जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

लेखनप्रकार
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते.

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

हे हृदय कसे बापाचे......!

(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

ये दोस्ती ......

( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखनविषय:
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

दाग अच्छे है

लेखनविषय:
लेखनप्रकार
मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं.

मदत हवी आहे.

लेखनविषय:
या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com

मनकवडा डॉक्टर …

कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्‍या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखनविषय:
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.
Subscribe to सद्भावना