आपल्या विचारांत असो, बोलण्यात असो वा लिखाणात असो, आपले शब्द आपल्या भोवतालचं जग बदलू शकतात. प्रेम, आनंद, वीरश्री, मैत्री, दु:स्वास, भीती, तिरस्कार ...सगळे, सगळे भाव या शब्दांतून जन्म घेतात.
राल्फ वाल्डो इमर्सनने लिहून ठेवलंय त्याप्रमाणे (आपण जगातल्या खूपश्या गोष्टी बदलू शकत नसलो तरीही), आपण जन्मलोच नसतांना जग होतं, त्यापेक्षा आपल्या 'असण्याने' ते थोडंसं बरं, सुसह्य झालं असेल तर कधीही चांगलंच.