशाली इतिहास आपलासा वाटतो. त्यामुळे ती पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करते. यावरून हिंदू धर्माच्या सहवासाची महती कळते.
यावरुन गामा यांचे डोके ठिकाणावर नाही किंवा ते सनातनी झालेले असावेत अशी खात्री पटायला लागली आहे. इतके मूर्खासारखे विधान करत सुटला आहात की पुरावे वगैरे गोष्टी तुमच्यासाठी कधीच महत्वाच्या नसतात हे ओघाने आलेच. बाकी या तोडलेल्या अकलेच्या तार्‍यांपुढे नभाम्गणही फिक्के पडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा