✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : निकाल

स
साहित्य संपादक यांनी
Sun, 03/26/2017 - 20:02  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, 'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. यावर्षी स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. मतदानासाठी सात दिवसांचा कालावधी होता. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले गुणांकन ग्राह्य धरले आहे. आलेल्या गुणांकनातून प्रथम क्रमांक दिलेल्या कथांना ५ गुण दिले आहेत. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांना अनुक्रमे ३ आणि १ असे गुण दिले आहेत. आणि या गुणांकन पद्धतीनुसार प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत. पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.

प्रथम क्रमांकः आम्ही येतोय (लेखक : अॅस्ट्रोनाट विनय)

प्रथम क्रमांकः ऑक्टोबर- मार्च (लेखक : मराठी कथालेखक)

तृतीय क्रमांकः वेट अ मिनिट! (लेखक : जव्हेरगंज)

चतुर्थ क्रमांकः ईश्वराचा शोधं (लेखक : भृशुंडी)

पाचवा क्रमांकः ईमारत (लेखक : चिनार)

वरील विजेत्या कथांव्यतिरिक्त आलेल्या इतर सर्वच कथा एकापेक्षा एक सरस होत्या, आणि त्या आपण सगळ्यांनी बघितल्याच आहेत. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
21235 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक

अॅस्ट्रोनाट विनय
Sun, 03/26/2017 - 20:10 नवीन
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

तुषार काळभोर
Sun, 03/26/2017 - 20:12 नवीन
पहिला क्रमांक विभागून दिलाय, म्हणजे जबराट चुरस झाली! विजेत्यांचे अभिनंदन , मान्यवरांचे आभार , स्पर्धक, आयोजक, वाचक, मतदार या सर्वांचे कौतुक!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वरुण मोहिते
Sun, 03/26/2017 - 20:15 नवीन
एकापेक्षा एक सरस कथा देण्यासाठी . सर्व विजेत्यांचे .
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे जोरदार

किसन शिंदे
Sun, 03/26/2017 - 20:16 नवीन
सर्व विजेत्यांचे जोरदार अभिनंदन.!! पहिल्या क्रमांक पटकवलेल्या कथेच्या लेखकाने त्याचे आयडी नाम सार्थ ठरवले हे नमूद करू इच्छितो. बाकी ठरलेल्या दिवशी निकाल मिपाकरांसमोर आणल्याबद्द संपूर्ण साहित्य संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार!!
  • Log in or register to post comments

पहिल्या क्रमांक पटकवलेल्या

मराठी कथालेखक
Sun, 03/26/2017 - 22:54 नवीन
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या कथेच्या लेखकाने त्याचे आयडी नाम सार्थ ठरवले हे नमूद करू इच्छितो.
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पहिल्या क्रमांक पटकवलेल्या

अॅस्ट्रोनाट विनय
Mon, 03/27/2017 - 08:20 नवीन
पहिल्या क्रमांक पटकवलेल्या कथेच्या लेखकाने त्याचे आयडी नाम सार्थ ठरवले हे नमूद करू इच्छितो.
>> ही कमेन्ट नेमकी कोणाबद्दल म्हणायची :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

दोन्ही आयडींसाठी :)

किसन शिंदे
Mon, 03/27/2017 - 14:13 नवीन
दोन्ही आयडींसाठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय

अभिनंदन!

पैसा
Sun, 03/26/2017 - 20:36 नवीन
सर्व विजेते आणि सहभागी लेखकांचे अभिनंदन! अनेक कथा वेगवेगळ्या प्रकारे आवडल्याने कोणाला पहिले क्रमांक द्यावते हे समजले नाही त्यामुळे मतदान केले नाही. विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!
  • Log in or register to post comments

जोरदार अभिनंदन!!!!!!

जव्हेरगंज
Sun, 03/26/2017 - 20:58 नवीन
जोरदार अभिनंदन!!!!!! अशा स्पर्धा मिपावर वारंवार होवो. अनेक नवलेखकांच्या कथा वाचण्यात खास मज्जा आली!!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन!

यशोधरा
Sun, 03/26/2017 - 21:00 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

एस
Sun, 03/26/2017 - 21:27 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या साहित्य संपादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे आणि सर्व

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 03/26/2017 - 21:56 नवीन
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

जबर स्पर्धा; जबर कथा; जबर

वेल्लाभट
Sun, 03/26/2017 - 22:25 नवीन
जबर स्पर्धा; जबर कथा; जबर निकाल वाह ! मजा आली. पुढच्या वेळी माझी कथा निकालात चमकेल असा स्वतःलाच विश्वास देतोय :)
  • Log in or register to post comments

वरच्या सर्व कथा निष्पक्षपणे पुन्हा वाचल्या

संजय क्षीरसागर
Sun, 03/26/2017 - 22:29 नवीन
माझी कथा (कांचनमृग) सर्वात नीटस बांधलेली वाटली .....पण तिला एकही वोट मिळालं नाही ! याचा अर्थ काय असू शकतो ? हा एक लेखक म्हणून विचार करतोयं.
  • Log in or register to post comments

वाईट झाले हो स्वामीजी.

मोदक
Mon, 03/27/2017 - 14:32 नवीन
वाईट झाले हो स्वामीजी. (एक वाचक म्हणून मांडलेले मत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

याचा अर्थ काय असू शकतो ?

आदूबाळ
Mon, 03/27/2017 - 14:48 नवीन
याचा अर्थ काय असू शकतो ?
कदाचित शरीरसौष्ठव या निकषावर वाचकांनी मतं दिली नसावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ज्योक ठीके

संजय क्षीरसागर
Mon, 03/27/2017 - 15:05 नवीन
बट आय मीन, कथेत कोणताही कच्चा दुवा नाही की शेवटात संभ्रम नाही (जी गोष्ट मला इतर कथात जाणवली).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हा हा हा अहो काळा पैसावाले

एमी
Mon, 03/27/2017 - 15:21 नवीन
हा हा हा अहो काळा पैसावाले नोटबंदीच्या कचाट्यातून अलगद सुळकन सुटले; किंबहुना त्यांचा फायदाच झाला अशा गोष्टीला मिपावर मतं कशी मिळतील?? त्याऐवजी काळा पैसावाल्यांचं कसं वाट्टोळ्ळं वाट्टोळ्ळं झालं अशा विशफुल स्वप्नरंजनाला प्रथम क्रमांक मिळतो, मुस्लिम दहशतवाद्यांचा बागुलबुवा उभा करणार्या कथेला तृतिय क्रमांक मिळतो. असो. मक आणि जव्हेरगंज दोघेही मला लेखक म्हणून आवडतात. पण या कथा अजेंडायुक्त आहेत त्यामुळे मी त्यांना मत दिले नाही. एनीवे भाजपेयी मोदीभक्तांना किंवा इतर कोणत्याच उपप्रतिसादांना उत्तर मिळणार नाही. बादवे सासं, आता प्रत्येक शशक धागा त्या त्या लेखकाच्या नावे करुन टाकता येइल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नाही हो !

संजय क्षीरसागर
Mon, 03/27/2017 - 15:49 नवीन
राजकीय विचारसरणीचा प्रश्न बाजूला ठेवू. कथाविषय, मांडणी, कल्पना नाविन्य, आशय थेट पोहोचणं या निर्वैयक्तिक निकषांविषयी मी बोलतोयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

Ok. May be my bad/goggle.

एमी
Mon, 03/27/2017 - 18:05 नवीन
Ok. May be my bad/goggle. Sorry didnt mean harm.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संजयजी अनुमती असल्यास वाचक

चिनार
Mon, 03/27/2017 - 15:21 नवीन
संजयजी अनुमती असल्यास वाचक म्हणून आपल्या कथेवर व्यनीतून प्रतिक्रिया देऊ इच्छितो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जरुर कर !

संजय क्षीरसागर
Mon, 03/27/2017 - 15:27 नवीन
पण मला खरंच कुतुहल आहे. कुणी इथे प्रतिसाद दिले तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

संक्षी, तुमची कथा मला समजली

यशोधरा
Mon, 03/27/2017 - 18:01 नवीन
संक्षी, तुमची कथा मला समजली नाही. माझ्या तोकड्या बुद्धीचा दोष असू शकेल. मला फायनान्स विषयात गती नाही आणि आवड नाही त्यामुळे माझ्यासारख्या त्या विषयाबद्दल नावडीमुळे अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीला लगेच लक्षात येण्यासारखी ती कथा नाही. उत्तम असेल, नाही म्हणत नाही पण बारकाव्यांसकट कळली नाही, तर प्रतिसाद कसा देणार ना? कदाचित हे कारण असू शकेल काही जणांच्या बाबतीत तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एग्जाटली!!

किसन शिंदे
Mon, 03/27/2017 - 18:16 नवीन
एग्जाटली!! जेव्हा बोर्डावर टाकली तेव्हा वाचली होतीच, पण आताही वर लिंक दिल्यानंतर पुन्हा जाऊन वाचली. पण तरीही शेवटाकडे कळाली नाही. त्यामुळेच कदाचित लोकांची मते पडली नसावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कथेवर मत व्यक्त केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार्स !

संजय क्षीरसागर
Mon, 03/27/2017 - 21:06 नवीन
मला ही एक्झॅक्टली हेच वाटलं की मी आशय पोहोचवू शकलो नाही ! कारण निर्णय कायम असला तरी नक्की काय झोल झाला इतकंच जाणून घ्यायचं होतं. तुम्हा सर्वांची टेक्निकल डिफिकल्टी मान्य आहे पण शशकमधे हे सगळं बसवणं असभंव होतं. एनी वे, तुम्ही सरळपणानं सांगितलंत, सो तुमच्यासाठी हा उलगडा ! इट इज धिस वे : शेटनी सदाला काही वर्षांपूर्वी ६ लाख कॅश कर्ज दिलंय (हे सगळे व्यावहार विनाकागदपत्राचे आणि रोखीत होतात. शेट इतका पॉवरफुल असतो की घेणारा पलटी मारु शकत नाही). सदा आज कर्ज सव्याज परत करायला १० लाख घेऊन आलायं. निर्चलनीकरण झालं नसतं तर सदा आज संपूर्ण कर्जमुक्त होणार होता. सर्व व्यावहार रोखीतच असल्यानं शेटला सुद्धा अदरवाइज आनंदच होता. पण सद्य स्थितीत पैसे असूनही सदा मुक्त होऊ शकत नाही आणि शेटलाही समोर आलेल्या लक्ष्मीचा मोह सुटत नाही.... हा प्लॉट आहे ! मग शेट नामी शक्कल लढवतो. तो सदाला पाच पॅनकार्डस आणि त्या व्यक्तींचे साइन्ड ब्लँक चेक्स आणायला सांगतो. सदाला काहीच प्रॉब्लम नसतो कारण ज्यांच्या खात्यात पैसेच नाहीत अशा व्यक्तींचे चेक्स घेऊन शेट काय करणार ? शेट, सदाचे दहा लाख त्या लोकांच्या खात्यात भरतो. त्यांचे चेक्स सोनाराला देऊन त्यांच्या नांवाच्या पावत्या करुन घेतो (अ‍ॅज इफ दे हॅव परचेसड द गोल्ड). थोडक्यात सदाच्या पैश्याचे (बाद नोटा) वॅलीड कागद होतात (सोनाराच्या पावत्या). आणि शेट सोनाराकडून ....दहा लाखाचं सोनं घेऊन टाकतो ! तर असा हा कांचनमृग ! मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर. पाच पॅनकार्डच्या झेरॉक्स आणि त्या लोकांचे चेक घेऊन ये’ दहा दिवसांनी शेटनी सदाला पॅनकार्डवाल्यांच्या नांवच्या सोनाराच्या पावत्या दिल्या. सदा पाहातच राहीला.... त्याच्या पैशाचे कागद झाले होते.... आणि शेटनी कचर्‍याचं सोनं केलं होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओके, आभार उलगडल्याबद्दल. हा

यशोधरा
Mon, 03/27/2017 - 21:17 नवीन
ओके, आभार उलगडल्याबद्दल. हा पंच बिगर फायनान्स वाल्यांना पोचणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

उलगडून सांगितल्याबद्दल

किसन शिंदे
Mon, 03/27/2017 - 22:36 नवीन
उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद संक्षी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मला सुद्धा नीट कळली नाही.

प्राची अश्विनी
Mon, 03/27/2017 - 18:13 नवीन
मला सुद्धा नीट कळली नाही. म्हणून मत दिले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी

पिलीयन रायडर
Tue, 03/28/2017 - 23:41 नवीन
बघा संक्षी.. तुमच्या कथेला मी एकटीने निसंधिग्धपणे आवडली म्हणलंय.. काय म्हणावं ह्या योगाला?! =)) मी मतदान केलं असतं तर तुम्हाला नक्की मत दिलं असतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्यवाद !

संजय क्षीरसागर
Wed, 03/29/2017 - 00:33 नवीन
विचार विरोधी असले तरी ठाम असले तर कधी ना कधी एकवाक्यता होते ! १) विनयच्या कथेतील शेवटावर, स्त्रुजाचा हा प्रतिसाद दही सुद्धा लागायची मारामार असं झालं तर ! फार बोलका आहे. २) मकलेंची कथा `बॅड सफर्स बॅडली' स्टाईलची आहे. ३) जंगची कथा मला अजूनही कळली नाही. ४) भृशुंडी काय म्हणतात कुणाला कळलं असेल तर नक्की कळवा. ५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार) वरच्या मतांचा माझी कथा विजेती न ठरण्याशी सुतराम संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

भृशुंडीची कथा आवडली मला.

एमी
Wed, 03/29/2017 - 05:03 नवीन
भृशुंडीची कथा आवडली मला. ५) चिनार एंडस ऑन अ पॅथेटिक नोट (आय एम रिअली सॉरी चिनार) >> यालामात्र +1.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

चालायचच संक्षी. मला तर माझी

मृत्युन्जय
Wed, 03/29/2017 - 14:43 नवीन
चालायचच संक्षी. मला तर माझी कथाच सर्वोत्कृष्ट वाटली होती. पण वाचकांना त्यात काही राम दिसलेला दिसत नाही. वाचकांच्या मनोभूमिकेत १००% शिरुन लेखक लिहिता होउ शकला तर मग प्रत्येक लेखकाचे प्रत्येक पुस्तक / लेख सुपरहिट्ट ठरेल की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही

मराठी कथालेखक
Wed, 03/29/2017 - 15:11 नवीन
बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही मतदान का नाही केलंत ? एकूणातच अनेक स्पर्धकांनीही मतदान का नाही केलं हे जाणून घ्यायला आवडेल,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कथा वाचली की लगेच मत देणे

विनिता००२
Wed, 03/29/2017 - 16:40 नवीन
कथा वाचली की लगेच मत देणे सोपे जाते. एकदा वाचून मग परत मतदानाच्या वेळी परत वाचणे होत नाही. आजकाल तेवढा वेळ मला वाटते, कोणाकडे नाहीये. माझ्यावरुन सांगतेय. वाचून प्रतिसाद दिले गेले. पण मतदानाच्या वेळी मार्चच्या कामात व्यस्त असल्याने परत उघडून वाचणे जमले नाही. मतदान राहून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

सर्वांचे आभार

मराठी कथालेखक
Sun, 03/26/2017 - 22:44 नवीन
सर्व वाचक आणि मतदात्यांना मनःपुर्वक धन्यवाद. इतर सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धेत चुरस आणि रंगत वाढवल्याबद्दल सहस्पर्धकांचे मनःपुर्वक आभार आणि सर्वात महत्वाचे, आयोजक व संपादक मंडळाचे आभार..लेखकाचे नाव उघड न करता कथा प्रसिद्ध करण्याचा निर्णय खूप योग्य होता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सर्वंच लेखकांचे अन

अभ्या..
Sun, 03/26/2017 - 22:44 नवीन
सर्वंच लेखकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन. अगदी अप्रतिम अशा कथा सर्वच नाहीत पण आगमी लेखनाबद्दल आशा बाळगाव्यात असे लेखक या स्पर्धेने मिळताहेत ही खूप छान गोष्ट आहे. कमीतकमी शब्दात एखादे कथासूत्र सादर करणे हे चॅलेंजिंगच, त्यातल्या त्यात मला आकाराने छोट्या पण आशयाने संपन्न कथा आवडतात. अशा कथा रेग्युलरली मिपावर येऊ लागल्या तर त्यापेक्षा भारी कै नै.
  • Log in or register to post comments

माझ्याकडून येतील असा शब्द

अॅस्ट्रोनाट विनय
Mon, 03/27/2017 - 00:08 नवीन
माझ्याकडून येतील असा शब्द देतो.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन!!

एमी
Mon, 03/27/2017 - 06:04 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!! आम्ही येतोय (लेखक : अॅस्ट्रोनाट विनय) >> :-) ऑक्टोबर- मार्च (लेखक : मराठी कथालेखक) >> :O
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन!!

प्राची अश्विनी
Mon, 03/27/2017 - 09:34 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

शब्दबम्बाळ
Mon, 03/27/2017 - 09:42 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! जव्हेरगंज याचे लिखाण आवडत असले तरी ही शशक "मराठी" म्हणण्यासारखी नव्हती असे वाटले... जो कि स्पर्धेचा निकष असायला हवा होता..
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !!

बबन ताम्बे
Mon, 03/27/2017 - 11:12 नवीन
साहित्यसंपादक मंडळ आणि मतदाते, वाचक यांचे ही आभार. माझ्या शशक कथेलाही (अडनड ) काही वाचकांनी गुण दिले हे पाहून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

नीलमोहर
Mon, 03/27/2017 - 16:01 नवीन
सर्व विजेते, स्पर्धकांचे अभिनंदन, सा सं, मालकांचे आभार.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

पद्मावति
Mon, 03/27/2017 - 17:53 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मस्तं झाली स्पर्धा.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक

विनिता००२
Wed, 03/29/2017 - 10:35 नवीन
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

बापू नारू
Wed, 03/29/2017 - 10:54 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन . आयोजकांचेही आभार_/\_
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

संजय पाटिल
Wed, 03/29/2017 - 12:26 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

एक अपेक्षाय,

अभ्या..
Wed, 03/29/2017 - 13:57 नवीन
एक अपेक्षाय, कितीतरी नवीन लेखक दिसताहेत, काही गणमान्यही आहेत पण या सर्वांनी केवळ स्पर्धा आहे ह्यापेक्षा रेग्युलरली मिपावर शशकच नव्हे तर लघुकथा, दिर्घकथा, ललित अशा प्रकारचे लेखन चालू ठेवावे. दर आठ्वड्याची/महिन्याची कथा, कविता, शशक अशे गौरव मिपाप्रशासनाने दिले तर लेखकांना अजून प्रोत्साहन मिळेल असे वाटते. ह्यातल्या विजेत्यांच्या कलाकॄतींचे पण मिपापुस्तक बनवता येऊ शकते. शिवाय वाचकांना मेजवानी मिळत जाईल हे बोनसच.
  • Log in or register to post comments

द्विशतशब्दकथा स्पर्धा

सिरुसेरि
Wed, 03/29/2017 - 15:43 नवीन
शतशब्दकथा स्पर्धा २०१७ झाली . आता , द्विशतशब्दकथा स्पर्धेच्या प्रतिक्षेत .
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

भिंगरी
गुरुवार, 03/30/2017 - 00:30 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

इडली डोसा
Sat, 04/01/2017 - 05:08 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा