✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा विडंबन स्पर्धा - निकाल

स
साहित्य संपादक यांनी
Mon, 03/28/2016 - 16:04  ·  लेख
लेख
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली. आणि तिच्यात रंग भरण्याचं काम स्पर्धकांनी जितकं चोख केलं, तितकंच मतदात्यांनीही केलं. प्रेम, राजकारण, फजिती अशा तीनही विषयांच्या प्रवेशिकांना भरपूर मतदान झालं. वाचकांनी त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. बुरा ना मानो होली है! ही उक्ती सार्थ ठरवत अवघ्या मिपाविश्वाने या सगळ्याची मजा लुटली. आता शेवटचा टप्पा; निकालाचा. प्रत्येक विषयाचे अग्रणी तीन क्रमांक इथे जाहीर करत आहोत. त्यातील पहिला क्रमांक अर्थातच त्या विषयाच्या विडंबन स्पर्धेचा विजेता आहे. प्रेम : प्रथम क्रमांक - ज्ञानोबाचे पैजार - लव्ह करणे तुजवरती द्वितीय क्रमांक - बहुगुणी - जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली तृतीय क्रमांक - नीलमोहर - प्रेम कर हरणीसारखं --------------------------------------------------- राजकारण : प्रथम क्रमांक - सर्वसाक्षी - मताचे श्लोक द्वितीय क्रमांक - आनंद मोरे - परत ये रे मल्ल्या तृतीय क्रमांक - बहुगुणी - देता मते कुणाला --------------------------------------------------- फजिती : प्रथम क्रमांक - स्वामी संकेतानंद - ओल्ड मंक येता येता द्वितीय क्रमांक - ज्ञानोबाचे पैजार - चांगली खोली दिलीस देवा तृतीय क्रमांक - बहुगुणी - हनुवटी रुतुनी आहे --------------------------------------------------- वरील स्पर्धक व विजेत्या विडंबनांव्यतिरिक्त आलेली इतर सर्वच विडंबनं एकापेक्षा एक सरस होती, आणि ती आपण सगळ्यांनीही बघितलीतच. पण स्पर्धा म्हटलं की चुरस, चुरस म्हटलं की विजेतेपद हे सगळं आलंच. त्यामुळे मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांना व्यनितून त्यांचं प्रशस्तीपत्रक धाडण्यात येईल. बाकी काही म्हणा, रंगांचं कसं असतं, की एकटाच एकटा रंग तितका खुलून दिसत नाही. पण रंग जेंव्हा एकमेकात मिसळतात ना, तेंव्हा खरी धमाल येते. मिपाचं सार नेमकं हेच आहे. मिसळा आणि उधळा; मग एकच धुरळा ! चांगभलं ! इतर प्रवेशिका खालीलप्रमाणे ------------------------------------------------------- प्रेम जिथे सागरा धरणी मिळते - प्रमोद देर्देकर काय करू देवा? - संदीप चांदणे राजकारण ठकतंत्रांचे देणे - बाजीगर मीडिया बटकिणी - राजेश घासकडवी तुणतुणे - संदीप चांदणे छद्मबंध - स्वामी संकेतानंद णवणाग स्ट्रोट्र - ज्ञानोबाचे पैजार माल्या तुला शोधू कुठ - मंदार भालेराव नेते ते करीती - मनमोहन रोहिदास रोगे कुठे शोधिसी मल्ल्या आता - दमामि फजिती येशील येशील येशील दोस्ता - संदीप चांदणे चणा - नीलमोहर सोच नाही तेथे… - दमामि
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
6950 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणी

मृत्युन्जय
Mon, 03/28/2016 - 16:06 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणी स्पर्धकांचे देखील.
  • Log in or register to post comments

तीन भागात बहुगुणींचा लंबर.

अभ्या..
Mon, 03/28/2016 - 16:13 नवीन
तीन भागात बहुगुणींचा लंबर. दोन भागात पैजार माऊली. भारी भारी. उर्वरित सर्व विजेत्यांचे मीनंदन.
  • Log in or register to post comments

सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन!

पैसा
Mon, 03/28/2016 - 16:15 नवीन
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! सर्वांनाच विनंती की आपआपल्या विडंबन कवितांचे स्वतंत्र धागे टाका म्हणजे प्रत्येकाचा स्वतंत्र आस्वाद घेतायेईल.
  • Log in or register to post comments

अरे वा!

खेडूत
Mon, 03/28/2016 - 16:17 नवीन
अरे वा! सर्व विजेत्यांचे अभिनंदन! सहभागी कवींचे कौतुक. विडंबन करणे महाकठीण काम. तीनही प्रकारांत नंबर काढल्याबद्दल बहुगुणी यांचे विशेष अभिनंदन! दोन प्रकारांत निवड झाल्याबद्दल पैजार बुवांचे खास अभिनंदन..
  • Log in or register to post comments

+++ १११

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/28/2016 - 22:05 नवीन
+++ १११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

+२

सस्नेह
Tue, 03/29/2016 - 10:43 नवीन
विडंबन महाकठीण काम. त्यातून नंबरात यायचे म्हणजे खाऊ नव्हे. तस्मात सर्व स्पर्धकांना कॉम्प्लिमेंट्स आणि विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

#कायच्याकाहीप्रतिसाद!

एस
Mon, 03/28/2016 - 16:17 नवीन
मी न केलेल्या विडंबनाला न मिळालेल्या पारितोषिकाबद्दल स्वतःचे नभिनंदन नरून नेतो. ;-) झक्कास झाली स्पर्धा. विडंबने दर्जेदार आणि खळखळून हसविणारी होती. क्या बात है! सर्वांचे अभिनंदन आणि जोरदार टाळ्या.
  • Log in or register to post comments

मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली.

भाऊंचे भाऊ
Mon, 03/28/2016 - 16:21 नवीन
हम्म.. माहिती बद्दल धन्यवाद. आता अस्वाद घ्यावा म्हणतो. सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

कौतुक

नाखु
Mon, 03/28/2016 - 16:22 नवीन
जोरदार अभिनंदन आणि सर्वांना टाळ्या. नाखु विडंबन वाला
  • Log in or register to post comments

विजेत्या्चे अभिनंदन

मित्रहो
Mon, 03/28/2016 - 16:23 नवीन
विजेत्या्चे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

प्रचेतस
Mon, 03/28/2016 - 16:23 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धा सुरेखच झाली. इतर विडंबंकांची विडंबनेसुद्धा छानच होती. त्यांची नावे जाहिर करण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आणि

वेल्लाभट
Mon, 03/28/2016 - 16:54 नवीन
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आणि विजेत्यांचे विशेष कौतुक !
  • Log in or register to post comments

आयला...जाम भारी!

चांदणे संदीप
Mon, 03/28/2016 - 17:14 नवीन
पैजारबुवा.... ___/\___ बहुगुणी सर(आप भी?!!) ___/\___ नीलमोहर - प्रेम कर प्रेम कर हरणीसारखं... हम्म... लक्षात आलेलं लगेच! ;) स्वामीजी.... गुड वन! आनंद मोरे.... मल्ल्या रडतोय बघा वाचून! :) सर्वांचे अभिनंदन आणि मिपाचे आभार! मजा आली....अजून नव्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत! Sandy
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन!

प्राची अश्विनी
Mon, 03/28/2016 - 17:19 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन! मजा आली वाचताना!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

किचेन
Mon, 03/28/2016 - 17:28 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचं अभिनंदन!

अजया
Mon, 03/28/2016 - 17:48 नवीन
सर्व विजेत्यांचं अभिनंदन! बहुगुणींचं त्रिवार अभिनंदन!
  • Log in or register to post comments

बहुगुणी.... नाव सार्थ केलेत..

Anand More
Mon, 03/28/2016 - 17:53 नवीन
बहुगुणी.... नाव सार्थ केलेत... मनःपूर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

चांगली खोली दिलीस देवा

जव्हेरगंज
Mon, 03/28/2016 - 18:03 नवीन
चांगली खोली दिलीस देवा यावर एक गाणं झालंच पाहिजे !! विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

जोरदार टाळ्या आणि

बोका-ए-आझम
Mon, 03/28/2016 - 18:03 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

जोरदार टाळ्या आणि

बोका-ए-आझम
Mon, 03/28/2016 - 18:07 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी!! इतर सर्व

स्वामी संकेतानंद
Mon, 03/28/2016 - 20:03 नवीन
धन्यवाद मंडळी!! इतर सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

आदूबाळ
Mon, 03/28/2016 - 20:07 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन, प्रतिसादकांचे आभार!

बहुगुणी
Mon, 03/28/2016 - 20:53 नवीन
आता मिपावरील हौशी गायक-गायिकांनी सर्वच विडंबने मूळ सुरावटीत गाऊन प्रकाशित करावीत म्हणजे आणखी धमाल येईल!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे आणि

रातराणी
Mon, 03/28/2016 - 22:41 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! मज्जा आली!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/28/2016 - 23:15 नवीन
सर्व विजेत्यांचे सर्व सहभागी मिपाकरांचेही अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

नीलमोहर
Mon, 03/28/2016 - 23:25 नवीन
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!!

जुइ
Mon, 03/28/2016 - 23:29 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

सर्व स्पर्धकांचे आणि

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/28/2016 - 23:36 नवीन
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे आणि

संजय पाटिल
Tue, 03/29/2016 - 06:58 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

यशोधरा
Tue, 03/29/2016 - 07:50 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! मजा आली विडंबने वाचायला :)
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचं अभिनंदन!!!

दमामि
Tue, 03/29/2016 - 14:18 नवीन
सर्व विजेत्यांचं अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

सर्व

सुमीत भातखंडे
Tue, 03/29/2016 - 17:24 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मस्त झाली स्पर्धा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा