मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक ·

आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!

कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....

In reply to by शार्दुल_हातोळकर

नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.

In reply to by साहित्य संपादक

महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)

In reply to by शार्दुल_हातोळकर

आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

देशप्रेमी 02/05/2017 - 13:41
तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....

राघव 02/05/2017 - 09:43
सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)

वरुण मोहिते 02/05/2017 - 14:17
सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .

सपे-पुणे-३० 02/05/2017 - 14:54
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

माहितगार 02/05/2017 - 15:03
महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.

In reply to by माहितगार

माहितगार 02/05/2017 - 15:15
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.

सही रे सई 02/05/2017 - 19:45
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.

In reply to by सही रे सई

स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__

In reply to by शार्दुल_हातोळकर

दशानन 02/05/2017 - 22:35
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?

In reply to by शार्दुल_हातोळकर

यशोधरा 03/05/2017 - 07:45
मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.

In reply to by यशोधरा

देशप्रेमी 03/05/2017 - 14:15
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.

In reply to by देशप्रेमी

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.

चौथा कोनाडा 05/05/2017 - 22:26
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !

पाषाणभेद 06/05/2017 - 00:56
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही

नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

चौथा कोनाडा 29/03/2017 - 12:56
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! अच्छा, ही ती मंडळी आहेत का त्यांच्या लेखन-कौशल्याने आम्हाला भुरळ घालणारी ! बर्‍याचश्या शशक आवडल्या. भन्नाट उपक्रम ! उलगडायची पद्धत पण झक्कासच ! आय लव्ह मिपा !

नमस्कार मिपाकरहो, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत. अनुक्रमणिका 01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय 02. नवी सुरुवात = आंबट गोड 03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि 04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी 05. पाउलखुणा = श्वेता व्यास 06.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : निकाल

साहित्य संपादक ·

पहिला क्रमांक विभागून दिलाय, म्हणजे जबराट चुरस झाली! विजेत्यांचे अभिनंदन , मान्यवरांचे आभार , स्पर्धक, आयोजक, वाचक, मतदार या सर्वांचे कौतुक!

किसन शिंदे 26/03/2017 - 20:16
सर्व विजेत्यांचे जोरदार अभिनंदन.!! पहिल्या क्रमांक पटकवलेल्या कथेच्या लेखकाने त्याचे आयडी नाम सार्थ ठरवले हे नमूद करू इच्छितो. बाकी ठरलेल्या दिवशी निकाल मिपाकरांसमोर आणल्याबद्द संपूर्ण साहित्य संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार!!

In reply to by किसन शिंदे

पहिल्या क्रमांक पटकवलेल्या कथेच्या लेखकाने त्याचे आयडी नाम सार्थ ठरवले हे नमूद करू इच्छितो.
धन्यवाद :)

In reply to by मराठी कथालेखक

>> ही कमेन्ट नेमकी कोणाबद्दल म्हणायची :))

पैसा 26/03/2017 - 20:36
सर्व विजेते आणि सहभागी लेखकांचे अभिनंदन! अनेक कथा वेगवेगळ्या प्रकारे आवडल्याने कोणाला पहिले क्रमांक द्यावते हे समजले नाही त्यामुळे मतदान केले नाही. विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

माझी कथा (कांचनमृग) सर्वात नीटस बांधलेली वाटली .....पण तिला एकही वोट मिळालं नाही ! याचा अर्थ काय असू शकतो ? हा एक लेखक म्हणून विचार करतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

आदूबाळ 27/03/2017 - 14:48
याचा अर्थ काय असू शकतो ?
कदाचित शरीरसौष्ठव या निकषावर वाचकांनी मतं दिली नसावीत.

In reply to by संजय क्षीरसागर

एमी 27/03/2017 - 15:21
हा हा हा अहो काळा पैसावाले नोटबंदीच्या कचाट्यातून अलगद सुळकन सुटले; किंबहुना त्यांचा फायदाच झाला अशा गोष्टीला मिपावर मतं कशी मिळतील?? त्याऐवजी काळा पैसावाल्यांचं कसं वाट्टोळ्ळं वाट्टोळ्ळं झालं अशा विशफुल स्वप्नरंजनाला प्रथम क्रमांक मिळतो, मुस्लिम दहशतवाद्यांचा बागुलबुवा उभा करणार्या कथेला तृतिय क्रमांक मिळतो. असो. मक आणि जव्हेरगंज दोघेही मला लेखक म्हणून आवडतात. पण या कथा अजेंडायुक्त आहेत त्यामुळे मी त्यांना मत दिले नाही. एनीवे भाजपेयी मोदीभक्तांना किंवा इतर कोणत्याच उपप्रतिसादांना उत्तर मिळणार नाही. बादवे सासं, आता प्रत्येक शशक धागा त्या त्या लेखकाच्या नावे करुन टाकता येइल का?

In reply to by एमी

राजकीय विचारसरणीचा प्रश्न बाजूला ठेवू. कथाविषय, मांडणी, कल्पना नाविन्य, आशय थेट पोहोचणं या निर्वैयक्तिक निकषांविषयी मी बोलतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

चिनार 27/03/2017 - 15:21
संजयजी अनुमती असल्यास वाचक म्हणून आपल्या कथेवर व्यनीतून प्रतिक्रिया देऊ इच्छितो

In reply to by संजय क्षीरसागर

यशोधरा 27/03/2017 - 18:01
संक्षी, तुमची कथा मला समजली नाही. माझ्या तोकड्या बुद्धीचा दोष असू शकेल. मला फायनान्स विषयात गती नाही आणि आवड नाही त्यामुळे माझ्यासारख्या त्या विषयाबद्दल नावडीमुळे अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीला लगेच लक्षात येण्यासारखी ती कथा नाही. उत्तम असेल, नाही म्हणत नाही पण बारकाव्यांसकट कळली नाही, तर प्रतिसाद कसा देणार ना? कदाचित हे कारण असू शकेल काही जणांच्या बाबतीत तरी.

In reply to by यशोधरा

किसन शिंदे 27/03/2017 - 18:16
एग्जाटली!! जेव्हा बोर्डावर टाकली तेव्हा वाचली होतीच, पण आताही वर लिंक दिल्यानंतर पुन्हा जाऊन वाचली. पण तरीही शेवटाकडे कळाली नाही. त्यामुळेच कदाचित लोकांची मते पडली नसावीत.

In reply to by यशोधरा

मला ही एक्झॅक्टली हेच वाटलं की मी आशय पोहोचवू शकलो नाही ! कारण निर्णय कायम असला तरी नक्की काय झोल झाला इतकंच जाणून घ्यायचं होतं. तुम्हा सर्वांची टेक्निकल डिफिकल्टी मान्य आहे पण शशकमधे हे सगळं बसवणं असभंव होतं. एनी वे, तुम्ही सरळपणानं सांगितलंत, सो तुमच्यासाठी हा उलगडा ! इट इज धिस वे : शेटनी सदाला काही वर्षांपूर्वी ६ लाख कॅश कर्ज दिलंय (हे सगळे व्यावहार विनाकागदपत्राचे आणि रोखीत होतात. शेट इतका पॉवरफुल असतो की घेणारा पलटी मारु शकत नाही). सदा आज कर्ज सव्याज परत करायला १० लाख घेऊन आलायं. निर्चलनीकरण झालं नसतं तर सदा आज संपूर्ण कर्जमुक्त होणार होता. सर्व व्यावहार रोखीतच असल्यानं शेटला सुद्धा अदरवाइज आनंदच होता. पण सद्य स्थितीत पैसे असूनही सदा मुक्त होऊ शकत नाही आणि शेटलाही समोर आलेल्या लक्ष्मीचा मोह सुटत नाही.... हा प्लॉट आहे ! मग शेट नामी शक्कल लढवतो. तो सदाला पाच पॅनकार्डस आणि त्या व्यक्तींचे साइन्ड ब्लँक चेक्स आणायला सांगतो. सदाला काहीच प्रॉब्लम नसतो कारण ज्यांच्या खात्यात पैसेच नाहीत अशा व्यक्तींचे चेक्स घेऊन शेट काय करणार ? शेट, सदाचे दहा लाख त्या लोकांच्या खात्यात भरतो. त्यांचे चेक्स सोनाराला देऊन त्यांच्या नांवाच्या पावत्या करुन घेतो (अ‍ॅज इफ दे हॅव परचेसड द गोल्ड). थोडक्यात सदाच्या पैश्याचे (बाद नोटा) वॅलीड कागद होतात (सोनाराच्या पावत्या). आणि शेट सोनाराकडून ....दहा लाखाचं सोनं घेऊन टाकतो ! तर असा हा कांचनमृग ! मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर. पाच पॅनकार्डच्या झेरॉक्स आणि त्या लोकांचे चेक घेऊन ये’ दहा दिवसांनी शेटनी सदाला पॅनकार्डवाल्यांच्या नांवच्या सोनाराच्या पावत्या दिल्या. सदा पाहातच राहीला.... त्याच्या पैशाचे कागद झाले होते.... आणि शेटनी कचर्‍याचं सोनं केलं होतं!

In reply to by संजय क्षीरसागर

यशोधरा 27/03/2017 - 21:17
ओके, आभार उलगडल्याबद्दल. हा पंच बिगर फायनान्स वाल्यांना पोचणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी एकटीने निसंधिग्धपणे आवडली म्हणलंय.. काय म्हणावं ह्या योगाला?! =)) मी मतदान केलं असतं तर तुम्हाला नक्की मत दिलं असतं..

In reply to by पिलीयन रायडर

विचार विरोधी असले तरी ठाम असले तर कधी ना कधी एकवाक्यता होते ! १) विनयच्या कथेतील शेवटावर, स्त्रुजाचा हा प्रतिसाद दही सुद्धा लागायची मारामार असं झालं तर ! फार बोलका आहे. २) मकलेंची कथा `बॅड सफर्स बॅडली' स्टाईलची आहे. ३) जंगची कथा मला अजूनही कळली नाही. ४) भृशुंडी काय म्हणतात कुणाला कळलं असेल तर नक्की कळवा. ५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार) वरच्या मतांचा माझी कथा विजेती न ठरण्याशी सुतराम संबंध नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मृत्युन्जय 29/03/2017 - 14:43
चालायचच संक्षी. मला तर माझी कथाच सर्वोत्कृष्ट वाटली होती. पण वाचकांना त्यात काही राम दिसलेला दिसत नाही. वाचकांच्या मनोभूमिकेत १००% शिरुन लेखक लिहिता होउ शकला तर मग प्रत्येक लेखकाचे प्रत्येक पुस्तक / लेख सुपरहिट्ट ठरेल की.

In reply to by संजय क्षीरसागर

बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही मतदान का नाही केलंत ? एकूणातच अनेक स्पर्धकांनीही मतदान का नाही केलं हे जाणून घ्यायला आवडेल,

In reply to by मराठी कथालेखक

विनिता००२ 29/03/2017 - 16:40
कथा वाचली की लगेच मत देणे सोपे जाते. एकदा वाचून मग परत मतदानाच्या वेळी परत वाचणे होत नाही. आजकाल तेवढा वेळ मला वाटते, कोणाकडे नाहीये. माझ्यावरुन सांगतेय. वाचून प्रतिसाद दिले गेले. पण मतदानाच्या वेळी मार्चच्या कामात व्यस्त असल्याने परत उघडून वाचणे जमले नाही. मतदान राहून गेले.

सर्व वाचक आणि मतदात्यांना मनःपुर्वक धन्यवाद. इतर सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धेत चुरस आणि रंगत वाढवल्याबद्दल सहस्पर्धकांचे मनःपुर्वक आभार आणि सर्वात महत्वाचे, आयोजक व संपादक मंडळाचे आभार..लेखकाचे नाव उघड न करता कथा प्रसिद्ध करण्याचा निर्णय खूप योग्य होता. धन्यवाद.

अभ्या.. 26/03/2017 - 22:44
सर्वंच लेखकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन. अगदी अप्रतिम अशा कथा सर्वच नाहीत पण आगमी लेखनाबद्दल आशा बाळगाव्यात असे लेखक या स्पर्धेने मिळताहेत ही खूप छान गोष्ट आहे. कमीतकमी शब्दात एखादे कथासूत्र सादर करणे हे चॅलेंजिंगच, त्यातल्या त्यात मला आकाराने छोट्या पण आशयाने संपन्न कथा आवडतात. अशा कथा रेग्युलरली मिपावर येऊ लागल्या तर त्यापेक्षा भारी कै नै.

शब्दबम्बाळ 27/03/2017 - 09:42
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! जव्हेरगंज याचे लिखाण आवडत असले तरी ही शशक "मराठी" म्हणण्यासारखी नव्हती असे वाटले... जो कि स्पर्धेचा निकष असायला हवा होता..

अभ्या.. 29/03/2017 - 13:57
एक अपेक्षाय, कितीतरी नवीन लेखक दिसताहेत, काही गणमान्यही आहेत पण या सर्वांनी केवळ स्पर्धा आहे ह्यापेक्षा रेग्युलरली मिपावर शशकच नव्हे तर लघुकथा, दिर्घकथा, ललित अशा प्रकारचे लेखन चालू ठेवावे. दर आठ्वड्याची/महिन्याची कथा, कविता, शशक अशे गौरव मिपाप्रशासनाने दिले तर लेखकांना अजून प्रोत्साहन मिळेल असे वाटते. ह्यातल्या विजेत्यांच्या कलाकॄतींचे पण मिपापुस्तक बनवता येऊ शकते. शिवाय वाचकांना मेजवानी मिळत जाईल हे बोनसच.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन . वेगळ्या कथा वाचून आनंद मिळाला. माझ्या प्रतिक्रिया नंबरातील कथांवर पुढीलप्रमाणे १. हि कथा मी स्वतः एक सूक्ष्मजीवशास्त्र पदवीधर असल्यामुळे पटलेली नाही २. पंच आवडला . लाचप्रतिबंधक अधिकारी नि ८ कोटी विरोधाभास आवडला ३. जबरदस्त !!! वाचल्या क्षणीच कळले कि हि नंबरात येणार ४. विलक्षण कल्पकता !!!! त्या प्रकाश चित्रावर कथा लिहिणे फार कठीण होते. पर मान गाये !!!!! ५. कथा आवडली असे म्हणू शकत नाही कारण यात दाहक वास्तव होते. माझ्या कथेला कोणाची साथ (साथ)मिळाली नाही. असुदे. पुढच्या वेळी नंबरात यायचा प्रयत्न करू .

आनन्दा 03/02/2019 - 19:02
http://www.misalpav.com/node/38720 ही कथा यापूर्वी वाचलेय.. कदाचित शशक नसेल, पण कथावस्तू तीच होती.

In reply to by आनन्दा

ही कथा पुर्णतः माझीच आहे. स्पर्धेकरिता दिलेल्या चित्रावरुन उत्स्फुर्तपणे सुचलेली. योगायोगाने आणखी कुणाला सुचली असल्याची शक्यता नाकारत नाही तरी तुम्ही म्हणताय त्या कथेचा दुवा देवू शकता का ?

नमस्कार मिपाकरहो, 'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. यावर्षी स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी होता. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले गुणांकन ग्राह्य धरले आहे. आलेल्या गुणांकनातून प्रथम क्रमांक दिलेल्या कथांना ५ गुण दिले आहेत.

अमर - कथा

jp_pankaj ·
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला. ***************************************************************************************** .केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता. केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा. पयका बरा भेटायच पण केश्याची जिंदगी बापा भोवतीच फिरायची.

रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत ·

साधा मुलगा 05/08/2016 - 14:59
सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!! दुवा आणि लेखासाठी धन्यवाद ! यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे. कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते. google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.

In reply to by आदूबाळ

पाटीलभाऊ 05/08/2016 - 19:43
पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला. तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.

खेडूत 06/08/2016 - 17:09
उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले. आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा! साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच. याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत. भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.

साधा मुलगा 06/08/2016 - 21:34
दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा. हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले. तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:00
नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला. खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो. आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते. रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:37
दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा! हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली. अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

खेडूत 08/08/2016 - 12:17
दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय. तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं. नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले. दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला. आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!

नाखु 08/08/2016 - 11:50
संघाला शुभेच्छा... काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..

महासंग्राम 08/08/2016 - 15:22
ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:21
आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण. पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:38
अभिनव बिंद्रा ४ था आला. नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर. हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव. जलतरण butterfly event चालू आहे. रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 10:48
अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो. मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते. काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.

In reply to by साधा मुलगा

असंका 09/08/2016 - 13:39
बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली... शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.

In reply to by जेसीना

असंका 09/08/2016 - 18:13
नै हो... ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.

टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 23:50
हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा, बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 09/08/2016 - 21:19
त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.

साधा मुलगा 10/08/2016 - 00:02
प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता दीपिका 1.27 वाजता जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता 64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता

लालगरूड 10/08/2016 - 08:33
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या पराभवाचा ( संजय दुधाणे ) 10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली . अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते . त्याने धडाकेबाज कामगिरी करताच क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता. रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला . त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो सेनादलात साधा जवान असल्याने त्याला आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ , ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला. महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता माझी शेवटची इच्छा बनली आहे .

In reply to by लालगरूड

साधा मुलगा 10/08/2016 - 11:21
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

In reply to by लालगरूड

निओ 19/08/2016 - 22:49
रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

In reply to by निओ

बहुगुणी 19/08/2016 - 23:42
माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेडूत 10/08/2016 - 09:02
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

In reply to by खेडूत

चतुरंग 10/08/2016 - 10:35
आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा

In reply to by चतुरंग

नाखु 10/08/2016 - 11:17
आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

In reply to by चतुरंग

एस 10/08/2016 - 13:41
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

विखि 10/08/2016 - 21:59
गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

In reply to by चतुरंग

चतुरंग 11/08/2016 - 07:43
अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

खेडूत 11/08/2016 - 09:53
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.

In reply to by लालगरूड

थॉर माणूस 11/08/2016 - 20:30
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

In reply to by असंका

थॉर माणूस 11/08/2016 - 22:00
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺

रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.

सद्भावना - हराभरा भारत

वेल्लाभट ·

प्रीत-मोहर 21/06/2016 - 11:06
मस्त उपक्रम आहे. लाज वाटते अस काही करता येणं शक्य असुनही न करत अस्ल्याचा. पण सध्या तरी आम्ही घरात कसलाही कर्यक्रम झाल्यास रिटर्न गिफ्ट म्हणुन झाडे देणे हे सुरु केलेय. दरवर्षी घरी झाडे लावुन ती जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे. ( गोव्यात असुनही आमच्या भागात उन्हाळ्यात पाण्याचा फार त्रास होतो. इतर लोक्स आमच्या घरुन पाणी नेतात वगैरे. त्यामुळे..)

वेल्लाभट जी, एक सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. एन जी ओ वाले लोक सुद्धा माणसेच असतात. काहि एन जी ओ वाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असतील पण त्यामुळे तसा सरसकट शिक्का सर्व सेवाभावी संस्थांना लावणे उचित नव्हे!

In reply to by शान्तिप्रिय

वेल्लाभट 21/06/2016 - 15:40
बाय अँड लार्ज असंच दिसतं पण. माणूस वाईट आहे. माझा एक जुना सहकर्मचारी जो आता अतिशय उच्च पदावर कामाला आहे तो मला काही दिवसांपूर्वी विचारता झाला की ट्रस्ट फॉर्मेशन ची प्रक्रिया काय असते, किंवा काय काय लागतं इत्यादी. सविस्तर बोललो तेंव्हा त्याच्या तोंडून हे वाक्य आलं, की 'रिटायरमेंटके बादका प्लॅनिंग करना चाहिये ना! हा हा हा' आणि तोवर त्याने सांगितलेलं आम्ही यांव करू आम्ही त्यांव करू हे सगळं मातीमोल झालं. त्यामुळे वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींवरून केलेलं ते विधान आहे.

लोकसत्तामधे प्रकाशित झालेला माझा एक लेख इंग्रजीतही या व्यक्तीबद्दल लिहिलं आणि नुकतंच ते द बेटर इंडिया नावाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालं वृक्षसंवर्धनाचं कार्य करणार्‍या एका संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. तसं व्यापांमुळे फार योगदान देता येत नाही पण जी खरोखर मनोभावे हे काम करतायत, ज्यांनी हा वसा खर्‍या अर्थाने घेतलाय त्यांचा परिचय मात्र होतो.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१७: रस्ता: निकाल

साहित्य संपादक ·

इडली डोसा - झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल
चांदणे संदीप - खंडाळ्याच्या घाटासाठी
मोहन - तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट
जुइ - विमानातून दिसलेला महामार्ग
राजेंद्र मेहेंदळे - कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अ‍ॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो
अमलताश - ही वाट दूर जाते डॉ सुहास म्हात्रे -दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक
अजिंक्य विश्वास - झेड ब्रिजच्या रस्त्यावर
उल्का - ही वाट खोल जाते...
जव्हेरगंज - सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट
वेल्लाभट - 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे)
रोहन अजय संसारे - माझ्या गावातला एक रस्ता राजकुमार१२३४५६ - हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता

एस 01/05/2016 - 11:47
या स्पर्धेत फारच छान छायाचित्रे पहायला मिळाली. सर्वांचेच अभिनंदन आणि आभार!

अगदी योग्य छायाचित्रे निवडून आलेली आहेत! विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! या वेळी आगळीच धमाल उडवून दिलेली स्पर्धेबाहेरील छायाचित्रांनी. माझी प्रवेशिका देताना धाकधूक जरा जास्तच होती, वाटलं डिपॉझीटही जप्त होतंय का काय! पण ३ का ४ मतं मिळून डिपॉझिट वाचल्याचा आनंद आहे. ;) Sandy

माझ्या छायाचित्राला मते व अभिप्राय देणार्‍यांचे तसेच अभिनंदनाच्या शुभेच्छा देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या प्रोत्साहनामुळे नवनवीन प्रयोग करायला अन छायाचित्रणाशी संबंधीत गोष्टी शिकत राहायला स्फूर्ती मिळते. प्रथम व तृतीय क्रमांक मिळवणार्‍या अनुक्रमे समर्पक व आनंद फडके यांचेही अभिनंदन. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रवेशिका व अवांतर छायाचित्रे या दोन्ही प्रकारांमधून अनेक उत्कृष्ट चित्रांचा आस्वाद घेता आला त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. थोडंसं या छायाचित्राबाबत मिनेसोटातला वसंत ऋतू हा एकदम नेत्रसुखद असतो. बर्फाची चादर जाऊन महिन्या दीड महिन्यात सगळीकडे हिरवाई पसरते अन विविध रंगी फुलांनी झाडे बहरू लागतात. गेल्या वर्षी याच महिन्यात एका रस्त्याने जाताना हे ठिकाण दिसले. तेव्हा घाईत होतो म्हणून दुसर्‍या दिवशी ठरवून तिथे फोटो काढायला गेलो. तिथे पोचताच प्रवेशद्वाराच्या कमानीशेजारी (केवळ कमानच होती, द्वार नव्हतेच) Trespassers not allowed ही पाटी दिसली. ती जागा कुणाची तरी खाजगी मालमत्ता आहे हे कळले. मग प्रवेशद्वाराच्या बाहेरुनच एक-दीड मिनिटांत काही फोटो काढले अन त्यापैकीच हा एक. दुर्दैवाने तेव्हा आभाळ भरून आले होते. त्यामुळे मागाहून फोटोचा ब्राइटनेस वाढवावा लागला. पॉइंट ब्लँक यांच्या सूचनेनुसार यापुढे असे फोटो काढताना लो अँगल शॉट घेऊन पाहीन.

नाखु 02/05/2016 - 09:59
आणि मिपा "वाट"चाल अशीच हमरस्त्यांबरोबर पायवाटा , रानवाटाही,जंगलवाटासकट पादाक्रांत करो हीच शुभेच्छा!!!! वाटाड्या मिपावारकरी नाखु

नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना ६७व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला मतदानाद्वारे दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

अवघा महाराष्ट्र सैराटमय

प्रमोद देर्देकर ·

In reply to by प्रचेतस

आलेच !! कुठेही मराठी हिंदी चित्रपटांचा विषय निघाला की वल्ली सर "आम्ही फक्त ईंग्लिश चित्रपट पहातो" असा बॅनर घेवुन तिथे उभे रहायला आलेच म्हणुन समजा !! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणुनच एक दिवस एखादा इंग्लिश पिक्चर मी वल्ल्लीदांना बरोबर घेवुन बघणार आहे. पडद्यावर काय संवाद चालले आहेत ते लगेच भाषंतरीत कारायला सांगणार आहे. जल्ला आमाला ती भाषा कलतंच नै. वल्ल्लीदा याल ना.

In reply to by प्रमोद देर्देकर

सहमत ओ काका. साला इतके भराभरा उच्चार करतात. सगळंच नुडल्ससारखं एकमेकांत गुंतलेलं वाटतं. जल्ला काय कल्ला नाय होतं.

In reply to by विजय पुरोहित

प्रचेतस 28/04/2016 - 17:54
सोप्पंय. आजूबाजूच्या लोकांकडे नजर ठेवायची. ते हसले की आपणही हसायचं, त्यांनी शिट्ट्या मारल्या की आपणही मारायच्या. सगळा पिक्चर कळतो. बाकी हल्ली बऱ्याच थेटरांत इंग्रजी सबटायट्ल्स दाखवतात शिवाय हिंदी डबही असतोच. त्यामुळे कळायचा प्रश्न येत नै फारसा पण मूळ इंग्रजी भाषेतूनच बघणे उत्तम.

In reply to by प्रचेतस

नाखु 29/04/2016 - 10:12
शिणेमे "बघण्यासाठी" असत्यात डोयलॉक ऐकण्यासाठी नाही
अशे आमच्ये कालेज सिनेमा गुरु सांगीत असत याची आठवण झाली.. सब घोडे (सिनेमे) बारा टक्के वाला नाखु.

In reply to by प्रचेतस

स्पा 29/04/2016 - 08:21
वल्ली सरांशी शहमत, टुकार शॆराट पाण्यापेक्षा माझा लाडका कप्तान अम्रिका कधी एकदा येतोय असं झालय :D नागराज मंजुळे ने अता काहीतरी वेगळे करावे सेम विथ अजय अतुल तोच नाशिक ढोल, तोच ठेका, त्याचत्याच चाली असो

सतिश गावडे 28/04/2016 - 09:37
खुपच कौतुक ऐकलं होतं "झिंगाट" गाण्याचं. आता पाहीलं. काही विशेष वाटलं नाही.
तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
हिरोईनच नव्हे, आक्खं गाणं ढिगाने साउथचे पिक्चर पाहून बनवले आहे असे वाटते. :)

मला तरी व्यक्तिशः अतिशय आवडले झिंगाट हे गाणे. चित्रपट बघु या नंतर. पण आत्ता कायप्पा आणि चेपुवर जबरदस्त हाईप निर्माण करण्यात यशस्वी झालाय हा चित्रपट. सैराट गाणं पण अप्रतिम आहे.

In reply to by रघुनाथ.केरकर

हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?
याऐवजी, हे पुण्याला (पुण्यात नाहीयेत तरीही) पण झालं अस्तं नां? अस म्हटल असतं तर एक वेळ पुणेरी प्रतिसाद ठरून पुण्याच्या मानात तेवढीच भर तरी पडली असती. पण आता काय उपयोग, मुंबैच नाव घेऊन काय मजा नाय येत. ;) Sandy

वेल्लाभट 28/04/2016 - 11:11
गाणी सुंदर आहेत. झिंगाट ऐकताना 'रिगा डिंग डिंग साँग' (इंग्रजी) आणि याड लागलं ऐकताना ए आर चं प्रेमिका ने प्यारसे ची आठवण प्रकर्षाने आली. फूल माला... दो रुपय्या... तेरी ज़ुल्फ में सजा दूं फूल सा रुपय्या.... याड लागलं.... (अंतरा)

In reply to by वेल्लाभट

अभ्या.. 28/04/2016 - 17:29
प्रेमिकाने प्यारसे ची बीटस काय होती म्हाराजा. एकतर त्या नग्माला डान्स येत नाही त्यात सोबत कसाही वाकणारा आणी थिरकणारा प्रभुदेवा आणि एसपीआन्ना सुध्दा. अल्टीमेट कोरिओग्राफी. निदान त्या काळात तरी ती क्रांतीकारकच वाटली होती.

In reply to by अभ्या..

लिरिक्सपन क्रांतीकारकच आहेत. प्रेमिकाने प्यारसे जो भी दे दिया, तेरे वास्ते है नीलम जैसा. प्रेमिकाने प्यारसे जो भी छू लिया, तेरे वास्ते है सोने जैसा. प्रेमिकाको तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो. प्यारे के... संगीत में...अंहं मोहिनी...सुरागिनी..

In reply to by तुषार काळभोर

वेल्लाभट 29/04/2016 - 15:14
ते लिरिक्स बीट्स वगैरे ठीक आहे...ते भारीच होतं.वन ऑफ माय फेवरिट्स आहे हे गाणं. पण याचा अन याड लागलं चा अंतरा मागोमाग ऐका. लई कन्फूज व्हायला होतं.

अजया 28/04/2016 - 15:56
बघून मत बनवेन! आमच्या इथल्या हळदींमध्ये सध्या झिंगाट गाण्यावर नाचून झिंगाट फिरणारे सर्वत्र दिसत आहेत!

याडं लागलं गाणं मला तरी जोगवा / साऊथची गानी / रहमानची गाणी वगैरे सारखंच वाटतं. आपण नवीन काही ऐकतोय असं वाटत नाही. सेम विथ झिंगाट. ऐकायला गाणी चांगली असली तरी हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

गाण्यात फारस नाविन्य नाही हे खरय. आधी ऐकल्यासारखी वाटतात. हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत. माझही हेच मत होत. पण जेव्हा मी 'सैराट' मोठ्या पडद्यावर पहिला आणि गाणी अचानक आवडू लागली. आकाश कमालीचा गोड आणि निरागस दिसतोय तर रिंकू एकदम करारी आणि धीट. तांत्रिकदृष्ट्या व छायाचित्रण उत्तम.

वैभव जाधव 28/04/2016 - 16:28
प्रत्येक गणपती विसर्जनाला एक गाणं उचललं जातं. या वेळी झिंगाट असणार. बाकी चित्रपट आंतरजातीय प्रेमकथा व दुःखद शेवट असणारा असा आहे असे कुठल्याशा महोत्सवात चित्रपटाच्या प्रदर्शनांतरच्या प्रेक्षकांच्या मतानुसार आहे.

रमेश भिडे 28/04/2016 - 16:31
अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण... अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा.... काय अवस्था होते.... बापाची...भावाची बहिणीची ...आईची अन कुटूंबाची.. कल्पना करा.... त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा... अन मगच करा.... समर्थन सैराट चित्रपटाच. शाळा... टाईमपास... टाईमपास 2 , फैंड्री तून काय संस्कार करण्यात आले पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर... सुजाण पालकांनो... भानावर या. त्यातच सैराट आलाय... अल्पवयीनांच्या प्रेम प्रकरणांचे प्रतिनिधित्व करायला. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ? अहो... निर्मातेसाहेब... तुम्ही सामाजिक प्रबोधन करताय की समाजात शैक्षणीक प्रवाहात असणा-या कोवळ्या वयातील मुलांमध्ये बालवयातील प्रेमप्रकरणांची विकृती पसरवताय. ? या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय. ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको. सध्या सर्वत्र सैराटचे प्रमोशन पहायला मिळतेय... लक्षपुर्वक पहा... हे प्रमोशन यातील मुख्य भुमिका निभावणारे विद्यार्थी दशेतील मुलं पहा...त्यांचा प्रेमाचा खेळ पहा... शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी.. प्रेमप्रकरणाला प्रोत्साहन देणारे चित्रीकरण पहा.... असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...? महत्वाच.... राज्यात बालकामगार बंदी आहे. 14 वर्षाच्या आतील बालकामगार जिथे असतील तर तिथ कायदेशीर कारवाई करणेत येते ... मग या ठिकाणी सुट कशासाठी....? पालकांनो सजग रहा... आदर्श पालक व्हा.. (टिप : मी चित्रपटाविरोधी नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)

In reply to by रमेश भिडे

आदूबाळ 28/04/2016 - 17:27
अरे काय! प्रेमप्रकरणांची विकृती?? शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय?? या/अशा सिनेमामुळे?? शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी?
असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?
नक्कीच समर्थन करेन. असल्या वयातली प्रेमप्रकरणं माझ्या आईवडिलांनी "खपवून" घेतली. मग माझ्या अपत्यांना हे नाकारण्याचा कोणता नैतिक अधिकार माझ्याकडे उरतो? -------- कमॉन काका, गेट अ लाईफ! अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन.

In reply to by आदूबाळ

चौथा कोनाडा 28/04/2016 - 20:49
अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन. 103.5 % सहमत. अश्या भाबडेपणा बद्दल काय बोलावे समजत नाही. (हेच किंवा असेच पत्र कायप्पावर फिरतेय. हे जर रभि साहेबानी लिहिले असेल तर भारी म्हणायला पाहिजे. ) सिनेमाच प्रतिबिंब समाजात पडते का समाजचे प्रतिबिंब सिनेमात पडते ? नेहमीचाच एव्हरग्रीन विषय !

In reply to by रमेश भिडे

भिडे साहेब खरंय तुमचं. हल्ली हे मार्केट मधे खपतंय म्हणून विकलं जातंय. ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको. हज्जारदा सहमत. ऐकायला मिळाली नव्हे आत्ता सुधा मिळत आहेत. पूर्वी प्रमाणे अत्याचाराचा वगैरे प्रकार नाही स्वखुषीने पण परिणामाची जाण नसल्यामुळे हे प्रकार होत असतात. बाकी समाज सध्या याच स्वप्निल नशेत आहे की आपण किती पुढे गेलो आहोत वगैरे वगैरे. दुष्परिणाम दिसतील तेव्हा नशा उतरेल. तोवर तुम्हाला वेडे ठरवले जाईल, मोठे व्हा सांगितले जाईल पण ठीके योग्य तेच बाजारात विकलं जातं असं नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बबन ताम्बे 28/04/2016 - 18:16
पोरं पोरी कॉलेजमधे लेक्चरला सुद्धा बसायला मागत नाहीत. नापास झाले तरी त्यांना आता काही वाटेनासे झालेय.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 28/04/2016 - 23:00
शिक्षणाच्या "परिक्षार्थी " पॅटर्नचा परिणाम. पालक लाखो रु खर्च करुन खासगी क्लासेस मध्ये घालतात, मग कश्याला पाहिजे कॉलेजात वर्गात बसायला? मार्क्स पडल्याशी कारण. ज्याला शिक्षणात / करियर मध्ये रस नाही त्याना काय घेणे आहे pपास नापास शी. पालक पैसे देतायतना, मग करा टाईमपास. या असल्या पार्श्वभुमी वर गरिब, झोपडपट्टीतले, kकष्टकरयांची मुले चमकुन जातात याचे कौतुक वाटते.

In reply to by बबन ताम्बे

काळा पहाड 29/04/2016 - 22:21
आणि नंतर जिथं काम नसेल अशी 'नौकरी' पण हवी असते. ती नाही मिळाल्यावर 'हेच काय अच्चे दिन' असं बोंबलायचं पण असतं.

In reply to by काळा पहाड

तर्राट जोकर 29/04/2016 - 22:30
पहिल्या वाक्याशी सहमत, दुसर्‍या वाक्यात थोडासा बदल : 'मागच्या साठ वर्षात काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं'

In reply to by रमेश भिडे

महासंग्राम 28/04/2016 - 18:22
हे तुमचं मत आहे कि काय अप्पा वर आलेलं संदेश चीटकवला आहे ते तरी कळू दे प्रेमाला वयाच बंधन घालणारे आपण कोण ??? देवाने प्रेमलीला केलेल्या चालतात मग सामन्या माणसाचे वावडे का अजून एक प्रश्न .
शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात.
सैराट मध्ये हे दाखवलं आहे का ?? अर्थात तुम्ही पाहिला आहे का हा सवाल आहेच

In reply to by रमेश भिडे

त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा... - तीच अल्पवयीन मुलगी प्रेमात पडते तेव्हा तिच्या पण मनाची काही किंमत असते , तिला काय वाटत असेल ? तिच्या भावनांचं काय ? या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय. - 'गुरु ' बघून किती जन 'अंबानी ' झाले ? अन 'हम साथ साथ है ' बघून किती घर एकत्र आली ? - चित्रपटाचा समाजावर परिणाम हा ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे ! असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? -TV सेरिअल वर दाखवली जाणारी लग्नाअगोदरचे किंवा लग्नानंतरची अफेअर्स सगळेजन घरात एकत्र बघत असतात तेव्हा किंवा 'बेबी डॉल मै सोने की ' हे गाण एकत्र बघताना असा विचार केला का की आपल्या घरातील मुलांनी अस नाचल तर चालेल का ? लॉजिक बिलकुल पटल नाही पालकांनो सजग रहा... आदर्श पालक व्हा.. -आदर्श , सुजाण पालक आपल्या पाल्याशी मैत्री करेल , त्याला /तीला समजून घेईल . (टिप : मी प्रतिसादाच्या विरोधात नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)

In reply to by रमेश भिडे

'सैराट' प्रदर्शित होण्याच्या आठवडा अगोदर पासून हा मेसेज whatsapp वर फिरतोय. आपल्याकडे यापूर्वी आलेले चित्रपट आणि मालिका काय दाखवतात. मग सैराटला इतका विरोध का? सगळ विसरून अगदी त्यात दाखवलेला 'जातीभेद' वै पण विसरून आपल्या मायमराठीतली एक चांगली कलाकृती म्हणून त्याचा आनंद आपण नाही घेवू शकत का?

In reply to by पूर्वाविवेक

बोका-ए-आझम 02/05/2016 - 16:47
मास्तर बिघडतील म्हणून पिंजरा ला विरोध का नाही केला? - कायप्पावरील एक संदेश. याच्याशी कचकून सहमत!

In reply to by रमेश भिडे

'सैराट' प्रदर्शित होण्याच्या आठवडा अगोदर पासून रमेश भिड्यांची हि प्रतिक्रिया whatsapp वर फिरतेय. आपल्याकडे यापूर्वी आलेले चित्रपट आणि मालिका काय दाखवतात. मग सैराटला इतका विरोध का? सगळ विसरून अगदी त्यात दाखवलेला 'जातीभेद' वै पण विसरून आपल्या मायमराठीतली एक चांगली कलाकृती म्हणून त्याचा आनंद आपण नाही घेवू शकत का?

विटेकर 28/04/2016 - 18:05
रमेश भिडे याण्च्याशी सहमत ! ज्याण्च्या घरात वयात आलेली पोर आहे , त्याला हे दु:ख बरोब्बर कळेल.

याड लागलं मधील दुसर्या आणि तिसर्या अंतर्यात अजयने जो आवाज लावला आहे तो लाजवाब आहे,सैराट झालं जी मध्ये पण छान आवाज लागला आहे.बाकी कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णी यांच्या टुकात चाली असणार्या गाण्यांना प्रमाण संगीत मानणार्यांच्या पोटात सैराटमुळे पोटदुखी झालीए यात काही आश्चर्य नाही वाटले.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

असं काही नसावं चंनी साहेब... पण तुम्ही रसिकतेने सैराट ऐकताय याचा आनंद आहे. जियो नागराज आणि अतुल अजय...

In reply to by विजय पुरोहित

बाकी कालपासून मी हेडफोन लावून सतत झिंगाट हे एकच गाणं ऐकतोय. रेवतीतै म्हणताहेत तसं खरंच अगदी झिंग आणणारं गाणं आहे यात दुमत नाही. मी तेच अनुभवतोय.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

रेवती 28/04/2016 - 19:54
कौशलच्या चाली आवडतात. गुप्तेच्या आवडण्याचा प्रश्नच येत नाही, सलीलच्या बर्‍या असतील पण मी त्याची फ्यान नाही पण म्हणून त्या टुकार आहेत असं तुम्हाला वाटतय. मलाही सैराट गाणं आवडलं पण अजय अतुल जशा जीव गुंगला, रंगला सारख्या सुरेख चाली देतात तसा ते अशक्य गोंगाटही करतात यावर दुमत नसावे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

काळा पहाड 29/04/2016 - 23:04
कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णी
हा बहुजन-बहुजनेतर चित्रपट नाहीये मुल्हेरकर साहेब. मराठा विरुद्ध दुसरी कुठली तरी जात (कोणती ते माहिती नाही) असा संघर्ष आहे. तुम्ही नावं चुकीची.. बहुजनेतर निवडलीयत. तुमच्या गटानुसार विरुद्ध पार्टीची नावं निवडा पाहू.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बोका-ए-आझम 02/05/2016 - 16:52
तरी बाकीचे संगीतकार टुकार संगीत देतात असं मानायचं काहीही कारण नाही. अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच. अजय-अतुल एवढं सातत्य बाकीच्यांनी दाखवलं नाहीये हे मान्य पण म्हणजे ते टुकार आहेत असं अजिबात नाही.

In reply to by बोका-ए-आझम

टवाळ कार्टा 02/05/2016 - 18:39
अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच.
याबद्दल कच्चकून निषेध

रेवती 28/04/2016 - 19:51
इतका बोलबाला झाल्यावर ते गाणं पाहिलं. नाच हा झिंग आणणारा असला तरी असे नाच बर्‍याच शिनेमांमध्ये आधीही झालेत. फ्यान्ड्री पाहिला नसल्याने हाही पाहीन की नाही माहित नाही. ती मुलगी वयानं लहान आहे. फारच गोड्ड आहे व मला आवडली. तिचे डोळे बोलके आहेत, खरच गोड मुलगी. त्यातील मुलगा हा पैलवान होता म्हणे! तोही चांगला आहे. यावर परिक्षण येईल ते वाचीन.

तर्राट जोकर 28/04/2016 - 20:02
[खोचक मोड ऑन] हे काय संगित म्हणायचे काय? कुणीतरी गातंय, कुणीतरी काहीतरी वाजवतंय, असं आधीही होऊन गेलंय, काही नवीन नाही. कुणीही काहीही गाण्याबजावण्याशिवाय संगित दिलं तर म्हणेन की काहीतरी नवीन आणलंय, क्रिएटीव्हिटी आहे. गाण्यासारखं गाणं , उगाच डोक्यावर घेतात लोक. [खोचक मोड ऑफ]

आनन्दा 28/04/2016 - 20:40
तसे काही रेव्होलुशनरी वाटले नाही. झिंगाट् चांगले वाटले, तेही एक विशिष्ट मूड असेल तरच. बाकी गाणी फारशी आवडली नाहीत. कदाचित ओव्हरहाईप झाल्यामुळे असेल. बाकी - भाषा वगैरे मराठवाड्याची बोलीभाषा असल्यामुळे तिकडच्या लोकांना हे जास्त रिलेट करता येईल, त्यामुळे त्यांना जास्त आवडेल हे समजू शकतो. पिक्चर बद्दल बोलायचे झाले तर एकंदरच हा थोडासा हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांकडे झुकणारा वाटला. अर्थात पुन्हा जनरल मराठवाड्यावर असलेला तेलगू चित्रपटांचा प्रभाव पाहता यात देखील फारसे आश्चर्य वाटले नाही. पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.

In reply to by आनन्दा

अस्वस्थामा 28/04/2016 - 21:34
नै बाकी ठिकय. फक्त ती भाषा सोलापूर, करमाळा या बाजूची आहे. मराठवाडा अजून पल्याड राहिला हो.
पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.
पण त्याहीपेक्षा एकंदरीतच so called "ग्रामीण" मराठी चित्रपटांचा सातारा-सांगलीच्या पलिकडे (म्हंजे पूर्वेकडे) होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा. तसे पुण्या-मुंबईच्या लोकांना सगळे "ग्रामीण" सारखेच म्हणा. (आमची मुंबईच्या हापिसातली मुंबईकरीण पुणेकरास तो पुण्याला जात असताना "गावी चाललास काय?" असे विचारायची ते आठवलं.. ;) )

गाणी जबरा आहेतच,सिनेमाही असणारच, अजय-अतुल म्हणजे शेवटच.गाणी गावटी आहेतच पण त्यामध्ये एक वेगळी नशा आहे,ती गावटी लोकांनाच जाणवेल. ग्रामीण जीवन जगलेल्यांना/जगत असणार्यांना सिनेमा आवडेल. बाकि नागराजचे सिनेमे वास्तववादी असतात, एखाद्या सामान्या माणसाला उचलून एका दिवसात हिरो बनवण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात. मोठ्या कलाकारांशिवायही चित्रपट दर्जेदार बनू शकतो हे त्याने दाखवून दिलयं. शहरी राहणीमान असणार्यांना फारसा आवडणार नाही. . . ---( गावटी )

In reply to by प्रदीप साळुंखे

साळुखे साहेब अगदी बरोबर ,आम्हा ग्रामिण आणि शेतकरी लोकांना असे चित्रपट चांगले रिलेट करता येतात.

मस्त गाणी!!! जाम आवडली, "सैराट झालं जी" एक नंबरच!! बाकि, महाराष्ट्र म्हणजे पुणे,मुंबई अशी मानसिकता असणार्यांना काय ढेकळं समजणार नाही पिक्चरमधलं. ▼ ▼ ▼एका आर्चीचा परश्या

तर्राट जोकर 28/04/2016 - 22:17
पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...होणारे संस्कार हे फॅन्ड्री, टाइमपास, शाळा अशा चित्रपटांतून होतात असं मानणार्‍या पालकांना माझा साष्टांग नमस्कार. दंडवत. तुमचे चरणकमलांचे फोटो जरा मला पाठवा. द्येव्हार्‍यात ठेवीन म्हणतो. तुम्ही (काळजीवाटणार्‍या पालकांना उद्देशून) बालकपालक चित्रपट बघितला काय हो? बघितला असेल तर तुम्ही त्यातून काहीच शिकले नाही असे वाटते. नसेल तर बघून घ्या. पौगंडावस्थेतली पोरं काय काय करतात हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला खरंच जागं आणि मुख्य म्हणजे प्रगल्भ होण्याची गरज आहे. जेव्हा मी दहावीला होतो, अंदाजे १९९५ चा काळ, तेव्हा माझ्या शाळेतली सहावीतली मुलं-मुली एकमेकांना चिठ्ठ्या देत होती हे सोताच्या डोल्यानं बघितल्याव. वीस वर्ष झाली त्याला. तेव्हा कुठे फॅन्ड्री टाइमपास, शाळा होते? तेव्हा तर अधेड उम्रके बेटे, पुलिस इनिस्पेक्टर, बडे बापकी बेटीला पटवत होते, झाडांमधून घिरट्या घालत कवायती करत होते. दोन फुलांना टेकवून सुचित करायच्या हरकती सरेआम पडद्यावर तेही चायागित्त, रंगोली, चित्रहार मधून घरोघरी दिसत होत्या. प्रेमाचं प्रदर्शन आणि शारिरीक संबंधाचे चाळे दाखवणारे चित्रपट तर आठवड्यातून तीनदा दूरदर्शन नामे लोकजागरासाठी वाहलेल्या च्यानलवर लागत होते. ज्या गोष्टींचे उदात्तीकरण केले जाते त्या अनुकरण करु पाहण्याचा पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. फॅण्ड्रीत एका शॉटमधे हे उत्तम दाखवलंय. जब्या कपड्यांच्या दुकानाबाहेर उभा असतो. तिथल्या मोठ्या पोस्टरवरच्या मॉडेलकडे बघुन स्वतःला तसं बघतो असं दाखवलंय. मुलांमधे हे कुठून येतं हे आपल्या आजूबाजूला इतकं ढळढळीत चालू असतांना त्याच गोष्टी टिपणार्‍या चित्रपटांना दोष देणे हास्यास्पद आहे. हे म्हणजे बलात्काराच्या बातम्या वृत्तपत्रात येतात म्हणून बलात्कार करण्याची प्रेरणा मिळते व असे प्रकार वाढतात असे म्हणणे आहे. संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.

In reply to by तर्राट जोकर

पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. हेच्च म्हणतो.काही अडल्ट कंटेट वगैरे बघून परिणाम होत असेल थोडाफार पण तो क्षणिक असतो.
संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.
व्हयं!!!! ते अणि काय वो???

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

तर्राट जोकर 28/04/2016 - 23:20
हे राम. हे अ‍ॅडल्ट कन्टेन्टबद्दल आहे असे का वाटलं तुम्हास्नी. भारतीय हिंदी चित्रपटांमधे प्रेमकहान्या एक मोठा पार्ट व्यापुन आहेत. प्रेमकहान्या हळुवारपणे फुलतात, दोघे जीव एकेमेकांसाठी जान की बाजी लावतात, एकमेकांसाठी अलम दुनियेला ठुकारावुन लावतात. पौगंडावस्थेतल्या कावर्‍याबावर्‍या असलेल्या, आपली ओळख, अस्तित्व वेगळं आहे असे जाणवू लागलेल्या पोरांना त्यांचे संसाराच्या कोलूत खंतावलेले आईबाप समजून घेउ शकत नाहीत, ते त्याला/तीला अजूनही कुक्कूलं बाळ समजून त्यांना पाहिजे तसं वागवायला बघतात, अशावेळेस फक्त त्याला/तीलाच महत्त्व देणारं, तिच्या/त्याच्या भोवती आपलं जग विणणारं, तो/ती म्हणेल तसं वागणारं, खास आपल्यासाठी जगणारं, आपलंच स्वप्नं बघणारं कोणी भेटलं तर हवंच असतं. पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.

In reply to by तर्राट जोकर

I know हे अडल्ट कंटेंट नाहीये, माझा रोख दुसरीकडेच आहे कि अडल्ट कंटेट पाहिल्यावर त्याचा परिणाम हा क्षणिक असतो,म्हणजे त्याचमुळे माणूस बलात्कारी बनतो अशी धारणा चुकीचे आहे.मी थोडं अवांतर केलं होतं.

In reply to by तर्राट जोकर

राजाभाउ 29/04/2016 - 11:02
तजो तुमच्या वरील प्रतीसादाला १००% सहमत अस लिहीणार होतो, पण या प्रतीसादाला १०००% सहमत. म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पालकानी कसे वागु नये याचा एका अर्थी वस्तुपाठच आहे वरील प्रतीसाद.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 03/05/2016 - 01:24
पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.
का चुकीचं? आणि मुळात लैंगिकता हे आणि हेच कारण आहे. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं यात काहीच चुकीचं नाहीये. अर्थात लोक जेव्हा प्रत्यक्ष आणि कथा यांच्यातली सीमारेषा विसरतात, तेव्हा गोष्ट गंभीर होते हे खरं आहे. आईवडिलांनी आणि मित्रांनी तेच काम करायला पाहिजे. जमिनीवर आणण्याचं.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 03/05/2016 - 02:14
सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी त्या लैंगिक आहेत हे त्यावेळी मनाला माहित नसतं. 'त्यांच्या मुळाशी लैंगिकता आहे' हे विधान तात्विक चर्चेत, विद्वानांच्या सभेत, वैद्यकिय प्रबंधांत योग्य आणि सत्य आहे पण हे किशोरावस्थेतल्या मुला-मुलीला वळत नसतं. ते न उमगणं समजून घ्यावं असं माझं म्हणणं आहे. 'एखाद्या मुलीचा एखाद्या मुलावर क्रश आहे आणि तीने त्या मुलाचा कुठेतरी पडलेला रुमाल आपल्याजवळ खाजगीत गुप्तपणे लपवून ठेवला' ह्या कृतीला आपण 'तीला त्याच्यासोबत ***चेच होते म्हणून तीने असे केले' इतक्या टोकाला नाही नेऊ शकत. काही टप्पे (अर्थात माझे निरिक्षण: सॅम्पल गृप बराच मोठा आहे पण आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे शास्त्रिय आधार नाही) पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींना तर आपल्याला एखादं माणूस आवडतंय हेही कळत नसतं, नुसतं ओढलं जाणं, विचारांमधे गुंतत जाणं, भान हरपणं, हे सगळं आतलं, एकतर्फी, एकटं. ती व्यक्ती गृपमधे, ओळखीत असेल तर नकळत तीला आवडेल असे वागणे, तीची काळजी घेणे, तीच्यासाठी खस्ता खाणे, उपद्व्याप करणे, मदत करणे, स्वतःला व स्वतःचे महत्त्वाचे उद्योग विसरुन तीच्यामागे राहणे हे जरा प्रकट, तरीही अनभिज्ञ. पुरेसं प्रकट त्या व्यक्तीच्या दर्शनाविना कळवळून जाणं, असुरक्षित वाटणं, ती सतत जवळ असावी असं वाटणं, त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणं आणी ते करणंही, ह्यात प्रत्यक्ष तसं व्यक्त करायची गरज भासते. मुलं-मुली प्रेमाची कबूली देतात. एकदा रितसर दोन्हीकडून कबूली झाल्यावर सहवास वाढतो, विश्वास, जवळीक वाढते, अजून अजून जवळ येण्याची तृष्णा वाढते, लैंगिकता ह्या टप्प्यावर जाणवू लागते, आणि ती पुढे चटकन मूर्त रुप घेऊ शकते. लैंगिकता हा एक क्षीण आवेग आहे, अनेक रुपं, पुटं चढवून तो येतो. जसजसा जवळ येतो तशी पुटं गळून पडतात आणि मूळ रुपात भिडतो. आवेग ओसरुन गेल्यावरही ती अधिरता, तो विश्वास, ते प्रेम, ती आपुलकी तशीच राहत असेल तर पुढे संगोपनास आवश्यक ठरते. आईवडिल आणि मित्रांनी जमिनीवर आणायचे म्हणजे काय आणि कसे ते समजले नाही. उपयोग नसतो असा अनुभव आहे. मुळात अशा काही गोष्टी उपटूच नये म्हणून पालकांनी खूप जागरूक (मुलांचे मित्र बनणे इ.) राहावं लागतं आणि ते पालकांना ज म त नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. कारण मुलांचे मित्र बनण्याच्या ऐवजी अनेक महत्त्वाच्या भूमिका चाळीशी-पन्नाशीतल्या पालकांना पार पाडाव्या लागतात. मुलांना काही शिक्षण देण्याअगोदर पालकांना पालक व्हायचे शिक्षण दिले पाहीजे या मतावर मी येऊन पोचलोय. असो. अर्थात काही मुलं आजकाल हे वरचे टप्प्यांच्या फंदात पडत नाहीत असेही निरिक्षण आहे. आजकाल 'फ्रेण्शिप देती का', 'लवशिव देती का' किंवा नुसतंच 'देती का' ह्या तीन प्रश्नाचे टप्पे राहिले आहेत. ठळकपणे आढळत असेल तरी हेही सार्वत्रिक नाही हेही तितकेच खरे.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 03/05/2016 - 10:15
पालकांना पालक होण्याचं शिक्षण दिलं पाहिजे याच्याशी १००% सहमत. तसं दुर्दैवाने होत नाही. खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) त्यामुळे या पिढीतल्या लोकांनी आपल्या मुलांबरोबर मित्रत्वाचं नातं निर्माण करायला हरकत नाही. पण त्यासाठी खास प्रयत्न केले जाताहेत का हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. मी त्याच्याकडे ब-याच व्यापक दृष्टीने बघतो. शारीरिक आकर्षण हा मुद्दा आहेच पण या अवस्थेत मुलांना त्यांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम भिन्नलिंगी व्यक्तीवर कसा होतोय हेही बघायचं असतं (gratification). त्यांची स्व-प्रतिमा आणि स्व-मूल्य (self-image and self-esteem) या भिन्नलिंगी प्रतिसादांवर अवलंबून असतात. हाही लैंगिकतेचाच एक भाग आहे.

In reply to by बोका-ए-आझम

पौगंडावस्थेतील जाणीवा ह्या लैंगिकच असतात पण तेवढं कळण्याइतकी परिपक्वता त्या वयात नसते. पण आजकाल ती परिपक्वता इंटरनेटमुळे यायला लागली आहे. पौगंडवस्था म्हणजे नेमकं किती वय? याचं संशोधन करून नव्याने त्याची परिभाषा याकाळात ठरवायला हवी.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 04/05/2016 - 10:56
खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) >> तुमचा अंदाज शंभर टक्के योग्य आहे. त्या पिढीच्या पौगंडावस्थेच्या भोवतालात आणि आज ९५ नंतर जन्मलेल्यांच्या भोवतालात भयंकर फरक आहे. तेव्हा आपली पिढी (३५-४५) शाळा व घर इतक्याच परिघात होती. आपला वेळ घरच्यांशी बोलण्यात, कामे करण्यात, खेळण्यात, अभ्यासात जात असे. संपर्काचे साधने कमी असल्याने, आजसारखे इण्टरनेट-मोबाईलने सगळं जग उघडं पडलेलं नव्हतं. शाळा-क्लासेसमुळे फक्त झोपायला जेवायला घरी असा प्रकार नव्हता. आज वातावरण खुप बदललेलं आहे. मुलं ज्यापद्धतीने व वेगाने जगाला एक्पोज होतायत तेव्हा इथून पुढे आईवडिलांचं कठिण आहे असे जाणवतंय. तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. >> लैंगिकता ही मी पौगंडावस्थेतल्या मुलांच्या दृष्टिकोनातून बघत आहे. तुम्ही दिलेलं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण मान्यच आहे पण हे कोवळ्या, अनभिज्ञ जीवांना कळत नाही हा माझा मुद्दा आहे.

नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय.

मिपा विडंबन स्पर्धा - निकाल

साहित्य संपादक ·

पैसा 28/03/2016 - 16:15
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! सर्वांनाच विनंती की आपआपल्या विडंबन कवितांचे स्वतंत्र धागे टाका म्हणजे प्रत्येकाचा स्वतंत्र आस्वाद घेतायेईल.

खेडूत 28/03/2016 - 16:17
अरे वा! सर्व विजेत्यांचे अभिनंदन! सहभागी कवींचे कौतुक. विडंबन करणे महाकठीण काम. तीनही प्रकारांत नंबर काढल्याबद्दल बहुगुणी यांचे विशेष अभिनंदन! दोन प्रकारांत निवड झाल्याबद्दल पैजार बुवांचे खास अभिनंदन..

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 29/03/2016 - 10:43
विडंबन महाकठीण काम. त्यातून नंबरात यायचे म्हणजे खाऊ नव्हे. तस्मात सर्व स्पर्धकांना कॉम्प्लिमेंट्स आणि विजेत्यांचे अभिनंदन !

एस 28/03/2016 - 16:17
मी न केलेल्या विडंबनाला न मिळालेल्या पारितोषिकाबद्दल स्वतःचे नभिनंदन नरून नेतो. ;-) झक्कास झाली स्पर्धा. विडंबने दर्जेदार आणि खळखळून हसविणारी होती. क्या बात है! सर्वांचे अभिनंदन आणि जोरदार टाळ्या.

नाखु 28/03/2016 - 16:22
जोरदार अभिनंदन आणि सर्वांना टाळ्या. नाखु विडंबन वाला

पैजारबुवा.... ___/\___ बहुगुणी सर(आप भी?!!) ___/\___ नीलमोहर - प्रेम कर प्रेम कर हरणीसारखं... हम्म... लक्षात आलेलं लगेच! ;) स्वामीजी.... गुड वन! आनंद मोरे.... मल्ल्या रडतोय बघा वाचून! :) सर्वांचे अभिनंदन आणि मिपाचे आभार! मजा आली....अजून नव्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत! Sandy

बहुगुणी 28/03/2016 - 20:53
आता मिपावरील हौशी गायक-गायिकांनी सर्वच विडंबने मूळ सुरावटीत गाऊन प्रकाशित करावीत म्हणजे आणखी धमाल येईल!

यशोधरा 29/03/2016 - 07:50
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! मजा आली विडंबने वाचायला :)

मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली. आणि तिच्यात रंग भरण्याचं काम स्पर्धकांनी जितकं चोख केलं, तितकंच मतदात्यांनीही केलं. प्रेम, राजकारण, फजिती अशा तीनही विषयांच्या प्रवेशिकांना भरपूर मतदान झालं. वाचकांनी त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. बुरा ना मानो होली है! ही उक्ती सार्थ ठरवत अवघ्या मिपाविश्वाने या सगळ्याची मजा लुटली. आता शेवटचा टप्पा; निकालाचा. प्रत्येक विषयाचे अग्रणी तीन क्रमांक इथे जाहीर करत आहोत.

एक हवीहवीशी शाळा

वेल्लाभट ·

क्या बात है. मस्त ओऴख. वरे सरांचा मोबाईल नंबर द्या. कौतुक करु या. सर पण मस्त प्रसन्न आणि खुश दिसताहेत. जिप शाळेतील शिक्षक फार कमी प्रसन्न दिसतात. दिलीप बिरुटे

नाखु 10/03/2016 - 18:34
आणि अनेकानेक शुभेच्छा !!! वेल्ला धन्यवाद आणि इथे भेट द्यायलाच हवी असे ठिकाण !!!

एस 10/03/2016 - 21:07
कौतुकास्पद! पालकांकडून खंडीभर पैसे उकळणार्‍या खासगी शाळांमध्येतरी असं होतं असेल का असा प्रश्न पडला. शिक्रापूर बाजूला गेलो तर वाबळेवाडीला नक्कीच भेट देईन. तुमचे आभार या माहितीबद्दल.

अगम्य 10/03/2016 - 22:57
मिपावर कोणी असे लोक आहेत का ज्यांच्या टीव्ही चानेल वर ओळखी आहेत? ह्या शाळेवर खरे तर national TV वर छोटीशी story होऊ शकेल.

खूपच महत्वाचा विषय अन अत्यंत स्पृहणीय कार्य. शिक्षण त्यातही शालेय शिक्षण हा खूपच महत्वाचा विषय आहे. वरे सर व त्यांचे शिक्षक सहकारी व त्यांना साथ देणारे वाबळेवाडीचे ग्रामस्थ यांना मनःपूर्वक धन्यवाद. अशा उपक्रमांची संख्या वाढत राहो.

In reply to by मधुरा देशपांडे

इडली डोसा 12/03/2016 - 09:20
__/\__ धन्यवाद शेअर केल्याबद्दल. खूप छान माहिती .

अजया 16/03/2016 - 11:41
_/\_ प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.आमच्याही गावाच्या जवळ छोट्या छोट्या गावात शाळा आहेत.मदतीसकट ही बातमी तिथे नक्की पोचवु शकेन.

वेल्लाभट 16/03/2016 - 14:23
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल अनेक आभार. हे खरोखर एक उदाहरण आहे व मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे वरे सरांना भेटण्याची माझी इच्छा व प्रयत्न आहे. मी सगळ्या प्रतिसादकांच्या सदिच्छा त्यांच्यापर्यंत पोचवेन. सद्ध्या मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण या विषयासंदर्भात कार्य करणा-या व्यक्तींशी त्याच निमित्ताने संपर्कात असताना समोर आलेलं या शाळेचं उदाहरण म्हणजे फारच प्रेरणा देणारं आहे आमच्यासाठी. पुनःश्च आभार.

चिगो 16/03/2016 - 16:49
अत्यंत प्रेरक, स्तुत्य प्रयत्न.. वरे स, त्यांचे सहकारी आणि गावकर्‍यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहेत..

वेल्लाभट 11/04/2016 - 16:20
वाबळेवाडीस भेट देण्यात आलेली आहे. वृत्तांत आज उद्यात टाकेन. तोपर्यंत पत्ता, संपर्क इत्यादी माहिती आता इतक्यातच सुरू झालेल्या या शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.zpschoolwablewadi.org

स्तुत्य उपक्रम. वरे सर हाडाचे शिक्षक असणार. शिक्षणाच्या बाजारामधे असे लोकं दुर्मिळ असतात. फक्तं आता हे घाणेरड्या व्यवस्थेचा बळी ठरु नयेत हि माफक अपेक्षा आणि देवाकडे प्रार्थना.

शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल. पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती.