✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अवघा महाराष्ट्र सैराटमय

प
प्रमोद देर्देकर यांनी
गुरुवार, 04/28/2016 - 09:27  ·  लेख
लेख
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत. अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल. कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात. अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन
आस्वाद
बातमी

प्रतिक्रिया द्या
66868 वाचन

💬 प्रतिसाद (231)

प्रतिक्रिया

असं काही नसावं चंनी साहेब...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 19:52 नवीन
असं काही नसावं चंनी साहेब... पण तुम्ही रसिकतेने सैराट ऐकताय याचा आनंद आहे. जियो नागराज आणि अतुल अजय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर

बाकी कालपासून मी हेडफोन लावून

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 19:58 नवीन
बाकी कालपासून मी हेडफोन लावून सतत झिंगाट हे एकच गाणं ऐकतोय. रेवतीतै म्हणताहेत तसं खरंच अगदी झिंग आणणारं गाणं आहे यात दुमत नाही. मी तेच अनुभवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

कौशलच्या चाली आवडतात.

रेवती
गुरुवार, 04/28/2016 - 19:54 नवीन
कौशलच्या चाली आवडतात. गुप्तेच्या आवडण्याचा प्रश्नच येत नाही, सलीलच्या बर्‍या असतील पण मी त्याची फ्यान नाही पण म्हणून त्या टुकार आहेत असं तुम्हाला वाटतय. मलाही सैराट गाणं आवडलं पण अजय अतुल जशा जीव गुंगला, रंगला सारख्या सुरेख चाली देतात तसा ते अशक्य गोंगाटही करतात यावर दुमत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर

हा ही प्रतिसाद त्याच वाटेने

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 20:21 नवीन
हा ही प्रतिसाद त्याच वाटेने गेला तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर

कौशल इनामदार,गुप्ते,सलिल

काळा पहाड
Fri, 04/29/2016 - 23:04 नवीन
कौशल इनामदार,गुप्ते,सलिल कुलकर्णी
हा बहुजन-बहुजनेतर चित्रपट नाहीये मुल्हेरकर साहेब. मराठा विरुद्ध दुसरी कुठली तरी जात (कोणती ते माहिती नाही) असा संघर्ष आहे. तुम्ही नावं चुकीची.. बहुजनेतर निवडलीयत. तुमच्या गटानुसार विरुद्ध पार्टीची नावं निवडा पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर

अजय-अतुल अप्रतिम संगीत देत असले

बोका-ए-आझम
Mon, 05/02/2016 - 16:52 नवीन
तरी बाकीचे संगीतकार टुकार संगीत देतात असं मानायचं काहीही कारण नाही. अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच. अजय-अतुल एवढं सातत्य बाकीच्यांनी दाखवलं नाहीये हे मान्य पण म्हणजे ते टुकार आहेत असं अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर

अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली

टवाळ कार्टा
Mon, 05/02/2016 - 18:39 नवीन
अजय-अतुल यांनीही कोंबडी पळाली सारखं टुकार गाणं दिलेलं आहेच.
याबद्दल कच्चकून निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मान्य आहे टकाभौ!

बोका-ए-आझम
गुरुवार, 05/05/2016 - 12:08 नवीन
कोंबडी पळाल्यावर निषेध हा होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इतका बोलबाला झाल्यावर ते गाणं

रेवती
गुरुवार, 04/28/2016 - 19:51 नवीन
इतका बोलबाला झाल्यावर ते गाणं पाहिलं. नाच हा झिंग आणणारा असला तरी असे नाच बर्‍याच शिनेमांमध्ये आधीही झालेत. फ्यान्ड्री पाहिला नसल्याने हाही पाहीन की नाही माहित नाही. ती मुलगी वयानं लहान आहे. फारच गोड्ड आहे व मला आवडली. तिचे डोळे बोलके आहेत, खरच गोड मुलगी. त्यातील मुलगा हा पैलवान होता म्हणे! तोही चांगला आहे. यावर परिक्षण येईल ते वाचीन.
  • Log in or register to post comments

+11111 रेवतीतै...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 19:53 नवीन
+11111 रेवतीतै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

[खोचक मोड ऑन]

तर्राट जोकर
गुरुवार, 04/28/2016 - 20:02 नवीन
[खोचक मोड ऑन] हे काय संगित म्हणायचे काय? कुणीतरी गातंय, कुणीतरी काहीतरी वाजवतंय, असं आधीही होऊन गेलंय, काही नवीन नाही. कुणीही काहीही गाण्याबजावण्याशिवाय संगित दिलं तर म्हणेन की काहीतरी नवीन आणलंय, क्रिएटीव्हिटी आहे. गाण्यासारखं गाणं , उगाच डोक्यावर घेतात लोक. [खोचक मोड ऑफ]
  • Log in or register to post comments

:-)

प्रदीप साळुंखे
गुरुवार, 04/28/2016 - 21:31 नवीन
चपखल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चपखल

सतीश कुडतरकर
Fri, 04/29/2016 - 11:14 नवीन
AAMHI KADHALI TIKAT SHANIVARCHI. MARATHI PICTURE AAHE, DOKYAVAR GHENARACH. ENGLISH SATHI MAAFI.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कसा वाटला?

वगिश
Sat, 04/30/2016 - 19:18 नवीन
कसा वाटला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

पुण्यात हाऊसफुल्ल

सत्याचे प्रयोग
गुरुवार, 04/28/2016 - 20:11 नवीन
पुण्यातील बर्‍याच थिएटर चे शुक्रवारचे शो हाऊसफुल्ल झालेत
  • Log in or register to post comments

हायला गांधीबाबा तुम्हाला पण

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 20:17 नवीन
हायला गांधीबाबा तुम्हाला पण झिंगाट् आवडतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

व्हय राजे

सत्याचे प्रयोग
गुरुवार, 04/28/2016 - 23:36 नवीन
पहिला दिवस पहिला खेळ पहायला जातोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

तसे काही रेव्होलुशनरी वाटले

आनन्दा
गुरुवार, 04/28/2016 - 20:40 नवीन
तसे काही रेव्होलुशनरी वाटले नाही. झिंगाट् चांगले वाटले, तेही एक विशिष्ट मूड असेल तरच. बाकी गाणी फारशी आवडली नाहीत. कदाचित ओव्हरहाईप झाल्यामुळे असेल. बाकी - भाषा वगैरे मराठवाड्याची बोलीभाषा असल्यामुळे तिकडच्या लोकांना हे जास्त रिलेट करता येईल, त्यामुळे त्यांना जास्त आवडेल हे समजू शकतो. पिक्चर बद्दल बोलायचे झाले तर एकंदरच हा थोडासा हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांकडे झुकणारा वाटला. अर्थात पुन्हा जनरल मराठवाड्यावर असलेला तेलगू चित्रपटांचा प्रभाव पाहता यात देखील फारसे आश्चर्य वाटले नाही. पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.
  • Log in or register to post comments

नै बाकी ठिकय. फक्त ती भाषा

अस्वस्थामा
गुरुवार, 04/28/2016 - 21:34 नवीन
नै बाकी ठिकय. फक्त ती भाषा सोलापूर, करमाळा या बाजूची आहे. मराठवाडा अजून पल्याड राहिला हो.
पण एकंदरीतच मराठी चित्रपटांचा किंवा एकंदरीतच भारतीय चित्रपटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा.
पण त्याहीपेक्षा एकंदरीतच so called "ग्रामीण" मराठी चित्रपटांचा सातारा-सांगलीच्या पलिकडे (म्हंजे पूर्वेकडे) होणारा प्रवास अभ्यासाचा विषय ठरावा. तसे पुण्या-मुंबईच्या लोकांना सगळे "ग्रामीण" सारखेच म्हणा. (आमची मुंबईच्या हापिसातली मुंबईकरीण पुणेकरास तो पुण्याला जात असताना "गावी चाललास काय?" असे विचारायची ते आठवलं.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये

आदूबाळ
गुरुवार, 04/28/2016 - 21:42 नवीन
पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये समुद्र दिसतोय. ही काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

गेले असतील मंबईला फिरायला,

अस्वस्थामा
गुरुवार, 04/28/2016 - 22:03 नवीन
गेले असतील मंबईला फिरायला, काय प्रॉब्लेमय वो..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

उजनी धरणाचे backwater आहे

राघवेंद्र
गुरुवार, 04/28/2016 - 22:54 नवीन
उजनी धरणाचे backwater आहे असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ओह्ह्ह, अच्छा. त्वरित बघणे

आदूबाळ
गुरुवार, 04/28/2016 - 22:57 नवीन
ओह्ह्ह, अच्छा. त्वरित बघणे आहे हा सिनेमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

गाणी जबरा आहेतच,सिनेमाही

प्रदीप साळुंखे
गुरुवार, 04/28/2016 - 21:26 नवीन
गाणी जबरा आहेतच,सिनेमाही असणारच, अजय-अतुल म्हणजे शेवटच.गाणी गावटी आहेतच पण त्यामध्ये एक वेगळी नशा आहे,ती गावटी लोकांनाच जाणवेल. ग्रामीण जीवन जगलेल्यांना/जगत असणार्यांना सिनेमा आवडेल. बाकि नागराजचे सिनेमे वास्तववादी असतात, एखाद्या सामान्या माणसाला उचलून एका दिवसात हिरो बनवण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यात. मोठ्या कलाकारांशिवायही चित्रपट दर्जेदार बनू शकतो हे त्याने दाखवून दिलयं. शहरी राहणीमान असणार्यांना फारसा आवडणार नाही. . . ---( गावटी )
  • Log in or register to post comments

साळुखे साहेब अगदी बरोबर

चंद्रनील मुल्हेरकर
गुरुवार, 04/28/2016 - 21:31 नवीन
साळुखे साहेब अगदी बरोबर ,आम्हा ग्रामिण आणि शेतकरी लोकांना असे चित्रपट चांगले रिलेट करता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे

सहमत चंनी साहेब.

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 21:34 नवीन
सहमत चंनी साहेब. आयला काय जबरा जादू केल्या त्या गाण्याने...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर

..

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 04/28/2016 - 22:02 नवीन
मस्त गाणी!!! जाम आवडली, "सैराट झालं जी" एक नंबरच!! बाकि, महाराष्ट्र म्हणजे पुणे,मुंबई अशी मानसिकता असणार्यांना काय ढेकळं समजणार नाही पिक्चरमधलं. ▼ ▼ ▼एका आर्चीचा परश्या
  • Log in or register to post comments

पुण्यातले सगळे शो बुक झाले

चंद्रनील मुल्हेरकर
गुरुवार, 04/28/2016 - 22:15 नवीन
पुण्यातले सगळे शो बुक झाले म्हणे ..
  • Log in or register to post comments

पौगंडावस्थेतील

तर्राट जोकर
गुरुवार, 04/28/2016 - 22:17 नवीन
पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...होणारे संस्कार हे फॅन्ड्री, टाइमपास, शाळा अशा चित्रपटांतून होतात असं मानणार्‍या पालकांना माझा साष्टांग नमस्कार. दंडवत. तुमचे चरणकमलांचे फोटो जरा मला पाठवा. द्येव्हार्‍यात ठेवीन म्हणतो. तुम्ही (काळजीवाटणार्‍या पालकांना उद्देशून) बालकपालक चित्रपट बघितला काय हो? बघितला असेल तर तुम्ही त्यातून काहीच शिकले नाही असे वाटते. नसेल तर बघून घ्या. पौगंडावस्थेतली पोरं काय काय करतात हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला खरंच जागं आणि मुख्य म्हणजे प्रगल्भ होण्याची गरज आहे. जेव्हा मी दहावीला होतो, अंदाजे १९९५ चा काळ, तेव्हा माझ्या शाळेतली सहावीतली मुलं-मुली एकमेकांना चिठ्ठ्या देत होती हे सोताच्या डोल्यानं बघितल्याव. वीस वर्ष झाली त्याला. तेव्हा कुठे फॅन्ड्री टाइमपास, शाळा होते? तेव्हा तर अधेड उम्रके बेटे, पुलिस इनिस्पेक्टर, बडे बापकी बेटीला पटवत होते, झाडांमधून घिरट्या घालत कवायती करत होते. दोन फुलांना टेकवून सुचित करायच्या हरकती सरेआम पडद्यावर तेही चायागित्त, रंगोली, चित्रहार मधून घरोघरी दिसत होत्या. प्रेमाचं प्रदर्शन आणि शारिरीक संबंधाचे चाळे दाखवणारे चित्रपट तर आठवड्यातून तीनदा दूरदर्शन नामे लोकजागरासाठी वाहलेल्या च्यानलवर लागत होते. ज्या गोष्टींचे उदात्तीकरण केले जाते त्या अनुकरण करु पाहण्याचा पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. फॅण्ड्रीत एका शॉटमधे हे उत्तम दाखवलंय. जब्या कपड्यांच्या दुकानाबाहेर उभा असतो. तिथल्या मोठ्या पोस्टरवरच्या मॉडेलकडे बघुन स्वतःला तसं बघतो असं दाखवलंय. मुलांमधे हे कुठून येतं हे आपल्या आजूबाजूला इतकं ढळढळीत चालू असतांना त्याच गोष्टी टिपणार्‍या चित्रपटांना दोष देणे हास्यास्पद आहे. हे म्हणजे बलात्काराच्या बातम्या वृत्तपत्रात येतात म्हणून बलात्कार करण्याची प्रेरणा मिळते व असे प्रकार वाढतात असे म्हणणे आहे. संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.
  • Log in or register to post comments

..

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 04/28/2016 - 22:40 नवीन
पौगंडावस्थेतल्या पोरांचा कल नैसर्गिक आहे. हेच्च म्हणतो.काही अडल्ट कंटेट वगैरे बघून परिणाम होत असेल थोडाफार पण तो क्षणिक असतो.
संस्कार माय फूट. खरं दुखणं यागळंच आहे.
व्हयं!!!! ते अणि काय वो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे राम. हे अ‍ॅडल्ट

तर्राट जोकर
गुरुवार, 04/28/2016 - 23:20 नवीन
हे राम. हे अ‍ॅडल्ट कन्टेन्टबद्दल आहे असे का वाटलं तुम्हास्नी. भारतीय हिंदी चित्रपटांमधे प्रेमकहान्या एक मोठा पार्ट व्यापुन आहेत. प्रेमकहान्या हळुवारपणे फुलतात, दोघे जीव एकेमेकांसाठी जान की बाजी लावतात, एकमेकांसाठी अलम दुनियेला ठुकारावुन लावतात. पौगंडावस्थेतल्या कावर्‍याबावर्‍या असलेल्या, आपली ओळख, अस्तित्व वेगळं आहे असे जाणवू लागलेल्या पोरांना त्यांचे संसाराच्या कोलूत खंतावलेले आईबाप समजून घेउ शकत नाहीत, ते त्याला/तीला अजूनही कुक्कूलं बाळ समजून त्यांना पाहिजे तसं वागवायला बघतात, अशावेळेस फक्त त्याला/तीलाच महत्त्व देणारं, तिच्या/त्याच्या भोवती आपलं जग विणणारं, तो/ती म्हणेल तसं वागणारं, खास आपल्यासाठी जगणारं, आपलंच स्वप्नं बघणारं कोणी भेटलं तर हवंच असतं. पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

I know हे अडल्ट कंटेंट नाहीये

खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 04/28/2016 - 23:40 नवीन
I know हे अडल्ट कंटेंट नाहीये, माझा रोख दुसरीकडेच आहे कि अडल्ट कंटेट पाहिल्यावर त्याचा परिणाम हा क्षणिक असतो,म्हणजे त्याचमुळे माणूस बलात्कारी बनतो अशी धारणा चुकीचे आहे.मी थोडं अवांतर केलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तजो तुमच्या वरील प्रतीसादाला

राजाभाउ
Fri, 04/29/2016 - 11:02 नवीन
तजो तुमच्या वरील प्रतीसादाला १००% सहमत अस लिहीणार होतो, पण या प्रतीसादाला १०००% सहमत. म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पालकानी कसे वागु नये याचा एका अर्थी वस्तुपाठच आहे वरील प्रतीसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

पडद्यावरच्या प्रेमकहान्या

बोका-ए-आझम
Tue, 05/03/2016 - 01:24 नवीन
पडद्यावरच्या प्रेमकहान्या ह्या जाणीवेला अजून फु़ंकर घालतात, पेटवतात, त्या जाणिवा लैंगिकच आहेत असे समजणे चुकीचे आहे.
का चुकीचं? आणि मुळात लैंगिकता हे आणि हेच कारण आहे. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं यात काहीच चुकीचं नाहीये. अर्थात लोक जेव्हा प्रत्यक्ष आणि कथा यांच्यातली सीमारेषा विसरतात, तेव्हा गोष्ट गंभीर होते हे खरं आहे. आईवडिलांनी आणि मित्रांनी तेच काम करायला पाहिजे. जमिनीवर आणण्याचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी

तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 02:14 नवीन
सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी त्या लैंगिक आहेत हे त्यावेळी मनाला माहित नसतं. 'त्यांच्या मुळाशी लैंगिकता आहे' हे विधान तात्विक चर्चेत, विद्वानांच्या सभेत, वैद्यकिय प्रबंधांत योग्य आणि सत्य आहे पण हे किशोरावस्थेतल्या मुला-मुलीला वळत नसतं. ते न उमगणं समजून घ्यावं असं माझं म्हणणं आहे. 'एखाद्या मुलीचा एखाद्या मुलावर क्रश आहे आणि तीने त्या मुलाचा कुठेतरी पडलेला रुमाल आपल्याजवळ खाजगीत गुप्तपणे लपवून ठेवला' ह्या कृतीला आपण 'तीला त्याच्यासोबत ***चेच होते म्हणून तीने असे केले' इतक्या टोकाला नाही नेऊ शकत. काही टप्पे (अर्थात माझे निरिक्षण: सॅम्पल गृप बराच मोठा आहे पण आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे शास्त्रिय आधार नाही) पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींना तर आपल्याला एखादं माणूस आवडतंय हेही कळत नसतं, नुसतं ओढलं जाणं, विचारांमधे गुंतत जाणं, भान हरपणं, हे सगळं आतलं, एकतर्फी, एकटं. ती व्यक्ती गृपमधे, ओळखीत असेल तर नकळत तीला आवडेल असे वागणे, तीची काळजी घेणे, तीच्यासाठी खस्ता खाणे, उपद्व्याप करणे, मदत करणे, स्वतःला व स्वतःचे महत्त्वाचे उद्योग विसरुन तीच्यामागे राहणे हे जरा प्रकट, तरीही अनभिज्ञ. पुरेसं प्रकट त्या व्यक्तीच्या दर्शनाविना कळवळून जाणं, असुरक्षित वाटणं, ती सतत जवळ असावी असं वाटणं, त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणं आणी ते करणंही, ह्यात प्रत्यक्ष तसं व्यक्त करायची गरज भासते. मुलं-मुली प्रेमाची कबूली देतात. एकदा रितसर दोन्हीकडून कबूली झाल्यावर सहवास वाढतो, विश्वास, जवळीक वाढते, अजून अजून जवळ येण्याची तृष्णा वाढते, लैंगिकता ह्या टप्प्यावर जाणवू लागते, आणि ती पुढे चटकन मूर्त रुप घेऊ शकते. लैंगिकता हा एक क्षीण आवेग आहे, अनेक रुपं, पुटं चढवून तो येतो. जसजसा जवळ येतो तशी पुटं गळून पडतात आणि मूळ रुपात भिडतो. आवेग ओसरुन गेल्यावरही ती अधिरता, तो विश्वास, ते प्रेम, ती आपुलकी तशीच राहत असेल तर पुढे संगोपनास आवश्यक ठरते. आईवडिल आणि मित्रांनी जमिनीवर आणायचे म्हणजे काय आणि कसे ते समजले नाही. उपयोग नसतो असा अनुभव आहे. मुळात अशा काही गोष्टी उपटूच नये म्हणून पालकांनी खूप जागरूक (मुलांचे मित्र बनणे इ.) राहावं लागतं आणि ते पालकांना ज म त नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. कारण मुलांचे मित्र बनण्याच्या ऐवजी अनेक महत्त्वाच्या भूमिका चाळीशी-पन्नाशीतल्या पालकांना पार पाडाव्या लागतात. मुलांना काही शिक्षण देण्याअगोदर पालकांना पालक व्हायचे शिक्षण दिले पाहीजे या मतावर मी येऊन पोचलोय. असो. अर्थात काही मुलं आजकाल हे वरचे टप्प्यांच्या फंदात पडत नाहीत असेही निरिक्षण आहे. आजकाल 'फ्रेण्शिप देती का', 'लवशिव देती का' किंवा नुसतंच 'देती का' ह्या तीन प्रश्नाचे टप्पे राहिले आहेत. ठळकपणे आढळत असेल तरी हेही सार्वत्रिक नाही हेही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तजो

बोका-ए-आझम
Tue, 05/03/2016 - 10:15 नवीन
पालकांना पालक होण्याचं शिक्षण दिलं पाहिजे याच्याशी १००% सहमत. तसं दुर्दैवाने होत नाही. खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) त्यामुळे या पिढीतल्या लोकांनी आपल्या मुलांबरोबर मित्रत्वाचं नातं निर्माण करायला हरकत नाही. पण त्यासाठी खास प्रयत्न केले जाताहेत का हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. मी त्याच्याकडे ब-याच व्यापक दृष्टीने बघतो. शारीरिक आकर्षण हा मुद्दा आहेच पण या अवस्थेत मुलांना त्यांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम भिन्नलिंगी व्यक्तीवर कसा होतोय हेही बघायचं असतं (gratification). त्यांची स्व-प्रतिमा आणि स्व-मूल्य (self-image and self-esteem) या भिन्नलिंगी प्रतिसादांवर अवलंबून असतात. हाही लैंगिकतेचाच एक भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

+१

दिग्विजय भोसले
Tue, 05/03/2016 - 10:35 नवीन
पौगंडावस्थेतील जाणीवा ह्या लैंगिकच असतात पण तेवढं कळण्याइतकी परिपक्वता त्या वयात नसते. पण आजकाल ती परिपक्वता इंटरनेटमुळे यायला लागली आहे. पौगंडवस्था म्हणजे नेमकं किती वय? याचं संशोधन करून नव्याने त्याची परिभाषा याकाळात ठरवायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

खरंतर १९७० आणि ८० च्या

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 10:56 नवीन
खरंतर १९७० आणि ८० च्या दशकातील पिढी, जी आज चाळीशी आणि तिशीत आहे, तिचे आपल्या पालकांबरोबर असलेले संबंध पुष्कळ समजुतीचे होते (हे सरसकटीकरण नसून अंदाज आहे.) >> तुमचा अंदाज शंभर टक्के योग्य आहे. त्या पिढीच्या पौगंडावस्थेच्या भोवतालात आणि आज ९५ नंतर जन्मलेल्यांच्या भोवतालात भयंकर फरक आहे. तेव्हा आपली पिढी (३५-४५) शाळा व घर इतक्याच परिघात होती. आपला वेळ घरच्यांशी बोलण्यात, कामे करण्यात, खेळण्यात, अभ्यासात जात असे. संपर्काचे साधने कमी असल्याने, आजसारखे इण्टरनेट-मोबाईलने सगळं जग उघडं पडलेलं नव्हतं. शाळा-क्लासेसमुळे फक्त झोपायला जेवायला घरी असा प्रकार नव्हता. आज वातावरण खुप बदललेलं आहे. मुलं ज्यापद्धतीने व वेगाने जगाला एक्पोज होतायत तेव्हा इथून पुढे आईवडिलांचं कठिण आहे असे जाणवतंय. तुम्ही लैंगिकता हा शब्द फक्त शारीरिक आकर्षण या संदर्भात बघताय असं वाटतं. >> लैंगिकता ही मी पौगंडावस्थेतल्या मुलांच्या दृष्टिकोनातून बघत आहे. तुम्ही दिलेलं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण मान्यच आहे पण हे कोवळ्या, अनभिज्ञ जीवांना कळत नाही हा माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

समर्पक शब्दांमध्ये

lakhu risbud
Tue, 05/03/2016 - 13:48 नवीन
तजो,अत्यंत समर्पक शब्दांमध्ये विचार व्यक्त केलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

खरं दुखणं यागळंच आहे.

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 22:47 नवीन
खरं दुखणं यागळंच आहे.
हा शोध कसा लावलात? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

1995 NAAY 1987

सतीश कुडतरकर
Fri, 04/29/2016 - 11:20 नवीन
MI SAATVILAA ASTANA MAJHYAPEKSHA VAYANE 2 VARSHE MOTHE ASLELYA MULACHYA CHITTHYA TYACHYA PREYASILA DYAYACHO. THODKYAT KABUTAR HOTO.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सहमत

lakhu risbud
Fri, 04/29/2016 - 15:29 नवीन
तजो यांच्याशी सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हे एक राहिलंच, अस्मादिक तीसर्

तर्राट जोकर
गुरुवार, 04/28/2016 - 22:23 नवीन
हे एक राहिलंच, अस्मादिक तीसर्‍या वर्गात असल्यापासून एकनिष्ठ रामाच्या एकाग्रचित्ताने एका सुंदर बालिकेचे (तीसर्‍या वर्गातली) एकतर्फी प्रेमी होते. अकरावीपतुर एकतर्फी सांभाळलं पण खुलासा झाल्याने प्रियतमेच्या भावबंधांनी सोप्या भाषेत भेटगांठ घेतल्याने प्रकरण थांबले. त्याबद्दल सविस्तर लिविनार, मज्जा होती तीपन एक. आमचे मातोश्री पाटीवर तीचे नाव मी गिरवीत बसल्याचे पाहुन ... असो. ट्रेलर काफी. पिच्चर बादमें.. =))
  • Log in or register to post comments

तर्राट जोकर सेठ, चित्रपट

वैभव जाधव
गुरुवार, 04/28/2016 - 22:51 नवीन
तर्राट जोकर सेठ, चित्रपट मंजुळे यांचा असला तरी झी मराठी ची निर्मिती आणि मार्केटिंग आहे. काही लोकांमध्ये आर्थिक फायद्या तोट्याबाबत शिक्षण कमी पडत असावं ;) - खरं दुखणं आणि ठसठस वृत्त!
  • Log in or register to post comments

झणाट गाणी!!! मस्त हाईप

दिग्विजय भोसले
गुरुवार, 04/28/2016 - 22:57 नवीन
झणाट गाणी!!! मस्त हाईप निर्माण झाली आहे. काय खतरा कडवं हाय हे,किती खोल अर्थ दडलाय. सुलगं ना ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या दुखनं हे देखनं गं एकलचं हाय साथीला काजळीला ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला चांदणीला अवताण धाडतुया रोजं रातिला झोप लागना सपानं जागवाया लागलं पाखरुं कसं…. आभाळ पांघरायां लागलं याड लागलं गं याड लागलं गं
  • Log in or register to post comments

तर्राट जोकर १+

चैतू
गुरुवार, 04/28/2016 - 23:41 नवीन
तर्राट जोकर १+
  • Log in or register to post comments

"याआधी असा बोलबाला बिनधास्त

श्रीरंग
गुरुवार, 04/28/2016 - 23:43 नवीन
"याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे." अंकल.. फारच वहावत गेलात की स्तुती करण्याच्या नादात. झी च्या सर्व मराठी चॅनेल्सवर मिनिटागणीक चाललेल्या जाहिराती पहा. वारेमाप खर्च म्हणजे काय ते दिसेल.
  • Log in or register to post comments

झीवाले स्वतःच निर्माते आहेत.

बोका-ए-आझम
Tue, 05/03/2016 - 10:21 नवीन
त्यामुळे स्वतःच्या चॅनेल्सवर ते जाहिरात करणारच. पण त्यासाठी त्या चॅनेल्सना काही उत्पन्न मिळालं असेल असं वाटत नाही. असलं तरी ते transfer pricing स्वरूपातलं असणार. म्हणजे झीच्या एका कंपनीने झीच्याच दुस-या कंपनीला पैसे देणं. एका खिशातून पैसे काढून दुस-या खिशात टाकण्यासारखं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

कौतुक वाटते

श्रीरंग_जोशी
Fri, 04/29/2016 - 00:06 नवीन
वर्षानुवर्षे हिंदी चित्रपटांची प्रदर्शनपूर्व हवा अनुभवल्यावर मराठी चित्रपटांची तशी हवा पाहून कौतुक वाटत आहे. आज प्रथमच युट्युबवर सैराटची गाणी पाहतोय. ग्रामीण महाराष्ट्रातला उत्साह छान प्रतिबिंबित केला आहे. सादरीकरणावर जयम सारख्या तेलुगु चित्रपटाचा प्रभाव वाटतोय. वरच्या या प्रतिसादातला मजकूर चेपूवरही वाचला होता. यात केलेला दावा अन मिपावर पूर्वी केला गेलेला एक दावा आठवला - 'वाढत्या वयात शामची आई वाचून मुले साने गुरुजींसारखी बनण्याचा धोका असतो'. अशा भाबडेपणाची गंमत वाटते. सैराटला शुभेच्छा!! बादवे समाजमाध्यमांतून होणार्‍या प्रचारासाठीही भरपूर पैसे खर्च केले जातात जे प्रत्यक्षपणे दिसत नसतात.
  • Log in or register to post comments

हैल... लै भारी प्रतिसाद.

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 00:11 नवीन
हैल... लै भारी प्रतिसाद. आवळ्ळला आप्ल्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा