Skip to main content

रिओ ऑलिम्पिक २०१६

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/08/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका

वाचने 80112
प्रतिक्रिया 405

प्रतिक्रिया

In reply to by लालगरूड

रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

In reply to by निओ

माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

In reply to by खेडूत

आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा

In reply to by चतुरंग

आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

In reply to by चतुरंग

दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

फ्रीस्टाईल फायनल सुरु होतेय!! :)

In reply to by चतुरंग

अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.

In reply to by लालगरूड

मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

In reply to by असंका

बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺

सानिया-बोपण्णा टेनिस क्वार्टरफाइनल मधे विकास बाॅक्सिंग क्वार्टरफाइनल मधे

हा धागा अगोदर ज्या उत्साहाने उघडला जायचा तितकाच आता भित भित उघ्डला जातोय... :( दत्तू भोकनळ परत एकदा सुरेख खेळला मात्र काल...पूर्ण वेळ आघाडीवर राहून शेवटच्या एक सेकंदात दुसर्‍या स्थानावर गेला.

आजचे अपडेटस.. अश्विनी, ज्वाला, भारतीय महिला हॉकी संघ स्पर्धेबाहेर गेले. पण किदम्बी श्रीकांतने बॅडमिंटन मधे विजयी सलामी दिली. उद्या स्वीडीश खेळाडूसोबत खेळणार. त्याला शुभेच्छा ...! सानिया -बोपन्ना उपान्त्यपूर्व फेरीत उद्या खेळतेल

हो, तिचेही अभिनंदन आणि शुभेच्छा! वादग्रस्त पैलवान नरसिंग आज रिओला पोहोचला. १९ तारखेला तो पहिला सामना खेळेल. उद्या दीपा कर्माकर्च्या कामगिरीची उत्सुकता आहे!

ललिता बाबरचे अभिनंदन. पी टी. उषानंतर ऍथलेटिक्स फायनलमध्ये खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरेल.

In reply to by असंका

सायनाचा खेळ पाहता ती जिंकेल असं एकदाही वाटलं नाही. अजिबात उत्साह नाही, की पर्फेक्ट स्म्याशिंग दिसली नाही की रिटर्न विशेष वाटले नाही. -दिलीप बिरुटे

सिंधू पुढच़्या फेरीत

दीपा कर्मकारचे पदक अगदी थोडक्यात हुकले. जिम्नॅस्टिकची फारशी परंपरा नसलेल्या भारतासारख्या देशाकडून ऑलिंपिकसाठी पात्र ठरून ४ था क्रमांक मिळविणे हे मोठे यश आहे. ती सहाव्या क्रमांकावर परफॉर्मन्ससाठी आली तेव्हा पहिल्या पाचातील प्रथम ३ क्रमांकांची कामगिरी दाखवित होते. तिने उत्कृष्ट कामगिरी करून थेट दुसर्‍या क्रमांकावर आली. तिच्या दुर्दैवाने शेवटच्या दोन जिमनॅस्ट तिच्या तुलनेत फारच दादा ठरल्यामुळे तिची कामगिरी चवथ्या क्रमांकावर गेली आणि पदक हुकले. भारताला एकंदरीत ४ था क्रमांक तापदायक ठरतोय. अभिनव बिंद्रा, पुरूष हॉकी संघ आणि आता दीपा कर्मकार. सर्वजण पदकापासून अगदी थोड्या अंतराने लांब राहिले.

In reply to by श्रीगुरुजी

>>>> भारताला एकंदरीत ४ था क्रमांक तापदायक ठरतोय. सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा चौथा क्रमांक भारताची प्रगती दाखवतोय....मिल्खा सिंग, पी टी उषा पण चौथे होते पण त्यांच्यानंतर किती वर्षांनंतर आपण पुन्हा तितके जवळ जाउ शकलो? आणि किती खेळात? पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक येतोय याचाच अर्थ आपण आता जास्ती संख्येने, जास्ती जोरात आणि जास्ती ठिकाणी धडका मारतो आहोत.

In reply to by असंका

पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक येतोय याचाच अर्थ आपण आता जास्ती संख्येने, जास्ती जोरात आणि जास्ती ठिकाणी धडका मारतो आहोत.
+1

कदम्बी छानच खेळला आज. त्याचा कोर्ट वरचा आक्रमकपणा आवडला. पण पुढची वाटचाल खडतर आहे.. सिंधु चे काय होताय पाहुयात आता.

In reply to by थॉर माणूस

आज श्रीकांत आणि उद्या सिंधूचे क्वार्टरफायनल्स. दोन्ही प्रेक्षणीय होणार.. नरसिंग जाऊनही खेळणार का हा प्रश्नच आहे.वाडाची सुनावणी उद्या, आणि सामना परवा. बघुयात.

वांग यीहान ला नामोहरम करुन सिंधू उपांत्य फेरीत ! जपानच्या नोझोमि ओकुहारा बरोबर लढ्त होणार ! सिंधूला अनेक शुभेछा .

लोकहो, काल रियोतल्या संध्याकाळी किरियन सायकलिंगच्या स्पर्धेत ब्रिटीश सायकलपटू जेसन केनीस आगळीकीपायी अपात्र घोषित करायला हवं होतं. मात्र ब्रिटन बलाढ्य राष्ट्र असल्याने यातून मार्ग काढला गेला. शर्यतीचा चित्रक (=क्यामेरा) सुयोग्य प्रकारचा नसल्याने जेसन केनीस ठामपणे अपात्र ठरवणे अवघड आहे असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे थांबवलेली शर्यत नव्याने सुरू करण्यात आली. दुसऱ्यांदा सुरू झालेली शर्यत परत एकदा थांबवण्यात आली. कारण की मागच्या वेळेसारखीच आगळीक परत एकदा घडली. या खेपेस पोलंडच्या डेमियन झीलीन्स्की वा जर्मनीच्या योकिम आयलर्स यांच्यापैकी एकाला बाहेर व्हावं लागलं असतं. मात्र याही वेळेस कोणालाही अपात्र न ठरवता शर्यत परत सुरू करण्यात आली. तिसऱ्या वेळेस मात्र शर्यत व्यवस्थितपणे पार पडली. जेसन केनीने जिंकली याबद्दल त्याचं अभिनंदन. मात्र एक प्रश्न उद्भवतो. नरसिंह यादवला अशी खास वागणूक कधीतरी मिळेल काय? कालच्या बातमीनुसार यादवच्या सहभागाबद्दल उद्या १८ तारखेला निर्णय होणार आहे. यादवला शेवटच्या क्षणापर्यंत लटकत ठेवण्यामागे कोण आहे? आ.न., -गा.पै.

काय जबरदस्त टक्कर दिली श्रीकांतने!! दोन वेळचा गोल्ड मेडल विजेता लिन डॅन सरळ सरळ चिडलेला दिसला शेवटच्या सेटमध्ये..वेल प्लेड श्रीकांत... लिन डॅन २१-६, ११-२१, २१-१८

श्रीकान्त भारी खेळला, कुस्ती त पण चान्गला खेळ चाल्लाय, विनेश फोगट भारी खेळत होती, बेक्कार इन्जुरड झाली पण :(

In reply to by विखि

फोगट जखमी झाल्याने बाहेर. साक्षी हरली तरी तिला रेपेचेंज मधुन कांस्य पदक घेण्याचा मार्ग अजून खुला आहे.

In reply to by धनावडे

रेपेचेंज मधुन परत येऊन कांस्य पदक मिळवले. साक्षी मलिक मुळे भारताचे खाते अखेर उघडले.

In reply to by साधा मुलगा

रेपेचेन्ज म्हणजे जे दोन स्पर्धक अंतिम फेरी खेळणार आहेत त्यांच्या सोबत जे हरले आहेत, ते स्वतंत्रपणे कास्यपदकाची लढत खेळतात. एखाद्याला कठीण स्पर्धक मिळाला तर पुन्हा संधी देण्याचा प्रकार आहे. अधिक माहितीसाठी हा दुआ पहा.

अभिनंदन. आज सिंधू पण जोरदार खेळेल . तिला शुभेच्छा..!

साक्षीचं अभिनंदन, खूप आनंद झाला. पदकाच्या अनेक हुलकावण्यानंतर अखेर कास्य पदकानेही खूप आनंद झाला. -दिलीप बिरुटे

पुढील संभाव्य पदकाम्च्या प्राप्तीची...

साक्षीचे मनःपुर्वक अभिनंदन

,आणि खेडूत रावांचे आणि प्रतिसादकांचे विशेष कौतुक, धागा मशालीसारखा पेटता ठेवण्यापेक्षा देव्घरातील निरांजनासारखा निवांत प्रकाशी राहिला हे पाहिले गेले...... नितवाचक नाखु

इतके दिवस फक्त पराभवाच्या बातम्यांनी मिपावर चर्चा करणे सोडले होते, धागा उघडायला पण भीती वाटायची, एकही पदक न मिळालेला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश हा पाकिस्तानचा 1996 पासून असलेला रेकॉर्ड आपण मोडतोय कि काय हि भीती होती. तरी काल साक्षीचा आधीचा एक सामना पहिला , त्यात ती रशियाच्या खेळाडूंशी हरली, पण नंतर Repêchage राऊंड मध्ये मिळालेल्या संधीचे तिने अक्षरशः सोने केले, जिंकलस पोरी!!!

लोकहो, आज नरसिंह यादवच्या पात्रतेचा निर्णय होणार आहे. यादव निघतांना मोदींना भेटला होता. मोदीं यांत लक्ष घालून तो अपात्र ठरणार नाही याची काळजी घेतील अशी आशा आहे. आ.न., -गा.पै.

लोकहो, मुष्टीयोद्धा विकास कृष्णन उपांत्यपूर्व फेरीत का हरला याची कारणीमीमांसा करतोय. लेख इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/ri… भारतीय मुष्टियुद्ध संघटनेवर बंदी असतांनाही पराभवाचा दोष विकास केवळ स्वत:लाच देतोय. ही केविलवाणी वेळ त्याच्यावर कशापायी आली आली असेल? उत्तर साधं आहे. विकासकडे पैसे नाहीत. अभिनव बिंदराकडे स्वत:चे पैसे होते. त्याने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वधनावर सुवर्णपदक मिळवलं. विकासकडे तो पर्याय नाही. म्हणून पदाधिकाऱ्यांची हांजीहांजी करावी लागते. भारतीय खेळाडूंसमोरच्या अडचणी मांडण्याचा माझ्याकडून एक अल्पसा प्रातिनिधिक प्रयत्न. आ.न., -गा.पै.