✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अवघा महाराष्ट्र सैराटमय

प
प्रमोद देर्देकर यांनी
गुरुवार, 04/28/2016 - 09:27  ·  लेख
लेख
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत. अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल. कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात. अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन
आस्वाद
बातमी

प्रतिक्रिया द्या
66868 वाचन

💬 प्रतिसाद (231)

प्रतिक्रिया

मी तर क्याप्टन अमेरिका

प्रचेतस
गुरुवार, 04/28/2016 - 09:32 नवीन
मी तर क्याप्टन अमेरिका सिव्हिल वॉरमय झालोय. ६ मे ची वाट बघणे आले.
  • Log in or register to post comments

+1 civil war ची वाट बघतोय.

जेपी
गुरुवार, 04/28/2016 - 09:36 नवीन
+1 civil war ची वाट बघतोय. बाकी सैराट ची हिरोईन या वर्षी दहावीत जाईल हे कळालय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी पण

नया है वह
गुरुवार, 04/28/2016 - 16:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आलेच !!

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/28/2016 - 16:15 नवीन
आलेच !! कुठेही मराठी हिंदी चित्रपटांचा विषय निघाला की वल्ली सर "आम्ही फक्त ईंग्लिश चित्रपट पहातो" असा बॅनर घेवुन तिथे उभे रहायला आलेच म्हणुन समजा !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण काही म्हणा! 'झिंगाट'ने

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 16:18 नवीन
पण काही म्हणा! 'झिंगाट'ने सध्या धमाल उडवून दिलीय खरी! कुणी काही म्हणो. आपल्याला तर आवडले गाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

म्हणुनच एक दिवस एखादा इंग्लिश

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/28/2016 - 16:28 नवीन
म्हणुनच एक दिवस एखादा इंग्लिश पिक्चर मी वल्ल्लीदांना बरोबर घेवुन बघणार आहे. पडद्यावर काय संवाद चालले आहेत ते लगेच भाषंतरीत कारायला सांगणार आहे. जल्ला आमाला ती भाषा कलतंच नै. वल्ल्लीदा याल ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सहमत ओ काका. साला इतके भराभरा

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 16:46 नवीन
सहमत ओ काका. साला इतके भराभरा उच्चार करतात. सगळंच नुडल्ससारखं एकमेकांत गुंतलेलं वाटतं. जल्ला काय कल्ला नाय होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

सोप्पंय.

प्रचेतस
गुरुवार, 04/28/2016 - 17:54 नवीन
सोप्पंय. आजूबाजूच्या लोकांकडे नजर ठेवायची. ते हसले की आपणही हसायचं, त्यांनी शिट्ट्या मारल्या की आपणही मारायच्या. सगळा पिक्चर कळतो. बाकी हल्ली बऱ्याच थेटरांत इंग्रजी सबटायट्ल्स दाखवतात शिवाय हिंदी डबही असतोच. त्यामुळे कळायचा प्रश्न येत नै फारसा पण मूळ इंग्रजी भाषेतूनच बघणे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

ओए…ये र….र…रा कर के मन्ने

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 18:17 नवीन
ओए…ये र….र…रा कर के मन्ने रागणी ना सुणा ओर सीधी तरिया अपणा नाम बता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

क्विकसिल्वर गावडे सर.

प्रचेतस
गुरुवार, 04/28/2016 - 18:28 नवीन
क्विकसिल्वर गावडे सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

विंग्लीश

नाखु
Fri, 04/29/2016 - 10:12 नवीन
शिणेमे "बघण्यासाठी" असत्यात डोयलॉक ऐकण्यासाठी नाही
अशे आमच्ये कालेज सिनेमा गुरु सांगीत असत याची आठवण झाली.. सब घोडे (सिनेमे) बारा टक्के वाला नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ

प्रचेतस
गुरुवार, 04/28/2016 - 17:54 नवीन
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ - ल्लुलुबंध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वल्ली सरांशी शहमत, टुकार

स्पा
Fri, 04/29/2016 - 08:21 नवीन
वल्ली सरांशी शहमत, टुकार शॆराट पाण्यापेक्षा माझा लाडका कप्तान अम्रिका कधी एकदा येतोय असं झालय :D नागराज मंजुळे ने अता काहीतरी वेगळे करावे सेम विथ अजय अतुल तोच नाशिक ढोल, तोच ठेका, त्याचत्याच चाली असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खुपच कौतुक ऐकलं होतं "झिंगाट"

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 09:37 नवीन
खुपच कौतुक ऐकलं होतं "झिंगाट" गाण्याचं. आता पाहीलं. काही विशेष वाटलं नाही.
तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
हिरोईनच नव्हे, आक्खं गाणं ढिगाने साउथचे पिक्चर पाहून बनवले आहे असे वाटते. :)
  • Log in or register to post comments

मला तरी व्यक्तिशः अतिशय आवडले

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 10:08 नवीन
मला तरी व्यक्तिशः अतिशय आवडले झिंगाट हे गाणे. चित्रपट बघु या नंतर. पण आत्ता कायप्पा आणि चेपुवर जबरदस्त हाईप निर्माण करण्यात यशस्वी झालाय हा चित्रपट. सैराट गाणं पण अप्रतिम आहे.
  • Log in or register to post comments

हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 04/28/2016 - 10:39 नवीन
मुम्बईत , महरष्ट्रात रेकोर्डींग स्टुडिओज असताना अजय अतुल अमेरिकेत गाणं रेकोर्ड करुन आलेयत, हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?
  • Log in or register to post comments

लोल!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/28/2016 - 11:01 नवीन
हे मुम्बैला पण झालं अस्तं नां?
याऐवजी, हे पुण्याला (पुण्यात नाहीयेत तरीही) पण झालं अस्तं नां? अस म्हटल असतं तर एक वेळ पुणेरी प्रतिसाद ठरून पुण्याच्या मानात तेवढीच भर तरी पडली असती. पण आता काय उपयोग, मुंबैच नाव घेऊन काय मजा नाय येत. ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

असतं. केलं अमेरिकेत. काय

वेल्लाभट
गुरुवार, 04/28/2016 - 11:12 नवीन
असतं. केलं अमेरिकेत. काय बिघडलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

हे बघा

अविनाश लोंढे.
Fri, 04/29/2016 - 01:21 नवीन
https://www.youtube.com/watch?v=gtpK3fcw07A
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

गाणी सुंदर आहेत.

वेल्लाभट
गुरुवार, 04/28/2016 - 11:11 नवीन
गाणी सुंदर आहेत. झिंगाट ऐकताना 'रिगा डिंग डिंग साँग' (इंग्रजी) आणि याड लागलं ऐकताना ए आर चं प्रेमिका ने प्यारसे ची आठवण प्रकर्षाने आली. फूल माला... दो रुपय्या... तेरी ज़ुल्फ में सजा दूं फूल सा रुपय्या.... याड लागलं.... (अंतरा)
  • Log in or register to post comments

प्रेमिकाने प्यारसे ची बीटस

अभ्या..
गुरुवार, 04/28/2016 - 17:29 नवीन
प्रेमिकाने प्यारसे ची बीटस काय होती म्हाराजा. एकतर त्या नग्माला डान्स येत नाही त्यात सोबत कसाही वाकणारा आणी थिरकणारा प्रभुदेवा आणि एसपीआन्ना सुध्दा. अल्टीमेट कोरिओग्राफी. निदान त्या काळात तरी ती क्रांतीकारकच वाटली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

प्रेमिकाने प्यार से जो भी दे दिया..

तुषार काळभोर
Fri, 04/29/2016 - 11:33 नवीन
लिरिक्सपन क्रांतीकारकच आहेत. प्रेमिकाने प्यारसे जो भी दे दिया, तेरे वास्ते है नीलम जैसा. प्रेमिकाने प्यारसे जो भी छू लिया, तेरे वास्ते है सोने जैसा. प्रेमिकाको तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो. प्यारे के... संगीत में...अंहं मोहिनी...सुरागिनी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ते लिरिक्स बीट्स वगैरे ठीक

वेल्लाभट
Fri, 04/29/2016 - 15:14 नवीन
ते लिरिक्स बीट्स वगैरे ठीक आहे...ते भारीच होतं.वन ऑफ माय फेवरिट्स आहे हे गाणं. पण याचा अन याड लागलं चा अंतरा मागोमाग ऐका. लई कन्फूज व्हायला होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मला तरी फँड्री विशेष आवडला

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/28/2016 - 15:40 नवीन
मला तरी फँड्री विशेष आवडला नव्हता त्यामुळे सैराट बद्दल उत्सुकता नाही.
  • Log in or register to post comments

टीनेजरच्या प्रेमाचा साचा आहे

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 15:44 नवीन
टीनेजरच्या प्रेमाचा साचा आहे हा. हमखास हीट होणारा फॉर्मुला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

बघून मत बनवेन!

अजया
गुरुवार, 04/28/2016 - 15:56 नवीन
बघून मत बनवेन! आमच्या इथल्या हळदींमध्ये सध्या झिंगाट गाण्यावर नाचून झिंगाट फिरणारे सर्वत्र दिसत आहेत!
  • Log in or register to post comments

याडं लागलं गाणं मला तरी जोगवा

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/28/2016 - 16:01 नवीन
याडं लागलं गाणं मला तरी जोगवा / साऊथची गानी / रहमानची गाणी वगैरे सारखंच वाटतं. आपण नवीन काही ऐकतोय असं वाटत नाही. सेम विथ झिंगाट. ऐकायला गाणी चांगली असली तरी हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत.
  • Log in or register to post comments

+१

मधुरा देशपांडे
गुरुवार, 04/28/2016 - 16:19 नवीन
अगदी हेच. गाणी छान आहेत पण हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गाण्यात फारस नाविन्य नाही हे

पूर्वाविवेक
Mon, 05/02/2016 - 10:15 नवीन
गाण्यात फारस नाविन्य नाही हे खरय. आधी ऐकल्यासारखी वाटतात. हाईप होण्या इतकी भारी वाटली नाहीत. माझही हेच मत होत. पण जेव्हा मी 'सैराट' मोठ्या पडद्यावर पहिला आणि गाणी अचानक आवडू लागली. आकाश कमालीचा गोड आणि निरागस दिसतोय तर रिंकू एकदम करारी आणि धीट. तांत्रिकदृष्ट्या व छायाचित्रण उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रत्येक गणपती विसर्जनाला एक

वैभव जाधव
गुरुवार, 04/28/2016 - 16:28 नवीन
प्रत्येक गणपती विसर्जनाला एक गाणं उचललं जातं. या वेळी झिंगाट असणार. बाकी चित्रपट आंतरजातीय प्रेमकथा व दुःखद शेवट असणारा असा आहे असे कुठल्याशा महोत्सवात चित्रपटाच्या प्रदर्शनांतरच्या प्रेक्षकांच्या मतानुसार आहे.
  • Log in or register to post comments

सैराट नको

रमेश भिडे
गुरुवार, 04/28/2016 - 16:31 नवीन
अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण... अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा.... काय अवस्था होते.... बापाची...भावाची बहिणीची ...आईची अन कुटूंबाची.. कल्पना करा.... त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा... अन मगच करा.... समर्थन सैराट चित्रपटाच. शाळा... टाईमपास... टाईमपास 2 , फैंड्री तून काय संस्कार करण्यात आले पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर... सुजाण पालकांनो... भानावर या. त्यातच सैराट आलाय... अल्पवयीनांच्या प्रेम प्रकरणांचे प्रतिनिधित्व करायला. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ? अहो... निर्मातेसाहेब... तुम्ही सामाजिक प्रबोधन करताय की समाजात शैक्षणीक प्रवाहात असणा-या कोवळ्या वयातील मुलांमध्ये बालवयातील प्रेमप्रकरणांची विकृती पसरवताय. ? या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय. ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको. सध्या सर्वत्र सैराटचे प्रमोशन पहायला मिळतेय... लक्षपुर्वक पहा... हे प्रमोशन यातील मुख्य भुमिका निभावणारे विद्यार्थी दशेतील मुलं पहा...त्यांचा प्रेमाचा खेळ पहा... शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी.. प्रेमप्रकरणाला प्रोत्साहन देणारे चित्रीकरण पहा.... असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...? महत्वाच.... राज्यात बालकामगार बंदी आहे. 14 वर्षाच्या आतील बालकामगार जिथे असतील तर तिथ कायदेशीर कारवाई करणेत येते ... मग या ठिकाणी सुट कशासाठी....? पालकांनो सजग रहा... आदर्श पालक व्हा.. (टिप : मी चित्रपटाविरोधी नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/28/2016 - 16:46 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

Sarcasm?

निशांत_खाडे
गुरुवार, 04/28/2016 - 17:22 नवीन
Sarcasm?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अरे काय!

आदूबाळ
गुरुवार, 04/28/2016 - 17:27 नवीन
अरे काय! प्रेमप्रकरणांची विकृती?? शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय?? या/अशा सिनेमामुळे?? शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी?
असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?
नक्कीच समर्थन करेन. असल्या वयातली प्रेमप्रकरणं माझ्या आईवडिलांनी "खपवून" घेतली. मग माझ्या अपत्यांना हे नाकारण्याचा कोणता नैतिक अधिकार माझ्याकडे उरतो? -------- कमॉन काका, गेट अ लाईफ! अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अशा वेळी "मोठे व्हा" असं

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/28/2016 - 20:49 नवीन
अशा वेळी "मोठे व्हा" असं म्हणायची आंजावर पद्धत आहे. मोठे तर तुम्ही आहातच. "तरूण व्हा" असं म्हणेन. 103.5 % सहमत. अश्या भाबडेपणा बद्दल काय बोलावे समजत नाही. (हेच किंवा असेच पत्र कायप्पावर फिरतेय. हे जर रभि साहेबानी लिहिले असेल तर भारी म्हणायला पाहिजे. ) सिनेमाच प्रतिबिंब समाजात पडते का समाजचे प्रतिबिंब सिनेमात पडते ? नेहमीचाच एव्हरग्रीन विषय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

खरंय

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/28/2016 - 18:04 नवीन
भिडे साहेब खरंय तुमचं. हल्ली हे मार्केट मधे खपतंय म्हणून विकलं जातंय. ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको. हज्जारदा सहमत. ऐकायला मिळाली नव्हे आत्ता सुधा मिळत आहेत. पूर्वी प्रमाणे अत्याचाराचा वगैरे प्रकार नाही स्वखुषीने पण परिणामाची जाण नसल्यामुळे हे प्रकार होत असतात. बाकी समाज सध्या याच स्वप्निल नशेत आहे की आपण किती पुढे गेलो आहोत वगैरे वगैरे. दुष्परिणाम दिसतील तेव्हा नशा उतरेल. तोवर तुम्हाला वेडे ठरवले जाईल, मोठे व्हा सांगितले जाईल पण ठीके योग्य तेच बाजारात विकलं जातं असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

पोरांचे शिक्षणाचे पण वाटोळे झालेय.

बबन ताम्बे
गुरुवार, 04/28/2016 - 18:16 नवीन
पोरं पोरी कॉलेजमधे लेक्चरला सुद्धा बसायला मागत नाहीत. नापास झाले तरी त्यांना आता काही वाटेनासे झालेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

शिक्षणाच्या "परिक्षार्थी "

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/28/2016 - 23:00 नवीन
शिक्षणाच्या "परिक्षार्थी " पॅटर्नचा परिणाम. पालक लाखो रु खर्च करुन खासगी क्लासेस मध्ये घालतात, मग कश्याला पाहिजे कॉलेजात वर्गात बसायला? मार्क्स पडल्याशी कारण. ज्याला शिक्षणात / करियर मध्ये रस नाही त्याना काय घेणे आहे pपास नापास शी. पालक पैसे देतायतना, मग करा टाईमपास. या असल्या पार्श्वभुमी वर गरिब, झोपडपट्टीतले, kकष्टकरयांची मुले चमकुन जातात याचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

आणि नंतर जिथं काम नसेल अशी

काळा पहाड
Fri, 04/29/2016 - 22:21 नवीन
आणि नंतर जिथं काम नसेल अशी 'नौकरी' पण हवी असते. ती नाही मिळाल्यावर 'हेच काय अच्चे दिन' असं बोंबलायचं पण असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

पहिल्या वाक्याशी सहमत, दुसर्

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 22:30 नवीन
पहिल्या वाक्याशी सहमत, दुसर्‍या वाक्यात थोडासा बदल : 'मागच्या साठ वर्षात काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हे तुमचं मत आहे कि काय अप्पा

महासंग्राम
गुरुवार, 04/28/2016 - 18:22 नवीन
हे तुमचं मत आहे कि काय अप्पा वर आलेलं संदेश चीटकवला आहे ते तरी कळू दे प्रेमाला वयाच बंधन घालणारे आपण कोण ??? देवाने प्रेमलीला केलेल्या चालतात मग सामन्या माणसाचे वावडे का अजून एक प्रश्न .
शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात.
सैराट मध्ये हे दाखवलं आहे का ?? अर्थात तुम्ही पाहिला आहे का हा सवाल आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

मुद्दे निश्चित

मराठी_माणूस
गुरुवार, 04/28/2016 - 20:15 नवीन
मुद्दे निश्चित विचारकरण्याजोगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

१०० % असहमत

अविनाश लोंढे.
Fri, 04/29/2016 - 13:54 नवीन
त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा... - तीच अल्पवयीन मुलगी प्रेमात पडते तेव्हा तिच्या पण मनाची काही किंमत असते , तिला काय वाटत असेल ? तिच्या भावनांचं काय ? या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय. - 'गुरु ' बघून किती जन 'अंबानी ' झाले ? अन 'हम साथ साथ है ' बघून किती घर एकत्र आली ? - चित्रपटाचा समाजावर परिणाम हा ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे ! असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ? -TV सेरिअल वर दाखवली जाणारी लग्नाअगोदरचे किंवा लग्नानंतरची अफेअर्स सगळेजन घरात एकत्र बघत असतात तेव्हा किंवा 'बेबी डॉल मै सोने की ' हे गाण एकत्र बघताना असा विचार केला का की आपल्या घरातील मुलांनी अस नाचल तर चालेल का ? लॉजिक बिलकुल पटल नाही पालकांनो सजग रहा... आदर्श पालक व्हा.. -आदर्श , सुजाण पालक आपल्या पाल्याशी मैत्री करेल , त्याला /तीला समजून घेईल . (टिप : मी प्रतिसादाच्या विरोधात नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

'सैराट' प्रदर्शित होण्याच्या

पूर्वाविवेक
Mon, 05/02/2016 - 10:23 नवीन
'सैराट' प्रदर्शित होण्याच्या आठवडा अगोदर पासून हा मेसेज whatsapp वर फिरतोय. आपल्याकडे यापूर्वी आलेले चित्रपट आणि मालिका काय दाखवतात. मग सैराटला इतका विरोध का? सगळ विसरून अगदी त्यात दाखवलेला 'जातीभेद' वै पण विसरून आपल्या मायमराठीतली एक चांगली कलाकृती म्हणून त्याचा आनंद आपण नाही घेवू शकत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

मुलं बिघडतील म्हणून सैराट ला विरोध करणाऱ्यांनी

बोका-ए-आझम
Mon, 05/02/2016 - 16:47 नवीन
मास्तर बिघडतील म्हणून पिंजरा ला विरोध का नाही केला? - कायप्पावरील एक संदेश. याच्याशी कचकून सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक

'सैराट' प्रदर्शित होण्याच्या

पूर्वाविवेक
Mon, 05/02/2016 - 10:45 नवीन
'सैराट' प्रदर्शित होण्याच्या आठवडा अगोदर पासून रमेश भिड्यांची हि प्रतिक्रिया whatsapp वर फिरतेय. आपल्याकडे यापूर्वी आलेले चित्रपट आणि मालिका काय दाखवतात. मग सैराटला इतका विरोध का? सगळ विसरून अगदी त्यात दाखवलेला 'जातीभेद' वै पण विसरून आपल्या मायमराठीतली एक चांगली कलाकृती म्हणून त्याचा आनंद आपण नाही घेवू शकत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

सहमत

जानु
गुरुवार, 04/28/2016 - 17:12 नवीन
रमेश भिडे यांशी बर्‍यापैकी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

सहमत !

विटेकर
गुरुवार, 04/28/2016 - 18:05 नवीन
रमेश भिडे याण्च्याशी सहमत ! ज्याण्च्या घरात वयात आलेली पोर आहे , त्याला हे दु:ख बरोब्बर कळेल.
  • Log in or register to post comments

गाणी काय विशेष आवडली नाहीत !

जव्हेरगंज
गुरुवार, 04/28/2016 - 19:26 नवीन
गाणी काय विशेष आवडली नाहीत ! पिरतीचा इंचू मात्र झकास डसला होता!! प्रोमोवरुन सिनेमाही एवढा खास वाटत नाहीये! पण बघणार आल्यावर !!
  • Log in or register to post comments

याड लागलं मधील दुसर्या आणि

चंद्रनील मुल्हेरकर
गुरुवार, 04/28/2016 - 19:50 नवीन
याड लागलं मधील दुसर्या आणि तिसर्या अंतर्यात अजयने जो आवाज लावला आहे तो लाजवाब आहे,सैराट झालं जी मध्ये पण छान आवाज लागला आहे.बाकी कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णी यांच्या टुकात चाली असणार्या गाण्यांना प्रमाण संगीत मानणार्यांच्या पोटात सैराटमुळे पोटदुखी झालीए यात काही आश्चर्य नाही वाटले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा