अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स
पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव.
ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील. म्हणजे ते आले एप्रिलमध्ये आणि जाणार होते जुलै मध्ये, पण डिसेंबर पर्यंत पैसे भरायला लागतील म्हणून सांगितलं. बरं महिन्याचा हप्ता जवळपास $४०० होत होता. मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं. किरकोळ आजारांसाठी लागणारी औषधं भारतातून येताना बरोबर आणायला सांगितली.
ते प्रथमच न्यू यॉर्कमध्ये आले असल्याने भरपूर भटकंती सुरु होती. अश्यातच वेस्ट कोस्टची ट्रिप ठरली. ग्रँड कॅन्यनला माझी ४ वर्षांची मुलगी माझ्याच बरोबर आलेल्या एका व्यक्तीमुळे जवळपास ४ फूट उंचीच्या दगडावरून पडली (त्यातले खास भारतीय व्यक्तींचे वागणे व तो अनुभव दुसऱ्या लेखात सांगीन). मुलीचा पाय दुखावला पण फ्रॅक्चर आहे का नाही ते कळेना. गाडीत बसल्यावर ती शांत झाली आणि मग आम्ही ४-५ तासांचा प्रवास करून वेगासमध्ये परत आलो. पायाला नक्की फ्रॅक्चर आहे का नुसताच मुरगळलाय ते कळत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघे (मी आणि पत्नी) चर्चा करत होतो की काय करावं. अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंटच्या आणि खर्चाच्या भयानक कथा ऐकल्या होत्याच. त्यात इन्शुरन्स नसल्यामुळे कसं आणि काय होणार याची पण चिंता होती.
वेगासला येईपर्यंत तसा उशीर झाला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला एका हॉस्पिटल मध्ये नेलं. तातडीच्या सेवेमध्ये (ER) हॉस्पिटलने दाखल करून घेतलं व आमची रवानगी एका खोलीत झाली. थोड्या वेळाने एक नर्स येऊन वय, वजन, उंची ई घेऊन गेली. मग अर्धा तास झाला, एक तास झाला आम्ही आपले वाट बघतोय. मध्ये २ वेळा विचारून आलो तर नुसतंच डॉक्टर येताहेत (Doctor is on his way) असं सांगत होते. डॉक्टर पण ग्रँड कॅन्यनहून येत होता की काय कोण जाणे. साधारण दीड तासाने एक माणूस डुलतडुलत आला म्हणलं चला आता उपचार चालू होतील, तर तो निघाला X-Ray काढणारा. पाय वेडावाकडा करून करून त्याने ५-६ X-Ray काढले व परत आमची रवानगी एका खोलीत झाली. आधीच्या अनुभवावरून फार लवकर काही होईल अशी आशा नव्हती पण यावेळेला फक्त ३ तासांनी डॉक्टर आले. तोपर्यंत आम्हाला फ्रॅक्चर आहे वा नाही हे पण कोणी सांगत नव्हतं.
अमेरिकन प्रथेप्रमाणे छान छान बोलून डॉक्टरांनी सुरुवात केली. इथे माझ्या मनात मी म्हणतोय बाकी सगळं राहूद्या हो, आधी सांगा काय झालंय ते. पण नाही... आधी आमच्याशी, मग मुलीशी छान छान बोलून डॉक्टरांनी ५-७ मिनटं घालवलीच, मग मुद्द्यावर आले. घोट्याच्या २-३ इंच वर नडगीला अगदी बारीक (Hairline) फ्रॅक्चर होतं पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आत्ताच्या फ्रॅक्चरच्या थोडं वर एक जुनं फ्रॅक्चर पण होतं जे भरून आलं होतं. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की ती या आधी कधी अशी पडली नाही किंवा पाय दुखतोय अशी तक्रार पण केली नाही, मग असं जुनं फ्रॅक्चर असणे कसं शक्य आहे? पण तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच येताय त्यामुळे आधीचं आम्हाला काही माहित नाही आणि जे दिसतंय ते आम्ही सांगतोय असं उत्तर देऊन प्रश्नच फेटाळून लावला.
आता प्लॅस्टर घालायचं का विचारल्यावर नर्स येऊन घालेल म्हणाले. नशिबाने या वेळेला नर्स लवकर आली पण हातातलं सामान प्लॅस्टरचं वाटत नव्हतं. तिने पायाची पाहणी केली आणि मग एक पट्टीसारखं काहीतरी काढलं. जवळपास २ इंच रुंद आणि ३ फूट लांब असेल. ते पाण्यात भिजवलं आणि पोटरीच्या खालून अगदी तळपायाच्या बोटांपर्यंत लावून त्याला पायाचा आकार दिला आणि ते वाळल्यावर स्ट्रेच बँडेज गुंडाळून टाकलं. एवढ्यात झालं का अश्या मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितले तर म्हणाले झालं सगळं. तेवढ्यात परत डॉक्टर आले आणि म्हणाले तिला जर वाटलं तर २ आठवड्याने ते बॅंडेज बदलून टाका. मी त्यांना सांगितलं की आम्ही इथे राहत नाही व २ दिवसात परत जर्सीला जाणार आहे, तर म्हणाले घरीच बदलून टाका. आम्ही विचारलं की तिचे X-Rays आणि रिपोर्ट्स मिळतील का? कारण जर जर्सीमध्ये डॉक्टरांना दाखवायचं असेल तर उपयोगी पडेल. तर CD वर कॉपी करून देतो म्हणाले. मी परत जुन्या फ्रॅक्चरचा विषय काढला, तर म्हणे तिची हाडं ठिसूळ आहेत. त्यावर लवकरात लवकर टेस्ट्स आणि ट्रीटमेंट करून घ्या. प्रकरण वाढलं तर ती नुसतं चालता चालता पडली तरी फ्रॅक्चर होईल. हे ऐकून आम्ही दोघे एकदम टेंशनमध्ये आलो.
तेवढ्यात ते धडकी भरवणारे वाक्य आलं - बिल भरून या. जड पायांनी आणि धडधडत्या छातीने मी गेलो. बिलिंग डेस्कवरची स्त्री आणि माझा संवाद खालील प्रमाणे -
ती: इन्शुरन्स कोणता आहे?
मी: नाहीये. मी थोडक्यात तिला परिस्थिती समजवायचा प्रयत्न केला.
परत मीच: घाबरत तिला बिल विचारलं
ती: ३,५०० डॉलर्स
माझ्या पोटात गोळा आला. जे भारतात ३,५०० रुपयात (तेव्हा) झालं असतं त्याला जवळपास २,००,००० रुपये द्यायचे? तिला बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं.
ती: तुम्ही भरू शकता का?
मी: हे बरेच पैसे आहेत.
ती: तुम्ही यातले २०% भरू शकता का? $६०० वगैरे.
माझ्या मनात एकदम बऱ्याच भावना आणि प्रश्न आले. त्यामुळे चेहऱ्यावर बावळट भाव आले असावेत.
तिने पटकन माझ्याकडे एक फॉर्म दिला आणि म्हणाली हा भर, ६०० डॉलर दे की तुझं काम झालं.
मी: (अविश्वासाने) बाकीचे पैसे मी नाही भरायचे?
ती: नाही. त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ.
मी फॉर्म भरून दिला.
ती: हे ६०० डॉलर्स तुला एकदम भरता येणार नसतील तर आपण महिन्याला ठराविक रक्कम ठरवू तेवढे भर.
मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे.
मी: ६०० डॉलर्स भरतो.
पुढे एका विभागात जाऊन मी रिपोर्ट्सची CD घेतली व सकाळी ८ ला ER मध्ये गेलेलो आम्ही साधारण संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडलो. यात खरं काम किती वेळाचं तर फार तर १ तास, बाकी वेळ नुसतच बसून.
उर्वरित ट्रिप तशीच लेकीचा "प्लॅस्टर" मधला पाय घेऊन पार पाडली.
समारोप
जर्सीला परत गेल्यावर ते रिपोर्ट्सचं पाकीट उघडलं. याआधी ते वाचायला वेळ झाला नव्हता. ३ पानी रिपोर्ट वाचता वाचता दुसऱ्या पानावर एका परिच्छेदात काय लिहिलं होतं त्याचा संदर्भच लागेना. लिहिलं होतं - किडनीच्या आजाराचे डिटेल्स, किडनीमधून स्टेंट टाकल्याचे आणि अजून कसलेकसले मार्क्स आहेत. आम्हाला दोघांनाही काय करावे ते कळेना. भारतात आमच्या डॉक्टरना फोन झाले. अमेरिकेतल्या डॉक्टर असलेल्या माझ्या चुलत बहिणीला विचारून झालं पण कोणाला काही कळेना. मग दुसऱ्या दिवशी वेगासमधल्या हॉस्पिटलला फोन केला. त्यांनी शांतपणे सांगितलं की टाईप करताना चुकलं असेल. म्हणलं प्रत्येक पानावर रुग्णाचं नाव लिहिलंय आणि पानावरचा एकच परिच्छेद कसा चुकू शकतो? तर ते म्हणे झालं असेल चुकून, तुम्ही दुर्लक्ष करा.
पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला बायकोमुलींची सुट्टी वाढवायला लागली. आमच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे बायकोमुलीं सुट्टीनंतर परत जाणार होते व मी एकटा अमेरिकेत राहणार होतो. परंतु, मुलीच्या हाडांच्या ठिसूळपणाचं पुढे योग्य निदान आणि उपचार करावे म्हणून आम्ही सगळ्यांनीच अमेरिकेतला गाशा गुंडाळून परत जायचं ठरवलं. दरम्यान पुढील १-२ महिन्यांमध्ये त्या हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या विभागांकडून $५०-$६० ची २-३ बिलं आली, जी मी भरली.
भारतात परत आल्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ् आहेत त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे Dexa Scan केलं. त्याचे रिपोर्ट्स व अमेरिकेतले रिपोर्ट्स घेऊन आम्ही डॉक्टरांसमोर बसलो. Dexa Scan रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणले ती व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. मी अमेरिकेतले रिपोर्ट्स दाखवले. ते बघून ते म्हणाले कि अमेरिकन स्टॅंडर्डप्रमाणे सगळ्याच भारतीयांची बोन डेन्सिटी कमी असते. त्यामुळे ते लोक म्हणतात की तुमची हाडं ठिसूळ आहेत. पण तसं काही नसतं आणि तुमच्या मुलीलाही काही झालेलं नाहीये.
अशी ही अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्सची गम्मत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला
भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या
मलाही अजुन दर्जात फरक नाही
पैसे कशाचे .... ?
मी सुट्टीसाठी आले असताना
तुमचा अनुभव
मुद्दा पटतोय तुमचा कारण मी
वैद्यकीय सुविधा
+१
अर्थातच..
याला पूर्ण सहमत
+100, दोन्ही प्रतिसादांना !
फेरफटका यांच्या प्रतिसादांना,
धाग्याचा उद्देश
साधारण अंदाज येण्यासाठी या साधनांचा उपयोग करू शकता
ईंशूरन्स
सहमत
http://mobile.nytimes.com
मुक्त बाजारपेठ
३५००?
समर्थन
कॉस्ट संदर्भात.
तुमचा इन्शू पुन्हा एकदा
कसा तपासुन घेऊ? म्हणजे नक्की
थांब जरा, एवढे लिहिणे जमणार
एवढे बिल
कॉस्ट
इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते.पिराताई: तुमच्या दुसर्या धाग्यात दिलेलं स्पष्टीकरण (चार्जमास्टर) हे कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करेल. तुमच्या इंन्शुरन्स कंपनीला फोन करून 'साध्या' टेस्ट्स ची त्या हॉस्पिटल मधील त्यांची निगोशिएटेड किंमत काय आहे ते विचारा (तो तुमचा हक्क आहे), तुमच्या विभागातल्या फेअर प्राईस अंदाजावरून ती अवास्तव असेल तर ती तशी का आहे ते त्यांना विचारा. काही वेळा ते सभासद गमावण्यापेक्षा निगोशिएट करून चार्जेस कमी करतात. वचने किं दरिद्रता? फोन-पलिकडचे इंन्शुरन्स एजंट काही तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाहीत, ना तुम्ही त्यांना, नुसतं विचारण्याने फायदा होत असेल तर बोलून पहायला काय हरकत आहे?कॉस्ट संदर्भात.
तुलनेची पद्धत चुकीची आहे
भारतात मला समजा रु. १० लक्ष
हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय
जरूर
पिडाकाका, हे असे पाहिजे.
मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये
पण तुझी डिलिव्हरी सुद्धा
खूप चांगला आहे असं म्हणणं
ते ओबामा केअर चा फार गवगवा
ओबामाकेअर
नागरिक आणि पर्मनंट रेसिडेंट्स
हामरिकेत असे अचानक तर रेटस
रेटस बद्दल कल्पना नाही
अमेरिकेत किंमती जास्त का?
- इथल्या प्रॅक्टिसमध्ये मेडिको-लीगल अॅक्शनच्या दबावाखाली कदाचित अनावश्यक अशा अतिरेकी निदान-चाचण्या,
- औषध कंपन्यांनी आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांनी पेटंट्सच्या खर्चाच्या (आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये अयशस्वी ठरणार्या कँडिडेट ड्रग्ज च्या खर्चाच्या) कारणास्तव चढत्या किंमती ठेवणं, तसंच
- मानवी वेळाच्या (लेबर चार्जेस) तुलनेने आधिक किंमती.
या दुव्यातूनः It is difficult to untangle precisely why prices are higher in the U.S., but two things are apparent: U.S. physicians get higher incomes than in other countries and the U.S. uses more expensive diagnostic procedures. More generally, with so many different kinds of insurance, no one organization has a strong incentive to cut out wasteful practices and ensure that all Americans get value for the very high levels of expenditure incurred when they are sick. मला भीती आहे ती ही हेच सगळं इंन्शुअरन्स कंपन्यांच्या सुळसुळाटाने भारतातही येऊ घातलं आहे, नव्हे मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी आलेलं आहे! जाता जाता: ही किंमतीतील वाढ गेल्या १५ वर्षा॓ंत किती अतोनात आहे ते पहाण्यासारखं आहे!मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी
ट्रेडमार्क, खरंच धागा काढून
काय सांगता?
सद्यस्थितीत मी नगर, नाशिक,
बाकी ते 3500 डॉलरचे बिल 600
हाहा... खरंय, विचार होता माझा
अमेरीकेत शक्यतो भारतीय दंतवैद्याकडे जायचे
+ 1 अमेरीकेत शक्यतो भारतीय दंतवैद्याकडे जायचे