(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील प्राण्यांचा व घटनांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तिंशी व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंध नाही. यात वर्णिलेल्या घटनांचा जर सद्य किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांशी काही जरी संबंध आढळला तर तो किव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती)
पूर्व, पश्चिम, उत्तर ते दक्षिण असे प्रचंड विस्तारलेले एक जंगल होत. गोड्या पाण्यांनी काठोकाठ भरलेली तळी, सुपीक जमीन, बारमाही वाहणार्या नद्या यांनी तो प्रदेश सुजलाम सुफलाम बनला होता. विविध प्रकारचे प्राणी त्यात गुण्यागोविंदाने रहात होते.